Submitted by अनुजय on 31 December, 2023 - 10:05
थर्टीफस्ट
सरत्या वर्षाला देता निरोप
तिला गलबलून आलं
डबडबलेल्या डोळ्यांनी
तिला तो आठवला,
ज्याला कोरोनाने नेलं
एकुलते एक मूल ही
कसल्याशा आजाराने गेलं
असतं कुणीतरी तर
इतरांशी हेवा करत
घेतल असते जवळ
आता थिजले मन
अन् जातेय सर्व वेस्ट
कसला आनंद अन्
कसला आलाय थर्टीफस्ट
प्रा.महेश बिऱ्हाडे
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
साध्या सरळ शब्दात संदेश दिलाय
साध्या सरळ शब्दात संदेश दिलाय.