Submitted by साक्षी on 29 September, 2023 - 01:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य -
सारण -
खजूर : ४-५
काजु - ७-८
बदाम - ७-८
अक्रोड - ५-६
तूप - १ चमचा
आवरण -
१) उकडून सालं काढून मॅश केलेले बटाटे - २ छोटे
२) आरारूट / साबुदाणा पीठ / उपवास भाजणी (जिरे विरहित) - १ किंवा २ चमचे
तळणीसाठी तेल (फोटोत नाहिये)
क्रमवार पाककृती:
कृती
१) तूप घालून सगळी ड्राय फ्रुट्स मिक्सरवर भरड वाटून घ्या.
२) मॅश केलेल्या बटाट्यात आरारूट / साबुदाणा पीठ / उपवास भाजणी घालून हलक्या हाताने मळून घ्या. (उपासासाठी करायच्या नसतील तेंव्हा ब्रेड क्रम्स घातले तरी चालतील)
३) बटाट्याचे आणि सारणाचे गोळे करून घ्या.
४) बटाट्याच्या गोळ्याची वाटी करून त्यात सारण भरून बॉल्स करून घ्या.
५) मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
६) तयार कचोरी वाढा.
दुसर्या अॅंगलने
वाढणी/प्रमाण:
१ किंवा २
अधिक टिपा:
तेल कमी पुरेल म्हणून कचोर्या आप्पेपात्रात तळल्या.
माहितीचा स्रोत:
नेहमीची उपासाची गोड कचोरी असतेच, तिचं सारण बदलून
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झकास दिसत्ये. करुन बघायला
झकास दिसत्ये. करुन बघायला पाहिजे.
कालची स्वीट रॅव्हिओली जरा
कालची स्वीट रॅव्हिओली जरा complicated झाली. ती कृती करताना ही सुचली. शेवटची सकाळ शिल्लक आहे म्हणून ही अजुन एक जरा सोपी कृती
हे नक्कीच करुन बघेन
हे नक्कीच करुन बघेन
यम्मी दिसतेय कचोरी
वा छान दिसतेय. मस्त पाकृ
वा छान दिसतेय. मस्त पाकृ
ही पण मस्त आहे. एरवी काय
ही पण मस्त आहे. एरवी काय सारण वापरता? ओलेखोबरे, मिरची कोथंबीर आले व ड्रायफ्रूट्स का? ही माझ्या आईने एकदाच केली होती व लै भारी टेस्ट. आता परत एकदा करून बघेन. ही ताजी गरम खायला हवी. इथे मिळते पण ती गुज्जु टाइप असते.
मस्त दिसतेय!
मस्त दिसतेय!
एरवी काय सारण वापरता?
एरवी काय सारण वापरता? ओलेखोबरे, मिरची कोथंबीर आले व ड्रायफ्रूट्स का?>>
मी एरवी खरं तर फार करत नाही.
पण हो, बाहेर मिळते त्यात हेच असतं.
गोडाची असेल तर गूळ, खोबरं ड्रायफ्रूट्स
मस्तच रेसिपी.
मस्तच रेसिपी.
खोबरं आवडत नाही, हे सारण
खोबरं आवडत नाही, हे सारण बेस्ट दिसते आहे.
छान रेसेपी
कचोरी मस्त दिसत आहे. अगदी
कचोरी मस्त दिसत आहे. अगदी टेम्पटींग!
मस्त आहेत हे!
मस्त आहेत हे!
आहाहा!
आहाहा!
मस्त!
मस्त!
मस्त दिसते आहे कचोरी!
मस्त दिसते आहे कचोरी!
मस्त!
मस्त!
तुमच्या दोन्ही पाकृ छान आहेत..
शुभेच्छा
आता मत कोणत्या पाकृ ला
आता मत कोणत्या पाकृ ला द्यायचे हा गहन प्रश्न पडलेला आहे.
आता मत कोणत्या पाकृ ला
आता मत कोणत्या पाकृ ला द्यायचे हा गहन प्रश्न पडलेला आहे. Sad
>>>
स्वतः एक पाकृ बनवून टाका. मग प्रश्न सुटेल
लोल
लोल
हा प्रकार माझा अत्यंत आवडता..
हा प्रकार माझा अत्यंत आवडता....
फोटो पाहून तोपासू.
थंड गोड दही सोबतीला....अहाहा...
मस्त. अमा तिखट कचोरी साठी तेच
मस्त. अमा तिखट कचोरी साठी तेच असते सारण तुम्ही लिहिलेले, ड्राय फ्रूट नाही घातले तरी चालेल.
छानच रेसिपी आणि फोटो दोन्ही.
छानच रेसिपी आणि फोटो दोन्ही.
ओलेखोबरे, मिरची कोथंबीर आले >>> प्लस दाण्याचं कुट घालते मी.
छान आहे
छान आहे
मस्त आहे. फोटो सुंदर.
मस्त आहे. फोटो सुंदर. आप्पेपात्रात तळायची कल्पना फार छान वाटली.
खुपच छान!
खुपच छान!
अभिनंदन साक्षी !
अभिनंदन साक्षी !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अभिनंदन साक्षी
अभिनंदन साक्षी
अभिनंदन....
अभिनंदन....
अभिनंदन मानवजी..!
अभिनंदन मानवजी..!
धन्यवाद!
धन्यवाद!
अभिनंदन साक्षी..!
अभिनंदन साक्षी..!
माफ करा पहिल्या प्रतिसाद चुकून मानवजीचं नाव लिहिले होते..!
Pages