शब्दांची नवनिर्मिती

Submitted by छल्ला on 22 August, 2023 - 02:46

आपल्या मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी तिच्यात अधिकाधिक नवीन शब्दांची भर टाकणे गरजेचे आहे.

हे काम आपण सर्वांनी मिळून करायला हवे. भाषातज्ज्ञ आणि अभ्यासक तर आहेतच, पण सर्वसामान्य " यूजर्स " Happy म्हणून आपणही काही भर घातली तर काय हरकत आहे?
उदा
मला मराठीतील धन्यवाद शब्द मुळीच आवडत नाही..
किती कोरडा आणि रुक्ष आहे तो !! किती कठोर व्यंजन आहेत त्यात...
या उलट,
थँक्यू! स्वतःच केस कपाळावर आधी पुढे आणून मग मागे सारण्याचा अभिनय करणाऱ्या..अल्लड किशोरी सारखा आहे!!
थँक्यू म्हणताना ओठांचा चंबू होतो, डोळे हसरे होतात..मनातली कृतज्ञता शब्दांत उमटते.
याउलट धन्यवाद ! म्हणताना.. मान ताठ होते, स्वरात एक तुच्छ बेपर्वाई आपोआप उमटते , आपणच समोरच्यावर उपकार करतोय असा एक छुपा दंभ जाणवतो.

मग असा एखादा आनंदी, उत्फुल्ल ' थँक्यू ' मराठीत का तयार करु नये आपण !

किंवा...एखाद्या भावनेला, वस्तूला एकच पर्यायी शब्द हवा असे थोडेच आहे! आपण दुसराही काही छान पर्याय सुचवू शकतो.
उदा - उत्तर, परीक्षा, बादली, खुर्ची.....यांना दुसरे मराठी शब्द मला तरी माहिती नाहीत.

आणखी एक म्हणजे - संस्कृतोद्भव असले तरच ते शब्द ग्राह्य धरले जातील असा काही नियम आहे का?
शुद्ध मराठीत नवीन शब्द तयार केला तर त्याला मान्यता कोण देते?

तुमच्या नवीन संकल्पनांच्या प्रतीक्षेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला स्वतःला मी तयार केलेला टंकाळा हा शब्द खूप आवडतो. काहीजणांना वापरतानाही पाहिलंय. जे वापरतात त्यांनी रॉयल्टी म्हणून एक कप रॉयल टी प्या. >>> हो टंकाळा मजेदार आणि चपखल आहे.

मामी, टंकाळा आवडला होता, त्याची रॉयल्टी तुमच्याकडे आहे हे माहीत नव्हतं. आता रॉयल टी माझ्याकडे नाही. इथल्या भाषाव्याघ्रजनांच्या प्रदेशात घाबरून फिरणारी बकरी या नात्याने मी वाघ-बकरी चहा पितो.

Happy छान शब्द.
मीम ला काय म्हणता येईल आणि?

मामी, टंकाळा शब्द मस्त आहे, मला आवडतो, आताही टंकाळा झटकून प्रतिसाद दिला Happy

मला वाटलेलं हा शब्द मिपा वर आलेला..

टंकाळा आणि टंचनिका हे दोन्ही शब्द मिपाचे प्रॉडक्ट्स आहेत आणि ते तिथे बरेच वर्षांपासून प्रचलित होते. आतां तिथे फिरकत नसल्याने आताची प्रचलित आहेत की नाही ते ठाउक नाही.

नवीन शब्द निर्मिती होत नाही म्हणता? मागच्या दहावीस वर्षात जन्मलेल्या पोरांची नावे ऐका. र ला ट जोडून मनानेच नावे बनवतात, वर वाट्टेल तो (गुगलप्रणित) अर्थही त्यास चिकटवून टाकतात.
नितारा, टिया, रियान, अहान, कियान, कियारा, त्वेष्टी, दृशित, ध्रुवित, गर्विल, मृदित, श्रीनिका, क्रिषीका, वेदांतिका.. काय वाट्टेल ते अरारारा... ऐकुन संस्कृतोद्भव वाटतात पण कशाचा कशाशी "अर्थाअर्थी" संबंध नसतो.

>>>>नितारा, टिया, रियान, अहान, कियान, कियारा, त्वेष्टी, दृशित, ध्रुवित, गर्विल, मृदित, श्रीनिका, क्रिषीका, वेदांतिका.. काय वाट्टेल ते अरारारा>>>
Rofl

हीरा+१११ तात्या होते तेंव्हापासून वाचलेत हे दोन्ही शब्द तिकडे. तिकडे कोणी जन्माला घातले माहीत नाही. हीरा, संजोपराव का तात्या?

सुनिती.. Happy
खरे आहे. मला नेहमीच नवल वाटते ह्या हल्लीच्या नावांचे!!!
निदान... काही अर्थ नाही, शब्द आवडला म्हणून ठेवले...असे तरी म्हणा!!!

>>>वाक् वळू'>>>

वळू म्हणजे देवाचा बैल.
वळू शब्द दोरखंड विणणे या अर्थाने सुध्दा येतो.
मी च-हाट ( दोर ) वळत होतो.
तो मला दोरखंड वळू लागत होता.

@ लंपन,
तात्या, संजोप राव आणि टारझन ह्यापैकी एक. बहुधा टारझन . हा माणूस अफलातून होता. आणि एक नंदन कोटिसम्राट. टारझन हा आय डीच्या शब्दांचे विडंबन मस्त करीत असे. नीतीन थत्ते ह्या आयडीला तो मारीन बुक्के म्हणे. आणि ' बशीवला टेम्पोत ' हे तर भयाणच.
तात्या तर गेलेच. संजोप राव लिहीत नाहीत आता. टारझनला त्याच्या जादाच टिंगल टवाळ खोरपणामुळे दोनदा हाकलले आणि लोकाग्रहास्तव परत घेतले. पण महिलावर्गाने आरडाओरडा केला आणि पुन्हा त्याचे दर्शन झाले नाही.

Yes हिरा! अजून एक id athavatey तो म्हणजे ब्रिटिश. आगरी भाषेत धमाल katha. त्याची द्रौपदी चे वस्त्रहरण katha म्हणजे kahar होती..

लंपन, तो आय डी ब्रिटिश टिंग्या होता का? आडनाव भोईर होते हे आठवते. नुसती धमाल होती. वस्त्रहरण मलाही आठवते.

हीरा हे आयडी सगळेच आठवत आहेत. पण नक्की कोणी निर्मिती केली ते माहीत नाही. मिपा वर काहीही चालायचे. काहीही म्हणजे काहीही. एक शरदिनी आयडी होता आणि त्यांनी एक डुडूळगावचा गोलंदाज का अशी काहीतरी कविता केली होती. Proud असो खूपच अवांतर.

तो id ब्रिटिश च. ब्रिटिश टिन्ग्या वेगळा माझ्या मते. ब्रिटिश चे नाव मिथुन भोईर. Tanchnika मला वाटते टारझन चे कॉन्ट्रिब्युशन.

बोबडी या क्रि.वि. ला नाम/ विशेषण केलं की होईल ना.
'चटईला टाचणी टोचली' हे एकदम बोबडी वाक्य आहे.

वाक्ववळ्कटी मस्त आहे. तोच मुळात एक (दिसायला आणि उच्चारायला) वाक्ववळ्कटी असण्याने आणखी मजेदार आहे.

Pages