Submitted by पुरंदरे शशांक on 25 August, 2023 - 00:29
थेंबांत उन्हाच्या रेषा
थेंबांत उन्हाच्या रेषा
पाचूत मिरवल्या वाटा
रंगाची उधळण होता
स्वप्नात बिलोरी लाटा
जरतारी हिरवी शिखरे
ठिबकता थेंब हळुवार
बिंबातून झळके सोने
मऊ वाटेवर अलवार
किणकिणती घंटा दूर
मंजूळ सुरावट रानी
वार्यावर हलके गीत
वेळूतून पाऊस गाणी
भवताल स्वप्नसे भासे
नंदनवन अवनी सारी
सुख मावेना ह्रदयात
आकाशी घेत भरारी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
आवडली!
आवडली!
अहाहा..!!
अहाहा..!!
आल्हाददायक!!!
आल्हाददायक!!!
काय सुन्दर नाद आहे शब्दांना!
काय सुन्दर नाद आहे शब्दांना! थेंबात उन्हाच्या रेषा. व्वा!चुंबुनी दव रवीकिरणे
इंद्रधनू वाकविती
ताणूनी रंगीत प्रत्यंचा
तम गगना विंधिती
थेंबातून तेजस्वी
ओघळती बिंदू गोल
शिंपीत सोनेरी सडा
फाकविती रत्नकिळ
पहाटेस नृत्य नाट्य
चाले रवी किरणांचा
दव बिंदू साथ देती
लेऊनी पट रंगांचा
…
आई ग्ग!! पुरंदरे व रेवती _/\_
आई ग्ग!! पुरंदरे व रेवती _/\_
कमाल शब्दनिवड !!
कमाल शब्दनिवड !!
शशांक सर व रेवती तै... दंडवत !!
अतिशय सुंदर कविता !
अतिशय सुंदर कविता !
सुरेख, रेवती.
अहाहा! सुंदर कविता.
अहाहा! सुंदर कविता.
सुरेख कविता शशांकजी.
सुरेख कविता शशांकजी.
सुरेख कविता रेवती.
शशांक, फारच सुन्दर..
शशांक, फारच सुन्दर..
रेवती , खूप छान
मस्तच!
मस्तच!
शशांक व रेवती खुप सुंदर....
शशांक व रेवती खुप सुंदर.... दंडवत..
रेवती आपले शेवट चे कडवे ..कल्पना किती सुंदर....अप्रतिम..
सुंदर कविता! चित्र रेखाटेलत
सुंदर कविता!
चित्र रेखाटेलत