Submitted by मामी on 25 September, 2023 - 10:45
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
तिने नेहमीप्रमाणेच रेशमी फुलाफुलांचे वस्त्र परिधान केले होते. केशभूषणांनी तिचे केस सुरेखशा रचनेत मस्तकावर रचले होते. लाडिकपणे दांतात धरलेली गवताची काडी तिच्या ओठांवर मोहक दिसत होती! तिच्या हातात काळा मखमली बटवा शोभून दिसत होता - रोजच्याप्रमाणेच!
तो त्या अप्सरेकडे एकटक बघतच राहिला. आजची सकाळही कारणी लागली म्हणायची!
....................... टिंग टिंग!!!!
"भाऊ, टाका ती कचर्याची पिशवी गाडीत. रोज काय शेजारणीकडे टक लावून बघता! "
स्वतःच्या हातातील कचराबॅग घंटागाडीत टाकत शेजारणीनं त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत तोंडातला टूथब्रश काढून जमलेला फेस बाजूला थुंकला आणि नाईटी एका हातानं सावरत तिने डोक्यावरचे कर्लर्स चाचपले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी जमलीयं कथा..!
भारी जमलीयं कथा..!
(No subject)
(No subject)
धमाल, हाहाहा. मोरोबा भारीच.
धमाल, हाहाहा.
मोरोबा भारीच.
मस्त. एनालॉजी एकदम perfect
मस्त. एनालॉजी एकदम perfect जमली आहे...
काळा बटवा ई.....
धम्माल
धम्माल
हहपुवा..
हहपुवा..
>> एका माणसाला आदल्या रात्री
>> एका माणसाला आदल्या रात्री जास्त झालेली
अहाहा क्या बात. ब्युटी लाईज इन दि आईज ऑफ दि बि(यर)होल्डर
काळा बटवा ई.....
तसेच
जमलेला फेस ई.....
शीर्षक पण भारी आहे. पार विल्हेवाट लागली!
कारुण्यभरा शेवट हवा असेल तर:
"अहो, टाका ती कचर्याची पिशवी गाडीत आणि या वर. रोज काय तिच्याकडे टक लावून बघता! "
'वरून' आवाज आला
वरुन पहाडी आवाज आला
वरुन पहाडी आवाज आला
मस्त हाहाहा
मस्त हाहाहा
(No subject)
Pages