Submitted by prajo76 on 8 January, 2024 - 05:32
सध्या घरात फार धुळ येते आहे. एअर प्युरिफायर काेणी वापरलेलं आहे का? त्याचा खरंच ऊपयाेग हाेताे का?
डस्ट एलर्जी असल्यामुळे सर्दी, कफ व खाेकला हे सतत हाेत असतं वारंवार. त्यामुळे एअर प्युरिफायर खरंच ऊपयाेगी पडेल का?
कृपया सांगा..माबाेकर...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धूळ कशामुळे निर्माण होत आहे,
धूळ निर्माण होण्याचे स्त्रोत अनेक असतील (वहानांमुळे, रस्त्यावरिल वर्दळ, औद्योगिक / रासायनिक उद्योग, कोळसा/ खाण काम.... ) ते कमी करणे शक्य नसेल तर धूळ घरांत येण्याचे " प्रमाण " कमी करता येईल का?
अॅलर्जी तसेच फुफ्फुसाचे आजार वाढत आहेत. हवेतील २.५ तसेच १० मायक्रॉन particulate matter ( PM2.5, PM10), NO2 /oxides of nitrogen NOx, SO2.... यांचे प्रमाण किती आहे हे सहजपणे समजते. तासागणित Air Quality Index AQI चे आकडे प्रसिद्ध होत असतात.
Air-purifier मधे air filters असतात. filter चाळणी हवेतील particulate matter ना हवेतून वेगळे करतात. चाळणी जेव्हढी बारिक / जाड/ एका पेक्षा जास्त लेयर्समधे तेव्हढी हवा तुलनेने आधीपेक्षा स्वच्छ.
आमच्या कडे उन्हाळ्यांत जवळपास ३-४ महिने ( forest fire मुळे) धुराचे साम्राज्य होते. दारे खिडक्या सतत बंद ठेवली होती. त्यावेळी मी तयार केलेला घरगुती air-filter. धूळ किंवा PM2.5 ना अडकवण्याचे काम सहज करेल ( पण SO2/ NO2 किंवा chemical pollution साठी काम करणार नाही ). मला air purifier तातडीने बनवावा लागला होता, पण या पेक्षा नक्की चांगला (आणि efficient) बनवता येतो. पंख्यातून बाहेर फेकलेली हवा पुन्हा मागे पंख्यातून जायला नको म्हणून समोर पुड्ढा लावलेला आहे.
मला अॅलर्जीचा त्रास आहे,
मला अॅलर्जीचा त्रास आहे, नक्की कशाची आहे हे कळत नाही, कुठे ट्रिगर व्हायला नको म्हणून काळजी घेत असतो. air-purifier चा उद्देश घरांतील PM2.5 चे प्रमाण कमी करणे हा होता. डस्ट अॅलर्जी असणार्यास उपयोग होतो अथवा नाही हे माहित नाही. बाजारांत अनेक air-purifiers मिळतात, काही दिवस वापरुन बघा.
Dhanyawaad uday
Dhanyawaad uday