Submitted by अनुजय on 27 December, 2023 - 12:31
*महती माणुसकीची*
माणसं माणसाला
क्षणोक्षणी लुबाडतात
अन् महती सदा
माणुसकीची गातात......
घर असो की दार
सदैव स्वार्थाची पेरणी
आपल्याच लोकांची घेरणी
हाव संपत्तीची धरतात,....
प्रीत असो वा लंघोटी यारी
केसांनी गळा आवळती भारी
आव आणून जीव ओवळती
जिवलगा उताणा करतात...
उद्योग असो वां व्यवसाय
काढुनी वरची मलई साय
वैध अवैध मार्ग बेसुमार
मिलावटी जहर बनवतात...
शासन असो प्रशासन
देती फुकाचेच आश्वासन
आशा लावून दिवास्वप्नांची
जिवंतपणी दिवसा मारतात...
शिक्षण असो आरक्षण
करून सारे खाजगीकरण
मुक्या जिवापरी
खऱ्या लाभार्थ्या दूर करतात..
समाजकारण असो की राजकारण
सांभाळून सारे अर्थकारण
फेकू सारे फेक फेकतात
भोळ्याभाबड्या ,मूर्ख समजतात....
महेश बिऱ्हाडे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults