आठवतात का ग ते मंतरलेले कॉलेज चे दिवस
संध्याकाळी न चुकता वालचंद हॉस्टेल वरुन सनीज कॉर्नर ला भेटण्याचे ते दिवस
धूंद संध्याकाळ ......
हातात गरम फिल्टर कॉफी चा तो प्याला ...
साला काय ते दिवस
तो स्वर्गीय स्वाद आणि कॉफीची किक
बॅकग्राऊंड ला मंद भाव गीत आणि तू .......
तू समोर मिश्किल हसतेस……. मी .......
मी सिगारेट च्या धुम्र वरतुळातून तुला पाहतोय......
एक टक.....
तू अजूनही मिश्किल हसते आहेस
साला काय ती रम्य संद्याकाळ ....
साला काय ते दिवस
मी बुलेटवर....डोळ्यांवर गॉगल्स .
तू ...
तू मला बिलगुन...
वाऱ्याशी झुंज देत
हवेचे तढाखे छातीवर झेलत मी
पुढे...बुलेट वर ...
तू………
तू मला अगदी बिलगुन...
वाराही जात नाही आपल्या मधुन .....
साला काय ते दिवस
सळसळणार माझं रक्त …..
हवीहवीशी वाटणारी उब .....
तुझ्या स्पर्शाची !
आणि काय हवं होतं आयुष्यात!
साला काय ते मंतरलेले दिवस
आज एक अशीच संध्याकाळ.....
तीच विश्रामबाग, पण खुपच बदलेली
वालचंद वरुनच चाललो होतो...
अवचित वळली नजर, सनिज नव्हते !
.............................
... आता तिथे मॅकडोनाल्ड आहे
रस्ते सुद्धा अनोळखी झालेत ...
... बुलेट आता झेपत नाही...
आणि तू ...
तू ही सोबत नाहीस ... !
साला काय हा दिवस
शरिर थकले तरी मी तोच आहे
.... आंत....
बुलेट,वारा आणि तुझा तो उबदार स्पर्श अजून तसाच जपलाय
... आठवणीत.......
आणि हो सनिज ची फिल्टर कॉफी सुद्धा...
साला काय ते दिवस....
बुधवार ०६/०३/२०२४ , ५:२७ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
Mast kavita. Vishrambaug
Mast kavita. Vishrambaug aamche sasar aahe.
अश्विनीमामी धन्यवाद ,
अश्विनीमामी
धन्यवाद ,