सापळा - प्राईम व्हिडीओ
दिग्दर्शक - निखिल लांजेकर
निर्माते - शिवकाल से दिग्पाल लांजेकर, चिन्मय मंडलेकर और उनके बहोत सारे साथी.
कलाकार - समीर धर्माधिकारी, नेहा जोशी, दीप्ती केतकर आणि चिन्मय मंडलेकर ( कळलं ना ?)
चित्रपटाचा प्लॉट चार ओळींचा आहे. पण त्याची ट्रीटमेंट हिचकॉकच्या रहस्यपटांची आहे असा दिग्दर्शकाचा आणि लेखकाचा (श्रीनिवास भणगे) समज आहे. तसा संवाद एका पात्राच्या तोंडी आहे. पात्राच्या तोंडून लेखकच बोलतो किंवा नाही बोलत. " इंग्रज गेला तो कंटाळून" हे वाक्य पुलं च्या मनातले नसून पात्राच्या तोंडचे आहे. इथे मात्र संशयाला जागाच नाही.
वैधानिक इशारा : इथून पुढे स्पॉयलर्सच स्पॉयलर्स आहेत आहेत.
(हा इशारा तळटीप म्हणून पण दिला आहे. एखादा माझ्यासारखा खालून वर येतो त्याच्यासाठी)
कोचावर एक मिसेस परेशान बसलेली आहे. परेशान हे नाव देवेन वर्माचं होतं. त्यात तो कथा लिहीण्यासाठी परेशान झालेला असतो. इथे ही बाई परेशान आहे . फरक इतकाच कि तिचा नवरा लेखक आहे. नेहा जोशी ही कामवाली आहे. हल्ली कामवाल्या बायका सहा पदरी साडी, ती ही काठाची नसलेली नेसतात, हे लांजेकर, चिन्मय मंडलेकरला माहिती नसेल. ऐतिहासिक चित्रपट बनवता बनवता महाराष्ट्रातल्या ग्रामीण बायका किंवा कामवाल्या बायका काठापदराच्याच साड्या नेसत असतील एव्हढंच बरं यांना कळतं. तो ही ग्रामीण भागातून दाखवला आहे मग फेटा, धोतर, कोपरी अशा वेषात का नाही ? ये न्याय्य नही अन्याय्य है मिलॉर्ड !
सुरूवातीला नेहा जोशीच्या अंगात आलेलं आहे ( ती डोळे फार चमत्कारिक ( भारी या अर्थाने) करते). फिट आलेल्या बाईसारखे डोळे झालेत. त्यात तिला मालक ( परेशान बाईचा नवरा) बाहेर ओव्हरकोट चढवून पावसात प्रेत ओढताना दिसतो. तो बाहेर असताना घरात कुणाच्या तरी हातात चाकू आहे आणि परेशान बाई मागे सरतेय हे दृश्य तिला दिसते. परेशान बाई घाबरली आहे.
इथेच चाणाक्ष प्रेक्षक अंदाज बांधायला सुरूवात करतो. नेहा जोशीला घेतलंय म्हणजे ही मुख्य नायिकेचं मानधन घेणारी बया. मग तिला मोलकरीण का दा़खवलीये ? मालक प्रेत ओढताना दिसतो म्हणजे त्याला खून करायचाय बहुतेक. कदाचित नेहा जोशी (कौसल्या) आणि मालक बाईला (बायकोला) गंडवून खून करणार आहेत. हा प्लॉट मराठी नाटकात पहिल्यांदा पाहिलेला. त्यानंतर बायकोला वेडी बनवण्याचा प्लॉट असलेले रहस्यपट येऊन गेले. आता त्याला तीसेक वर्षे तरी झाली असतील. लांजेकरांना तीसेक वर्षे ही तीस सेकंदांसारखी वाटत असतील. त्यांचा मुक्काम तर त्याच्या ही किती तरी पाठीमागे आहे. अद्याप ते १६७० च्या पुढेच सरकलेले नाहीत.
समीर धर्माधिकारी (उदय रोहेकर) हा लेखक आहे. त्याने लिहीलेले अनेक सिनेमे गाजलेले आहेत. गेल्या काही वर्षात मात्र त्याचे ओळीने सिनेमे आपटलेले आहेत. त्याचं फ्रस्ट्रेशन त्याला आलेलं आहे. त्याला एका हिटची गरज आहे. तो हिट मिळवण्यासाठी त्याच्या डोक्यात योजना आहे. तो आपले सिनेमे कसे लिहीतो याबद्दल व्याख्यानं सुद्धा देतो. तिथे त्याला त्याच्यावर भाळलेला एक होतकरू नवोदीत लेखक दीपक सामंत (चि मं) भेटतो. तो त्याचं ताजं स्क्रीप्ट त्याला दा़खवतो. ते पाहून उदय त्याला घरी बोलावतो. हे स्क्रीप्ट त्याला मिळालं तर त्याला पुन्हा एक हिट मिळणार असतो.
वीसेक मिनिटे चित्रपट ससरकल्यावर दीपक सामंतचे आगमन होते. मग आपला पूर्वीचा अंदाज खूप लवकर बांधला असे वाटते. एक पात्रं वाढलं. आता कोण कुणाचा खून करणार ?
सुरूवातीलाच कौसल्येला तरण्या माणसाचा खून झालेला दिसत असतो. त्यानंतर उदय रात्री बेरात्री बाहेर आवारात खड्डा खणत असतो. भर दुपारी रेनकोट घालून पोत्यात वाळू भरून ते ओढत असतो. त्याचे विचित्र वागणे पाहून चित्रा (दीप्ति केतकर) तणावाखाली असते.
तिला हृदयरोग आहे. त्यातच तिला मधूमेह डिटेक्ट झालेला आहे म्हणून उदय कौसल्येवर त्याला गोड चहा दिला म्हणून वसकन धावून जातो. तिला मधूमेह आहे तर मला गोड चहा का ? जे तिला नाही मिळणार ते मलाही नाही मिळायला पाहीजे म्हणुन तो कपबशी तिच्या समोर आपटून फोडतो. २०२४ सालात मधूमेह म्हणजे १९७३ सालच्या आनंद मधला कॅन्सर आहे का ? समजा हे नाटक असले तरीही मधूमेह निघाला म्हणून इतकी ओव्हरअॅक्टींग न समजायला चित्रा सोडा कौसल्या पण बावळट नसायला पाहीजेत. इथेच चित्राचं मरणं अटळ आहे ही घंटा वाजू लागते. इतकं साधं समजत नसेल तर बाई जगून तरी काय फायदा ? कुणी ना कुणी तुला संकटात पाडेलच. त्या पेक्षा तू आताच सुटका करून घे. हे निष्ठूर जग तुझ्यासारख्या संतांसाठी नाहीच ग बाई.
उदय हा लेखक घरात भिंतीवर विविध खंजीर, कृपाण, तलवारी, पिस्तुलं आणि हातकडी पण टांगत असतो. कुठलीही कथा लिहीताना त्याला म्हणे महत्वाचा क्लू असणारी प्रॉपर्टी समोर लागते. इथे पुढचे कथानक फोडत नाही. अजूनही बघायचा असेल कुणाला तर.
( रहस्यकथालेखकाच्या तोंडी एक संवाद आहे.
" मी आधीच सांगितलेले ना, कि मी कुठलीच गोष्ट विनाकारण करत नाही. माझी रहस्यकथा लिहीताना मी अभ्यास करूनच लिहीतो" . केवळ या वाक्याने डॅन ब्राऊन आठवला. लेखकाचे नाव उदय रोहेकर ऐवजी धन्य काचोळीउन्हे असते तर समर्पक वाटले असते.)
खरे तर चौथ्या कि पाचव्याच फ्रेम मधे चित्रपटात ब्राँझचा हातात भाला घेतलेला पुतळा दिसतो. हाच पुतळा रामसे बंधूंच्या अनेक सिनेमात असतो. या पुतळ्याचे काही तरी प्रयोजन असायला पाहीजे म्हणून पूर्ण चित्रपट पाहिला. पण तेच रहस्य निघाले. म्हणजे चित्रपट संपला तरी त्याचे प्रयोजन हे रहस्यच राहीले.
समीर धर्माधिकारी हा गरीबांचा मिलिंद सोमण वाटतो. पण तो एका सिनेमात नायक होता आणि त्याला सहा नाही तरी साडेचार तरी पॅक्स असावेत. ( पाव पाव पॅक्स नाभीच्या दोन्ही बाजूला). त्यामुळे मिलिंद सोमणला गरीबांचा सध म्हटले तर योग्य होईल. पण मग या हिशेबाने समीर धर्माधिकारीला अजगर आणून द्यावा लागेल. आपण सधलाच गरीबांचा मिसो करू म्हणजे फुरसे पण चालेल.
इथे बजेट फारच महत्वाचे आहे. चित्रपटात बंगल्याच्या बाहेरचे मोजून दोन ते तीन सीन्स असावेत. बंगला म्हणजे हिल टॉपचे फार्महाऊस आहे. ते स्वस्तात मिळालेले असणार. सुरूवातीलाच एक एरीयल शॉट (ड्रोन ) घेतला आहे. त्यानंतर बाहेरचा सीन दिसतच नाही. चित्राच्या वकील भावाला फोन जातो तेव्हां तो कारमधे असतो. कारचा खर्च वाढला. ही कार कदाचित शूटींग लोकेशन पासून फर्लांगभर अंतरावर असावी. त्या वेळी ती बाहेरून न दाखवल्याने उदयला भेटायला त्याला सारखी फोन करणारी एक हिरॉईन येते तेव्हां बाहेरून हीच कार दाखवली असावी. ती कार फाटकाच्या बाहेर उभी असते तो एक शॉट घराच्या बाहेरचा. खिडकीतून उदय प्रेत ओढताना दिसतो तो एक आणखी बाहेरचा शॉट.
म्हणजे आत्मपॅफ्लेट मधे बाहेरच्या चित्रीकरणाची उधळपट्टीच केलीय अस्से म्हणावे लागेल. अगदीच कॅमेरे खुंटीला अडकवून त्याच्या समोर संवाद म्हटलेले नाहीत हे छान केले आहे. मराठी सिनेमाच्या कक्षा रूदावलेल्याच राहिल्या आहेत.
उदय आणि दीपक नंतर एकमेकांशी रहस्यमय आट्यापाट्या खेळतात आणि अनेक सिनेमात येऊन गेलेले फंडे वापरतात. म्हणजे हे ढापू रहस्यकथाकार आहेत. आणि तरी एकमेकांची रहस्ये यांना समजत नाही. पण बाजी पलटताना हे मला महिती होतं म्हणून चाणाक्षपणे हसत असतात. बरं दोन दोन रहस्यकथाकार. त्यांनी जे करू नये ते केलं आहे आणि एकदा केलंय म्हणजे ते कधीही पुन्हा करू शकतात तरीही त्यांना एकाच छाताखाली का रहायचेय?? शिवाय नुसत्या आश्वासनावर कुणी गंभीर गुन्ह्यात साथ द्यायला कसं तयार होईल ?
शेवटी अपेक्षित धक्के बसतात. या संपूर्ण खेळात पोलीस बहुतेक संपावर असतात किंवा मोदीजींनी घटना बदलल्याने आता त्यांची आवश्यकता राहिलेली नाही. किंवा लांजेकरांनी ते ज्या काळात आहेत तिथले कायदे इथे मंडलेकरांना पोस्टाने पाठवले असावेत.
एकंदर चित्रपटाचा हेतू हा मराठी प्रेक्षकांना एक उत्तम हिचकॉक पट द्यायचा होता हे ध्यानात येते. तसे तर त्यांना ऐतिहासिक चित्रपट पण उत्तमच बनवायचे होते. त्याचे अजीर्ण प्रेक्षकांनाच (फक्त) झालेले नाही म्हणूनच ही मंडळी इकडे वळाली असणार.
मराठी चित्रपट आवडत नसलेल्यांना काय म्हणावे ? ते अल्लू अर्जुनचे आगा न पिछा असलेले सिनेमे बघतात. त्यातला function at() { [native code] }अर्क्य डान्स पाहतात.
जिथे पिकतं तिथे विकत नाही किंवा घरकी मुर्गी दाल बराबर. समीर धर्माधिकारीवर जरा मेहनत घेतली असती तर तो मराठीतला अक्षयकुमार जरी नाही तरी राजेश खन्ना होऊ शकला असता. ( डान्स मधे सवलत.) त्याला सुपरस्टार म्हणून प्रोजेक्ट केले असते तर आज चिमं सुद्धा मेगा स्टार झाला असता. वर्तमानपत्रात टेबल न्यूज आल्या असत्या कि सध च्या कारचे चुंबन घ्यायची तरूणींमधे स्पर्धा आहे. सध ला रक्ताने पत्र लिहीले जाते . त्याच्या गाडीपुढे मॉड तरूणी आडव्या पडतात इ.
समीर धर्माधिकारी बसस्टॉपवर तरूणीला छेडतो. आता पासून दहाव्या मिनिटाला तू मला पटलेली असशील असे आव्हान दिल्यावर मृणाल कुलकर्णी (संतूर साबणामुळे वयच वाढत नाही) पराभूत मानसिकतेत जातात (जाते?). आणि दहाव्या मिनिटाला त्यांचे गाणे सुरू होते. इतक्यात दोन गुंड तिला छेडतात. (त्यांना मोतीबिंदू असल्याने मृणाल षोडशा भासते.) आता सधला राग येतो आणि गुंड हवेत उडतात.
पुढच्याच सीन मधे गाणे. इथे डान्स म्हणून दुश्मन सिनेमात "मैने देखा तूने देखा" या गाण्यात राजेश खन्नाने दोन्ही खांद्यावरून उपरणे सरळ करून दोन्ही हात आडवे फैलावून त्यात ते उपरणे धरत फक्त टाचा स्प्रिंगसारख्या उडवायचा आणि एक पाऊल पुढे कि लगेच मागे हा जो डान्सप्रकार केला आहे, तोच सलमान ने काही दशकांनी दबंग आणि रेडी मधे केले आहे. हा सोपा डान्स असला तरी तो इतिहासात आणि वर्तमानकाळतही हिट झालेला आहे. तसेच राजेश खन्नासारखे मान आणि कंबर तीस अंशातून जमिनीकडे करून वेगात चालत येणे ही सुद्धा एक सिग्नेचर स्टेप आहे. यात प्रेक्षक चौकोन करून उभे असले तरी काका कधीच ऑफसेट चौकोनात चालत नाही. त्याचे आणि चौकोनाचे वाकडे आहे. त्यामुळे तो चौकोनाच्या चारही कोनाला रेडीयस मारतो. शाळेतह बहुधा काकाला चौकोनाच्या जागी लंबवर्तुळ काढून दिले तरी माफ असावे. "हमे नुकिले किनारे पसंद नही रे पुष्पा. आय हेट शार्प एजेस" हे त्याचे स्पष्टीकरण सुद्धा असू शकेल. पुढे त्याच्या वरूनच टेबल इत्यादी वस्तूंना चँफर मारायचे टेक्निक विकसित झाले असावे.
मुद्दा हा कि हे समीर धर्माधिकारी नवीन असतानाच केले असते तर आज मराठीत स्टार कल्चर रूजले असते. त्याचा फायदा सापळा ला झाला असता. आज आपण तो प्राईम वर बघत नसतो.
स्पॉयलरचा इशारा दिलेला असला तरी रहस्योद्घाटन नको म्हणून इतकेच. अर्थात प्रेक्षक जास्त चाणाक्ष असल्याने सगळा सिनेमा समजला असेल तर क्षमा असावी.
तळटीप : खालून वर वाचू नका. वर स्पॉयलर्स आहेत.
समीर धर्माधिकारी मराठी असं
चित्रपट सुरुवातीला उत्कंठावर्धक होता. सापळा चांगला होता पण तो एक्झिक्युट होताना विश्वासार्ह वाटला नाही.
समीर धर्माधिकारी मराठी असं काय विचित्र बोलतो? पूर्वी नीट बोलायचा आठवतं. अगदीच कायच्याकाय दिसतो बोलतो आणि उथळ भडक काही तरी अभिनय करतो.
नेहा जोशी बद्दल वादच नाही. सगळ्याच बाबतीत तिने उत्तम केलं आहे. काम दिसणं बॉडी लॅग्वेज तर कमाल दाखवली आहे.
चित्रपट मात्र एकावर एक कायतरी दाखवायचं असा झाला आहे. अर्ध्यापर्यंत मला उत्कंठा होती. मग अगदीच अतर्क्य प्रकार होत गेले. एकतर माणसाला हुषार दाखवा किंवा मद्दाड. नेहेमी हुषार आणि क्लायमॅक्सला मद्दाड ते ही एकाच पिक्चरमध्ये तीनवेळा... हे जरा function at() { [native code] }ई होतं.
घ्या! सकाळी हा नेटिव्ह कोड प्रॉब्लेम सुटलेला. आता परत व्हर्जन बदलली बहुतेक वेमांनी.
इथे पुढचे कथानक फोडत नाही >>
इथे पुढचे कथानक फोडत नाही >> फोडा हो बिंधास्त. इतर लोकांचा मौल्यवान वेळ वाचेल.
सिनेमा बंडल, कथानक बंडल, डायरेक्शन बंडल, धर्माधिकारीचं सगळंच अ ती बंडल, मांडलेकरचं ओव्हरअॅक्टिंग बंडल. सगळंच बंडल. नेहा जोशी आवडते म्हणुन तिच्याकरता बंडलाची बंडलं सहन केली ३ तास.
'वाळवी'सारख्या तद्दन बकवास
'वाळवी'सारख्या तद्दन बकवास चित्रपटापेक्षा एकदा बघायला 'सापळा' ठीकच आहे.
(No subject)
धमाल लिहिले आहे.
धमाल लिहिले आहे.
हे खालचे काही निवडक सुपरलोल>>>
इंग्रज गेला तो कंटाळून"
अद्याप ते १६७० च्या पुढेच सरकलेले नाहीत.
२०२४ सालात मधूमेह म्हणजे १९७३ सालच्या आनंद मधला कॅन्सर आहे का ?
निष्ठूर जग तुझ्यासारख्या संतांसाठी नाहीच ग बाई.
पुतळ्याचे काही तरी प्रयोजन असायला पाहीजे म्हणून पूर्ण चित्रपट पाहिला. पण तेच रहस्य निघाले.
आपण सधलाच गरीबांचा मिसो करू म्हणजे फुरसे पण चालेल.
तसे तर त्यांना ऐतिहासिक चित्रपट पण उत्तमच बनवायचे होते
वर्तमानपत्रात टेबल न्यूज आल्या असत्या कि सध च्या कारचे चुंबन घ्यायची तरूणींमधे स्पर्धा आहे. सध ला रक्ताने पत्र लिहीले जाते
त्यांना मोतीबिंदू असल्याने मृणाल षोडशा भासते.)
त्याचे आणि चौकोनाचे वाकडे आहे.
>>>
मृणाल कुलकर्णीची खरोखरच छेड काढली आहे. :कपाळाला हात:
अरे , मी काल रात्रीच नेटाने
अरे , मी काल रात्रीच नेटाने बघितला.
मला तर सगळेच overreacting ची दुकानं वाटली .नेहा जोशीची भिती वाटायला लागते खरोखर. तो भानु एक आवडला मला.
भानु जो property dispute बघायला गेलेला असतो ते location बंगल्याच्या मागेच असावं . एक बंगला , एक कार एवढाच काय तो खर्च.
चित्रपट सुरुवातीला उत्कंठावर्धक होता. सापळा चांगला होता पण तो एक्झिक्युट होताना विश्वासार्ह वाटला नाही. >>> अनुमोदन
छान लिहिलयं परिक्षण...!
छान लिहिलयं परिक्षण...!
लेख वाचून ट्रेलर पाहिला चित्रपटाचा..
उत्कंठावर्धक वाटतोयं ...
समीर धर्माधिकारीला जेव्हा 'स्वामिनी' मालिकेत प्रथम पाहिलं होतं तेव्हा खूप आवडला होता हिरो म्हणून.. एकदम सुंदर आणि रुबाबदार व्यक्तीमत्व ..!
अद्याप ते १६७० च्या पुढेच
अद्याप ते १६७० च्या पुढेच सरकलेले नाहीत.
चित्रपट संपला तरी त्याचे प्रयोजन हे रहस्यच राहीले.
मराठी सिनेमाच्या कक्षा रूदावलेल्याच राहिल्या आहेत.
त्यांना मोतीबिंदू असल्याने मृणाल षोडशा भासते.
>>>>
काकावरचा पूर्ण परीच्छेदच >>>
खालील गोष्टी अजूनही रहस्यच राहिल्यात.
अजगर/फुरसं जाऊ दे, मराठीत मधु सप्रे कुठून आणणार? ती मराठी असली तरी गरीबांच्या मिसोसाठी इटलीवरून कशाला येईल? आणि फुरश्याला नंतर बाटलीत कोण भरणार?
मृणाल कुलकर्णी पराभूत मानसिकतेत जातात (जाते?). >>>> आधी ती उसासे, सुस्कारे किती सोडते?
बघायला घेतला.बराच मंद आहे.कथा
बघायला घेतला.बराच मंद आहे.कथा पटकन कळते.
समीर धर्माधिकारी इतर ठिकाणी कसा अभिनय करतात माहीत नाही, पण इथे मात्र बराच ओव्हर वाटला.आणि ती हार्ट डिसीज वाली बायको पण ओव्हर करते. त्यातल्या त्यात सर्वात चांगला अभिनय अंगात येणाऱ्या बाईचाच आवडला.
खरे तर चौथ्या कि पाचव्याच
खरे तर चौथ्या कि पाचव्याच फ्रेम मधे चित्रपटात ब्राँझचा हातात भाला घेतलेला पुतळा दिसतो. हाच पुतळा रामसे बंधूंच्या अनेक सिनेमात असतो. या पुतळ्याचे काही तरी प्रयोजन असायला पाहीजे म्हणून पूर्ण चित्रपट पाहिला. पण तेच रहस्य निघाले. म्हणजे चित्रपट संपला तरी त्याचे प्रयोजन हे रहस्यच राहीले. >> हा परिच्छेद आणि मिलिंद सोमणचा परिच्छेद वाचून लोळले.
सिनेमा अजिबात समजला नाही, पण परिक्षण वाचायल मजा आली खूप. मी एकदा प्राईम वर हा सिनेमा बघण्याचा विचार केला होता. पण रद्द केला ते बरं झालं एकूण.
अजगर/फुरसं जाऊ दे, मराठीत मधु
अजगर/फुरसं जाऊ दे, मराठीत मधु सप्रे कुठून आणणार? >>>>>>>>>> मराठी मिसो साठी मराठी मस आपली सई
मि सो म्हणजे श्रीमंतांचा स ध
मि सो म्हणजे श्रीमंतांचा स ध!
मस्त लिहीले आहे!
काहीही आहे पिक्चर.प्रेक्षक
काहीही आहे पिक्चर.प्रेक्षक पहिल्यांदा पिक्चर बघतायत त्यांना पण कळतंय पात्र दगा देणार.पण कथालेखनात अनुभव असलेली पात्रं मात्र सगळं विसरून जातायत.
आपली सई मधू सप्रेच्या मानाने
आपली सई मधू सप्रेच्या मानाने जरा 'खातेपिते घर कि' मॉडेल नाही का वाटणार? अमृता खानविलकर चालेल पण तिच्यात ते 'उम्फ' नाहीये.
ज्यानिं हा चित्रपट पुर्ण
ज्यानिं हा चित्रपट पुर्ण बघितला त्या सर्वानां माझा साष्टांग .....
काल पाहिला हा सिनेमा खरं तर
काल पाहिला हा सिनेमा खरं तर इतके रहस्यपट कोळून प्यायल्याने मी शॉकप्रूफ आहे
पण तरी सुरुवातीला वाटले प्रेडिक्टेबल तरीही बरा प्लॉट दिसतोय. निदान कसे एक्झेक्यूट करतायत हे बघण्याइतका. पण छे. पुढे सगळा गडगडत तद्दन बकवास होत गेला. बरं ते खुर्चीला हातकडी च्या मदय्तीने मागे बांधणे किती मूर्ख आयडिया आहे, नुसता उभा राहिला माणुस तरी निसटेल. क्लायमॅक्स ला तर हसू यायला लागले. चि मां चे पात्र इतके वस्ताद तरी नेमक्या वेळी घोर स्टुपिड. आणि मग अचानक संपलाच सिनेमा
स.ध. सगळ्यात बेक्कार . उगीच विचित्र डोळे आणि हावभाव पूर्ण सिनेमात बघून वैताग येतो. चिमां पूर्ण वेळ घरच्या ( लांजेकराच्या) मैदानावर बॅटींग मिळालेली आहे, आता बघाच कसला भारी परफॉर्म करतो ते अशा विनाकरण आवेशात. एकूण मराठी सिनेमाची आळशी ट्रीटमेन्ट आणि क्रिएटिविटीची गरीबी पुन्हा दिसली.
ए मी बंडल बंडल ७ वेळा लिहिलंय
ए मी बंडल बंडल ७ वेळा लिहिलंय तरी पहाताय. विश्वास ठेवा की
माफक नको, सर्वच स्पॉयलर्स
माफक नको, सर्वच स्पॉयलर्स द्या. पिक्चर काही बघणार नाहीये.
खुर्चीला हत्कडी, बायकोला
खुर्चीला हत्कडी, बायकोला मारणार आणि संपत्ती हाफ अँड हाफ करणार सांगितल्यावर, हा मला म्हणजे नवोदित लेखकाला मारेल ह्याचा त्याने विचारही न करणे, कबर खोदणे, बॉडी घेऊन जाण्याचा सराव करणे आणि हे बायकोने बघून काय करणे? तर नवऱ्याशी न बोलता भानू शी बोलणे. हातकडी पेशल आहे हे आमच्या लक्षात राहिलं आणि हा इतका सुवर्णपदक विजेता रायटर आणि विसरला... आणि वास्तववादी वाटायला हा मारामाऱ्या, खून आणि रेप करत फिरणार आणि बॉडी बॅग मध्ये दगड का बरं?... हौद्या की खर्च! घाल की एखाद बॉडी. आणि सहा महिने थांब वाली प्रेयसी काय, रुक्मिणी बरोबर संग करायचा तर त्या रायटर विना हार्ट अटॅक आणणे शक्य न्हवते का? असाही हुकमी हार्ट अटॅक आणला ना? मग रुकमणी रुकमणी शादी के बाद क्या क्या हुवा... आणखी दोन चार वेडाचे झटके आणि झोपेतली बडबड ऐकून येता की हार्ट अटॅक. मांडलेकर वाचले असते.
मैत्रेयी आणि सुनिधी तुमच्या
मैत्रेयी आणि सुनिधी तुमच्या कमेंट्स वाचून जोरात हासले.
सगळेच प्रतिसाद धमाल आहेत.
सगळेच प्रतिसाद धमाल आहेत. आवडलेले पंचेस नंतर कोट करीन.
रहस्यपट असेल तर शक्यतो रहस्योद्घाटन करावेसे वाटत नाही म्हणून स्पॉयलर अलर्ट देऊनही हातचे राखून लिहिले आहे (कंटाळा येतो हे पण खरे .)