लेखन उपक्रम -२-दुकाळ-दतात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 24 September, 2023 - 13:20

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
“ये गैबाने बघ की संक-या कवादरनं येत नाय”.
“आवं गाडी जुपत आसलं”.
“म्या म्हणलं हुतं येरवाळी निघायचं. वाटंत भुताचा माळ लागतोया”.
“आला बघा . गाडीत काय तरी भरलया आण पोरंसोरं बसल्याती वर”.
“काय रं उशीर लावला”?
संक-या : “नाय जायचं ऊस तोडणीला. तुका पाटलानं दोन पोती दाणं दिल्याती. वैरण पण दील. म्हणला पाटील अजून जीता हाय”.
“आरं त्यानं दिलं न् त्वा घेतलं. तुला काय लाज हाय का नाय”.
“नाय पाटील म्हणलं ऊसणं देतो. पीकल्यावं परत कर”.
तो : “लय देवमाणूस पाटील. म्याच वळीकला नाय. फिरवं गाडी घरला”.

© दत्तात्रय साळुंके

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालीय कथा.
थोडा असा एक धडा होता आम्हाला शाळेत, दौलत आणि पाटील यांच्यात आधी तणाव मग दौलत कुटुंब घेऊन आपल्या नुकत्याच पूर ओसरलेल्या वाडीत जायला निघतो, पण पाटील आपली चूक ओळखून त्याला थांबवतात.

त्याची आठवण आली वाचून..

ग्रामीण भाषेत शशक मला वाटते हि एकच असावी. खूप आवडली.

मानव, करेक्ट! मलाही तो धडा लक्षात आहे व अधूनमधून आठवतो. "राबता सुरु झाला कि होईल वाट" असे काहीतरी एक वाक्य सुद्धा आहे त्यात.
(पाटील विचारतो कि "अजून जमीन ओळी असेल तिथे, तू जा ये कशी करणार?" त्यावर आवंढा गिळून तो हे उत्तर देतो. असे काहीतरी)

>>>>थोडा असा एक धडा होता आम्हाला शाळेत, दौलत आणि पाटील यांच्यात आधी तणाव>>>>
मानव असेल पण मी शाळेत असताना असा धडा नव्हता. शतशब्द कथेत कलाटणी महत्वाची . त्यादृष्टीने जे सहज सुचलं ते उतरलं....

>>>>ग्रामीण भाषेत शशक मला वाटते हि एकच असावी. खूप आवडली.>>>>
अतुल तुमचेही खूप धन्यवाद.... माझ्या मायबोलीवर लिहिलेल्या सर्व कथा गावात घडतात एक अपवाद वगळता...
Happy

त्या धड्यातही पाटील दयाळु निघतो शेवटी आणि ग्रामीण भाषेत संवाद एवढेच काय ते साम्य. त्यामुळे त्याची आठवण आली.

छान वाटतं ग्रामीण भाषेतील कथा वाचायला.

अतुल, हो ते वाक्य आणि शेवटी "राहु दे ते सामान!" असं म्हणुन पाटील गहिवरून क्षमा मागतात असं आठवतंय.

मानव
जुन्या मराठी सिनेमात बहुतेक पाटील वाईट दाखवत पण काही चित्रपटात सद्वर्तनी दाखवत.
Happy