उपक्रम २- एकारंभा अनंतार्था - ती, तो आणि माबो- अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 20 September, 2023 - 12:01

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

ही तीच आहे नं, जी दहावीत असताना आपल्या शुद्धलेखनाच्या चुका काढायची. आता मायबोलीवर लिहिते म्हणे. बोलू का हिला का इथेही 'वाचनमात्र' राहू.

ती: राघव ना तू ? अरे, मी अरण्या.
तो: कशी आहेस.
ती: तशीच, मला काय धाड भरलीये.
तो: अजूनही शुलेच्या चुका काढतेस ना.
ती: आता फक्त आवंढा गिळते रे.
तो: तू माबोवर खूप प्रसिद्ध आहेस म्हणे, माझ्या कवितेला मात्र दोन प्रतिसाद आलेत.
ती: काही नाही रे.... लिहित रहा, येतील कमेंट्स.
तो: तुझे १७६० चाहते आहेत म्हणे..
ती : तुझेही होतील रे , तुझा काय कोतबो झालाय का..
तो: माझे सहा चाहते आहेत, त्यापैकी चार तर माझेच ड्यूआय आहेत.
ती: चिल यार, एवढं काय त्यात. माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे व्यापारच्या खेळात श्रीमंत होण्यासारखं आहे. चल, गाडी येईपर्यंत दोन-दोन प्लेट रगडा पॅटीस खाऊ.
आनंदाने जातात...

Wink -अस्मिता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाटाआसाठी 'शिकार' म्हणून संवेदनशील आयडी व लांबलचक पोस्टी निवडाव्यात. 'दुप्र' मात्र कुठेही चालेल. Lol

भन्नाट Lol

प्रतिसादही भन्नाट आहेत.

आता फक्त आवंढा गिळते रे
माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे व्यापारच्या खेळात श्रीमंत होण्यासारखं आहे>>>> Rofl

धन्यवाद सर्वांना. Happy
या धाग्यावर हसणाऱ्या सर्वांची विघ्नं बाप्पा दूर करो.

छान आहे , आवडली

माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे व्यापारच्या खेळात श्रीमंत होण्यासारखं आहे

धमाल निरीक्षण

माबोवरील गमतीजमती -
मीच लिहिलेल्या आहेत, वाहून जातील म्हणून चिकटवतेय. पुन्हा हसा किंवा हसू नका. Happy

१. अवांतर करणाऱ्यांसाठी -
'हम जहाँ होते है, अवांतर वहींसे शुरू होता है'

२. तोवरच जोवर वेमा येऊन-
तुम जिस सोमिपे लिखते हो, हम उसके वेबमास्तर है' म्हणत नाहीत.

३. माबोवरील दंडवत, सार्थक, धमाल, छान वगैरे अभिप्रायांबद्दल दोन लेखकांच्या मनातील स्पर्धात्मक भावना -

Don't underestimate the power of दंडवत.
संदर्भ- दीवार.

एक लेखक दुसऱ्या लेखकाला मनात -
मेरे पास 'जबरदस्त लिहिले आहे है, मेरे पास धमाल है, मेरे पास मायबोलीवर येण्याचे सार्थक झाले' भी है.

दुसरा लेखक -
मेरे पास दंडवत है..
खेळ खल्लास.
Lol

Pages