दुसऱ्या धाग्यांवर चर्चा चालू आहे. त्या वाचल्यानंतर लक्षात आले की बऱ्याच म्हणी जवळपास सारख्याच अर्थाने एकापेक्षा जास्त भाषांमधे वापरल्या जातात. जसे की मराठीत 'हातच्या कांकणाला आरसा कशाला?' यासारखीच हिंदीत 'हाथ कंगन को आरसी क्या' अशी म्हण आहे . किंवा 'दुरून डोंगर साजरे ' सारखी ' दूर की डगर सुहानी ' अशी हिंदीत किंवा 'the grass is always greener on the other side' अशी इंग्रजीत म्हण आहे.
म्हणींचा प्रवास एका भाषेतून दुसरीकडे झाला असावा का?
आपल्याला माहीत असलेल्या अशा अर्थाअर्थी सारख्या म्हणी/ वाक्प्रचार येथे नोंदवून ठेवूया.
तसेच म्हणीच्या उगमाबद्दल किंवा एका भाषेतून दुसरीकडे झालेल्या प्रवाहाबद्दल विशेष माहिती दिलीत तर ' सोने पे सुहागा ' .
मला फक्त 3 भाषा येतात. चौथी संस्कृत थोडीफार समजते. त्यामुळे मी इथे उदाहरण या भाषांमधील दिले. बाकी जाणकार इतर भाषांतील म्हणींबद्दल सांगतीलच.
अर्थाअर्थी म्हणी
Submitted by मनिम्याऊ on 7 September, 2023 - 07:57
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान धागा. तिथला प्रतिसाद इथे
छान धागा. तिथला प्रतिसाद इथे चिकटवू का?
नक्कीच ह पा
नक्कीच ह पा
'युद्धस्य कथा रम्या' हे वचन
'युद्धस्य कथा रम्या' हे वचन फारच ऐकिवात आहे. मुळात इथे 'युद्धाच्या कथाच तेवढ्या रम्य असतात, प्रत्यक्ष युद्ध हे भयानक असतं, ते तितकं रम्य वगैरे अजिबात नसतं' - असा अर्थ अध्याहृत आहे. एका संस्कृत सुभाषितात ते येतं -
दूरस्था: पर्वता: रम्या: वेश्या च मुखमंडने |
युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरतः ||
पर्वत दुरूनच छान दिसतात, वेश्या मेकप केल्यानंतरच, युद्धाच्या फक्त कथाच रम्य; आणि हे तिन्ही लांबूनच रमणीय वाटतात. 'दुरून डोंगर साजरे, जवळ जाता दरी-खोरे' या म्हणीशी फारच साधर्म्य वाटलं.
गुजरातीतही ह्या अर्थाची म्हण
गुजरातीतही ह्या अर्थाची म्हण आहे. एका ट्रेकला गेले होते. तेव्हा बरोबर असलेल्या गुजराती मुलाने सांगितली होती.
वर दिलेला श्लोक माहिती नव्हता. 'दुरून डोंगर साजरे' ह्या म्हणीचा पुढचा भागही माहिती नव्हता.
छान धागा.
छान धागा.
वर दिलेला श्लोक माहिती नव्हता. 'दुरून डोंगर साजरे' ह्या म्हणीचा पुढचा भागही माहिती नव्हता. >>> मम.
छान धागा आहे.
छान धागा आहे.
Work is worship ही म्हण नव्हे, वाक्प्रचार म्हणता येईल. कन्नडामधे 'कायकवे कैलासा' असं म्हणतात. अर्थ तोच. कामात देव शोधणे.
मराठी - उथळ पाण्याला खळखळाट
मराठी - उथळ पाण्याला खळखळाट फार
हिंदी - अधजल गगरी छलकत जाय..
>>>>>>कन्नडामधे 'कायकवे
>>>>>>कन्नडामधे 'कायकवे कैलासा' असं म्हणतात. अर्थ तोच. कामात देव शोधणे.
Hands to work, hearts to God
योगः कर्मसु कौशलम् ||
योगः कर्मसु कौशलम् ||
हाथ के कंगण को आरसी क्या, हे
हाथ के कंगण को आरसी क्या, हे ठिक पण पढे-लिखे को फारसी क्या याचा संबंध म्हणीच्या पहिल्या भागाशी लागत नाहीसे वाटते.
बाकी, अश्या म्हणी खुप आहेत. आठवतील तश्या सांगेन.
छान धागा मनिम्याऊ. वाचतेय.
छान धागा मनिम्याऊ. वाचतेय.
<<<हाथ के कंगण को आरसी क्या,
<<<हाथ के कंगण को आरसी क्या, हे ठिक पण पढे-लिखे को फारसी क्या याचा संबंध म्हणीच्या पहिल्या भागाशी लागत नाहीसे वाटते.>>>
आहे संबंध, पुर्वी म्हणजे मोगलांच्या काळात फारसी ही राज्यभाषा होती. ती आपल्या भारतीय भाषांपेक्षा वेगळी असल्याने ती शिकण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत. म्हणजे सगळ्यांना सहज येणारी भाषा नव्हती. सरकारी काम पुर्णपणे फारसीत चालत असल्यामुळे सरकार दरबारी व्हाइट कॉलर जॉब करणार्यांना थोडक्यात शिकल्या सावरलेल्या लोकांना बाय डिफॉल्ट फारसी येत असे. म्हणून तशी म्हण आहे. थोडक्यात स्वातंत्र्य पुर्व काळात जे स्थान इंग्रजी भाषेला होते तेच मुघल काळात फारसी ला होते.
एक अवांतर गोष्ट सांगायची तर फारसी येणे ही प्रतिष्ठेच लक्षण असल्यामुळे लोकांमध्ये बोलताना फारसी शब्द पेरायची फॅशन होती (जशी नंतर इंग्रजी शब्द पेरायची फॅशन आली). ह्या प्रकारामुळे मराठी वर फारसीचे फार आक्रमण झाले होते. ह्याला आळा घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी 'राज्यभाषा कोश' तयार करवला , नाण्यांसाठी आणि राज्यमुद्रेसाठी संस्कृत भाषा वापरली. थोडक्यात प्री मुघल परंपरा पुनरुज्जीवित केली.
छान माहीती पर्णिका.
छान माहीती पर्णिका.
छान माहीती पर्णिका +100
छान माहीती पर्णिका +100
पर्णिका, उत्तम!
पर्णिका, उत्तम!
छान धागा मनिम्याऊ.
छान धागा मनिम्याऊ.
पर्णिका, माहितीसाठी धन्यवाद.
पर्णिका, किती रोचक माहिती.
पर्णिका, किती रोचक माहिती.
म्हण नाही.. पण एक शब्द मस्त
म्हण नाही.. पण एक शब्द मस्त प्रवाहित झाला आहे.. त्याबद्धल...
हिंदीत नमक पारे असा एक पदार्थ आहे.. बेसिकली मठरी फक्त डायमंड शेप मध्ये...
तीच गोड बनवली कि त्याला शक्कर पारे म्हणतात...
त्याला मराठीत शंकर पाळे असे नाव पडले आहे...
शक्करपारे --- शंकरपाळे
>>> पढे-लिखे को फारसी क्या
>>> पढे-लिखे को फारसी क्या
हा भाग ऐकला नव्हता कधी.
इंटरेस्टिंग माहिती, पर्णीका. याचा स्रोत सांगू शकाल का?
मराठी - उथळ पाण्याला खळखळाट
मराठी - उथळ पाण्याला खळखळाट फार
संस्कृत -
अगाधजलसंचारी गर्वंनायाति रोहीत:
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फुर्फुरायते
शफरी म्हणजे काय?
शफरी म्हणजे काय?
गुगलले तर 'कार्प' असा अर्थ दाखवतय? कार्प नावाचा मासा असतो एक सुंदर चित्रमय कविताही वाचलीये त्याबद्दल. आठवली तर देते.
तो मासा म्हणजेच शफरी का?
शंकरांच्या स्तोत्रात शफरीध्वज दहन असा काहीसा शब्द ऐकलाय. दक्षाच्या ध्वजावरती हे माशाचे चिन्ह असावे काय? मदनाचा असेल. कारण जाळला तर मदन होता ना.
- https://poets.org/poem/fish-2
एलिझाबेथ बिशप यांची ही कविता आठवत होती.
शफरी - एक लहान मासळी
शफरी - एक लहान मासळी
शाळेत हे सुभाषित होत
शफरीध्वज = मदन असेल तर शफरी
शफरीध्वज = मदन असेल तर शफरी म्हणजे मगर पाहिजे कारण मदनाला मकरध्वज म्हणतात.
हे सापडले -
हे सापडले -
हिमाचळी तप करी व्योमकेश ॥ मन्मथा तू भुलवी तयास ॥ मग रतीसहित कुसुमेश ॥ शिवाजवळी पातला ॥१८॥
पार्वतीच्या स्वरूपात ॥ रती जेव्हा प्रवेशत ॥ वसंते वन समस्त ॥ श्रृंगारिले तेधवा ॥१९॥
शिवाच्या मानसी सतेज ॥ प्रवेशला शफरीध्वज ॥ पाखरे करिती बहु गजबज ॥ शिवध्यान विक्षेपिती ॥१२०॥
ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर ॥ गेला होता तेव्हा दूर ॥ तो पार्वती होवोनि कामातुर ॥ पाठीसी उभी मन्मथाच्या ॥२१॥
शिवे उघडिले नयन ॥ तो पुढे देखिला मीनकेतन ॥ म्हणे माझ्या तपासी केले विघ्न ॥ मग भाललोचन उघडिला ॥२२॥
निघाला प्रळयवैश्वानर ॥ भस्म केला कुसुमशर ॥ फाल्गुनी पौर्णिमा साचार ॥ काम जाळिला ते दिनी ॥२३॥
माधव ह्यांचं बरोबर वाटतं आहे.
माधव ह्यांचं बरोबर वाटतं आहे. वरच्या श्लोकात मदन असाच अर्थ वाटतो आहे. शिवाय वरती 'मन्मथा तू भुलवी तयास' असंही आलं आहे.