मागच्या भागात आणि या भागात खूप जास्त कालावधीच अंतर आहे हे मान्य आहे मला... थोडे व्यक्तिगत इश्युज सुरू होते त्यामुळे लेखनाला अजिबात वेळही मिळत नव्हता आणि लिंक सुद्धा लागत नव्हती आणि त्यामुळे बराच वेळ झाला झाला आहे त्याबद्दल क्षमस्व...
आतापर्यंत सहा भाग झालेत..
बऱ्यापैकी सर्व पात्रांची एन्ट्री झालीय. आणि आत्तापर्यंत होणारं हत्या सत्र, आणि झालेली जुनं हत्या सत्र यांचा संबंध दीक्षा आणि निलय यांनी लावून त्यांच्या परीने शोध घेत होते ते आता एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ऐवजी "एकमेकां सहाय्य करू" या निष्कर्षावर आले आहेत... त्यांना इंडिरेक्ट मदत करताना अविनाश हा त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे.. आणि या घटनांवर प्रकाश पाडण्यासाठी जी मदत मिळू शकते त्या प्रत्येक सोर्स कडे या कथेचे मुख्य पात्रं वळत आहेत आणि झालेल्या, होत असणाऱ्या आणि होणाऱ्या घटनांचा पर्दाफाश करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी पडताळून पाहतायत...थोडं जुन्या पार्टस वर एक धावती नजर टाका आणि हा भाग वाचा... पुन्हा एकदा मनस्वी क्षमस्व एवढ्या उशिरा भाग पोस्ट करण्यासाठी...
भाग १
https://www.maayboli.com/node/83282
भाग २
https://www.maayboli.com/node/83302
भाग ३
https://www.maayboli.com/node/83312
भाग ४
https://www.maayboli.com/node/83323
भाग ५
https://www.maayboli.com/node/83368
भाग ६
https://www.maayboli.com/node/83419
******************
प्रकरण ७: दुनिया में... लोगोंको... धोखा कभी हो जाता है...!
मध्यरात्रीची वेळ होती. आळसवटल्यासारखा रिपरिप पाऊस सुरू होता. मधूनच झुपकन् एखादी दुचाकी साचलेलं पाणी उडवत ओल्या रस्त्यावरून पास होतं होती. पुर्ण काळा गुढघ्यापर्यंत येणारा ओव्हरकोट, काळ्या रंगाचाच बंद गळ्याचा टीशर्ट, डोळ्यावर ओढून घेतलेली फेल्ट हॅट, तशीच काळ्या रंगाची लेदर ची तंग पँट घातलेली व्यक्ती स्ट्रीट लाईटच्या प्रकाशाची हद्द जिथे संपत होती तिथे पत्र्याच्या शेडखाली कशाची तरी वाट पाहत उभी होती. पावसाचं पाणी कोटावर उडत होत आणि कोटावरून ओघळत थेंब थेंब जमिनीत झिरपत होत. आणि ते उडणारं पाणी चुकवण्यासाठी ती व्यक्ती कोट आवळून घेत एकाग्र होऊन समोरच्या वेअर हाउस कडे लक्ष ठेऊन उभी होती.
त्या शेडच्या विरुद्ध बाजूला निळ्या लाईट मध्ये पकपकणाऱ्या, थोड्या तिरक्या झालेल्या नियॉन साइन असणाऱ्या जुनाट बिल्डिंग कडे लक्ष ठेवत कोटाच्या डाव्या खिशात हात घालत बालिसॉन्ग(बटरफ्लाय नाएफ) च्या हील्ट वर हाताची मूठ आवळली आणि गाफीलपणे बालिसॉन्ग हातात खेळवत, बारकाईने निरीक्षण करत अगदी स्थिर उभी होती. काही क्षणानंतर पकपकणारा नियॉन साइन बंद झाला आणि स्ट्रीट लाइट चा प्रकाश वगळत अंधाराचा फायदा घेत त्या जुनाट बिल्डिंगच्या मागच्या दाराजवळ पावलांचा आवाज न करता चपळ हालचाली करत येऊन उभी राहिली.
कुलूप! काही आश्चर्य नाही...!!!
कोटाच्या डाव्या खिशात हात घालत त्या व्यक्तीने पास-किज् चा एक बंच बाहेर काढला. एकेक किल्ली ट्राय करता करता काहीतरी सातवी आठवी किल्ली लागली. क्लिक् आवाज करत कुलूप उघडलं गेलं आणि....
.......अविनं जोरात शेलकी शिवी हासडायची उर्मी कशीबशी दाबली....
च्यायला...! कुलूप आहे का चेष्टा? कुलुपावरची उलट्या U सारखी दिसणारी क्लिप कोयांड्यामध्येच आणि कुलूप मात्र ठॉककन् त्याच्या जाड चामड्याच्या बुटावर...!
चपळ हालचाली करत त्या कुलूपाने जोरात आवाज करायच्या आधी अलगद कुलूप उचलत, दरवाज्याच्या कोणताही आवाज येऊ नये म्हणून हळूच दार उचलून धरत दरवाजा उघडला. आणि आत येताच अनपेक्षित पणे थंडगार वाऱ्याचा झोत त्याच्या चेहऱ्यावर आदळला आणि सोबतच त्या कोल्ड रूम मध्ये रसायनांचा उग्र वास, मासे साठवल्यानंतर येणारा "सुवास" ....आणि एक अतिशय अतिशय सूक्ष्म पण कुबट, कुजकट दर्प भसकन् नाकात शिरला. आणि अवि ने खिशातल्या रुमालाची घडी नाकावर दाबली.
बाहेरून दिसणारं वेअर हाउस पण आतून अंधारात बुडलेलं कोल्ड स्टोरेजकडे आठ्या घालत अवि दोन क्षण दारातच उभा राहिला. आणि मनाशी काहीतरी ठरवत, पूर्ण दरवाजा उघडून आत येत पाठीमागे दरवाजा बंद करत आतल्या अद्यावत आणि मेन्टेन्ड कोल्ड स्टोरेज वर नजर फिरवत कुठून शोधायला सुरुवात करायची याचं प्लॅनिंग करू लागला. आणि नजर फिरवता फिरवता, वरच्या पण विरुद्ध बाजूला असलेले फिरते, मोशन सेन्सिटिव्ह CCTV टाळण्यासाठी दरवाज्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या उंच रॅक कडे कमीतकमी हालचाल करत सरकला. आणि हातातला बालिसॉन्ग नाईफ शिथ मध्ये सरकवला.
CCTV चा अँगल ऑटोमॅटिकली बदलल्यानंतर वेगात हालचाली त्या उंच रॅक ला पाठ टेकवत फेल्ट हॅट अजूनच नाकासमोर ओढली. तो कुबट कुजकट दर्प उजव्या बाजूच्या डीप फ्रीझर कडून जास्त उग्र येत होता. पण तिकडे आधी पाहण्याच्या आधी, एवढ्या उंच रॅक वर काय ठेवलं आहे याची आधी छनानी करावी असा विचार करत दोन रॅकच्या मधल्या स्पेस मध्ये चवड्यावर बसत एक बॉक्स ग्लव्हज् घातलेल्या हाताने स्विस नाईफ ने सफाईदारपणे एक रेष ओढली. आणि बॉक्स उघडून आतल्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या अर्ध्या अर्ध्या किलोच्या पुड्या हाताने तोलत पाकीट फोडावं का नको या द्विधा मनःस्थितीत आजूबाजूला नजर टाकली. शेवटी, 'जो होगा देखा जायेगा' असा निष्काळजीपणे विचार करत चाकुचे टोक एका कोपऱ्यात खुपसत थोडीशी पावडर चाकूच्या टोकानेच जिभेवर लावली आणि त्याचे डोळे चमकले.
ड्रगज्...!! हेरॉईन टू बी स्पेसिफिक...!!!
त्याच पद्धतीने बाकी चार पाच बॉक्सेस त्याने उघडून पाहिले पण त्यात खारवलेले, साठवलेले मासे आणि..... एका बॉक्स मध्ये..... काँडॉम्स....?? व्हॉट द हेक...!!??
इथे कोणी इंटीमेट होऊ शकेल या विचारानंच त्याला शिसारी आली. हे असं काहीतरी विचित्र कॉम्बिनेशन पाहून त्याच्या कपाळावरच्या आठया गडद झाल्या आणि आपण पहिल्याच प्रयत्नात लकी ठरलोय याचा त्याला अंदाज आला आणि त्याने बॉक्सेसवर बारकाईने निरीक्षण करत नजर फिरवली. आणि त्यानं जे पाहिलं, ज्या कोणी या ड्रग्स आणि मासे स्टोरेज ब्लेंड करण्याबाबतीत डोकं लावलेलं त्यांना मनोमन सॅल्युट ठोकला. आणि एकेक करत सगळ्या रॅक मधल्या विशिष्ठ बॉक्स अनपॅक करून पाहिले आणि 'वेल डन अवि..!' म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली..
पण अचानक त्याचे डोळे बारीक झाले... जर इथे ड्रग्सची तस्करी सुरू आहे तर कुबट कुजकट दर्प येण्याचे काय कारण?? मास्यांच्या उग्र वासात तो दर्प ब्लेंड होण्याचा प्रयत्न करत होता. पण निलय सोबत एक दोनदा (mortuary) मोर्च्युरी मध्ये जाऊन आल्याने तिथला येणारा दर्प विसरणं त्याच्यासाठी अशक्य होत.
त्या वेळी जी परिस्थिती होती ती आठवून एकदम भूतकाळातील आठवणींनी तो अस्वस्थ झाला. पण त्या आठवणीत न रेंगळता लगेच ती आठवण झटकून हातातल्या कामावर लक्ष केंद्रीत केले.
दोन सेकंद विचार करत त्याने फोन वरून झटपट मेसेज करत वाट पाहत रॅक च्या मधल्या स्पेस मध्ये उभा राहिला. हलकासा ब्लिप् आवाज करत खट्कन वरचे सीसीटीव्ही रोटेट व्हायचे थांबले ' थँक यु श्री..' असा विचार करत हलकासा सुटकेचा निःश्वास सोडला आणि बटरफ्लाय नाईफ सोबत चाळा करत जिथून तो सूक्ष्म दर्प येत होता तिकडे वेगात पावले टाकत डीप फ्रिझर कडे गेला आणि हातात डीस्पोजेबल रबर हॅण्ड ग्लव्हज् चढवत, त्याने डीप फ्रिझरच लीड उघडलं अन् आतला नजारा पाहून त्याच्या पोटात डचमळून आले....!!
सहा बाय चार फूट अश्या अवाढव्य आकाराच्या फ्रिझर मध्ये जवळपास चार पाच उघड्या डेडबॉडीज कश्याही कोंबून ठेवल्या होत्या आणि व्हायटल ऑर्गनस् च्या भागात घातलेले स्टीचेस त्या बेवारस मृतदेहांची दुर्लक्षित कथा सांगत होते. सावधपणे पावलं टाकत तिथे असलेले बाकीचे दोन फ्रिझर उघडावे का नको अश्या द्विधा मनस्थितीत तो हातातल्या पास किज् सोबत चाळा करत उभा होता.
त्याने हलकीच स्वतःशीच शीळ घातली. आणि कानातल्या इअर पिस वर हलकाच दाब देत, "तीन डीप फ्रिझरस्, पंधरा उभे रॅक्स.. आय'एम लिव्हिंग नौ. आय'ल गेट एविडेन्स फॉर रे'ड ऍज सून ऍज पॉसिबल." आणि बाहेर पडायला वळणार इतक्यात निव्वळ इंस्टीनक्ट्स च्या जोरावर झटकन् खाली वाकून लोळण घेतली आणि मागे उभ्या असलेल्या माणसाच्या नडगीवर जोरात पाय मारला आणि तो पडत असताना अजून एकदा दुसऱ्या पायात पाय अडकवून त्याला आस्मान दाखवले आणि हे करत असताना कमीतकमी आवाज होइल याची काळजी घेत झटक्यात वळून उजवा हात त्याच्या गळ्यावर आणि डावा हात तोंडावर आणि उजवा गुढगा पोटावर दाबून धरला. त्याच्या मजबूत पकडीखाली तो माणूस सुटण्यासाठी धडपडू लागला. गळ्यावरची पकड घट्ट करत, "मी तोंडावरचा हात काढतोय. ओरडलास वैगेरे तर फुकट मरशील. " कडक शब्दात वॉर्निंग देऊन हळू हात बाजूला केला आणि हात बाजूला केल्या केल्या जबड्याच्या बाजूने डोकावणारा, नजरेत भरणारा फिनिक्स चा टॅटू पाहून अविच्या कपाळावरची शीर तटतटली. आणि मानेवर हाताने चॉप मारला आणि त्या माणसाने डोळे पांढरे केले.
"एक पार्सल आहे सोबत गाडी घेऊन पुढच्या चौकात ये." एवढं बोलून फोन ठेवला आणि एखाद्या तळीरामाला घेऊन जावं तश्या पद्धतीने कोणालाही संशय येऊ नये अस घेऊन गाडीच्या डिकीत त्याला टाकलं आणि पॅसेंजर सीट वर बसून पलीकडच्या व्यक्तीला गाडी पिटाळण्यासाठी इशारा केला.
*********
रातराणी आणि पारिजातकाचा एकत्रित धुंद करणारा सुवास खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत अलगद खोलीमध्ये झिरपत होता आणि खिडकीजवळ पाय पोटात घेऊन बसलेली दीक्षा तो सुवास श्वासात भरून घेत घडलेला दिवस आठवत बसली होती...
>>>>"तुमच्या वडिलांनी दहा वर्षांपूर्वी जी केस पहिली होती... त्याचा आणि आताच्या घटनांचा संबंध नाहीय अस तुम्हाला वाटतं का? डोन्ट बी नाईव्ह ऑफिसर, हियर अस आऊट, आय हॅव सम ऑफ माय ओन क्वेस्शनस्... अँड वी कॅन वर्क टूगेदर..."
निलय भूत बघितल्यासारखा दीक्षा कडे पाहू लागला. आणि ताडकन उठून टेबलावर हात मारत, "हाऊ द हे'ल यू नो अबा'ऊट द केस हॅण्डल्ड माय फा'दर?" घुसमटलेल्या तीव्र आवाजात डोळ्यात डोळे घालत त्याने दिक्षाला प्रश्न विचारला आणि दीक्षा दचकून दोन पाऊले मागे सरकली. निलयने डोळे गच्च मिटून घेत दोन-तीन दिर्घ श्वास भरून घेऊन स्वतःला शांत केलं आणि प्रयत्नपूर्वक खुर्चीवर बसत हातानेच तिघांना खुर्चीवर बसण्याची खूण केली.
एक नजर सुमेर आणि दीक्षा वर टाकत त्याने आपला मोर्चा आस्था कडे वळवला. "तू काय करतेस इथे? आणि तू..." आवंढा गिळत त्याने प्रश्न केला, "तू... तू सांगितलस का की...?" प्रश्न अर्धवट सोडत त्याने दुखरा कटाक्ष आस्था कडे टाकला आणि आस्था घाईगडबडीत उत्तर देणार तेव्हड्यात दीक्षा ने हातातली डायरी टेबलावर ठेवत निलयच्या दिशेने सरकवली. "एकदम कोणत्याही निष्कर्षावर येऊन आस्थाला काही म्हणण्याआधी ह्या डायरीवर एक नजर फिरवा आणि मग आपण बोलू."
कपाळावर आठ्यांच जाळं विणत निलय डायरी उलट सुलट करत पाहू लागला. आणि तेंव्हाच दिक्षाने गळ्यातलं पेंडंत काढून टेबलावर ठेवलं. क्राईम सिन वर कलेक्ट केलेली चेन आणि आता टेबलावर असणाऱ्या चेन मध्ये असणारं साधर्म्य एकदम निलयला क्लिक झालं आणि ड्रॉवर उघडत त्याने एविडेन्स बॅग काढत दोन्ही लॉकेट चे बारकाईन निरिक्षण करण्यास सुरुवात केली. काही सूक्ष्म बदल सोडता दोन्ही लॉकेट मध्ये असणारं कमालीचं साम्य पाहून त्याच्या डोक्यातील चक्रे वेगाने फिरू लागली. आणि हातातली एविडेन्स बॅग पुन्हा ड्रॉवर मध्ये ठेवत दीक्षाला तीच लॉकेट परत केलं. आणि हातातली डायरी कशी उघडायची ते पाहू लागला.
"या चेनचा हा अर्धचंद्राकृती भाग या खाचेत बसवा आणि अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये फिरवा. डायरीचा क्ल्यापस् उघडेल." चेन पुन्हा टेबलावर सरकवत दीक्षा बोलली आणि निलयचे डोळे चमकले.
दीक्षाने सांगितल्याप्रमाणे त्याने डायरीचा क्ल्यापस् निलयने उघडला आणि तिचं पेंडेंत तिला परत केलं. "मी डायरी उघडुन वाचण्याआधी नेमकी काय भानगड आहे सांगता का? एकतर माझ्या वडिलांनी हॅण्डल केलेली केस, तुम्हाला आधीच माहीत असलेले दहा वर्षाआधीची केस तरी त्याचा कोणताही उल्लेख तुमच्या न्यूज मध्ये नसणं...., बि'कोझ लेट्स बी हॉनेस्ट, यूअ'र अ मर्सीलेस रिपोर्टर् अँड फ्रॉम व्हॉट आय हॅव ऑब्सरव्ड, आणि आता तुम्ही दोघं आणि आस्था एकदम इथे येणं.., आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे फिनिक्स कोरलेले लॉकेट आणि त्याचा असा 'की' म्हणून वापर...?? नक्की काय सुरू आहे आणि तुमचा या सगळ्यांसोबत काय संबंध आहे??"
थोड्या कठोर आवाजात त्याने लागोपाठ त्याचे डाऊटस् बोलून दाखवले आणि दीक्षा खळखळून हसू लागली. "प्लीज मला एकेरीच बोलवा ऑफिसर, आणि 'मर्सीलेस रिपोर्टर', ऑफिसर? सिरियसली...! आय हॅव टू ऍडमिट, आत्तापर्यंतची सगळ्यात युनिक काॅमप्लिमेंट आहे ही.." पुनःपुन्हा उफाळून येणार मिश्किल हसू कसंबसं दाबत तिने निलयला प्रतिसाद दिला. आणि तिच्या या खेळकर प्रतिसादाने निलयच्या ओठांवर नकळत स्मित उमटले.
मात्र त्या खेळकरपणाच्या जागी दिक्षाच्या दुःखाने काळवंडणाऱ्या चेहऱ्याच निरिक्षण करत त्याने प्रश्नार्थक नजरेने एक भुवई उंचावली आणि दीक्षाने दिर्घ सुस्कारा सोडत आस्थाला आतापर्यंत जे जे सांगितलं होत ते पुन्हा रिपीट केलं. दरम्यान सूमेरचा भावनाहिन कठोर चेहऱ्याच निरिक्षण करत दिक्षा सांगत असणारी सगळी माहिती आणि त्यातले बारकावे लक्षात घेत त्यांची नोंद निलय त्याच्या समोरच्या लेटरपॅडवर करून घेऊ लागला. आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर दोन्ही हात केसात अस्वस्थपणे फिरवत शून्य नजरेनं समोरच्या नोंदिंकडे पाहू लागला.
पाच-दहा मिनिटं अश्या विमनस्क मनःस्थितीत या नवीनच उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल निलय विचार करत केबिन मध्ये फेऱ्या मारत असताना दीक्षा त्याचं बारकाईन निरिक्षण करत होती. मानेवर जाणवणारी दिक्षाची नजर लक्षात येऊन, डोळे मिटून निलयने दिर्घ श्वास घेतले. एवढ्या वेळात तिच्याकडून काहीच प्रश्न किंवा काही कॉमेंट नाही आली हे लक्ष्यात येऊन दीक्षा बद्दल निलयच्या मनात कुतूहल निर्माण झाले. पुन्हा चेअर वर बसून समोर टेबलावर असणाऱ्या डायरीवर त्याने नजर टाकली आणि सावकाश डायरी हातात घेत त्याने दीक्षाला प्रश्न केला, "ही डायरी मी माझ्याकडे घेऊन गेलो किंवा ऍज अ एविडन्स म्हणून जमा करून घेतली तर चालेल का तुम्हाला... सॉरी तुला..?"
शेवटच्या शब्दात निलयने जाणीवपूर्वक केलेला बदल लक्षात घेत दीक्षाच्या ओठांवर स्मित उमटले आणि चेअरच्या हातावर बोटांनी आवाज करत काळजीपूर्वक शब्द निवडत, "जर तुम्ही मला तुमच्या इंव्हस्टीगेशन मध्ये भाग घेऊ देणार असाल तर तुम्ही ही डायरी तुमच्याकडे ठेवली तरी चालेल. पण ऍज अ एविडन्स म्हणून जमा करून घेऊ नका ऑफीसर, ही माझ्या वडिलांची शेवटची गोष्ट आहे माझ्याजवळ... " घसा साफ करत तिने तिचे बोलणे सुरू ठेवले, "मला या केसची संवेदनशीलता माहीत आहे त्यामुळे या केस बद्दल कमीत कमी आणि संदिग्ध आणि जास्तीत जास्त जेवढी मोघम बातमी सांगता येईल तेवढी मी सांगेन पण मला या तपासामध्ये इंवोल्व व्हायचं आहे. कारण या सगळ्यात माझे आणि तुमचे दोघांचे वडील इंव्होल्वड होते आणि मला हे रहस्य जाणून घ्यायचं आहे." शेवटचे शब्द ठाम पणे निलयच्या डोळ्यात डोळे घालत सांगतले.
डाव्या हाताने कपाळ चोळत निलयने डायरीचा क्ल्यापस् लॉक करत दीक्षा च्या दिशेने पुढे सरकवली आणि, "मी याबद्दल विचार करून सांगेन. सध्या तरी ही डायरी तुझ्या जवळच ठेव आणि कोणाच्या हातात पडणार नाही याची काळजी घे.. आपण पुन्हा भेटू." एवढे बोलून त्याने दीक्षा, सूमेर आणि आस्था चा निरोप घेतला.
**********
पु भा प्र
पु भा प्र
Welcome back
Welcome back
छान झालाय हा भाग.
मागच्या भागाच्या लिंक पोस्ट केल्या तर उत्तम
फार मस्त उत्कंठावर्धक शैलीत
फार मस्त उत्कंठावर्धक शैलीत लिहिता तुम्हि. पुढचे भाग प्लीज लवकर टाका.
पु भा प्र
पु भा प्र
Submitted by नानबा on 9 March, 2024 - 03:06>>>>>
या आठवड्यात पुढचा भाग पोस्ट करायचा नक्की प्रयत्न करेन... Thanks
Welcome back
छान झालाय हा भाग.
मागच्या भागाच्या लिंक पोस्ट केल्या तर उत्तम
Submitted by manya on 9 March, 2024 - 17:42>>>
हो मी जुन्या भागच्या लिंक्स update करते भागात.. थॅन्क्स..
फार मस्त उत्कंठावर्धक शैलीत लिहिता तुम्हि. पुढचे भाग प्लीज लवकर टाका.
Submitted by पर्णीका on 9 March, 2024 - 19:20>>>
हो नक्की.. पुढचा भाग या आठवड्यात पोस्ट करेन.. थॅन्क्स
तुम्ही पुन्हा लिहित्या झालात
तुम्ही पुन्हा लिहित्या झालात हे विशेष कौतुक..
खरी चिकाटी आहे ही.
लगे रहो..
हा पण भाग चांगला झालाय.
नवीन भाग आला हे छान झालं.
नवीन भाग आला हे छान झालं.
आवडला हा भाग पण.
पुभाप्र!!
धन्यवाद..... @धनवन्ती, @आबा.
धन्यवाद..... @धनवन्ती, @आबा.