चेपलेल्या वाहतुकीचे उद्गार

Submitted by वावे on 3 February, 2024 - 05:20

संदीप खरेच्या 'साहेब म्हणतो चेपेन, चेपेन' या कवितेचं विडंबन

बस म्हणते चेपेन, चेपेन, टॅक्सी म्हणते चेपेन, चेपेन
गर्दी मोठी, रस्ता छोटा, ट्रॅफिक म्हणतो चेपेन, चेपेन

आट्यापाट्या खेळत खेळत बाईकवाला आला रे
पोलीसाचा चुकवत डोळा सिग्नल तोडून गेला रे
डोके तिरके साधून कोन, खांद्यामधे धरला फोन
पब्लिक म्हणतं सुटला, सुटला, कॅमेरा म्हणतो पकडेन, पकडेन

बस म्हणते चेपेन, चेपेन, टॅक्सी म्हणते चेपेन, चेपेन

शिंगे फुंकत आणि रोखत आली मागून रिक्षा, रे
बेशिस्तीचे धडे गिरवत देते लोकां शिक्षा,रे
समोर ठेवुनी गूगल मॅप, घुसती पुढे नसता गॅप
आपण म्हणतो अडवेन, अडवेन, रिक्षा म्हणते निसटेन, निसटेन

बस म्हणते चेपेन, चेपेन, टॅक्सी म्हणते चेपेन, चेपेन

मूळ कविता
https://www.aathavanitli-gani.com/Song/Chepen_Chepen

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
रोजचा जिव्हाळ्याचा आणि डोक्यात जाणारा विषय.

धन्यवाद अमा, मानव, अमित, स्वातीताई, अवल, सामो, धनवन्ती, दीपक, कुमार सर Happy
अमित, प्रयत्न करते Happy

योगायोगाने आजच ही बातमी वाचली. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये बंगळुरातली वाहतूक सुधारली आहे! २०२२ मध्ये traffic congestion साठी जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेलं बंगळूर आता सहाव्या क्रमांकावर गेलं आहे. पुणे सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई पहिल्या दहात तरी नाही.
https://www.thehindu.com/news/cities/bangalore/bengaluru-drops-to-6th-pl...

मस्त जमली आहे Happy

डोके तिरके साधून कोन, खांद्यामधे धरला फोन >>> अशा त्या २-३ लाइन्स जबरी आहेत Happy

छान जमलीय...
कविता मला आवडत नाही म्हणून धागाच उघडला नव्हता.. प्रतिसाद संख्या वाढताना बघून काही राडा होतोय की काय या उत्सुकतेने उघडला Happy

मूळ कविता देखील छान