मारी कोन्दोबद्दल पहिल्यांदा कुठेतरी वाचलं होतं आणि नंतर तिची ती नेटफ्लीक्सवरची प्रसिद्ध सिरीज बघितली होती ज्यात ती अमेरिकतल्या हर प्रकारच्या पसार्यांनी ओथंबलेल्या खोल्या आवरण्यात मदत करायची. नंतर तिची 'कपड्यांना कश्या घड्या घालाव्यात' याबद्दलची एक क्लीप बघितली. 'हॅ! यात एवढं काय्ये शिकवण्यासारखं?' असं वाटलंच, खोटं कशाला बोला! तर ते प्रकरण तितपतच राहिलं. नंतर कंटाळा आला बघायचा. समहाऊ पसारा म्हणण्याइतक्या, वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या चीजवस्तू माझ्याकडे नसतील म्हणूनही असेल, पण तिची परत काही कुठल्याच माध्यमात भेट झाली नाही एवढं मात्र खरं.
लायब्ररीत मात्र अलिकडे तिचं "जॉय अॅट वर्क" हे अजून एका सह-लेखकासमवेत (Scott Sonenshein) लिहिलेलं पुस्तक दिसलं. कुतूहल वाटलं आणि घेऊन आले घरी लगेच.
घरातला पसारा असा-असा आवरायचा, अश्या- अश्या जागा मोकळ्या करायच्या हे सगळं ठिके पण ऑफिसही - तुमचं कामाचे टेबल, लॅपटॉपचा डेस्कटॉप, माय डॉक्युमेंट्स, ईमेल इनबॉक्स ही नीट आवरुन ठेवायचा इतकंच काय पण तुमचा वेळ आणि तुमच्या टीम्स मीटिंग्जही छान Tidy करायच्या बरं का, हे पुस्तकातल्या प्रकरणांच्या शीर्षकांवरुन कळल्यावर, 'बघूया तर काय म्हणतेय याबद्दल?' असं वाटलं आणि पुस्तक वाचायला घेतलं.
बर्याच पानांवर घुमून फिरुन तेच तेच लिहिलंय असं वाटलं पण काही टीप्स उपयुक्त वाटल्या म्हणून त्या नोंदून ठेवल्या डायरीत.
यात फार काही नवीन नाही. (खरंतर नसेलच - नुसतं आऊटलूक इनबॉक्स कसा ऑर्गनाईज करावा यावर कैक व्हिडीओज असतात यूट्यूबवर. तर ते असो.)
- You may have a "spark Joy" folder on your desktop wherein you can store works you're proud of, appreciations received, family pictures, etc.
- You may also have a "Joy" folder in your inbox for storing thank you/appreciation/compliments you received that you'd like to read on a bad day.
या पुस्तकात तिने तिचा घर आवरतानाचा फंडा ऑफिसच्या कामाच्या बाबतीतपण लागू केलाय. म्हणजे कपड्यांचे कपाट आवरायला घेतले आणि त्या उत्खननात कधीकाळी घेतलेल्या कपड्यांचा शोध लागला, तर तो एकेक कपडा हातात घेऊन स्वतःलाच विचारायचे की या कपड्याने मला
आत्ता आनंद मिळतो आहे का? जर उत्तर नकारार्थी असेल तर सरळ तो कपडा डोनेशन बॉक्सला बहाल करायचा. मग, जर हेच ऑफिसच्या कामाला लागू केले तर -
To decide whether to keep or delete an email/a document, ask yourself:
- Is this email/document a requirement or need in my current work?
- Does it guide/inspire me for future work or work better?
- Does this email/document spark joy in me?
पहिल्या प्रश्नाचे उत्तर देणे जरा कठीण आहे कारण अगदी करंट वर्कमध्ये लागत नसली तरी माझ्यासकट बहुतेक लोक ती फाईल्/ईमेल ठेवतच असतील. न जाणो, हा डेटा/ईमेल्/फाईल कधी परत लागली तर? )
दुसर्या प्रश्नाचे उत्तर माणसानुसार बदलत असावे. कधी कधी एखादे डॉक्युमेंट पुढच्या वर्जनसाठी बेस ठरतेच की.
शेवटच्या प्रश्नाने मात्र, बेक्कार डेटा असलेल्या असंख्य स्प्रेड्शीट्सने माझे कपाट भरले आहे आणि एकेक स्प्रेड्शीट हातात घेऊन, माझ्या मनाने मला "नाही!नको ही अजिबात" असं तातडीने सांगितल्याने मी ती स्प्रेड्शीट रिसायकल बीनमध्येही न ढकलता पर्मनंटली डीलिट करतेय, असं चित्र माझं मलाच दिसायला लागलं. जॉय स्पार्क करणारी ऑफिसेस कुठे असतात देव जाणे!
असो. फार काही नसलं तरी काही टीप्स तिच्या आवडल्या मला, त्यामुळे 'आरिगातो' (थॅंक्यू) असं म्हणून पुस्तक परत केलं.
जॉय अॅट वर्क - मारी कोन्दो व Scott Sonenshein
Submitted by वर्षा on 7 September, 2023 - 00:34
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त
मस्त
चांगलं लिहिलं आहे.
हे मलाही जमेल की नाही सांगता येत नाही.स्पार्क जॉय च्या व्याख्याच दर दिवशी बदलत राहतात.उदा, एखादे अतिशय चिकट बोअर काम केले, मागे टाकून दिले.आणि नंतर काही काळाने त्याचा उपयोग जाणवला, लोकांकडून स्तुती मिळाली तर ते आधी फेकणेबल होतं, पण आता स्पार्क जॉय मध्ये गेलं.
धडाधड डाटा एकदाच डिलीट करता येतो: लास्ट वर्किंग डे ला 1 दिवस उरल्यावर एरवी आपला जीव अडकलेला असतोच.
जॉय स्पार्क करणारी ऑफिसेस
जॉय स्पार्क करणारी ऑफिसेस कुठे असतात देव जाणे!)))
आवरणे, जागच्या जागी ठेवणे ठीकच आहे..पण हवंय की नाही हे ठरवणे खूपच कठीण आहे माझ्यासाठी !
एरवी आपला जीव अडकलेला असतोच. )))) अनु अगदी अगदी ...
कधी कधी लास्ट वर्किंग डे नंतरही डेटा उडवताना उगाच गलबलून येते...
मारी कोन्दो ची ती सिरीज
मारी कोन्दो ची ती सिरीज पहाण्ञाचा मीही प्रयत्न केलेला होता वर्षा पण मला झेपली नाही.
>>>>>>> You may also have a "Joy" folder in your inbox for storing thank you/appreciation/compliments you received that ....
कुठल्या बाजारा मिळता ही?
>>>>>>एकेक कपडा हातात घेऊन स्वतःलाच विचारायचे की या कपड्याने मला
आत्ता आनंद मिळतो आहे का? जर उत्तर नकारार्थी असेल तर सरळ तो कपडा डोनेशन बॉक्सला बहाल करायचा.
हां हे पटले.
माझे पेटंट वाक्य आहे - लाईफ इज टू शॉर्ट टू वेस्ट ऑन अ नॉनफेव्हरेट लिप्स्टिक कलर.
>>>>>>>>> Proud जॉय स्पार्क करणारी ऑफिसेस कुठे असतात देव जाणे!
सत्य गं!!!
लेखन आवडले. आपल्याला आवडेल असे लिहीत जाच. अशा अजुन टिप्स येउ देत.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
>>स्पार्क जॉय च्या व्याख्याच दर दिवशी बदलत राहतात
हाहा खरंय अनु.
केटी(?!) करण्यात बहुतेक वेळ घालवल्यावर जॉबच्या शेवटच्या दिवशी डेटा एकदाचा सटासट शेअरपॉईंटवर ट्रान्सफर केला की गंगेत घोडं न्हालं म्हणायचं :
सामो,
>>लाईफ इज टू शॉर्ट टू वेस्ट ऑन अ नॉनफेव्हरेट लिप्स्टिक कलर.हे भारीय.
टिप्स ह्म्म...वर्कस्टेशन जरा प्लेजंट करण्याच्या तिच्या काही टिप्स आवडल्या मला पण पुन्हा, नवीन नसाव्यात, पिंटरेस्ट इ. वर नक्की असतील. आणि कितपत फीजीबल/करणेबल आहेत हा वेगळा प्रश्न,
Spark joy @ Workstation
- Decide theme color to coordinate desk item (हे वाचताक्ष्णी मला माझ्या एका जुन्या जॉबमधल्या एका जपानी टीममेटची आठवण झाली. त्याला गुलाबी रंगाचे ऑब्सेशन होते बहुतेक. त्याच्या डेस्कवरील जवळपास सर्व गोष्टी गुलाबी असत. पोस्ट इट, पेनापासून ते माऊस, माऊसपॅड, पेनस्टँड, पुश पिन्स आणि मोबाईलची चार्जींग केबलपण.)
- Choose fav movie/story as a theme for decorating workspace.
- Place a small plant pot.
- Display a photo that brings back joyful memories.
- Add some sparkly, crystal or glass paperweight.
- Place a small aroma item for special fragrance.
- Place a beautiful candle.
- Choose favorite coaster for your drink.
- Change background of desktop to reflect each season.
म्हणजे एकीकडे पसारा आवरायचा आणि दुसरीकडे निर्माण करायचा आणि मग मारी कोन्दोला साकडे घालायचे
>>>>>लाईफ इज टू शॉर्ट टू
>>>>>लाईफ इज टू शॉर्ट टू वेस्ट ऑन अ नॉनफेव्हरेट लिप्स्टिक कलर.हे भारीय. Lol
सुगंधी साबण आणि रंगीबेरंगी लिप्स्टिक्स - नो तडजोड. मनमुराद आवडतात या २ गोष्टी. तू लिहीलयस ना स्पार्क जॉय.
येस्स्स्स!!! दिज २ इन्डलजन्सेस स्पार्क जॉय फॉर मी.
गिव्हन अ चॉइस, स्नानगॄहात, साबणांचा बफे उभारीन मी. रोज नवा फ्रॅग्रन्स
----------------------------
लिप्स्टिकमध्ये, मला हवा तसा अगदी बेबी पिंक रंग सापडायचाय. एकदा ट्रेनमध्ये एक कृष्णवर्णिय स्त्री होती जिचे ओठ अगदी प्लम्प होते आणि तिने तो रंग लावलेला. गॉड!!! आय ऑलमोस्ट हॅड अॅन अॅस्थेटिक ऑर्गॅझम काय सुंदर दिसत होता तो बेबी पिंक रंग. मला एखाद्या जन्मी कुरळ्या केसांची व असे प्लम्प ओठ असलेली आफ्रिकन स्त्री व्हायचे आणि नॉट टु मेन्शन त्यांचा बांधाही मस्त असतो. दे आर ब्यु-टि-फु-ल!!!
>>>>>>>>>>>Place a beautiful
>>>>>>>>>>>Place a beautiful candle.
मस्त मस्त!!
>>>>'आरिगातो'
>>>>'आरिगातो'
ही कोणती भाषा वर्षा? जपानी?
साबण बफे..मस्त आयडिया आहे
साबण बफे..मस्त आयडिया आहे.शेजारी अरोमा ऑईल चा पण बफे ठेवू.
अनु सुंदर!!! ऑइल्स चा वास
अनु सुंदर!!! ऑइल्स चा वास इतका आवडत नाही मला. पण येस तुला आवडत असेल. तू डिफ्युसर वापरतेस की ही ऑइल्स, डॅब ऑन स्किन करतेस? काही इन शॉवरही वापरायची असतात.
जनरली गरम पाण्याच्या बादलीत
जनरली गरम पाण्याच्या बादलीत.स्पेशल आवडती लव्हेंडर, येलांग येलांग आणि टी ट्री.
वॉव!!! खूप छान.
वॉव!!! खूप छान.
जॉय स्पार्क करणारी ऑफिसेस
जॉय स्पार्क करणारी ऑफिसेस कुठे असतात देव जाणे!
Ha ha, true that !
सामो,
Soap buffet is great idea. Though exactly contradictory to Marie Condo and Scott Sonenshein’s
>>>>>>Though exactly
>>>>>>Though exactly contradictory
का बरं, ज्या जॉय स्पार्क करतात, त्या गोष्टी नाही टाकायच्या.
Sparking Joy साठी एक दोन साबण
Sparking Joy साठी एक दोन साबण / फ़्लेवर्स ना ? आपण तर फ़ुल बुफे म्हणतोय
आम्ही साबण आणि अरोमा बुफे
आम्ही साबण आणि अरोमा बुफे मधली प्रत्येक गोष्ट आठवड्यात एक एक दिवस आनंदाच्या ठिणग्या पाडून वापरू.कोई शक?
… आनंदाच्या ठिणग्या पाडून …
… आनंदाच्या ठिणग्या पाडून …
ऐरणीवर आणलतं अरोमा ला
अनु
अनु
साबण आणि सुगंधी तेलांच्या बफेची आयड्या भारीय. बफे लगवाए, निर्मल आनंद पाए.
मस्त लिहीले आहे! लोकांनी
मस्त लिहीले आहे! लोकांनी आपली तारीफ केलेल्या मेल्सचा एक फोल्डर मी वर्षानुवर्षे वेगळा करून ठेवलेला आहे. त्याचा फार फायदा होतो कधी मोटिव्हेशन कमी पडले तर.
बाकी पसारा कमी करणे आपल्याला जन्मात जमणार नाही हे आता लक्षात आलेले आहे. कारण कोणतीही गोष्ट पटकन टाकून देणे जमतच नाही.
मात्र एक महत्त्वाचे - ऑफिसच्या कामाच्या मेल्स किंवा डॉक्युमेन्ट्स कधी डिलीट करायची हे सर्वस्वी एम्प्लॉयीज च्या हातात नसते. अनेक कंपन्यांच्या काटेकोर पॉलिसीज असतात त्याबद्दल. ते लक्षात घेउनच हे हाउसकीपिंग करावे एन्रॉन वाल्यांनी त्या कागदपत्रे श्रेड केलेल्या केस मधे "It was no longer giving me joy" असे काहीतरी उत्तर कोर्टात दिले आहे असे इमॅजिन केले
>> मात्र एक महत्त्वाचे -
>> मात्र एक महत्त्वाचे - ऑफिसच्या कामाच्या मेल्स किंवा डॉक्युमेन्ट्स कधी डिलीट करायची हे सर्वस्वी एम्प्लॉयीज च्या हातात नसते. अनेक कंपन्यांच्या काटेकोर पॉलिसीज असतात त्याबद्दल. ते लक्षात घेउनच हे हाउसकीपिंग करावे. एन्रॉन वाल्यांनी त्या कागदपत्रे श्रेड केलेल्या केस मधे "It was no longer giving me joy" असे काहीतरी उत्तर कोर्टात दिले आहे असे इमॅजिन केले
हो तेही खरंय.
अॅक्चुअली बहुतेक कंपन्या डेटा ट्रान्सफर करायला सांगतात ना. डीलीट अलाऊड नसावे.
>>मस्त लिहीले आहे! लोकांनी आपली तारीफ केलेल्या मेल्सचा एक फोल्डर मी वर्षानुवर्षे वेगळा करून ठेवलेला आहे. त्याचा फार फायदा होतो कधी मोटिव्हेशन कमी पडले तर.
हे मलाही आवडले आहे आणि इथून पुढे हे मी करणार आहे.
>> ही कोणती भाषा वर्षा? जपानी?
होय.