चंद्र मी व्हावे

Submitted by चुन्नाड on 2 February, 2024 - 09:26

चांदण्याला तेथे प्रवेश नाकारताना
जेथे शरीरसंपदा तुझी साकारताना
रेलावे की चूर व्हावे खेटून तुला ओणवे
रात्र"ही" थकून जावी अन् चंद्र मी व्हावे

गोपचांदण्या गोफ लोभसे पाहती बांधू मला
राधाअवनी प्रीत मोहक पाहती रांधू मला
तिला सतवाया जरासे कलेकलेने गुप्त व्हावे
भरती सागरास यावी अन् चंद्र मी व्हावे

उल्का लाखो, तारे चमचमणारे कोट्यावधी
निखळती नक्षत्रे सारी नजर तुझी पारधी
आकाशगंगा ही करी तुला पाचारण हळवे
नक्षत्र तू अठ्ठाविसावे अन् चंद्र मी व्हावे

अमावस्या भूतलावरी, असणे माझे सुप्त व्हावे
संमीलन ग्रहगोलांचे आपल्यासाठी लुप्त व्हावे
आकाशाचे श्याम राज्य तुझ्या सवे संपन्न व्हावे
पौर्णिमा ही फिकी ठरावी अन् चंद्र मी व्हावे

© चुन्नाड

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ही आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटली. बघितलं तर तुम्हीच एक महिन्यापूर्वी इथे टाकली आहे. चांगली आहे, नवनवीन लिहीत रहा.

मला वाटतं अशा अर्थाची व चंद्रावरचीच होती एक कविता. पण इतकी ओव्हर्ट नव्हती Happy

नाही नाही बरोबर हीच होती.

धन्यवाद !

चुकून वाहते पान विभागात होती