
“११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली”
(https://www.lokmat.com/national/the-high-court-denied-permission-to-an-1...).
नुकतीच ही जयपूरची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झाले. इतक्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेतून जे मातृत्व लादले जाते ते अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा शास्त्रीय कानोसा.
2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या युनिसेफच्या अहवालानुसार सुमारे 13 टक्के मुलींवर अशा प्रकारचे मातृत्व लादले जाते. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाखालील देशांमध्ये तर हे प्रमाण 25% आहे; दक्षिण आशियात ते १०% आहे. अशा घटनांमध्ये सुमारे 20% घटना बाललैंगिक अत्याचार या सदरात मोडतात. त्यावरील वयोगटांमध्ये 33% प्रकरणांमध्ये बलात्कार हे मातृत्वाचे कारण असते.
अल्पवयीन मातृत्वाची सामाजिक कारणे
१. दैनंदिन पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण या मूलभूत सुविधा घरांपासून लांब अंतरावर असण्यातून येणारी असुरक्षितता.
२. शाळा घरापासून खूप दूर असणे आणि तिकडे जाण्याचा मार्ग असुरक्षित असणे. खुद्द शाळेच्या वर्गातील मुलग्यांकडून आणि शिक्षकांकडून देखील बलात्काराचे भय संभवते.
३. प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा दूरच्या अंतरावर असणे आणि तिथली अपुरी वैद्यकीय सुविधा
४. गरिबी हे तर अत्यंत महत्त्वाचे कारण. दारिद्र्यरेषेखालील पालकांकडून आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांमधील काही मुली नाईलाजाने परिचयातील सधन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवून त्या बदल्यात पैसे आणि इच्छित वस्तू मिळवतात.
५. विवाहवय कायदा अस्तित्वात असूनही अजूनही कित्येक प्रदेशांमध्ये बालविवाह सर्रास होताना दिसतात. युनिसेफच्या 2021च्या माहितीनुसार जगभरात मिळून सध्या हयात असलेल्या स्त्रियांपैकी सुमारे ६५ कोटी महिलांचा बालविवाह किंवा अल्पवयात लैंगिक संबंध झाला होता. त्याची जागतिक टक्केवारी खालील चित्रात पाहता येईल :
(चित्रसौजन्य : युनिसेफ)
(वेळीच गर्भपात न केल्यास) अशा प्रकारच्या मातृत्वातून संबंधित मुलींना काही गंभीर शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ते आता थोडक्यात पाहू :
शारीरिक दुष्परिणाम
१. गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि फीट्सचा विकार होण्याची शक्यता
२. प्रसूतीपूर्व डॉक्टरी सल्लामसलतीकडे दुर्लक्ष आणि हेळसांड
३. मुदतपूर्व प्रसूती
४. प्रसूतीदरम्यान गंभीर अडथळा, सिझेरियन किंवा अन्य शस्त्रक्रियांची गरज
५. प्रसूतीनंतर होणारा fistula, अतिरिक्त रक्तस्त्राव, गर्भाशय अस्तराचा दाह. तसेच क्षयरोग आणि अन्य जंतुसंसर्ग
६. आधीच कुपोषणग्रस्त असल्यास तीव्र ऍनिमिया सुद्धा असतो
७. कमी वजनाच्या बालकाचा जन्म आणि/ किंवा जन्मानंतर लवकरच त्याचा मृत्यू.
सामाजिक दुष्परिणाम
१. शालेय शिक्षण थांबवावे लागणे
२. कुटुंब आणि आजूबाजूच्या समाजाकडून सतत दूषणे मिळणे; वेळप्रसंगी जवळच्या कुटुंबीयांकडून मारहाण
३. बलात्कारिता/ कुमारी माता हा आयुष्यभरासाठीचा कलंक लागतो.
४. गरोदरपणी योग्य वेळेत हस्तक्षेप न केल्यास जन्माला येणाऱ्या मुलांच्या पोषणाचा प्रश्न; अनाथालयांवरील बोजा वाढणे.
अशा प्रकारच्या शोषित मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून त्यांत त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. अशा समूहाकडून आलेल्या काही मागण्या अशा आहेत :
१. बलात्कारी पुरुषांना कठोर शासन करणे
२. पीडित मुलींना शाळेत पुन्हा घेऊन शैक्षणिक संधी देणे
३. या वयोगटातील मुलामुलींचे लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधन या विषयावर प्रबोधन व्हावे
४. शाळांमधील वातावरण सुरक्षित होणे आवश्यक असून त्याची हमी देण्यात यावी. या संदर्भात पालक व शिक्षकांचे समुपदेशन व्हावे
५. पीडीत मुलींकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टिकोनातही बदल झाला पाहिजे
६. विवाहवय कायद्याची कठोर अंमलबजावणी
अल्पवयीन मातृत्वाचे जागतिक पातळीवर नोंदलेले न्यूनतम वय किती असेल याचा शोध घेतल्यावर खालील धक्कादायक माहिती मिळाली :
सन 1939मध्ये पेरू देशातील ही घटना. (https://en.wikipedia.org/wiki/Lina_Medina)
पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले.
या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty).
या बातमीची वैद्यकीय तसेच पत्रकारीय प्रांतात बरीच शहानिशा झालेली दिसते. त्यानंतर ही बातमी खरी असल्याचे दिसते आहे..
(https://www.snopes.com/fact-check/youngest-mother/).
अर्थात मातृत्वाचे इतके लहान वय हे अपवादात्मक मानावे लागेल.
या दुःखद विषयाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित देशांतील सामाजिक आणि आरोग्य यंत्रणांनी या संदर्भात योग्य ती पावले प्राधान्याने उचलणे महत्त्वाचे आहे.
*********************************************************************
( सर्व चित्रसौजन्य : युनिसेफ)
चीड आणणाऱ्या घटना असतात या.
चीड आणणाऱ्या घटना असतात या. तीनचार वर्षांपूर्वी कर्नाटकातल्या एका अकरा-बारा वर्षांच्या मुलीची एक बातमी वाचली होती. तिला बहुतेक मुळात मासिक पाळी सुरू झालीच नव्हती (किंवा अनियमित असेल.) त्यामुळे ती गरोदर आहे हेच समजलं नाही. थेट सातव्या की आठव्या महिन्यात पोट मोठं दिसायला लागलं तेव्हा तपासणी केल्यानंतर समजलं. नातेवाईकांपैकीच कुणीतरी तिच्यावर बलात्कार केला होता
बलात्कार मधून अल्प वयीन
बलात्कार मधून अल्प वयीन मुलींना मातृत्व येत असेल तर हा प्रकार बाल अत्याचार चाच आहे आणि गंभीर प्रकार आहे हा.
लहान वयात लग्न करणे हा प्रकार पण बाल अत्याचार चच आहे पालक च दोषी आहेत पण पळून जावून लग्न केले असेल तर मात्र दोष कोणाला द्यावा.
वरील दोन्ही प्रकार साठी कडक कायदे जगभर आहेत.
कमी वयात लैंगिक इच्छा जागृत होण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे असे वाटते.
खूपच भयंकर. मुलींना आणि
खूपच भयंकर. मुलींना आणि त्यांच्या पालकांना लैंगिक शोषणाबद्दल मुलींच्या अगदी लहान वयापासून सजग करण्याची गरज आहे. म्हणजे निदान त्या मुलींना अल्पवयात मूल जन्माला घालावे लागणार नाही. (धागा अल्पवयीन मातृत्वाबद्दल आहे म्हणून हे लिहिले. बाकी बलात्कारासाठी कठोर आणि तत्काल शिक्षा याबद्दल लिहावे तितके थोडे)
वरील सर्वांशी सहमत. भरत,
वरील सर्वांशी सहमत.
भरत,
सूचनेबद्दल धन्यवाद !
आकडे हदरवणारे आहेत.
आकडे हदरवणारे आहेत.
आपल्या सुरक्षित जगाबाहेर एक काळे जग आहे याची जाणीव करून देणारे आहेत.
अर्थात आपल्या जगात ही टक्केवारी कमी असली तरी ते पूर्ण सुरक्षित नाही हे ठाऊक आहे. त्यामुळे शक्य ती काळजी घेतली जाईलच.
लेख नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण
चिड आणणारा गहन प्रश्न आहे हा.
चिड आणणारा गहन प्रश्न आहे हा....
अत्यंत गंभीर प्रश्न..
अत्यंत गंभीर प्रश्न..
प्रचंड अस्वस्थ करणारं आहे
प्रचंड अस्वस्थ करणारं आहे सर्व.
>>गरिबी हे तर अत्यंत
>>गरिबी हे तर अत्यंत महत्त्वाचे कारण. दारिद्र्यरेषेखालील पालकांकडून आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांमधील काही मुली नाईलाजाने परिचयातील सधन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवून त्या बदल्यात पैसे आणि इच्छित वस्तू मिळवतात.<< या शिवाय गरिबि मुळे आइ वडिल मुलान्ना सुरक्शित ठिकाणी ठेवून कामा साठी जाऊ शकत नाहित त्या मुळे त्यान्च्या गैर हजेरीत मुलांचा गैर फायदा घेतला जातो. पाळणाघर वगैरे सर्वान्ना परवडत नाही.
इतक्या लहान वयात असे काही
इतक्या लहान वयात असे काही घडले तर शारीरिक नुकसान तर होईलच. पण ती मुलगी काय मानसिक अवस्थेतून जात असेल याचा विचार करवत नाही.
बहुतेक शाळांत आता गुड टच, बॅड टच शिकवतात. पण आपल्यासोबत काय घडलेय याचे गांभीर्य कसे समजणार या वयात? किंवा मग झाल्या प्रकारची किती दहशत बसली असेल? काय काय गोष्टी समजावयाचा मुलांना?
खरंय, आपणा सर्वांशी सहमत आहेच
खरंय, आपणा सर्वांशी सहमत आहेच. या विषयाबाबत दुःख, राग, चीड, निषेध अशा सर्वकाही भावना मनात दाटून येतात.
अंदाजे सात-आठ वर्षांपूर्वीची घटना आठवली. असेच संक्रांतीनंतरचे दिवस होते. ग्रामीण भागातल्या शाळेतली मुलगी शाळेत जाताना आईला सांगून गेली,
“आई, आज भरपूर तिळगुळ कर बरं का. मला उद्या शाळेत सगळ्यांना वाटायचा आहे”.
आई वडील दोघेही शेतमजूर. ती मुलगी ज्या दिवशी हे सांगून गेली त्या दिवशीच शाळेतून येताना तिच्या शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि पुढे तिची हत्या केली. इकडे आई तिच्यासाठी तिळगुळ करून डब्यात भरून ठेवून तिची वाट बघत होती.
ती बातमी वाचल्यावर अक्षरशः लिटरभर रडू फुटले होते. पुढे या घटनेत पिडीतांना न्याय मिळाला का नाही ते काही कळले नाही.
मुळात अशा घटनांचा न्यायालयात ‘निकाल’ लागला तरी पिडीतांना खरा “न्याय” मिळतो का, हा एक सनातन प्रश्न असून तो अनेक व्यासपीठांवर उपस्थित केला गेलेला आहे.
सुन्नं करणारी सत्य स्थिती आहे
सुन्नं करणारी सत्य स्थिती आहे ही
हतबल वाटते.
काय काय गोष्टी समजावयाच्या
काय काय गोष्टी समजावयाच्या मुलांना?
>>>>
यावरून माझ्या वैद्यकीय शिक्षणादरम्यानची एक आठवण सांगतो 1980 च्या दशकात माझे पदवी शिक्षण चालू असताना बाल-आरोग्य या विषयात “बालक” याची भारतीय व्याख्या, वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अशी होती.
पुढे काही वर्षांनी पदव्युत्तर शिक्षण चालू झाल्यावर त्या विषयाचे पाश्चात्य पुस्तक उघडले तेव्हा त्यात गर्भनिरोधन हा विषय बऱ्यापैकी विस्ताराने दिलेला दिसला. हा एक छोटासा धक्का होता कारण बाराव्या वर्षापर्यंत याची काय गरज, अशी एक मनातली धारणा.
कालांतराने जगभरात आरोग्य दृष्टिकोनातून बालकाची व्याख्या वय 18 वर्षापर्यंत पुढे नेण्यात आली, हा भाग वेगळा.
अल्प वयीन वयात मातृत्व हा
अल्प वयीन वयात मातृत्व हा गंभीर प्रश्न आहेच.
अल्प वयीन वयात गरोदर राहणे ह्याला दोन च कारण .
1) बलात्कार .
२) लहान वयात लग्न.
लैंगिक अत्याचार जसे अल्प वयीन मुली वर होतात तसे अल्प वयीन मुलांवर वर होतात.
म्हणून अल्प वयीन स्त्री आणि पुरुष ह्यांना बालक हा शब्द वापरला जातो.
समाजाने gender biased नजरेने ह्या गोष्टी कडे कधीच बघू नये..
बालकांचे रक्षण करणे हे सरकार चे कर्तव्य आहेच पन समाजाचे पण ते कर्तव्य आहे .
भयंकर आहे! मागे एका अल्पवयीन
भयंकर आहे! मागे एका अल्पवयीन स्पेशल मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी वाचली होती. कुटुंब सुशिक्षित आणि सुस्थिती असलेले होते. पण नातेवाईकानेच गैरफायदा घेतला. शिवाय ही गोष्ट आई वडिलांना समजेपर्यंत उशीर झाला होता.
स्पेशल मुलीवर
स्पेशल मुलीवर
>>> म्हणजे मतिमंद की अन्य काही ?
अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि
अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्यातून मातृत्व किंवा अल्पवयीन मुलीचे लग्न आणि त्यातून मातृत्व या दोन्ही गंभीर समस्या आहेत. यातला अल्पवयीन मुलीचे लग्न हा देखील एक प्रकारे स्टॅच्युटरी रेपच. थोडक्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि त्यातून पुढे गर्भधारणा.
अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा नात्यातील, ओळखीतील असते. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरातील मुलींच्या बाबतीत आई-वडील जिथे काम करतात तिथल्याच व्यक्तींकडून लैंगिक शोषण होणे हे मोठ्या प्रमाणावर घडते. अगदी मुलगी स्वतः पळून गेली तरी अल्पवयीन मुलीला अशा संबंधांसाठी राजी करणे हा देखील गुन्हाच.
या सगळ्यात आता भर पडते आहे ती म्हणजे इंटरनेटचा वापर करुन सावज हेरणार्या सेक्शुअल प्रिडेटर्सशी. सेक्शुअल प्रिडेटर्समधे नातेवाईक, शेजार्यांपासून ते शिक्षक, कोच, डॉक्टर, पोलीस, डेकेअर/स्कूलबस कर्मचारी, कँप काउंसेलर अशी बरीच मंडळी असतात. गर्भधारणा ही एक समस्या झाली, त्या जोडीला ब्लॅकमेल्,/दहशत बसवून वारंवार होणारे शोषण, STD, मानसिक आघात आणि त्यातून PTSD हे देखील आहेच. बरेचदा प्लॅन बी वापरायला भाग पाडून गर्भधारणा टाळणे केले जाते, आणि शोषण सुरु रहाते.
एकीकडे अल्पवयीन मुलामुलींवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न गरजेचे आहेत तर दुसरीकडे पिडीत व्यक्तीचे पुनर्वसन, प्रजननसंस्थेसंबधीत आरोग्य, गर्भधारणा झाल्यास सुरक्षित गर्भपाताची सोय या समस्या आहेत.
अमेरीकेत सध्या अॅबॉर्शन बॅन बाबतचे कायदे होत आहेत आणि बलात्कारातून गर्भधारणा झाल्यास गर्भपाताची मुभा नसणे /मर्यादित असणे, नाईलाजाने मुलाला जन्म द्यावा लागणे हे मोठ्या प्रमाणात होत आहे. अॅडल्ट व्यक्तींना अॅबॉर्शनची सुविधा मिळणे मुश्किल तिथे अल्पवयीन व्यक्तीची परीस्थिती अजूनच गंभीर आहे. एक अवघी दहा वर्षाची बलात्कार पिडीता गर्भवती झाली. तिला तिच्या राज्यातील कायद्यांमुळे अॅबॉर्शन अॅक्सेस नाही म्हणून प्रवास करुन शेजारच्या राज्यात यावे लागले. हे असे करणे सर्वच केसेसमधे शक्य नसते. medical necessity, rape and incest या कारणास्तव मुभा आहे तिथेही गुन्हा घडला हे सिद्ध करायचे बर्डन पिडीत व्यक्तीवर आहे. अल्पवयीन व्यक्तीसाठी हे अतिशय गंभीर स्वरुपाची परीस्थिती निर्माण करते.
भयंकर आहे हे!
भयंकर आहे हे!
चीड आणणारे आणि सुन्न करणारे
चीड आणणारे आणि सुन्न करणारे आहे हे!
बलात्कारातून गर्भधारणा
बलात्कारातून गर्भधारणा झाल्यास गर्भपाताची मुभा नसणे /मर्यादित असणे, नाईलाजाने मुलाला जन्म द्यावा लागणे हे मोठ्या प्रमाणात होत आहे.
>> खरंय. देशागणिक कायद्यातील फरक आहेत. एकंदरीत जागतिक परिस्थितीवर नजर टाकता 60टक्के ठिकाणी गर्भपात कायदेशीर व सुलभ आहे असे दिसते :
https://reproductiverights.org/maps/worlds-abortion-laws/
या चाइल्ड मॉलेस्टर्स ना फाशी
या चाइल्ड मॉलेस्टर्स ना फाशी का होत नाही? जरब बसणार कशी?
आमच्या इथे ते रो विरुद्ध वेड
आमच्या इथे ते रो विरुद्ध वेड बाद झाल्याने मोठीच समस्या झाली आहे.
https://www.cnn.com/us/abortion-access-restrictions-bans-us-dg/index.html
सगळे इतके गुंतागुंतीचे झाले आहे की डॉक्टर्सही रुग्णाला सुरक्षित करायचे की स्वतःला अशा विवंचनेत!
कॉलेजची निवड करणार्या नव्या पिढीला कँपस सेफ्टीच्या जोडीला तिथल्या अॅबॉर्शनविषयक कायद्यांचाही विचार करायला लागत आहे हे फार दुर्दैवी आहे. धार्मिक कारणास्तव डयूटीवरच्या डॉक्टरने प्लॅन बी प्रिस्क्रिप्शन द्यायला नाकारणे, त्याच चालीवर फार्मसिस्टने प्लॅन बी प्रिस्क्रिप्शन भरायला नकार देणे, प्रसंगी त्यासाठी १०० मैलाच्या परीघात वणवण हे होतच होते आता त्यात नव्या कायद्यांची भर.
फार्मसिस्ट प्रिस्क्रिप्शन
फार्मसिस्ट प्रिस्क्रिप्शन भरायला नकार देऊ शकतो? वॉव!
उद्या कॅन्सर वर विश्वास नाही, ते माझ्या धर्मिक विश्वासात बसत नाही, म्हणून नकार देईल. ह्याला काय अर्थ आहे?
सॉरी इथे अस्थानी आहे. आणि फर्स्ट अमेंडमेंट खाली लोक काय इटरप्रिट करतील त्याला सीमा नाही. असो!
गंभीर आणि अवघड विषय
गंभीर आणि अवघड विषय
अजूनही भारतात अनेक भागात contraception हा विषय फक्त लग्न झालेल्यांसाठीच असल्यासारखा संकुचित आहे. महाविद्यालयांत तरी यावर शस्त्रशुद्ध माहिती द्यायला हवी
महाविद्यालयांत तरी यावर
महाविद्यालयांत तरी यावर शस्त्रशुद्ध माहिती द्यायला हवी >>>> +११
महाराष्ट्रातील काही महाविद्यालयांत असे उपक्रम राबवले जात आहेत.
हा पहा एका स्त्री वाचकाचा अनुभव :
https://www.misalpav.com/comment/1123685#comment-1123685
..
त्यातला मोजका भाग असा :
"महाविद्यालयातच राणी बंग यांचे भारी शिबिर झाले होते.
त्या नेमक्या कंडोम काय कसा उपयोग शिकवतांना प्रिन्सी आले.आम्हांला लाजल्यासारख झालं,पण राणीताई एकदम शांत होत्या तेव्हा समजलं ,समजतो एव्हढे या गोष्टींचा बाऊ करायची गरज नाही".
..
अजून असे अनुभव यावेत.
म्हणजे मतिमंद की अन्य काही ?>
म्हणजे मतिमंद की अन्य काही ?>>> मतिमंद.
>>गंभीर आणि अवघड विषय>>> +१
>>गंभीर आणि अवघड विषय>>> +१
कायद्याने मुलीच्या लग्नाche किमान वय १८ आहे. लगेच १८-१९व्या वर्षीच गरोदर होणे शरीराच्या दृष्टीने योग्य असते का?
१८-१९व्या वर्षीच गरोदर होणे
१८-१९व्या वर्षीच गरोदर होणे शरीराच्या दृष्टीने योग्य असते का?
>>>
मुलींचे यौवनात पदार्पण करण्याचे सरासरी वय १०-११वर्षे आहे. तर ते पूर्ण होण्याचे वय १५-१७ आहे. वयाच्या १८ व्या वर्षी जननेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली असते. तसेच मानसिक व भावनिक विकासही झालेला असतो.
शारीरिक दृष्टीकोनातून १८-१९व्या वर्षी गरोदर राहण्यास काही हरकत नसते.
१८-१९व्या वर्षीच गरोदर होणे
.
गर्भ निरोधक,गोळ्या किंवा
गर्भ निरोधक,गोळ्या किंवा condoms, hya विषयी दहा पंधरा वर्षाच्या मुलाना नक्कीच माहिती असेल.
ह्या वयात मोबाईल मुलांच्या हातात येतो .
आणि सर्व प्रकारची माहिती खरी ,खोटी मोबाईल देत च असतो.
त्या मुळे ह्या गोष्टी लोकांना शिकवले गेले पाहिजे ह्याला काही जास्त अर्थ नाही.
लोक सर्व बरोबर शिकलेले असतात.
गरज आहे मुलाना एका ध्येयाकडे वळवणे जेणे करून सेक्स ही गोष्ट त्यांच्या डोक्यात कमी येईल.
मैदानी खेळ,किंवा physical activity असणारे छंद, .
अभ्यास ,निसर्गात फिरणे .
अशा गोष्टीत मुलाना गुंतवले पाहिजे.
पण आपण बघतो इंटरनेट आणि समाज माध्यम ह्या वर मुल पडीक असतात
Pages