उपक्रम क्र. १ : मी बीटीएस मेंबर जिमिन झालेतर? अश्विनीमामी

Submitted by अश्विनीमामी on 19 September, 2023 - 20:49

सतराव्या वर्षी लग्न ठरलं आणि अठराव्या वर्षी झालं सुद्धा. मग अनेक परीक्षा, कर्तव्ये , अडथळे-शर्यत पार करताकरता साठी आली सुद्धा. पण थोडे जगायचे, अनुभवायचे राहुनच गेले. नवतारुण्याचे ते फुलपाखरी दिवस, छोटे छोटे आनंद ... कधी जिमखाना ग्राउंड वर बेदी ( स्पिन बोलर) आला आहे तर त्याला बघायला धाव घेणे, हाँगकाँग लेन मधून एखादेच नेलपॉलिश आणणे. ते निगुतीने लावणे, ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरची ज्वेलरी तेव्हा नव्यानेच आली होती, एखादे कानतले घेणे व दिवस दिवस ते किती गोड आहे म्हणून घालून मिरवणे..... एखादी सुरेख पर्स दुकानातच बघून नोकरी लागली की नक्की घेउ म्हणून स्वतःला प्रॉमिस करणे,

दहावीतले सेंट विमलीतले वर्गमित्र आता अकरावीत गरवारेला आल्यावर एकदम वेगळेच भासू लागले आहेत. त्या जोडीने इतर शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिकून आलेली स्मार्ट मुले मुली, त्यांच्या वागण्यातील सहजता, त्यांच्या बरोबरीचे भासण्यासाठी आपण तोकड्या बजेट मध्ये केलेले कुछ कुच्छ होता है मधील काजोल लेव्हलचे दयनीय प्रयत्न, कूलत्व आणाय ची ममव धडपड, हे चालू होते.. डे.जि. पोस्ट ऑफिसात कधीमधी दिसणारे गोरेपान इराणी विद्यार्थी, उत्कर्ष बुक सर्विस मधला निळ्ञा डोळ्ञाचा सेल्समन , जिम खाना ग्राउंड्वर क्रिकेट खेळायला येणारे जिम खान्यावरच बंगल्यात राहणारे पोरगे हे सर्व अव्यक्त क्रश होते. मग एकदम जीवनाने पीएचडीची प्रश्न पत्रिका समोर टाकली, ती सोडवता सोडवता दमछाक झाली व हे वय सतराचे नाजूक गोड विश्व कुठे तरी विरून गेले..... वैशालीतून बाहेर पडून जर्नल्स सांभाळत बॉयफ्रें च्या बाइक वर बसून सुसाट निघून जायचे( बहुतेक पाषाण लेक ला!!) हे स्वप्न स्वप्नच राहिले. अगले जनम में सही...

पण हिरव्या भीतिदायक काळडोहाची पापणी उघडली व झपकन मिटली असा हा सर्व काळ संपला व ते रुमालात ( दहावीतल्या सेंटेड खोड रबरा सोबत ) गुंडाळून ठेवलेले विश्व बीटीएस च्या फॅन डमच्या रुपाने एकदम सामोरे आले. आपल्यासारख्यांच्या जीवनातही रंगीबेरंगी इंद्रधनुष्ये दबा धरुन सुखी करायला टपलेली असतात व दु:खाच्या गर्तेत वगैरे पडू देत नाहीत हे सत्य गुलाबी हलक्या जांभळट, मोव्ह -पिंक स्वरुपात समोर आले. एखाद्या लाल भडक गोड लॉलीपॉप सारखे. हो त्या सत्याने तरी कायम काडेचिराइताचा काढा प्यायल्या सारखे कडवटच का बरे असायचे. रिअ‍ॅलि टी कॅन बी हॅपी एंड प्रिटी इफ ओन्ली यु कॅन मेक इट युअर्सेल्फ.

२०१८ मध्ये एन डी टीव्ही वर एक बीटीएस ची क्लिप पाहिली चुनरी चुनरी गाण्यावर त्यांच्या बॉय विथ लव्ह गाण्याची डान्स प्रॅक्टिस फार मस्त बसली होती. तो व्हिडीओ अनंत वेळा बघितला, मग गुगल सर्च करुन मेंबर्स च्या इमेजेस बघितल्या विकिपिडीआ वरून माहिती घेतली, साउथ कोरिआ मध्ये इंग्रजी शिकवायला जावे का असा विचार करुन बघितला, पण मी खूपच आळशी आहे. पाच दिवस एसी मध्ये पाट्या टाकून शनिवार रविवार निवांत सोफ्यावर पडून गेम खेळावी, सोबतीला पॉड कास्ट नैतर गाणी , साडेबाराला स्विगी वरून काही तरी मस्त ऑर्डर करावे, मधूनच दहा मिनिटे रील्स बघाव्या इथे तिथे पाठवाव्या!!! व मित्रमैत्रीणींना पिडावे, हा मेन उद्देश. ह्या सर्व घटना क्रमात मी कधी बीटीएस फॅन झाले - त्यांच्या शब्दात आर्मी -- ते समजले सुद्धा नाही. इथून पुढील लेख एका सतरा वरशाच्या मुली ने लिहिला आहे हे समजून वाचा बरे.

बीटीएस चे टोटल मेंबर सात. तीन दादा लोक ह्यंग!! जिन , नामजुन, सुगा, मध्ये जे होप व खाली तीन माकने लोक म्हणजे ल्हान भाउ, चिन्ना थंबीज व्ही जिमिन व जंगकुक. ओरिजिनली मी आंटि स्वरूप असल्याने ह्यांचे पार भारतीयीकरण करुन टाकले. जिन सर्वात मोठा धर्मराज,
उंचापुरा वेल बिल्ट व रॅप माँस्टर व्यक्तिमत्वाचा नामजुन भीम, ग्रूपात असुनही स्वतःचे वेगळे सांगितीक व्यक्तिमत्व राखून ठेवणारा सुगा कर्ण,
सर्वगुणसंपन्न पांढर्‍या घोड्यावरुन येणारा राजकुमार व्ही म्हणजे अर्जुन, तुलनेने बारक्या चणीचे होप व जिमिन नकुल -सहदेव आणि गोल्डन माकने जंग कुक म्हणजे खोडकर गोड कान्हा!! घाबरू नका. अजून डोक्याचे भजे झालेले नाही. पण बीटीएस फॅन डम मध्ये कोरीआची पाटलीण व बीटीएस कडप्पा असे ही गृप्स आहेत. ह्या सर्वांची एक एक खासियत व फँन डम आहे व जगभर सर्व वयाचे चाहते आहेत व गृपचे पण तसेच. बटर, डायनामाइट, बोय विथ लव्ह उआ उआ उआ उआ रन बीटीएस, डायनोसिअस, आयडॉल, परमिशन टु डान्स ही फेमस गाणी, टॉप क्लास कोरिओ ग्राफी वॉट्स नॉट टू लाइक.

नमनाला घडाभर गाणी ऐकवल्यावर आता मेन आरती सुरु करु. मला पार्क जिमिन व्हायला खूप आव्डेल. हा बीटीएस गृप मधला बारकुसा
पण हरफन मौला लाघवी व्यक्तिमत्व आहे. कंटेंपररी डान्स एक्सपर्ट, आयडॉल, व एकदम वेगळेच परफेक्ट लुक्स, काहीही कपडे घाला एकदम शोभुनच दिसतात व कसे ही केस, आधी ते सुरेख कोरिअन केस अनेक रंगात व स्टायलीत रंगवलेले, कापलेले, ते अगदी असे असे फिरतात नाचताना हाय हाय एकदम चुरा लिया है लेव्हल क्युट. त्याहुनही अधिक गोड म्हणजे लव्हिं ग केअरिन्ग स्वभाव एकदा जंगकुक वाढदिवसाला त्याला सर्वांनी डिझायनर काळी हँडलगेज बॅग गिफ्ट दिली तर ती त्याला देउन खाली उकिडवे बसून पॅकिंग मधून काढणे, आतले प्लास्टिक काढून टाकून बॅग नीट फिट होते आहे ना बघणे केक आणणे हे जिमिन ज्या निगुतीने करतो त्याची दाद द्यावी वाट्ते. किती तो गोड स्वभाव. नो वंडर आमची शुगर वाढते.

५६ किलोचे गंधर्व समान व्यक्तिमत्व पण आत कला अगदी कुटुन कुटून भरली आहे. तायक्वांदो शिकलेला आहे. आणि कॉन्सर्ट मध्ये जेव्हा हे पर्फॉरम करतात तेव्हा एका वेगळ्याच लेव्हलला जातात. रन बीटीएस ची अवघड कोरिओग्राफी असो की डायनामाइट मधले चमकणे. यट टु कम इन बुसान ह्या काँसर्ट मध्ये जिमिन ने साध्या ब्लू जीन्स, व्हाइट टीशर्ट वर एक निळे टिकल्या लावलेले जॅकेट घातले आहे. व रंगीत काचांचा चस्मा. अगदी दिलखेचक. तसे एकदा दिसायचे आहे व डायनामाइट स्टेप्स वर नाचायचे आहे. ( मस्ट सर्च इजी कोरिओ व्हिडिओ!!!)

ज्वेलरी, ट्रिंकेट्स चे प्रेम हा अजून एक समान धागा, जिमिनची ज्वेलरी ह्यावर एक वेगळा लेख लिहिता येइल पण तुर्तास चाणाक्ष वाचक गुगल इमेज सर्च करतीलच, त्याच्याबरोबर ज्वेलरीचा डब्बा घेउन बसायचे आहे व हे ते ट्राय करुन बघायचे आहे. नो वंडर सध्या तो टिफनी चा ब्रँड
अँबेसॅडर आहे!!! परफे क्ट पेअरिन्ग. तसे स्टायलिश नटायचे आहे.

मी एक दिवसासाठी जिमिन झाले ना तर त्यांची एक फार फेमस जंप आहे. जे होप जमिनीवर आहे व त्याच्या वरुन जिमिन पूर्ण कोलांटी उडी मारून परफेक्ट लँड होतो. हे सर्व कॉन्सर्ट मध्ये पर्फॉरमन्स चालू असताना. ते ट्राय करीन , गृप बरोबर डान्स प्रॅक्टिस करेन, जेजु आयलंडला जाउन किमची व बार्बेक्यु खाईन. वैताग येइ परेन्त पीजे टाकेन, बडबड करेन व खिदळेन, काहीतरी होम प्रॉजेक्ट करेन, गिटार शिकायचा प्रयत्न करेन, यस आय डू म्हणेन. स्नॅक म्हणून सुगा ने ठेव्लेले आइसक्रीम खाईन. खुर्ची वरुन खाली पडेन. ( हा खुर्ची वरुन खाली पडायच्या सीन्स चे एक कंपायलेशनच आहे.

जिमिनची इतर मेंबर्स प्रमाणेच एक वाइल्ड साइड पण आहे. तुम्ही खूप वेळ रील्स स्क्रॉल करत राहिलात तर जिमिन शा म्हणून एक क्लिप येते ती जरूर बघा. मला तसे करायचे नाही.. अब वो दिन नही रहें .. पण त्या पार्टीत साइडला उभे राहुन गड्याला मनसोक्त नाचताना बघायचे आहे.

सारान्येओ जिमिना. पर्पल हार्ट्स.
IMG_20230920_093243.jpg

वय सतराची मोड समाप्त. ऑर रिअली.. इज इट ओव्हर? आर यु शुअर?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती मस्त फँटसी अमा.जुन्या पुण्याची वर्णनं पण भारी.बीटीएस चा एक फॅन घरात आहे त्यामुळे रिलेट करू शकते.

बाकी मला सगळ्या के ड्रामा हिरोज चं कौतुक वाटतं.सगळे एक से एक छान स्किन, केस आणि अतिशय सुंदर ऍथॅलॅटिक टॅलेंट वाले.त्यात काही तर अगदी इतकं करून सेओल नॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये हुशार हुशार डिग्रीज पण घेतलेले (अर्थात आपल्या इंडियन मेल टेस्ट ला जरा बायकी वाटतात मुलं.म्हणजे हिरो हिरॉईन जरा ड्रेस किंवा केस बदलले की पटकन बाई किंवा माणूस वेगळ्या जेंडर चे दिसू शकतात. मग मन परत rrr मधल्या रामचरण कडे वळतं.)

वॉव!!! वेगळीच कल्पना. खूप मस्त लिहीलय. मुलीला हे प्रकरण आवडतं. त्यांच्या रुमबाहेर या मुलांची चित्रे असतात. मी कधी वाटेला गेलेले नाही. पण क्वचित पाहीलय त्यावरुन अंदाज येतो. ग्लॅमरस आहेत.

मस्तंय. मायबोली फँटसी लँड झाली आहे.
मलाही ऋत्विक रोशन बनून कंगनाला भेटायला जावंसं वाटतंय..

अरे या बीटीएसचा एक वेगळा धागा काढा अमा गणपतीनंतर..
मीच काढणार होतो... आमच्याकडे चोवीस तास हेच चालू असते घरी.. पण मी नाही त्यात पडत Happy
अर्थात गाणी सतत कानावर आदळतात.. ऐकायलाही आवडतात.. पण तरी किती यार.. त्यांचे सगळे छोटे मोठे शो ईटरव्यू आपापसातले फन गेम्स काहीच सोडत नाहीत घरचे

>>>>>ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरची ज्वेलरी तेव्हा नव्यानेच आली होती
ही अफलातून ज्वेलरी माझ्या पार विस्मरणात गेली होती. गेल्या च्या गेल्या वर्षी च्या गणेशोत्सवात ज्वेलरी डिस्प्ले थीममध्ये, स्वातीने फोटो टाकलेला. इतकी सुरेख नाजूक ज्वेलरी. मी त्या ज्वेलरीच्या प्रेमात पुनश्च आपटले
>>>>>वैशालीतून बाहेर पडून जर्नल्स सांभाळत बॉयफ्रें च्या बाइक वर बसून सुसाट निघून जायचे( बहुतेक पाषाण लेक ला!!)
आहाहा!!!

बायकोला विचारलं होतं कि मी नीट संवाद ऐकतो, पार्श्वसंगीत, संगीत, कॅमेरा अँगल याकडे लक्ष देतो तर असं वाटतं कि किती चांगला प्रेक्षक आहे मी..
पण तुम्हाला दागिने, साड्या, पडदे, कारंजी हे सगळं बघत, त्याचे डोळ्यांनी थेट एम आर आय स्कॅन करत पुन्हा कथा, संवाद बघायला कसं जमतं ? ही सुपरपावरच आहे.

>>>>>>>>पण हिरव्या भीतिदायक काळडोहाची पापणी उघडली व झपकन मिटली असा हा सर्व काळ संपला व ते रुमालात ( दहावीतल्या सेंटेड खोड रबरा सोबत ) गुंडाळून ठेवलेले विश्व
आई ग!!! काय लिहीलय.

>>>>> आपल्यासारख्यांच्या जीवनातही रंगीबेरंगी इंद्रधनुष्ये दबा धरुन सुखी करायला टपलेली असतात व दु:खाच्या गर्तेत वगैरे पडू देत नाहीत हे सत्य गुलाबी हलक्या जांभळट, मोव्ह -पिंक स्वरुपात समोर आले. एखाद्या लाल भडक गोड लॉलीपॉप सारखे. हो त्या सत्याने तरी कायम काडेचिराइताचा काढा प्यायल्या सारखे कडवटच का बरे असायचे. रिअ‍ॅलि टी कॅन बी हॅपी एंड प्रिटी इफ ओन्ली यु कॅन मेक इट युअर्सेल्फ.
_/\_ आमच्यासारख्या खरचटलं तरी रडणार्‍या लोकांनी हे वाक्य फ्रेम करुन लावायला हवे खरे तर.

मस्त! ही कोण मंडळी काही माहित नाही पण तुम्ही लिहिलंय फार भारी! जुन्या पुण्याचे, जिमखान्याचे वर्णन पण नॉस्टॅल्जिक एकदम!

Beautifully written !

… रंगीबेरंगी इंद्रधनुष्ये दबा धरुन सुखी करायला टपलेली असतात…. Waiting for that Happy

खास अमा स्टाईल!
या जिमिनचा एक तरी फोटो हवा त्या शिवाय लेख अपुरा आहे!

काय सुरेख लिहिलंत अमा! खास अमा परस्पेक्टिव.
हल्ली के ड्रामाचं व्यसन लागलं आहे , थँक्स टू घरातील यंग मंडळी. तर हे ही विचारून शोधून बघतेच.

BTS तुम्हाला आवडते म्हणून एक youtube channel - cute life सजेस्ट करते तिचे विडिओ बघून मी सुद्धा आर्मी बनले। mast हिंदीत डब करते run bts चे एपिसोडस खूपच cute आहे व जर हे सप्तसूर हिंदी असते तर असेच बोलले असते असे वाटते। जरूर बघा .