लेखन उपक्रम २ - गाणे चालूच - सामो

Submitted by सामो on 21 September, 2023 - 10:53

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
निघाल्यापासून धुसफुसतच होती . अजुनही रागाचा पारा तस्साच.
"मला नाही सांगीतली, अर्जुन, उद्धवाला सांगीतली."
"अर्रे! युगानुयुगापूर्वीचे काय्ये आता! बघ तर पृथ्वी कशी सजलीये आपल्या आगमनाकरता."
"हो!! सवत ना माझी. सजणारच."
"....!!"
.
.
"राम मंदिरात जयघोष चाललाय. चल लवकर दर्शन देउ."
"ऊं तुम्हीच जा. मी जाते तुळशीबागेत. एक तर चाणाक्ष गिर्‍हाईक माल उचलतं उशीर केला की गाळ उरतो. घासाघीस करायला लागते ते वेगळच. दोन तासानी इथेच."
.
विठ्ठल काही बोलणार तोच रखुमाई गायब होते. विठ्ठल बिचारे एकटेच राममंदीराकडे निघतात.
.
.
इकडे शनिपाराजवळ स्पीकरवर गाणे चालूच "व्हॉट झुमका?"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सामो.
पण ते 'सवत ' उलगडलं नाही गं.

छानै
पण सवत आणि गाडीचं मलाही नाही समजले

प्राचीन, अज्ञानी, मला वाटतं विठ्ठल म्हणाजेच विष्णू. आठवा 'वैष्णवांचा मेळा, चंद्रभागेतीरी" वगैरे उल्लेख.

आता आठवा पॄथ्वीचा वंदन श्लोक विष्णुपत्नीं पादस्पर्शं क्षमस्व मे ..."

म्हणजे पॄथ्वी विष्णुपत्नी. वराहावतारातही तिला समुद्रातून वर काढली.

म्हणजे ती लक्ष्मीची सवत.

गाडीचं म्हणाल तर विठ्ठल रखुमाई वैकुंठातून भूतलावरती उतरल्यानंतर गाडी/ रेल्वे/बस अशीच सैर करत होते.