उपक्रम २- एकारंभा अनंतार्था - ती, तो आणि माबो- अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 20 September, 2023 - 12:01

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

ही तीच आहे नं, जी दहावीत असताना आपल्या शुद्धलेखनाच्या चुका काढायची. आता मायबोलीवर लिहिते म्हणे. बोलू का हिला का इथेही 'वाचनमात्र' राहू.

ती: राघव ना तू ? अरे, मी अरण्या.
तो: कशी आहेस.
ती: तशीच, मला काय धाड भरलीये.
तो: अजूनही शुलेच्या चुका काढतेस ना.
ती: आता फक्त आवंढा गिळते रे.
तो: तू माबोवर खूप प्रसिद्ध आहेस म्हणे, माझ्या कवितेला मात्र दोन प्रतिसाद आलेत.
ती: काही नाही रे.... लिहित रहा, येतील कमेंट्स.
तो: तुझे १७६० चाहते आहेत म्हणे..
ती : तुझेही होतील रे , तुझा काय कोतबो झालाय का..
तो: माझे सहा चाहते आहेत, त्यापैकी चार तर माझेच ड्यूआय आहेत.
ती: चिल यार, एवढं काय त्यात. माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे व्यापारच्या खेळात श्रीमंत होण्यासारखं आहे. चल, गाडी येईपर्यंत दोन-दोन प्लेट रगडा पॅटीस खाऊ.
आनंदाने जातात...

Wink -अस्मिता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता फक्त आवंढा गिळते Proud

दोन-दोन प्लेट रगडा पॅटीस !!!

हे रोज शिकरण + मटार उ. खाण्याच्या लेव्हलचे शिरिमंताय Happy

Lol

>>>>>>माझे सहा चाहते आहेत, त्यापैकी चार तर माझेच ड्यूआय आहेत.
अर्र्र्र!!! Lol Lol
>>>>>तुझा कोतबो झालाय का Lol
>>> १७६०
हाहाहा!!!

>>>>>>>आता फक्त आवंढा गिळते रे.
हे बेस्ट आहे. हे मिस केलेलं.

Lol तेवढ्यात अनाउंसमेंट झाली.
मध्यरेल्वेचे हे 'सौजन्य' स्थानक आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येणारे पुढील लोकल हेमाशेपो कडे जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल कंपूगिरी, मोदीभक्ती, मुस्लिमद्वेश आणि आरक्षण या स्थानकांवर थांबेल.
आज मध्यरेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने 'मागा' स्टेशनवर जाणार्‍या भाविकांसाठी वरील सर्व स्थानकांवरुन शटल बसची सोय करण्यात आली आहे.

हा हा हा... माबो स्पेशल शशक
श्शSS श्शSSSक आहे हे Proud

तो: अजूनही शुलेच्या चूका काढतेस ना.
ती: चूका नाही रे, चुका Lol

Lol

त्या "कवितेवरच्या दोन प्रतिसादांत" एक माझाच "धन्यवाद" हा आहे हे तो सांगायचे विसरला. नाहीतर इतकी बाळबोध कविता होती की त्याच्या डुआयडींनीही वाहवा केली नाही Happy

अमितच्या हेमाशेपो लोकल मधे डाउन-अप करणारे काही असतात. त्यामुळे वरकरणी ते हेमाशेपो कडे जात आहेत असे वाटते पण लोकल फिरली की ते ही परत येतात Happy

एक माझाच "धन्यवाद"
त्याच्या डुआयडींनीही वाहवा केली नाही
लोकल फिरली की ते ही परत येतात>>>> Lol

हेमाशेपोचा पास ठेवायचा आणि हेमाशेपो-बट-वनला खाली उतरायचं.

अजून काही खळबळ माजवण्यासाठीच्या क्लृप्त्या.....
वर कुणी तळमळीने खूप लांबलचक प्रतिक्रिया दिली असेल तर खाली नुसतंच प्रकाटाआ लिहून पळून जायचं. ते बिचारे पाच मिनिटे चहाचा घोट घेऊन येतात व दिवसभर तळमळतात. आपण असं काय लिहिले की वाटून त्यांना वाईट वाटतं, ह्यांनी काय लिहिले असावे की म्हणून रात्री झोप येत नाही. तिथं काही नसतंच. Wink

नुसतंच दुप्र लिहून पळून जायचं, लोक पप्र शोधत बसतात तो नसतोच मुळी, मग अजून काय झालं असेल विचार करत बसतात.

मधेच admin इकडं लक्ष द्या म्हणून तीन दिवस गायब व्हायचं.

Lol

लेकी बोले सुने लागे
Lol Lol

“ पुढील लोकल हेमाशेपो कडे जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल कंपूगिरी, मोदीभक्ती, मुस्लिमद्वेश आणि आरक्षण या स्थानकांवर थांबेल.” - Lol

नकारात्मक प्रतिसादकांना झोडपून काढणारे बाणेदार पीळदार लेखक, प्रतिसाद मिळत नसल्याने झोडपणारे लेखक यामुळेच मायबोली दिवसेंदिवस समृद्ध होत चालली आहे.

धन्यवाद सर्वांना. Happy
माबोच्याच गणेशोत्सवाला माबोचंच शशक, गुळाच्या गणपतीला गुळाचाच नैवेद्य... !

अमा, नक्कीच. हा कोणता शिलालेख आहे म्हणून Wink , आवडेल मला.
जावेद खान , माझी आयडिया मलाच Lol
आचार्य Lol
निरू Happy

Pages