चित्रावरून लिखाण - एक पाचकळ प्रयत्न

Submitted by हरचंद पालव on 5 March, 2024 - 22:43

आमची एक चित्रा मिस होती, अत्यंत खडूस, भयंकर त्रास द्यायची...
ह पा नच चित्रावरील लिखाण बघून एक क्षण डोक्यात आल... चित्रा मिस च्या फोटो वर गिरगीट (लिखाण) केलं तर..?

पार्लरला जाण्याआधीचा फोटो लावला म्हणून चित्रा थोडी नाराज आहे. थोडं इंस्टा फिल्टर लावून फोटो अपडेट करायची रिक्वेस्ट आहे म्हणाली.

हरपा Lol

लंपन Lol

बर्याच कॉमेंट धमाल आहेत

आता कशावरून काय गेलंय ते सविस्तरच सांगतो. आधी चित्रा होती. त्यावरून लिखाण गेलं. पण चित्रा बारीक असल्याने नीट दिसेना. मग चित्राचा घाम मी वरून काढला आणि ती ठळक दिसू लागली. त्यामुळे नक्की कशावरून काय गेलंय हा गोंधळ होत असावा.

१..थोडक्यात घामाघूम होण्याइतपत तरी कष्ट घेतल्याशिवाय शरीर सुदृढ (ठळक) होत नाही..

२.. घ्या.. इथे आमचा घाम आम्हालाच पुसावा लागतो.. लकी चित्रा...

हर्पा Lol

वाहवा, निरु! माझ्या चित्रातून (आता माझी चित्रा कोण विचाराल) इतके सखोल गर्भित अर्थ निघत असतील असं वाटलं नव्हतं. आता हेच चित्र मॉडर्न मॉर्डन आर्ट म्हणून कुठल्यातरी गॅलरीत विकतो. मेसेज उदात्त वाटला पाहिजे एवढाच निकष असतो बहुधा. कुणीसं म्हटलेलंच आहे - विश्वाचे आर्ट माझ्या मनी प्रकाशले

आज की ताजा खबर...
चित्राच्या नावाचा अखेर खुलासा उघड
चित्रा विश्वा मणिप्रकाश

आज एक वाक्य ऐकलं, ते सुद्धा गो नी दां च्या पुस्तकात
"काशीचा रस्ता ह्या घरावरून जातो हे ऐकल्यावर एक माणूस शिडी घेऊन घरावर चढायला निघाला.. "
ते घरावरून ऐकताना हे चित्रावरून आठवले म्हणून लिहिले... Bw

मी मागे कुठल्यातरी प्रतिसादात हा किस्सा लिहिला होता, पण परत सांगण्याचा मोह आवरत नाही.-
‘अप्पासाहेब बेलवलकरांचं व्यक्तिचित्र रेखाटा’ ह्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नावर माझ्या एका वर्गमैत्रिणीने अगदी मन लावून ‘खुर्चीत बसलेले अप्पासाहेब’ असं चित्र रेखटलं होतं.
अर्थातच बाईंनी तिच्या उत्तरपत्रिकेचा पंचनामा भर वर्गात केला.

लई भारी!

प्रगत विश्वात स्वगत प्रकट करण्यासाठी चित्र प्रकाशात आले तर!

Pages