सध्या कोरीअन बरोबरच जपानी पदार्थ बनवायचे डोक्यात फार आहे. जपानी सोबा नूडल रेस्टॉरंट चे खूप च व्हिडीओ बघितले, टुको ममा व कोरिअन बायकांचे सकाळी पाच ला उठून ब्रेफा व डबे, बेंतो बॉक्सेस बनवायचे व्हिडिओ बघित ले.
मुंबईत पा पा या व यौत्सा अश्या हाय एं ड जागांमध्ये जपानी जेवण जेवुन पण आले. पण जे तिथे अगदी घरगुती जेवण आहे. आईच्या हातचे टाइप
ते इथे फार हाय एंड अनुभव आहेत. मला स्वतःला घरी बनवायला शिकायचे आहे.
आज दुपारी वेळ होता तर अमॅझॉन वर बरेच काय काय घटक पदार्थ विश लिस्टीत घातले आहेत. सुशी मेकिन्ग किट, दाशी वासाबी, मिसो,
सोबा नुडल्स मिरिन साके सॉय सॉस हे सर्व यादीत आहे. अजुन काय घ्यावे? स्टिकी राइस पण एक किलो नोरी शीट्स, बोनिटो फ्लेक्स घेतले आहे. घरी तीळ आहेत.
सरावाने चॉपस्टिक्स पण नीट वापरायला येउ लागले आहे.
बीफ काही इथे मिळत नाही. पण पोर्क मिळते व रेड मीट काही मी इतके खात नाही. पण फिश व चिकन मिळून जाते. प्रॉन टेंपुरा फ्लोअर मिक्क्ष पण मागवले आहे. मला टेंपुरा फार आवडतो. प्लस सूप्स सलाड, मशरूम्स, स्प्रिन्ग अनिअन्स गाजर बटाटे स्वी ट पटॅ टो इथे मिळतेच.
नव्या वर्शात काही तरी नवे शिकायचे व करायचे म्हणून प्रयत्न करुन बघत आहे. मला त थाई स्वयंपाक येतो. पण साउथ कोरीअन व जपानी शिकायचे आहे. तुमचे अनुभव व माहिती लिहा. रेशिप्या टाका.
२५ तीस वर्शे भारतीय स्वयंपाक करुन कंटाळा आला आहे. पोळ्या बडवायचा पण. खाणे कमी आहे त्यामुळे थोडे थो डे जपानी फूड पोट भरीचे होते आहे.
आरिगातो गोझाईमास.
Intersting वाचणार आहे हा धागा
Intersting
वाचणार आहे हा धागा
छान धागा, आमच्याकडेही हे
छान धागा, आमच्याकडेही हे पदार्थ आवडतात. आणि चॉपस्टिक्सने खायलाही मजा येते. धाग्यात चांगली माहिती येऊ दे. घरी शेअर करता येईल.
वाचतोय....
वा वा अमा तू तर माझ्याहीपुढे
वा वा अमा तू तर माझ्याहीपुढे गेलीस ( आठवा लक्ष्मी बाई टिळकांचा धडा). मी नुसतेच कोरियन ड्रामे बघते (आता मोजतच नाही) पण आवडीने बघते. त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर प्रयत्न मागे पडला, नुसतीच ऐकते मी ती भाषा कानाला गोड वाटते.
तसंच त्यांचे खाण्याचे पदार्थ पण .
ईताशीमाशीते
ईताशीमाशीते
अमा, मध्यंतरी मी ह्या नूडल्स
अमा, मध्यंतरी मी ह्या नूडल्स केल्या होत्या दोन तीनदा. आवडतायत का बघा. सोप्पी आहे रेसिपी.
https://www.instagram.com/reel/Ctguv5NgNor/?igshid=MzRlODBiNWFlZA==
तसंच मी घरी अधेमधे जॅपनीज स्टाईलची करी करते तेव्हा हे करी मिक्स वापरते.
ही करी जास्मिन राईसबरोबर चांगली लागते. राईसवर करी वाढून घेतली की त्या करीवर हे मिक्स घालून आवडतंय का बघा. ह्याला ‘फुरैकाके’ म्हणतात आणि इथे भरपूर फ्लेवर्समध्ये मिळतं. वरुन पिकल्ड जिंजर वगैरे घेऊ शकता चवीकरता.
करीची रेसिपी- चिकन ब्रेस्ट बाईट्साईझ पिसेस मध्ये कट करुन. तेलावर चौकोनी तुकडे केलेलं गाजर आणि बटाटा परतून घ्या. त्यावर तुकडे केलेलं चिकन परता. त्यावर वरच्या करी मिक्स पॅकेटमधले २,३ क्युब्ज घाला आणि पाणी घालून कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करा. ही करी जरा घट्ट असते. चवीला हवा तर सॉय सॉस वगैरे घालू शकता. मीठ वगैरे चवीप्रमाणे घाला हवंतर. चिकन शिजलं की गरम गरम खा.
सायो, नुडल्सची रेसीपी छाम आहे
सायो, नुडल्सची रेसीपी छाम आहे. थँक्स!
माझा लेकही सेम करी मिक्स वापरतो. मी एस अॅण्न्ड बी ची करी पावडर वापरुन करी करते.
माझ्या मुलाकडून मांगची आजीचं
माझ्या मुलाकडून मांगची आजीचं बरंच कौतुक ऐकलंय. तिचं यूट्यूब चॅनलही आहे.
स्वाती, मलाही मांगची आवडते.
स्वाती, मलाही मांगची आवडते.
मांगची गोड आहे… मला पण आवडते.
मांगची गोड आहे… मला पण आवडते.
वर टायपो झालाय जो बदलता येत
वर टायपो झालाय जो बदलता येत नाहीये आता. त्या मिक्सला ‘फुरिकाके’ म्हणतात.
Just one cookbook नावाचं
Just one cookbook नावाचं जपानी चॅनेल आहे युट्युब व्हिडिओज आहेत. छान सोप्या रेसिप्या आहेत. नक्की बघा.
जपानी फूड विशेषतः मिसो सूप
जपानी फूड विशेषतः मिसो सूप आणि सुशी, मलाही आवडतं. मिसो सूपाची पेस्ट ऑनलाईन मिळते, ती मागव अमा. मी टोफु स्कीनपण आणलीये युएसवरून. ती घालून मिसोसूप मस्त लागतं. इथे मिळते का ते पहायला हवं.
मी सुशीकरता शॉर्टकट शोधलाय. अगदी जुगाड टाईप. घरी फटाफट करता येण्यासारखा. नो व्हिज्युअल्स - जस्ट गो फॉर द टेस्ट.
भात करून त्यात राईस व्हिनेगर, काकडी-गाजर बारीक कापून, स्मोक्ड सामनचे तुकडे, सुशी नोरी शीट्स बारीक कापून. वसाबी पेस्ट, सोया सॉस मिक्स करून लहान लहान बॉल्स बनवायचे. झटपट सुशी. किंवा स्टाईलमध्ये सांगायचं तर De-constructed सुशी.
अमा तुमचं कौतुक वाटतं.. माबो
अमा तुमचं कौतुक वाटतं.. माबो वर वर्षा नावाच्या आयडी ने पुर्वी फार छान रेसिपीज लिहिल्या होत्या जपानी बहुधा, त्याही डोळ्या खालून घाला.
स्टर फ्राय चिकन, स्टर फ्राय व्हेजी, कोरीयन भाज्यांच्या पॅन केक ची रेसीपी आहे ऑलरेडी इथेच.
मिसो सूप माझ्या लेकी ला खूप आवडते, इथे त्याची पेस्ट मिळते, त्यात मी तोफू, सीवीड पाने आणि कांद्याची पात घालते.
अरे वा मस्तच की. छान
अरे वा मस्तच की. छान प्रतिसाद. मी काल जपानी फू ड नावाचे सब रेडिट जॉइन केले आहे. आज फ्राइड राइस विथ एग्ज आणलेला डब्ब्यात.
सोबत स्टर फ्राइ चिकन आणायचे होते पण वेळ नव्हता. कसले तरी ऑडिट आहे ती पी डा गेली की अमॅझोन वर ऑर्ड र टाकीन.
प्रॉन टेंपुरा घातलेली सुशी फार भारी फार भारी.
मांगची मी पण बघते.
माझ्याकडे एकेकाळी घरी घालायचा युकाता कॉटन किमोनो पण होता. हैद्राबादेस शेफाली नावचे फॅन्सी बुटीक होते तिथुन घेतलेला. ब्लॅक विथ डिझाइन्स आणि रेड बेल्ट. सिल्कचा किमोनो व ओबी पण एकदा नेसु बघायची आहे. साडी फाडून किमोनो शिवते घरीच.
प्रॉन टेंपुरा घातलेली सुशी
प्रॉन टेंपुरा घातलेली सुशी फार भारी >>> तेंपुरा म्हणजे भज्जी ना? आणि सुशी तर कच्ची असते. नक्की काय?
तेंपुरा म्हणजे भज्जी ना? आणि
तेंपुरा म्हणजे भज्जी ना? आणि सुशी तर कच्ची असते. नक्की काय?>> आधी प्रॉन टेंपुरा बनवुन घेतात मग ते उभे उभे सुशीच्या भातावर पसरतात प्लस काय ते काकडी गाजर हेते. मग सुशी रोल करतात.. क्रंची प्रॉन टेंपुरा मौ भातात मस्त लागतो. बरोबर वासाबी लागते उलीशी. परवा मी काय खाल्ले तर प्रॉन टेंपुरा असेच भातात गुंडाळले होते पण कव्हर कसलेतरी पिठाचेच होते. हे सर्व स्प्रिंग रोल सारखे तळले होते व मग वरुन पातळ राइस पेपर चे कव्हर होते. ते मौ पातळ कव्हर मग क्रंची तळलेले कव्हर मग राइस मौ व आत तळलेला प्रॉन टेंपुरा. एकद म भारी प्रिपरेशन. ह्याचे नाव क्रिस्पी प्रॉन च्युंग फन.
चिकन रॅप्ड इन पाक चॉइ. विथ सेझवान सॉस हे चायनीज झाले. तीनच चिकनचे मुट के पालकात गुंडा ळलेले.
ईंटरेस्टींग. पण बनवणे कटकटीचे
ईंटरेस्टींग. पण बनवणे कटकटीचे असावे सुशी.. ते राईस पेपर फाटत कसे नाहित?
सुशी आणि गिमबाप मध्ये काय फरक
सुशी आणि गिमबाप मध्ये काय फरक आहे?(गुगल करू शकते पण इथे जास्त चांगले उत्तर मिळेल.)
ईंटरेस्टींग. पण बनवणे कटकटीचे
ईंटरेस्टींग. पण बनवणे कटकटीचे असावे सुशी.. ते राईस पेपर फाटत कसे नाहित?>> राइस पेपर नसावा पण अगदी पातळ असे व्हाइ ट जिले टिनस कव्हर होते. राइस पेपर ओला करुन त्यात डंपलिन्ग भरता येतात. व उकडता किंवा तळता येतात. व्हिएट नामी पदार्थ आहे. मस्त लागतो.
फ बरोबर मस्त लागते हे तळकट. किंवा उकडलेले त्या फ मध्ये पण घालता येते.
सुशी आणि गिमबाप मध्ये काय फरक
सुशी आणि गिमबाप मध्ये काय फरक आहे?>>सुशी जपानी आहे. गिमबाप कोरिअन आहे. व घटक पदार्थ वेगळे आहेत. आत घालायचे सॉसेस व बरोबर द्यायचे सॉसेस पूर्ण वेगळे आहेत.
ओके ओके, माझ्या विचारण्याचे
ओके ओके, माझ्या विचारण्याचे मूळ कारण हे की एक बुफे हॉटेल होतं.आणि तिथे 'व्हेज सुशी' अशी पाटी असलेला जो पदार्थ ते लाईव्ह काउंटर ला बनवत होते तो अगदी गिमबाप सारखाच दिसत होता.तसेच राईस पेपर रोल वगैरे.
दोन्ही पदार्थ खाल्लेले नाहीत.
Veg sushi is like veg biryani
Veg sushi is like veg biryani there is no such thing. Kimbap is Korean staple food.
सुशी किट ह्यात मॅट दोन
सुशी किट ह्यात मॅट दोन प्लास्टिकचे चमचे एक भातवाढे आहे चक्क. व एक जबरी सुरा आला आहे. तीन क्युट बदक लाकडाचे.
वासाबी, गुलाबी आले तेरियाकी सॉस, मिरिन, कुकिंग साके, एक चोपस्टिकची जोडी आलेली आहे. नोरी शीट्स सोबा नुडल, फर्म तोफु आलेले आहे घरी. हे सर्व " पिस्तोल जेल में आ चुका है" ह्या चालीवर वाचावे. टेंपुरा बॅटर पण आलेले आहे.
आता परेन्त हे सर्व हार्ड वेअर आले आहे आता सॉफ्ट वेअर पक्षी सर्व भाज्या , मासे, चिकन अवोकाडो! लेकीला कॅलिफोर्निया सुशी रोल फार आव्ड तो त्यात अवोकाडो लागतेच. हे नेचर्स बास्केट मध्ये मिळून जाइल नाहीतर तिलाच आणा यला सांगेन.
गाजर रताळी, मुळे पालक मुळ्याचा पाला, अंडी, चिकन फिश आणायचे अहे. नॉनव्हेज साठी लिशिअस अॅप डाउन लोड केलेले आहे.
ह्या वीकांताला फोटो शूट करणार् होते पण कुत्रे आजारी पडले तिला उचलून आणताना ( व्हेट कडे) माझेच माकड हाड लैच दुखायला लागले म्हणोन गोळ्या घेउन सोफ्यावर पडून आहे व कुत्र्यावर लक्ष ठेवुन आहे. जपानीच काय भारतीय पन स्वयंपाक करायला झाले नाही. रेडिमेड मलबार पराठा व लसुण चट णी एकदम चालसे टाइप झाले.
आता युट्युब वर बघुन सुशी राइस कसा बनवायचा ते शिकले. ह्याची आंबेमोहोर वर प्र्काटिक्स करणार आहे कारण एकच किलो सुशी राइस आला आहे व तोही बर्या पैकी महाग आहे. सर्व वस्तु अमॅझोन. इन वर उपलब्ध आहेत. मला कास्तुदॉन चिकन राइस बाउल, ए ग फ्राइड राइस
रामेन बोल सुशी टेंपुरा प्रॉन हे फायनल गोल आहेत. पण आता एक एक गोश्ट बनवायला शिकत आहे फुल सेट मील यायला जुन उजाडेल बहुतेक.
सुशी राइस साठी लागते ते व्हिनेगार कसे बनवा यचे ते शिकले. साधेच व्हिनेगार वापरत आहे. ( अजुन बा टली धड उघड्ता येत नाही आहे. प्रयत्न चालू आहे. ) प्रमाण डोक्यात फिट बसले आहे. एक वाटी व्हिनेगार, अर्धी वाटी साखर व थोडेसे सॉल्ट सुशी चॅनेल वर पर फेक्ट प्रमाण दिले आहे.
बोनि टो फ्लेक्स म्हणजे
बोनि टो फ्लेक्स म्हणजे सुकवलेल्या माशांचे तुकडे का?
बर्डॉ क रुट म्हणजे कसले रूट?
बोनिटो फ्लेक्स म्हणजे तुकडे
बोनिटो फ्लेक्स म्हणजे तुकडे नसून फ्लेक्सच असतात आणि माशांचे. लाईट पिंक कलरचे असतील ना?
बर्डॉक रुट गुगल करा अमा. कसं खावं ह्याची आयडिया मिळेल.
तुमचं सुशी किट मस्तच दिसतंय. नेचर्स बास्केटमध्ये ‘ताकुआन’ (पिकल्ड रॅडीश) मिळतंय का बघा. एरवी ही भाताबरोबर साईडला तुकडे करुन खायला मस्त लागतं.
I got pink radish. Plus
I got pink radish. Plus seaweed flakes to put on onigiri rice. If icsn open the vinegar bottle will try to make sushi rice and some onigiri.
अरे वा! मस्तंच.
अरे वा! मस्तंच.
माझ्याकडे जपानी बेंतो रेसिपीची बेसिक पुस्तकं होती बहुतेक. बघायला हवीत.
Bonito फ्लेक्स म्हणजे फ्लेक्स च असतात.
ते पाण्यात थोडेसे उकळून पाणी गाळून घेतलं की फिश स्टॉक म्हणून वापरता येतं.
Miso सूप करताना पाणी उकळायला लागल्यावर बाकी सामग्री टाकून मग गॅस कमी करून त्यात मिसो पेस्ट टाकायची. Miso पेस्ट टाकल्यावर मात्र सूप उकळू द्यायचं नाही. ही टिप्स जपानी मैत्रिणीने दिलेली.
होरेंसो गोमाआए नावाची एक रेसिपी मला आवडायची करायला. पालक आणि तीळ कूट घालून केलेली साईड डिश आहे. पालकाचे देठ काढून टाकल्यावर मैत्रीण चकित झाली होती.. ते काढायचे नाहीत म्हणाली.
च्यावानमुशी नामक अंड्याचे अगोड कस्टर्ड करून बघा. लहान मुलांना पण खूप आवडते, थंडीत ब्रेकफास्टला गरम comfort food म्हणून खाऊ शकतो.
जपानी तमागोयाकी करून शकता. सोपी आहे.
अमा, माझ्याकडे एक सुशीचं
अमा, माझ्याकडे एक सुशीचं पुस्तक आहे बहुतेक. शोधावं लागेल. हवं तर रेसिपी पाठवेन.
अवांतर : अमा, पाळीव
अवांतर : अमा, पाळीव प्राण्यांसाठी रुग्णवाहिका आहेत. आमच्या भागात पाहिल्या आहेत.
मस्त तयारी अश्विनीमामी!
मस्त तयारी अश्विनीमामी!
गेल्या मार्च मधे मी सुशी करायचा घाट घातलेला. सगळी जमवाजमव केली. सुशी सुद्धा बऱ्यापैकी जमली पण नोरी शीट्सचा वास अन चव मला झेपेना. बाहेरच्या सुशीला नोरीचा तेव्हढा स्ट्रॅांग स्वाद नसतो. नंतर जेव्हा केली तेव्हा नोरी ऐवजी राईस पेपर वापरला आणि जिन्नस संपवले.
ही रेसिपी पाहून किमची बनवलो
ही रेसिपी पाहून किमची बनवलो होतो. बर्यापैकी छान झाली होती.
HOW TO MAKE KIMCHI at home in India
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
अरे वा अमा, ऐकतच नाही.
अरे वा अमा, ऐकतच नाही.
वा..वा.. अमा! किमोनो खोचून
वा..वा.. अमा! किमोनो खोचून स्वयंपाकाची तयारी सुरू केलीत!..
ते बदकांच्या आकाराचे काय आहे ?
अरे हो, ते बदक प्रकरण काही
अरे हो, ते बदक प्रकरण काही कळलं नाही.
Small wooden ducks are part
Small wooden ducks are part of the sushi kit. I think decoration for serving plate
>>>>किमोनो खोचून स्वयंपाकाची
>>>>किमोनो खोचून स्वयंपाकाची तयारी सुरू केलीत!..
हाहाहा
परवा वीकांताला जस्मिन राइस
परवा वीकांताला जस्मिन राइस व ब्रोकोली, मशरूम घालून - साधीशीच रेसीपी आहे. - चिकन बनवले. एक वाटीचा भरपूरच भात होतो. व पाणी जास्त झाल्यास गिचका गोळा होतो. छान वास येतो गरम भाताला.
चिकनची रेसीपी साधीच आहे. भाजलेले दाणे लागतात मूठ भर. ब्रोकोली मशरूम चिकन बिट्स तेलावर परतुन घ्यायचे. सोया सॉस, पेपर, सॉल्ट शुगर आले ठेचलेले थोडेसे ह्याचा सॉस बनवायचा. त्या परत लेल्या भाज्यांवर टाकायचे व मिसळून घ्यायचे. सर्व्ह करताना वरुन भाजुन सोललेले शेंगदाणे थोडे व भाजलेले तीळ पेरून द्यायचे. भाताला पुरेल इतका सॉस पाहिजे मात्र. नाहीतर कोरडे वाटते. मी तर चॉपस्टिकने पण खाल्ले.
पुढील प्रयत्न प्रॉन्स टेंपुरा आहे. झाले की लिहीन इथेच.
वॉव श्रिंप टेंपुरा लागतात
वॉव! श्रिंप टेंपुरा लागतात भारी. घरी करायला ते तसे जमले पाहिजेत. कुरकुरीत आणि आतुन मऊ. परत दोन तीनच्या वर खाऊ नये असं वाटू लागतं.
दोन तीन महिन्यातुन एकदा सुशी प्लेसला गेलं की खातो. घरी कधी केले नाहीत. तुम्ही केलेत की सांगा अमा.
इकडे कॉस्कोचे फ्रोजन पण मिळतात, पण त्यात ती मजा नसते.
तेंपुराचं वेगळं पीठ मिळतं.
तेंपुराचं वेगळं पीठ मिळतं. क्वचित आवडतात खायला. खूप तेल पितात त्यामुळे नेहमी खाववत नाहीत. भोपळ्याचे सगळ्यात भारी लागतात.
रताळं, ब्रोकोली, वांगं,
रताळं, ब्रोकोली, वांगं, झुकिनी सगळे बरे लागतात. श्रिंप सगळ्यात बेस्ट. पण तेलकटपणामुळेच दोन तीन च्या वर नको वाटतात.
तानपुरा आणि तेनपुरा -
तानपुरा आणि तेनपुरा - दोन्हीला भोपळाच बेस्ट
(No subject)
Pages