उपक्रम -१ - मी परी झाले तर - सामो

Submitted by सामो on 19 September, 2023 - 15:43

'Whenever a child says I don't believe in fairies there's a little fairy somewhere that falls right down dead' .............. असं म्हणतात - जेव्हा एखादं बाळ परीवरती अविश्वास व्यक्त करतं तेव्हा-तेव्हा म्हणे कुठेतरी एक परी मरुन पडते.
.
वरील वाक्य जर खरं असेल तर मग एखादं बाळ खळी पाडत किंवा कसेही - गोड गोड हासले की त्या हास्याचे चांदणं लेवुन एखादी परी जन्मालाही येत असेलच की.
मला व्हायचय तशी परी.
त्या बाळाकरता गार्डिअन एंजल असलेली परी.
फक्त त्या बाळालाच भोकर्‍या डोळ्यांनी दिसणारी परी.
बागेत आई घेउन आली ना की बाळ दुडूदुडू बागडताना, त्याला जपेन मी, पडू नाही देणार की रडू नाही देणार.
आम्ही दोघ खेळताना, मी लपून बसले की बाळ मला शोधत शोधत आईला विचारेल "परीराणी कुठे गेली आई. बोलाव ना तिला." पुस्तक वाचनात दंग असलेली आई म्हणले, "छकुले, अगं परी काही खरी नसते. कुठुन आणू मी तुला परी?" मग बाळ आणि मी दोघं पोट धरुन हसू. आईला काही कळत नाही. आपलं सिक्रेट बरं का.
झोपेतही त्याच्या स्वप्नात जाउन त्याला हसवेन. त्याला गोष्टी सांगेन.
गार्डिअन एंजल आहे ना मी, बाळाला प्रत्येक धोक्यापासून मैलोन मैल दूर ठेवीन.
परी असल्याने माझी युनिकॉर्नशी गट्टी असणारच ना. मी बाळालाही परीराज्याची सैर करुन आणिन. त्याची ओळख युनिकॉर्नशी घालून देइन.
.
.
अजुन महत्वाचे काम म्हणजे माझी गट्टी इतर गार्डिअन एंजल्स बरोबरही असणार. मग त्यातले काही कामचुकार असणार, झोपाळू, आळशी, बथ्थड असणार.
त्या सगळ्या एंजल्स्ची चांगली खरडपट्टी घ्यायचीये मला.
आमच्या निष्पाप बाळांवरती लक्ष ठेवायचे सोडून झोपा काढणार्‍या सगळ्या देवदूतांची बदली करुन मला कामसू, चाणाक्ष, हुषार देवदूत आणायचेत. कारण आजकाल ही जमात फार पाट्या टाकू लागलेली आहे. Sad
.
होता येइल का अशी परी? इवल्याश्या पिल्लाची लाड्की आणि शक्तीवान परी!! आयुष्यभर त्याचे रक्षण करणारी, भले चिंतणारी, त्याला प्रत्येक धोक्यापासून मैलोन मैल दूर ठेवणारी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो, अकरा दिवसाचा गणपती आहे.. त्यावर एक्स्ट्रा टाईम मिळतो.. सगळ आजच लिहून संपवणार का..
मी हे उद्या वाचतो.. चला शुभ रात्री !

फोटोतली परी गोड आहे. तिची परी व्हायची कल्पना मस्तंच. आमेन !!!

परी झाल्यावर मला कुणाचंही रूप घ्यायचं वरदान हवंय.
ऐश्वर्या रायला तरूण बनवायचंय, सलमान पर्वाच्या आधी एखादा हँडसम हंक बनून भेटायचंय.

छान लिहिले आहे सामो
ती फोटोतली गोदरेजचे कपाट आणि मोसाईक टाईल्स काळातील नन्ही परी तुम्हीच का?

>>>>>>ती फोटोतली गोदरेजचे कपाट आणि मोसाईक टाईल्स काळातील नन्ही परी तुम्हीच का?
माझी लेक Happy ४-५ महीन्याची. बाळसेदार.

>>>>गोदरेजचे कपाट आणि मोसाईक टाईल्स
शार्प आय Happy

गोड लिहिले आहे. फोटोही फार गोड. Happy माझा विश्वास आहे पऱ्यांवर आणि आम्ही चुकूनही ते वाक्य म्हणत नाहीत, टिंकर बेलने सांगितलेलं ऐकतो. Happy

सिक्रेट खूपच आवडले. सामो
माझ आणि भुभु लोकांच असच सिक्रेट असत. आमच्या सोसायटीत लेडी भुभु आहे. तिची आणि माझी खूपच दोस्ती.
" लेडी भुभु लेडी भुभु आपल सिक्रेट अजून सोसायटीत कुणाला माहित नाहीये. कुणाला सांगायच नाही बरं का? आपल्या दोघातच ठेवायच की आपण दोघेही भुभु आहेत ते!"
सारे भुभु से अच्छी लेडी भुभु हमारी! समजा दुसरे भुभु दिसल की सारे भुभुसे अच्छा.... भुभु हमारा म्हणायचे. फक्त या भुभुचे त्या भुभुला कळू द्यायचे नाही! Lol Lol

सामोचे दणादण धागे बघून जीव दडपला होता की कधी वाचू इतके म्हणून.

खूप छान कोवळे लिहिलंय.फोटो काढून टाकलाय का? मला दिसत नाही

Happy मलाही थकवा आलायच. थांबायचं कधी हे कळायला हवे खरे तर. शशकं काय दणादण निघतील. आता खरच विश्रांती घेते. Happy अजुन बरेच रथी महारथी उतरायचे आहेत रणांगणात Happy
आता पायावर पाय टाकून निवांत वारा खात, शहाळं पीत या माबो नामक बीचवरती बसते. Wink

>>>फोटो काढून टाकलाय का? मला दिसत नाही
काढून टाकलाय.