Astrophotography शिकायची आहे.

Submitted by बोकलत on 1 April, 2024 - 02:01

नमस्कार मित्रांनो. मला astrophotography शिकायची ईच्छा आहे. कसं सुरू करू कळत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

डोंबिवलीत १९९५ पर्यंत तांदुळाच्या आकाराची Andromeda galaxy आणि ओरायन तारकासमूहातील M42 बाइनोक्युलर्सने दिसत असे. हेच भिमाशंकरहून डोळ्यांनी जाणवत. रस्त्यावरचे सोनेरी दिवे लागले आणि आकाशदर्शन संपले. सर्व मुम्बई पुण्यातील उपनगरातील हीच परिस्थिती आहे. पुणे सातारा रेल्वेवरील दोंडाईचा, वाल्हे, आदर्की या स्टेशनवरून चांगले आकाश दिसण्याची शक्यता अधिक आहे.

बोकलत, सध्या धूमकेतू दिसतोय एक पहाटे पूर्वेला. C 2023/21 असं नाव आहे.
नंतर संध्याकाळी पश्चिमेला दिसेल. दोन तीन सुंदर फोटो बघितले. मला अजून दिसला नाहीये, ढग आहेत आकाशात. तुम्हाला दिसला तर पहा आणि फोटोही काढा.

वावे तुम्ही tsuchinshan धूमकेतूबद्दल बोलताय का? कुठून पाहताय तुम्ही हा? स्टेलेरियम ऍप वर magnitude २.७८ आहे म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसेल का मुंबईतून की टेलिस्कोप दुर्बीण लागेल? आणि सगळ्यात ठळक कधी दिसणार आहे? पश्चिमेला कधी दिसेल हा?

हो, तोच. पुण्यातून लोकांना नुसत्या डोळ्यांनीही दिसला असं समजलं. मी बंगलोरला आहे. बंगलोरमधून काढलेलेही काही सुंदर फोटो दिसले.
बारा ऑक्टोबरपासून संध्याकाळी पश्चिमेला दिसायला लागेल आणि तेव्हा तो आतापेक्षा जास्त तेजस्वी असेल असं वाचलं.

मस्त! हा मी काही महिन्यांपूर्वी काढलेला फोटो.

धूमकेतू मला दिसला, दोन दिवस पहाटे. पण फोटो मात्र नाही काढता आला.

वावे छान आलाय फोटो. कुठला कॅमेरा वापरलाय? धूमकेतू नुसत्या डोळ्यांनी दिसला का?
धन्यवाद @अंजू ताई @निर्मल ताई

नुसत्या डोळ्यांनी दिसला, एकदा पहाटे. आदल्या दिवशी दुर्बिणीने दिसला होता.
धन्यवाद अन्जू, निर्मल, बोकलत. वरचा फोटो माझ्या नेहमीच्या निकॉन P900 ने काढलाय.

धन्यवाद सामो आणि अंजू. दिवस आणि रात्र सेपरेट करणारी टर्मिनेटर लाईन आणि त्यावर असलेली विवरं उठून दिसतात. आमचे सर बोलतात चंद्राचा अभ्यास करण्यासाठी टर्मिनेटर लाईन महत्वाची असते. नुसताच चंद्र नाही इतर ग्रह पण. ज्या काही महत्वाच्या घडामोडी होतात त्या या लाईनवरच होतात असं पण बोलले ते. त्याचा अर्थ नीट काही समजला नाही. कातरवेळ डेंजर असते थोडक्यात.

बोकलत कुठल्या एरीयातून एवढं चांगलं दिसतं डोंबिवलीत. नशीबवान आहात. टॉवरमधे रहाता का.>>>> बोकलत जेव्हा टेलिस्कोप- कॅमेरा बाहेर कढतात तेव्हा त्यांच्या कह्यात असलेले समंध आजूबाजूच्या इमारती लेगो ब्लॉक्स म्हणून खेळायला घेऊन जातात, पण हो त्या आधी केबल्स च्या वायरी आपल्या आपल्या फेवरेट हडळींना स्किपींग रोप्स म्हणून देऊन टाकतात.

IMG_5502.jpeg
@केशवकूलजी हा गुरुचा फोटो मोबाईल मधून काढलाय. प्रत्यक्ष पाहताना गुरु कितीतरी पटीने चांगला दिसतो. त्याचा तांबूस रंग मस्त उठून दिसतो. मोबाईल कॅमेरा ते रंग पकडत नाही. एक लिमिटेशन येते हे माझं मत.
@अंजूजी डोंबिवलीतून कुठूनही पाहिलं तरी लाईट पोल्युशनमुळे काही दिसत नाही. दोन चार ग्रह आणि दोन चार तारे दिसतात फक्त. जेव्हा आकाश निरभ्र असतं खास करून पाऊस पडल्यानंतर जे वातावरण असतं तेव्हा हे ओरायन तारकासमूह वैगरे मोजकेच दिसतात. दोन दिवसांपूर्वी दिसत होते आता पुन्हा एयर क्वालिटी बिघडली.
@ फार्सजी Happy

IMG_5502.jpeg
@केशवकूलजी हा गुरुचा फोटो मोबाईल मधून काढलाय. प्रत्यक्ष पाहताना गुरु कितीतरी पटीने चांगला दिसतो. त्याचा तांबूस रंग मस्त उठून दिसतो. मोबाईल कॅमेरा ते रंग पकडत नाही. एक लिमिटेशन येते हे माझं मत.
@अंजूजी डोंबिवलीतून कुठूनही पाहिलं तरी लाईट पोल्युशनमुळे काही दिसत नाही. दोन चार ग्रह आणि दोन चार तारे दिसतात फक्त. जेव्हा आकाश निरभ्र असतं खास करून पाऊस पडल्यानंतर जे वातावरण असतं तेव्हा हे ओरायन तारकासमूह वैगरे मोजकेच दिसतात. दोन दिवसांपूर्वी दिसत होते आता पुन्हा एयर क्वालिटी बिघडली.
@ फार्सजी Happy

Pages