काल पुण्यामधे सभा घेण्यासाठी "निर्भय बनो" चे पत्रकार/सुधारक श्री. निखिल वागळे आणि समविचारी जाणार होते. सभेला जात असणार्या त्यांच्या ताफ्यावर काही भ्याड गुंडांनी अत्यंत सुनियोजीत रितीने प्राणघातक हल्ला केला. बैठकीला जात असणार्या या ताफ्यावर अनेक वेळा हल्ला झाला, त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला, गाडीच्या काचा फोडल्याचे व्हिडिओ सर्वत्र पसरत आहेत. अशा प्रकारच्या सर्वच हल्ल्यांचा निषेध करावा तेव्हढा थोडा आहे.
प्राणघातक हल्ला झाल्यावरही वागळे हे सभास्थाना पर्यंत पोहोचले. त्यांच्या निर्भयपणाला सलाम. या आधी ( महानगर घटना ) पण त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. तरी ते त्यांच्या विचारांवर ठाम राहिले आहेत.
वागळे हे पत्रकार आहेत. त्यांची मते ते निर्भीड पणे मांडत असतात. सर्वांनाच त्यांचे विचार पटत नसतील, काहींना वादग्रस्त वाटत असतील पण म्हणून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे हे उत्तर नाही. पत्रकारांवर/ विरोधी विचारांच्या लोकांवर प्राणघातक हल्ला होणे हे राज्यात कायदा सुव्यावस्था अस्तित्वात नसल्याचे दर्शवते.
त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली असतील तर कायदेशीर कारवाईचा लोकशाही मार्ग अवलंबायला हवा होता. केंद्रात तर तसेच राज्यात भाजपाचेच सक्षम सरकार असतांना - बेकायदेशीर असा हिंसक मार्ग का निवडला? हल्लेखोरांना कायद्याचा धाक / भिती काहीच राहिलेली दिसत नाही.
राज्याची सांस्कृतीक राजधानी असणार्या पुणे शहरांत एका पत्रकारावर अशाप्रकारे प्राणघातक हल्ला होतो हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. पत्रकारांना त्यांची मते निर्भीड पणे मांडता येत नसतील तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ(ही) खिळखिळा झालेला आहे, पोखरला आहे असे वाटते. सशक्त लोकशाही साठी निर्भीड पत्रकारीता जगविणे गरजेचे आहे अन्यथा अराजकाला आमंत्रण देत आहोत.
फेरफटका + १. वागळेंबद्दल मत
फेरफटका + १. वागळेंबद्दल मत बनवण्या इतके मी त्यांना कधीच पाहिले/ऐकले/वाचले नाही.
हल्ल्याचा निषेध.
अमितव+ १. कोणी आपल्या डोक्यात जातंय म्हणुन हल्ल्याचे, हाणामारीचे किंवा त्या व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाचे समर्थन करू नये हे पटलेच.
हा भ्याड हल्लाच आहे याबद्दल सहमत उदय.
रवीश कुमार आणि अभ्यासू
रवीश कुमार आणि अभ्यासू
या "अभ्यासू" पत्रकाराचे हल्दवानी बद्दलचे हे "अभ्यासू" ट्विट
-----------------------------------------------------------------------------------
@ravishndtv
उत्तराखंड में छह लोगों की मौत हुई है। कई लोग घायल हैं। विपक्ष के बड़े नेताओं को उत्तराखंड के बनभूलपुरा जाना चाहिए। वहां जाकर और ठहर कर चीजों का पता लगाना चाहिए। वहाँ जो हुआ है वह क़ब्ज़ा हटाने के नाम पर कुछ और भी नज़र आता है। वहाँ की ख़बरों में सरकार का ही पक्ष भरा है। ऐसे मामलों में विपक्ष के बड़े नेताओं को मैदान में जाकर रोकने और संवाद करने का साहस दिखाना चाहिए। आप बहुसंख्यक आबादी को गोदी मीडिया और व्हाट्स एप के प्रोपेगैंडा के सहारे नहीं छोड़ सकते। चुनावी ध्रुवीकरण तो वैसे भी हो रहा है।
विपक्ष इस तरह से चुप्पी लगाता रहेगा तोदेश भर में सामने आ रही सरकारी सांप्रदायिकता से नहीं लड़ पाएगा। इन बातों का भाषणों में ज़िक्र कीजिए। उत्तराखंड में भयंकर बेरोज़गारी है मगर बहस किस चीज़ को लेकर पैदा की जा रही है। वहाँ के युवाओं ने अगर यही भविष्य चुन लिया है तो दुखद है। उन्हें अख़बारों और चैनलों से सावधान रहने की ज़रूरत है।
दिल्ली में रातों रात मस्जिद का वजूद मिटा दिया गया। दिल्ली शहर के लोगों ने अनदेखा कर दिया। वे हर ज़्यादती में अपनी चुप्पी के साथ शामिल होते जा रहे हैं। विपक्ष के नेता क्या मौक़े पर गए, आस-पास के लोगों को बताया कि क्या हो रहा है?
हिंदी के अख़बारों में मस्जिदों पर दावों की ख़बरें भरी रहती हैं। कभी नीचे मंदिर होने तो कभी अतिक्रमण हटाने का सहारा लेकर तनाव पैदा किया जा रहा है ताकि बाद की कार्रवाई से वोट के लिए माहौल बने। ऐसी अनेक ख़बरों से गुज़रते हुए साफ़ लगता है कि कोर्ट, पुलिस, सरकारी विभाग और गोदी मीडिया के अख़बार लगातार ऐसी ख़बरों और बयानों से हिंदू वोट बनाने में लगे हैं। ये बहुत दुखद और शर्मनाक है।
नीचले स्तर पर कोर्ट की भूमिका पर बात होनी चाहिए। बात बात में सर्वे और स्टे के ज़रिए यह खेल खेला जा रहा है ताकि सब कुछ क़ानूनी लगे। सुप्रीम कोर्ट को अलग-अलग अदालतों में चल रहे ऐसे दावों और मामलों को देखना चाहिए। न्यायालय की व्यवस्था उसके हाथ में है। भारत में अदालती सांप्रदायिकता( court communalism) का एक नया ही रूप देखने को मिल रहा है।
कम से कम सुप्रीम कोर्ट को उसका संरक्षक नहीं बनना चाहिए और न अनजान रहना चाहिए।
-----------------------------------------------------------------------------------
अभ्यासू पत्रकार हे लिहायचे विसरला की लोकांनी/जमावाने जाणीपूर्वक आणि प्लॅनिंगने घरावर दगड जमा केले. पोलिस आले तर त्यांच्यावर दगडफेक केली. देशी कट्ट्याने गोळीबार केला. त्यांना मारहाण केली. आणि हे सगळे कशासाठी तर अतिक्रमण केलेल्या जागेवरील एक अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी.
थोडा अभ्यास राहिला बहुतेक
<दुसरा असा की हल्ला भ्याड
<दुसरा असा की हल्ला भ्याड नाही, त्यांना अगोदर हा हल्ला होणार आहे असे माहित होते, हल्ला लपून छपून नाही समोरून झालेला आहे.>
वागळेंच्या निमित्ताने भाजपचा आणि भाजप समर्थकांचा हा पवित्रा ससमर्थकांचा, हे चांगलं झालं.
कोर्ट ऑर्डर शिवाय मशीद
कोर्ट ऑर्डर शिवाय मशीद अनधिकृत की नाही हे कसे ठरवले ?
....
आणि, रविष आणि अभ्यासू हे दोन शब्द खटकले म्हणून हलद्वानीचे अवांतर इथे टाकणे टाळायला हवे होते.
वागळेंच्या निमित्ताने भाजपचा
वागळेंच्या निमित्ताने भाजपचा आणि भाजप समर्थकांचा हा पवित्रा , हे चांगलं झालं.<<
मला भाजप किंवा भाजप समर्थन अभिप्रेत नाही.
मला आंबा आवडतो म्हणजे मी कोय किंवा साल खात नाही.
तसेच मला कुठलाही एक पक्ष , एक व्यक्ती 100% आवडतो किंवा त्याचे समर्थन करावे असे वाटत नाही. त्यातील जे चांगले आहे ते समर्थन करावे कौतुक करावे वाईट आहे ते सोडून द्यावे , फार फार तर त्याचा निषेध करावा नाहीतर गप बसावे इतकेच एक सामान्य माणूस म्हणून मी करू शकतो.
आता या हल्ल्याची पार्श्वभूमी मला माहित नव्हती .तीशोधली असता असे कळले की, पंतप्रधान यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्यावर "एका गुंडाने दुसऱ्या गुंडाला दिलेले प्रशस्तीपत्रक "
अशा प्रकारचे ट्विट वागळे यांनी केले
आता मुद्दा असा की हे पत्रकार म्हणून त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्रात किंवा चॅनेलवर केलेले नसून x या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर व्यक्ती म्हणून केले आहे.
हे काही जणांना आवडले नाही व त्यांनी वागळे यांच्या विरुद्ध निषेध नोंदवला आणि निदर्शने योजली.
त्यानुसार पुण्यामध्ये झाली, त्यावेळेस निदर्शकांनी वागळे यांची गाडी अडवली घोषणा दिल्या आणि त्याच्या वर शाई फेकली आणि गाडीच्या काचा फोडल्या.
गाडीच्या काचा फोडणे व धमकी देणे व शारीरिक हिंसा करणे यांचा मी केव्हाही निषेध करतो.
पण एक सामान्य माणूस म्हणून आपण अशा प्रकारे कोणीही विनाकारण कोणाच्याही वाटेला जाऊ नये असे माझे मत.
सरकारला ज्याला भारतरत्न ची पदवी द्यावीशी वाटले ती त्याला दिली ज्याला घ्यावी अशी वाटली त्याने घेतली , तुमचे माझे काय गेले? आपल्या दैनंदिन जीवनाशी याचा काय संबंध? तुम्हाला आवडले असेल कौतुक करा आवडले नसेल तर आवडले नाही असे स्पष्ट म्हणा ना.. डायरेक्ट एखाद्याला गुंड असे म्हटले म्हणजे too much...
वागळे राजकीय कार्यकर्ते असतील तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात.
पत्रकार असतील तर कुठल्याही बातमीचा मागोवा घ्याव्या, तपशील द्यावा, लोकांना माहीत नसलेली बाजू समजावून सांगावी आणि आपली जी काही भूमिका असेल ती स्वतःच्या वर्तमानपत्रातून ,चॅनेल द्वारे मांडावे.
फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर ही वैयक्तिक व्यक्त होण्याची साधने आहेत. तेथील भूमिका पूर्णपणे वैयक्तिक असतात/ असाव्यात असे माझे आकलन.
कोर्ट ऑर्डर शिवाय मशीद
कोर्ट ऑर्डर शिवाय मशीद अनधिकृत की नाही हे कसे ठरवले ?
....
आणि, रविष आणि अभ्यासू हे दोन शब्द खटकले म्हणून हलद्वानीचे अवांतर इथे टाकणे टाळायला हवे होते.
Submitted by कॉमी on 11 February, 2024 - 09:00
>>>
कॉमी दादा, हलद्वानी विषयावर स्क्रोलचा लेख आहे. बराच मोठा आणि detailed आहे. इथे लेखन सीमा आहे आणि लेख इंग्रजीत आहे, नाहीतर कॉपी पेस्ट करून दिला असता.
https://scroll.in/article/1063483/uttarakhand-madrasa-at-centre-of-viole...
रवीश आणि अभ्यासू हे कॉम्बिनेशन केले असल्याने खटकनारेच आहे. बाकी रवीशला मॅगसेसे पुरस्कार मिळाला तेव्हाचा रवीश आणि आताचा रवीश दोन्ही वेगळे वाटतात. सवंग नसलेला रवीश आता एकांगी होतोय. आधी सर्व मुद्दे मांडणारा रवीश आता selective होतोय.
वागळे सारखा तो ही पत्रकार आहे आणि सरकार वर ताशेरे ओढणारा आहे. पण दोघेही सेलेक्टिव झाले आहेत. रवीशचा विषय मी इथे सुरु केला नाही, वर त्याचा उल्लेख आला, म्हणून दुटप्पी वागणाऱ्या माणसाचा चेहरा दाखवावा असे वाटल्याने लिहिले होते. बाकी माझी या विषयावरील ही शेवटची पोस्ट.
वागळे कितीही अक्रस्तळपने
वागळे कितीही अक्रस्तळपने बातम्या देत असेल तरीही आणि सर्वोच्च नेत्यांविरुद्ध बोलत असेल तरीही गाड्या फोडणे आणि शाई फेक हे चुकीचेच आहे. त्यांना दुर्लक्षित करणे हेच योग्य होते. आज वागळे उद्या आपलाही नंबर लागू शकतो. कारण प्रत्येक जण अपल्या मनाप्रमने अक्रस्तळपनाची व्याख्या करेल.
मी सदर लेख वाचूनच माझी
मी सदर लेख वाचूनच माझी प्रतिक्रिया लिहिले आहे. असो, थांबणे इष्ट.
छबुराव
छबुराव
हल्ला जर एकतर्फी झाला असेल तर तो निंदनीयच आहे. हल्ल्याचे समर्थन कधीही नाही. त्याच बरोबर वागळेंनी आव्हाडांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन सुद्धा निषेधार्ह आहे. महानगर वर झालेला हल्ला हा शिवसेना आणि वागळे यांच्या संगनमताने झाला होता असा लेख महानगर मधे वागळेंसोबत काम करणारे पत्रकार कपिल पाटील यांनी केला होता. ते या हल्ल्यानंतर वागळेंना सोडून गेले. त्यांनी आज दिनांक नावाचे दैनिक सुरू केले. त्यात एक लेख लिहून महानगरचा सेल वाढवण्यासाठी आणि शिवसेनेला प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही घटना घडवायची होती असे म्हटले होते.
हा लेख खराच असेल असे काही म्हणणे नाही. पण तो खोटा आहे असे वागळेंनी म्हटलेले नाही. सिन्नरच्या सभेत सुद्धा कपिल पाटील आता मविआ मधे आहेत असेच ते म्हणाले.
जर असे असेल तर सावध भूमिका घेणे चांगले. कुठल्याही पब्लिसिटी स्टंटसोबत आपण वाहवत जाऊ नये. अण्णांचे आंदोलन ज्याप्रमाणे बोगस निघाले तसा प्रकार असू नये. अर्थात या हल्ल्यामुळे भाजपचे नुकसानच होणार आहे हे निश्चित. निर्भय बनो या आंदोलनाला देशभर प्रसिद्धी मिळाली. उलट आता मैदानात सभा घ्याव्या लागतील. याचे राजकीय परिणाम भाजपला भोगावे लागतील.
हा हल्ला घडवून आणला कि नाही याबद्दल काहीही माहिती नाही. घडवून आणलेला नसेल तर तीव्र निषेध.
घडवून आणला असेल तरीही निषेध. हिंसा फक्त शारीरीक नसते. मानसिक हिंसा जास्त धोकादायक.
( वरीलप्रमाणे भूमिका असणार्यांवर छुपा संघी / भाजपचा एजंट असे आरोप होऊ शकतात. यामुळे व्यक्त न होणे चांगलेच. पण राहवत नाही).
<वागळे राजकीय कार्यकर्ते
<वागळे राजकीय कार्यकर्ते असतील तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात.
पत्रकार असतील तर कुठल्याही बातमीचा मागोवा घ्याव्या, तपशील द्यावा, लोकांना माहीत नसलेली बाजू समजावून सांगावी आणि आपली जी काही भूमिका असेल ती स्वतःच्या वर्तमानपत्रातून ,चॅनेल द्वारे मांडावे.
फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर ही वैयक्तिक व्यक्त होण्याची साधने आहेत. तेथील भूमिका पूर्णपणे वैयक्तिक असतात/ असाव्यात असे माझे आकलन.>
का बरं? राजकीय भूमिका घेण्यासाठी पक्षीय राजकारणातच उतरलं पाहिजे असं आहे का?
वर्तमानपत्रात , चॅनेलवर भूमिका मांडण्यासारखी आदर्श स्थिती आहे का? वागळे जाऊ द्या. किती पत्रकारांना चॅनेलने बाहेरचा रस्ता दाखवला किंवा त्यांनी चॅनेल्स सोडली याचा विदा पहा. सत्ताधारी पक्षाविरोधात बोलतो ते एक अख्खं चॅनेल विकत घेतलं जाऊ शकतं. अर्थात याचा सत्ताधारी पक्षाशी काय संबंध असं तुम्ही विचारूच शकता.
असे अनेक पत्रकार आता स्वतःची यु ट्यूब चॅनेल्स काढतात, ब्लॉग्स लिहितात. तुमचं आकलन सद्य परिस्थिती लक्षात घेतं का?
<<दुसरा असा की हल्ला भ्याड नाही, त्यांना अगोदर हा हल्ला होणार आहे असे माहित होते, हल्ला लपून छपून नाही समोरून झालेला आहे.>
म्हणजे वागळे वा त्यांच्या सोबतच्या लोकांनी त्या हल्लेखोरांना तसंच उत्तर देणं अपेक्षित होतं का? पोलिसांकडून अशा वेळी काय अपेक्षा ठेवावी?
मागच्या पानावर मी नितेश राणेंचा एक व्हिडियो दिला आहे. त्यातलं वक्तव्य इथे उतरवून काढतो.
मला एकच फोन आला पाहिजे की नितेश साहेब , कार्यक्रम करून टाकला. पोलिस मागे लागलेत, वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवायची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हांला आजच्या निमित्ताने देतो. पोलिसांच्या समोर देतो. माझं काही वाकडं करू शकणार नाहीत. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काही होत नाही आम्हां लोकांना.
----
पोलिसांनी हल्लेखोरांसोबत सभेचे आयोजक आणि मविआ कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मविआच्या कार्यकर्त्यांनी गाडीला , गाडीत बसलेल्यांना वाचवायचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार ( उलट मारणे) केलेला दिसत नाही. थोपवायचा प्रयत्न केला.
बाकी काहीही असो निखिल वागळे
बाकी काहीही असो निखिल वागळे यांनी धाडसी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला. मराठीतील journalistic activism मधे त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
विश्वंभर चौधरी यांची
विश्वंभर चौधरी यांची पोस्ट
https://www.facebook.com/100001297110601/posts/pfbid02uDhXcoS6boDZWmVXY8...
<< डायरेक्ट एखाद्याला गुंड
<< डायरेक्ट एखाद्याला गुंड असे म्हटले म्हणजे too much... >>
------ त्यांनी गुंड हाच शब्द वापरला आहे ?
दंगलखोर असे वाचण्यात आले होते. एका दंगलखोराने दुसर्या दंगलखोर्याला दिलेली शाबासकी.
दंगलखोर असे वाचण्यात आले होते
दंगलखोर असे वाचण्यात आले होते. एका दंगलखोराने दुसर्या दंगलखोर्याला दिलेली शाबासकी.>>> खरंच आहे की मग. रथयात्रेमुळे देशात १५० च्या वरती दंगली झाल्या होत्या. गुजराथ दंगल ही माहित आहे सगळ्यांना.
दंगलखोर असे वाचण्यात आले होते
दंगलखोर असे वाचण्यात आले होते. एका दंगलखोराने दुसर्या दंगलखोर्याला दिलेली शाबासकी.>>> खरंच आहे की मग. रथयात्रेमुळे देशात १५० च्या वरती दंगली झाल्या होत्या. गुजराथ दंगल ही माहित आहे सगळ्यांना.
वागळेंनी अमुक एक वक्तव्य
वागळेंनी अमुक एक वक्तव्य केल्यामुळे हल्ला केला असे स्पष्टीकरण दिले जात आहे. आज वागळे आहेत. उद्या दुसरं कोणी असेल. असेल कशाला?
जे एन यू मध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमारचं न्यायालयाच्या आवारातच मॉब लिंचिंग करायचा प्रयत्न केला गेला.
केंद्रातलं सरकार बदलल्यानंतर पहिलं मॉब लिंचिग झालं तेही पुण्यातच. मोहसीन शेख. सगळे आरोपी निर्दोष सुटले. आता ज्या कारणावरून भावना भडकल्या त्यांच्याशी मोहसीनचा संबंध इतकाच की तो मुस्लिम होता.
या प्रकरणी भाजप ने फुकट
या प्रकरणी भाजप ने फुकट वागळेंची प्रसिद्धी करून दिलीये असच वाटतं, जर ट्विट खटकलं होत तर कायदेशीर कारवाई करता आली असती, पोलीस स्टेशन च्या वाऱ्या करायला भाग पडले असते
निर्भय बनो असा काही इव्हेंट आहे हेच कित्येकांना माहिती नव्हते ते आता सगळ्यांना कळलं
आज दुपारी अभाविपने राष्ट्रीय
आज दुपारी अभाविपने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सुरू असलेला चित्रपट बंद पाडला. I am not River Jhelum हा २०२२ सालचा चित्रपट दाखवण्यात येत होता. केरळ, कलकत्ता, दिल्ली इथल्या महित्सवांमध्ये तो पूर्वी दाखवला गेला आहे. तिथे पुरस्कार मिळाले आहेत. सेन्सॉर प्रमाणपत्र आहे. तरी शो बंद पाडला. दिग्दर्शकाच्या उपस्थितीत हे घडलं. अजून पोलिसांच्या भानगडी सुरू असल्यानं तपशील लिहू शकत नाही. सदर चित्रपट महोत्सव पुणे इंटरनॅशनल सेंटर, FIPRESCI ही जगभरातल्या चित्रपट-समीक्षकांची संघटना, आणि एनएफडीसी यांनी आयोजित केला होता.
What is the end game here?
What is the end game here? नक्की काय साध्य करायचं आहे?!
(No subject)
अभाविप ही खाजवून खरूज काढणारी
अभाविप ही खाजवून खरूज काढणारी संघटना असल्याने वरील बातमीचे काहीही अश्चर्य वाटले नाही.
अखिल भारत विरोधी पक्ष
अखिल भारत विरोधी पक्ष
निवा प्रकरणी भाजपच्या
निवा प्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना झापले अशा बातम्या काल पर्यंत होत्या.
आजपर्यंत याचा फायदा मविआला झाला हा समज अगदी भाजपचा सुद्धा होता. पण..A Shock to MVA.
म्हातारी मेल्याचे ज्यांना दु
म्हातारी मेल्याचे ज्यांना दु:ख नाहीये त्यांनी हे विसरू नये की काळ सोकावतोय.
दु:ख ह्याचे ही आहे की काळ सोकावू नये म्हणून फक्त रडून उपयोग होत नाहीये हे कळत नाहीये
आणि काळ सोकावू नये म्हणून करायचा उपाय ज्यांच्याकडे आशेने पहावे अशा भल्याभल्या बहाद्दरांकडेही नाहीये.
Pages