तुमचा आवडता/आवडती कॉमेडीयन कोण आहे?

Submitted by वर्षा on 1 February, 2024 - 22:09

स्टॅन्ड अप कॉमेडी बघता का?
तुमचा आवडता/आवडती कॉमेडी आर्टीस्ट / इन्फ्ल्युएन्सर कोण आहे?
मला अय्यो श्रद्धाचा कंटेंट आवडतो . कॉर्पोरेट विश्वावर विनोद करणार्‍या आणखी एकाचा हिंदी कंटेंट आवडला होता पण त्याचे आता नाव आठवत नाहीये. इथे अमेरिकेत झरना गर्ग बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे असे दिसते.
त्यामुळे इंग्रजी/हिंदी/मराठीतील तुमचे आवडते कलाकार येऊ द्यात. रेको प्लीज. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अय्यो श्रद्धाचे बरेच व्हिडीओज पाहिले आहेत, नाव नव्हते माहित तिचे. बहुतेक सगळेच आवडले. तिची बोलण्याची पद्धत, हावभाव व चेहरा निष्पाप, बालिश आणि खोडकर वाटतात त्यामुळे आणखी चांगले वाटते तिचे प्रेझेंटेशन.

आणि
संतत प्रक्षेणस्य ट्यार्पि घसरती

हे दोन्ही मला त्या श्रद्धाच्या आवाजातच ऐकू आलं. तिचे विनोद असेच असतात. Lol

Pages