Submitted by बोकलत on 1 April, 2024 - 02:01
नमस्कार मित्रांनो. मला astrophotography शिकायची ईच्छा आहे. कसं सुरू करू कळत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डोंबिवलीत १९९५ पर्यंत
डोंबिवलीत १९९५ पर्यंत तांदुळाच्या आकाराची Andromeda galaxy आणि ओरायन तारकासमूहातील M42 बाइनोक्युलर्सने दिसत असे. हेच भिमाशंकरहून डोळ्यांनी जाणवत. रस्त्यावरचे सोनेरी दिवे लागले आणि आकाशदर्शन संपले. सर्व मुम्बई पुण्यातील उपनगरातील हीच परिस्थिती आहे. पुणे सातारा रेल्वेवरील दोंडाईचा, वाल्हे, आदर्की या स्टेशनवरून चांगले आकाश दिसण्याची शक्यता अधिक आहे.
माझा नवीन टेलिस्कोप. आता फक्त
माझा नवीन टेलिस्कोप. आता फक्त बघाच मी कुठल्या कुठल्या नवीन ग्रह ताऱ्यांचा शोध लावतो.

बोकलत, सध्या धूमकेतू दिसतोय
बोकलत, सध्या धूमकेतू दिसतोय एक पहाटे पूर्वेला. C 2023/21 असं नाव आहे.
नंतर संध्याकाळी पश्चिमेला दिसेल. दोन तीन सुंदर फोटो बघितले. मला अजून दिसला नाहीये, ढग आहेत आकाशात. तुम्हाला दिसला तर पहा आणि फोटोही काढा.
वावे तुम्ही tsuchinshan
वावे तुम्ही tsuchinshan धूमकेतूबद्दल बोलताय का? कुठून पाहताय तुम्ही हा? स्टेलेरियम ऍप वर magnitude २.७८ आहे म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसेल का मुंबईतून की टेलिस्कोप दुर्बीण लागेल? आणि सगळ्यात ठळक कधी दिसणार आहे? पश्चिमेला कधी दिसेल हा?
हो, तोच. पुण्यातून लोकांना
हो, तोच. पुण्यातून लोकांना नुसत्या डोळ्यांनीही दिसला असं समजलं. मी बंगलोरला आहे. बंगलोरमधून काढलेलेही काही सुंदर फोटो दिसले.
बारा ऑक्टोबरपासून संध्याकाळी पश्चिमेला दिसायला लागेल आणि तेव्हा तो आतापेक्षा जास्त तेजस्वी असेल असं वाचलं.
ओके, ट्राय करतो. ढगाळ आणि
ओके, ट्राय करतो. ढगाळ आणि प्रदूषित वातावरणात कितपत दिसेल शंका आहे.
सनस्पॉट्स
सनस्पॉट्स

मस्त! हा मी काही
मस्त! हा मी काही महिन्यांपूर्वी काढलेला फोटो.
धूमकेतू मला दिसला, दोन दिवस पहाटे. पण फोटो मात्र नाही काढता आला.
बोकलत, वावे सुरेख आलेत फोटो.
बोकलत, वावे सुरेख आलेत फोटो.
माझा नवीन टेलिस्कोप. >>> भारी आहे.
सुंदर आले आहेत फोटो बोकलत आणि
सुंदर आले आहेत फोटो बोकलत आणि वावे.
वावे छान आलाय फोटो. कुठला
वावे छान आलाय फोटो. कुठला कॅमेरा वापरलाय? धूमकेतू नुसत्या डोळ्यांनी दिसला का?
धन्यवाद @अंजू ताई @निर्मल ताई
नुसत्या डोळ्यांनी दिसला, एकदा
नुसत्या डोळ्यांनी दिसला, एकदा पहाटे. आदल्या दिवशी दुर्बिणीने दिसला होता.
धन्यवाद अन्जू, निर्मल, बोकलत. वरचा फोटो माझ्या नेहमीच्या निकॉन P900 ने काढलाय.
(No subject)
सुरेख फोटो बोकलत
सुरेख फोटो बोकलत
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
धन्यवाद निर्मल, धन्यवाद उपाशी
धन्यवाद निर्मल, धन्यवाद उपाशी बोका.
डोंबिवलीतून मोबाईलने घेतलेला
डोंबिवलीतून मोबाईलने घेतलेला फोटो. ओरायन तारकासमूह आणि ओरायन नेब्यूला स्पष्ट दिसतोय.
चंद्राचा फोटो अप्रतिम आलाय
चंद्राचा फोटो अप्रतिम आलाय बोकलत!
धन्यवाद वावे ताई.
धन्यवाद वावे ताई.
सहीच बोकलत. डोंबिवलीतून
सहीच बोकलत. डोंबिवलीतून वाचल्यावर भारी वाटलं.
ती चंद्रविवरं काय दिसतायत.
ती चंद्रविवरं काय दिसतायत.
धन्यवाद सामो आणि अंजू. दिवस
धन्यवाद सामो आणि अंजू. दिवस आणि रात्र सेपरेट करणारी टर्मिनेटर लाईन आणि त्यावर असलेली विवरं उठून दिसतात. आमचे सर बोलतात चंद्राचा अभ्यास करण्यासाठी टर्मिनेटर लाईन महत्वाची असते. नुसताच चंद्र नाही इतर ग्रह पण. ज्या काही महत्वाच्या घडामोडी होतात त्या या लाईनवरच होतात असं पण बोलले ते. त्याचा अर्थ नीट काही समजला नाही. कातरवेळ डेंजर असते थोडक्यात.
https://science.nasa.gov
https://science.nasa.gov/solar-system/skywatching/night-sky-network/astr...
smartphone telephotography.
बोकलत कुठल्या एरीयातून एवढं
बोकलत कुठल्या एरीयातून एवढं चांगलं दिसतं डोंबिवलीत. नशीबवान आहात. टॉवरमधे रहाता का.
बोकलत कुठल्या एरीयातून एवढं
बोकलत कुठल्या एरीयातून एवढं चांगलं दिसतं डोंबिवलीत. नशीबवान आहात. टॉवरमधे रहाता का.>>>> बोकलत जेव्हा टेलिस्कोप- कॅमेरा बाहेर कढतात तेव्हा त्यांच्या कह्यात असलेले समंध आजूबाजूच्या इमारती लेगो ब्लॉक्स म्हणून खेळायला घेऊन जातात, पण हो त्या आधी केबल्स च्या वायरी आपल्या आपल्या फेवरेट हडळींना स्किपींग रोप्स म्हणून देऊन टाकतात.
@केशवकूलजी हा गुरुचा फोटो
@केशवकूलजी हा गुरुचा फोटो मोबाईल मधून काढलाय. प्रत्यक्ष पाहताना गुरु कितीतरी पटीने चांगला दिसतो. त्याचा तांबूस रंग मस्त उठून दिसतो. मोबाईल कॅमेरा ते रंग पकडत नाही. एक लिमिटेशन येते हे माझं मत.
@अंजूजी डोंबिवलीतून कुठूनही पाहिलं तरी लाईट पोल्युशनमुळे काही दिसत नाही. दोन चार ग्रह आणि दोन चार तारे दिसतात फक्त. जेव्हा आकाश निरभ्र असतं खास करून पाऊस पडल्यानंतर जे वातावरण असतं तेव्हा हे ओरायन तारकासमूह वैगरे मोजकेच दिसतात. दोन दिवसांपूर्वी दिसत होते आता पुन्हा एयर क्वालिटी बिघडली.
@ फार्सजी
@केशवकूलजी हा गुरुचा फोटो
@केशवकूलजी हा गुरुचा फोटो मोबाईल मधून काढलाय. प्रत्यक्ष पाहताना गुरु कितीतरी पटीने चांगला दिसतो. त्याचा तांबूस रंग मस्त उठून दिसतो. मोबाईल कॅमेरा ते रंग पकडत नाही. एक लिमिटेशन येते हे माझं मत.
@अंजूजी डोंबिवलीतून कुठूनही पाहिलं तरी लाईट पोल्युशनमुळे काही दिसत नाही. दोन चार ग्रह आणि दोन चार तारे दिसतात फक्त. जेव्हा आकाश निरभ्र असतं खास करून पाऊस पडल्यानंतर जे वातावरण असतं तेव्हा हे ओरायन तारकासमूह वैगरे मोजकेच दिसतात. दोन दिवसांपूर्वी दिसत होते आता पुन्हा एयर क्वालिटी बिघडली.
@ फार्सजी
आमच्या गावातून दिसणारे आकाश.
आमच्या गावातून दिसणारे आकाश.

आमच्या गावातून म्हणजे....
आमच्या गावातून म्हणजे.... डोंबिवलीतून?
>>>फोटो मोबाईल मधून काढलाय>> म्हणजे त्या दुर्बिणीला मोबाईल लावून का?
एकदा डोंबिवलीकर मायबोलीकरांना दाखवा ना नवीन दुर्बिण
डोंबिवलीतून काय डोंबलं दिसतंय
डोंबिवलीतून काय डोंबलं दिसतंय. हा फोटो आमच्या गावातून रायगड मधून काढलाय आयफोन वापरून काळोख्या जागी जाऊन. टेलिस्कोप नाही वापरला. टेलिस्कोप बघायचा असेल तर इथेच आहे डोंबिवलीत या कधीपण शनिवार रविवारी. गुरु मंगळ शनी चंद्र बघू.
Pages