एल-निनो : ढासळते आरोग्य आणि संभाव्य धोके

Submitted by कुमार१ on 15 September, 2023 - 01:02

यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांनी या संदर्भात एक विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे (https://cdn.who.int/media/docs/default-source/2021-dha-docs/phsa-el-nino...).
त्यातील काही ठळक मुद्द्यांची नोंद या लेखात घेतो.

EL NINO jpeg rev.jpg

वातावरणातील या अनिष्ट परिणामामुळे आरोग्यावर परिणाम का होतात हे प्रथम समजून घेऊ. एल निनोच्या प्रभावामुळे मूलतः आरोग्य-संबंधित खालील गोष्टी घडतात :
1. अन्न तुटवडा
2. मोठ्या लोकसंख्येचे स्थलांतर. यातून अनेक साथींच्या रोगांना आमंत्रण मिळते.
3. खूप वाढलेल्या तापमानामुळे डासांसारखे रोगवाहक वाढतात आणि ते जगभरात सर्वदूर पसरतात
4. हवेचा आरोग्य दर्जाही ढासळतो; आगी लागण्याचे प्रमाण वाढते.

वरील सर्व घटकांमुळे एकंदरीत समाजाचे आरोग्यमान ढासळते आणि आरोग्यसेवाही अपुऱ्या पडू लागतात. यातून खालील आजारांचा सामाजिक प्रादुर्भाव बऱ्यापैकी वाढू शकतो :
1. कुपोषण
2. कॉलरा आणि इतर हगवणीचे आजार

3. टायफाईड, शिगेलोसिस, हिपटायटिस-A& E
4. मलेरिया : या आजाराचे प्रत्यक्ष जंतू आणि वाहक डास या दोघांमध्येही बेसुमार वाढ होऊ शकते. जगात जिथे हा आजार पाचवीलाच पुजलेला असतो तिथे तर त्यात वाढ होतेच, परंतु त्याचबरोबर जगाच्या ज्या भागांमध्ये एरवी हा आजार नसतो, तिथेही तो उद्भवतो.

5. Arboviral आजार : 5. Arboviral आजार : यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्याच्या घडीला डेंग्यू 129 देशांमध्ये फोफावलेला आहे; समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असलेल्या प्रदेशांमध्ये त्याचा धोका अधिक राहतो.

6. Hantaviral आजार : : हे आजार उंदरांच्या मार्फत पसरतात. उंदरांच्या थेट चावण्यातून किंवा त्यांच्या लघवी किंवा विष्ठेशी मानवी संपर्क आल्यास हे आजार होतात. अतिवृष्टीच्या प्रदेशांमध्ये हा धोका वाढतो.

7. गोवर आणि मेनिंजायटीस. संबंधित लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांमुळे देखील या आजारांची वाढ होते.
8. विविध प्रकारच्या अन्नातून होणाऱ्या विषबाधा देखील वाढतात. यामध्ये समुद्री अन्नाचाही समावेश आहे.
सागरी पृष्ठभाग तापमानवाढ >>> समुद्री जीवांमध्ये सूक्ष्मजंतूंची वाढ>> विविध विषांची निर्मिती >> यातील काही विषे ही विशिष्ट माशांमध्ये (शेल) पसरतात तर अन्य काही वायुरूप होऊन हवेतही मिसळतात. >> परिणामी माणसाला अन्नातून व हवेतून विषबाधा होते.

9. श्वसनाचे आजार : हे विशेषतः तान्ही मुले आणि वृद्धांमध्ये वाढण्याची शक्यता राहते.
10. ढासळत्या राहणीमानामुळे मानसिक आजार आणि लैंगिक अत्याचारांमध्ये पण वाढ होऊ शकते.

वरील संभाव्य धोके लक्षात घेता जगातील सर्वच देशांनी आपापल्या आरोग्य सेवा आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.

हा लेख नागरिकांची आरोग्यदक्षता वाढावी या उद्देशाने लिहिलेला असून त्यात कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही.
*******************************************************************************************************************************
चित्र जालावरून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार सर
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख
एल-निनो या वातावरणीय बदलाचे आरोग्यदृष्ट्या एवढे गंभीर परिणाम असतील असे वाटले नव्हते
त्यातल्या काहींची चुणूक दिसायला सुरुवात झाली आहे

Navbharat हा हिन्दी न्यूज चॅनेल आहे त्या वर आज पूर्ण जगात कसा पावसाने, महापुर नी, वादळाने,भूकंप नी , दुष्काळ नी थैमान घातले आहे ते दाखवले.
हवामान बदल आणि प्रदूषण ह्याचा इतक्या लवकर ह्या तीव्रतेने परिणाम होईल ह्याची कल्पना पण माणसाने केली नसेल.

त्यात कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही.
>>>
वाचताना भीती वाटली खरी...
एकूणच पुढच्या पिढीची चिंता वाटते. आपली पोरे मोठी होता होता काय होणार जगाचे वातावरणाचे...
असो, माहितीबद्दल धन्यवाद.. काळजी घेणे होईल

लोकांना अजून गंभीर परिणाम ची जाणीव नाही.
माझेच उदाहरण घ्या मी मुंबई मध्ये राहतो छान नोकरी आहे ..मुंबई मध्ये पाणी पुरवठा करणारे तलाव रिकामे कधीच कोणी अनुबवले नाहीत..
माझे गाव अशा ठिकाणी आहे तिथे किती दुष्काळ असेल तर इतका पावूस पडतो की पिण्याचे पाणी मिळतेच आणि दोन पीक येतात च.
त्या मुळे हवामान बदलाचे गंभीर परिणाम काय असतात ह्याची मला जाणीव नाही.
पण सर्व असे भाग्यवान नाहीत.
फक्त विचार करा मुंबई ल पाणी पुरवठा करणारे तलाव कोरडे पडले ,आणि गावात पण तीच अवस्था आहे.
तुम्ही करोड पती आहात,abjo रुपयाची संपत्ति तुमच्या कडे आहे.
तरी तुम्ही एक महिना पण जगू शकणार नाही.

आणि ह्या अशा स्थिती वर माणसाकडे काही उपाय नाही.

लोकांनी आता गंभीर होणे गरजेचे आहे.
जीव जंतू हवामान नुसार कार्यशील होतात.
आणि तेच आजारांना कारणीभूत असतात.
एकी कडे पिण्यास पाणी नाही,दुसरीकडे अन्न टंचाई आहे, तिसरीकडे तापमान ६० डिग्री वर गेले आहे,वीज नाही.
काय अवस्था होईल माणसाची

कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही. >>

विकीपिडियानुसार एल-निन्यो हजारो वर्षांपासून होत आला आहे, त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. बीबीसीच्या १९९७ मधील बातमीनुसार:
El Nino events normally occur roughly every 5 years, and last for between 12 and 18 months. However unpublished scientific research now suggests that the complex weather systems could occur every 3 years, making them a dominant weather pattern and in effect, almost permanent.

खरं तर, एल-निन्यो आणि ग्लोबल वॉर्मिग यांचा संबंध असू शकतो (ज्यामुळे हा प्रकार वरचेवर होऊन जास्त पाऊस पडू शकतो). पण नियमित होणाऱ्या या वातावरणातील बदलाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, हा प्रकार थोडा अतिरंजित वाटला, कारण गेल्या १०० वर्षात उलट मनुष्याचे आयुष्यमान खूपच सुधारले आहे.

काही विशिष्ट वातावरणात च ..
झुरळ, ढेकन , डास, टोळ, हे असे नजरेला दिसणारे कीटक वाढतात
काही विशिष्ट हवामान मध्ये च पिकांवर रोग पडतात.
हे सर्व सत्य आहे.
मानवी आरोग्य ची वाट लावायला हवामान बदल सक्षम आहे.
ह्या वर्षी उन्हाळ्यात तापमान नेहमी पेक्षा जास्त होते.किती त्रास होतो त्याचा ह्याची जाणीव लोकांस असलीच पाहिजे
काही डिग्री अजून तापमान वाढले तसे त्याचे मोठे दुष्परिणाम नक्की होतात.
लोकांचे वाढलेले आयुष्य परत कमी होत आहे.
जे आजार ६० वर्ष नंतर व्हायचे ते आता३० वय असताना च होत आहेत.
कॅन्सर चे प्रमाण जगभर वाढत आहे.
मधुमेह, वाढत आहे.

माणूस खेड्यातून शहरात स्थलांतरित होतोय. डासांना महात्मा गांधीचा विचार "खेड्याकडे चला" पटलाय. ते खेड्यात पोहोचलेत. मोकळा वारा, मोकळा श्वास आणि विशुद्ध रक्ताचा घास...वावा काय सुखी जीवन... Happy

मी ही असेच वाचलेय की वातावरणात काही वर्षांनंतर बदल होतातच. त्यात ध्रुवावरचं बर्फ वितळणे, पुरस्थिती येणं, तापमान वाढ , अतिवृष्टी, अवर्षण आदी गोष्टी घडत असतात.
पण वाढती लोकसंख्या, वारेमाप जंगलतोड, मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन, ओझोनच्या थराची हानी, जलप्रदूषण , वायूप्रदूषण, दुषित अन्न या गोष्टी पूर्वी एवढ्या प्रमाणात नसाव्यात. हे आपलेच कुकर्म. भोआकफ.

साधकबाधक चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !

यंदाच्या एल निनोमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने विस्तृत अहवाल प्रकाशित केल्यामुळे त्याची थोडक्यात दखल घेतली आहे.

साळुंके ह्यांचं बरोबर आहे.

अगदी काही दशके पूर्वी खेड्यात डास नव्हते. (शहरातली चिमुकले डास पण रोग निर्माण करण्यास बाप).

पावसात गवताच्या कुरणात डास असायचे पण ते आपल्याला जे डास माहीत आहेत तसे नसायचे आकाराने मोठे असायचे काळ्या रंगाचे.
म्हशी , गायी ह्यांना चावयचे ,माणसं पण प्रिय होती त्यांना पण जास्त नाही.
पण त्या डास न मुळे कोणते आजार होत नव्हते.
आता मात्र सर्रास शहरातील डास गाव खेड्यात पण आहेत.

पिसवा हा प्रकार नष्ट झाला आहे .ह्या पिसवा महा खतरनाक एक तर आकाराने खूप लहान पण चावा खूप जोरात घेत असत.
आणि चिमटीत पकडुन त्यांना मारू पण शकत नाही.
त्या सहज मरत पण नसतं.
असा बदल पण झाला आहे.

डासांच्या मुद्द्याबाबत सदर अहवालामध्ये काही सविस्तर माहिती आहे.
एरवी अतिउंचावरील प्रदेशांमध्ये (उदाहरणार्थ, हिमालयीन पट्टा) डासांमार्फत पसरणारे आजार सहसा आढळत नाहीत. परंतु आताच्या तापमान आणि हवामान बदलामुळे तिथेही अशा रोगांच्या प्रसाराला पोषक वातावरण तयार होते.


महासागरांमध्ये ज्या अण्वस्त्र चाचण्या होत आहेत

>>>
अशा चाचण्यांमुळे सागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते की नाही हे मला माहित नाही; ते कोणी हवामानतज्ञांनी सांगावे. पण अशा वाढलेल्या तापमानामुळे काय होते हे सदर अहवालात दिलेले आहे. ते असे :

सागरी पृष्ठभाग तापमानवाढ >>> समुद्री जीवांमध्ये सूक्ष्मजंतूंची वाढ>> विविध विषांची निर्मिती >> यातील काही विषे ही विशिष्ट माशांमध्ये (शेल) पसरतात तर अन्य काही वायुरूप होऊन हवेतही मिसळतात. >> परिणामी माणसाला अन्नातून व हवेतून विषबाधा होते.

>>>पिसवा हा प्रकार नष्ट झाला आहे .ह्या पिसवा महा खतरनाक एक तर आकाराने खूप लहान पण चावा खूप जोरात घेत असत.>>>
Hemant खरंच खतरनाक जीव...
बहुतेक कोंबड्या, कुत्र्यांवर होत...आता नाहीत....

L निनो मुळे ह्या वर्षी गंभीर दुष्काळ पडण्याची खूप शक्यता आहे.

खरिब हंगाम वाया गेला आहे.
मुंज,तुर, मूग,उडीद,भुईमूग,चवळी,सोयाबीन, तीळ,वाटाणा,घेवडा, भात ,ही आणि अजून .
पीक संपली आहेत.
सर्व धरणात खूप कमी पाणी आहे.
कोयना dam चे पाणी वीज निर्मिती साठी वापरायचे की शेती साठी ,की पिण्यासाठी हा प्रश्न निर्माण होणार आहे.
राज्यभर पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील होईल.
वीज कपात नक्की होईल.
अन्न धान्य महाग होतील.
हवामान बदल मुळे काय घडते ह्याचा ट्रेलर ह्या वर्षी महाराष्ट्र नक्की अनुभवेलं.
जनता अजून पण नशेत च आहे .
गंभीर स्थिती ची त्यांना जाणीव च नाही

भारतीय समाज प्रगल्भ नाही हे वारंवार मी बोलतो त्याचे हेच कारण आहे.
El निनो काय आहे सर्वांना नाहीत आहे.
पण त्याचा परिणाम ह्या वेळेस भारतावर होणार आहे.
El nino मुळे खूप मोठा परिणाम भारतावर होत आहे.
कोणालाच जाणीव नाही सर्व नशेत आहेत.
कारण आज पर्यंत त्याची जाणीव कोणाला झाली नाही.
पाणी .
भारतात पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील होईल.अशी अवस्था आहे.
सर्व hydro प्रोजेक्ट बंद होतील.
म्हणजे वीज कपात.
प्रचंड महागाई.
टोमॅटो १०० रुपये किलो वर गेले होते सर्व विसरले.
सर्व च गोष्टी महाग होतील इतक्या की विकत घेणे ऐर्या गाबल्याचे काम नसेल.
अशा धाग्यावर काय कॉमेंट हव्या होत्या .
प्रगल्भ समाज असता.
तर

१)आज पासून च पाणी कपात करा. पाणी खूप नियंत्रित रीती नी वापरा.
२) hydro प्रोजेक्ट ची बंद झले तर पर्यायी व्यवस्था निर्मिती करण्यासाठी आता च प्रयत्न करा

चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !
हेमंत
तुमची तळमळ समजली. पाणी आणि वीज बचत या गोष्टी तशाही कायमच महत्त्वाच्या आहेत.

छान आढावा घेतलाय. मनाचे विकार आणि वेगवेगळी इन्फेकशन्स ह्याचे प्रमाण नक्कीच वाढतंय. किंवा मग हे आधीही होते आणि आता अवेयरनेस वाढलाय असे असेल.

इको-अँग्झायटी हा विकार आहे. आताशा त्याचे प्रमाण वाढत आहे. असे कालच्या न्यु यॉर्क टाइम्स्मध्ये वाचण्यात आले.
Among the characteristics of eco-anxiety, they cited “frustration, powerlessness, feeling overwhelmed, hopelessness, helplessness.” There could be a combination of “clinically relevant symptoms, such as worry, rumination, irritability, sleep disturbance, loss of appetite, panic attacks.”

Arboviral आजार
>>>

केरळ व कर्नाटक पाठोपाठ आता Zika विषाणू पुण्यात दाखल. https://www.lokmat.com/pune/zika-virus-patient-found-in-pune-health-syst...

आरोग्य परिस्थिती नियंत्रणात आहे.
डास -नियंत्रण महत्त्वाचे.
गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घेण्याची गरज.

थांबा..
परिणाम किती प्रमाणात आहे ह्याची आकडे वारी मिळू द्या

बरोबर.
फक्त दखल घेतलेली आहे.
जर गरोदर स्त्रीला याची बाधा झाली तर जन्मणाऱ्या मुलामध्ये मेंदू व डोळ्याची गंभीर व्यंग उद्भवतात. हा महत्त्वाचा मुद्दा.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC10389317/