डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.
आपल्या मायबोलीवर वैद्यकीय विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करणारे डाॅ.कुमार 1 - हे आपणा सर्वांना सुपरिचित आहेतच.
याच डाॅ.नी हार्ट अॅटॅकवर शिक्का मोर्तब करणारे ट्रोपोनिन यावर एक लेख इथे लिहिलेला आहे - जो मी आधीच वाचलेला होता.
मला (शशांक पुरंदरे) जेव्हा काही महिन्यांपूर्वी घरीच हार्ट अॅटॅक आला तेव्हा त्या वेदनांच्या तीव्रतेमुळे मला पूर्णपणे कळलेले होते की हा हार्ट अॅटॅकच आहे. पण ज्या रुग्णालयामधे माझा ईसीजी व बीपी तपासले तेथे हे दोन्हीही नाॅर्मल आल्याने तेथील डाॅ. हे ह्रदय दुःख हे काहीतरी मानसिक स्ट्रेसमुळे झालेला त्रास आहे असे म्हणत राहिले. तासाभराने परत काढलेला ईसीजी ही नाॅर्मल आल्याने व मी पूर्ण वेदनामुक्त होऊन माझ्या पायावर उभा राहिल्याने तर ते डाॅ. हा हार्ट अॅटॅक नाहीच्चे यावर ठाम होते.
पण मी मात्र तो ट्रोपोनिनचा लेख वाचलेला असल्याने ती टेस्ट कराच म्हणून हटून राहिलो. पण ती टेस्ट हार्ट अॅटॅकनंतर सहा तासांनी करायची असते म्हणून डाॅ.नी मला घरीही पाठवले. व जेव्हा रात्री दहाच्या सुमारास मी ती टेस्ट तिथेच केली तेव्हा ती स्ट्राँग पाॅझिटिव आली व मला लगेच cardiac i. c. u. तच हलवले.
वैद्यकीय दृष्ट्या मी तसा स्टेबल असल्याने लगेचच दुसर्या दिवशी अँजिओग्राफी केली ज्यात ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्त वाहिन्यात चार मेजर ब्लाॅकेजेस आढळले. त्यामुळे त्यात चार स्टेंट टाकून माझा जीव डाॅ.नी वाचवला.
हे सगळे त्या ट्रोपोनिनमुळेच लक्षात आले. या करता या डाॅ.कुमार यांचा तर मी आजन्म ऋणीच आहे.
असेच वैद्यकीय विविध विषयांवरचे लेख लिहून डाॅ.नी सर्व सामान्यांचे प्रबोधन करीत रहावे ही डाॅ.ना नम्र विनंती.
सर्व मायबोलीकरांना उत्तम आरोग्यासाठी ह्रदयपूर्वक अनेक शुभेच्छा.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः
धन्यवाद !
--------------------------------------------------------
डाॅ.कुमार1 यांचा लेख
ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब https://www.maayboli.com/node/65025
शशांक सर,
शशांक सर,
तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा. कठीण परिस्थितीतही तुम्ही योग्य निर्णय घेतला व पाठपुरावा करून जीवघेण्या संकटातून बाहेर पडलात यासाठी तुमचं कौतुक व अभिनंदन.
कुमार सर,
तुम्ही तर देवदूत ठरलात, आपल्या कामाची यापेक्षा मोठी पावती असूच शकत नाही. तुमच्या लेखनाचं व प्रश्नोत्तरांच्या सातत्याचं नेहमीच कौतुक वाटतं.तुमचं मनापासून अभिनंदन.
(तुमची 'आनंदाने रात्री झोपूच शकलो नाही ' या अर्थाची पोस्ट फार निरागस वाटली. )
शशांक, वाचलेली माहिती योग्य
शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा. >>> देवकी + १.
काळजी घ्या. उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.
कुमार सरांचे धन्यवाद. उपयुक्त माहिती दिलीत आणि शशांक यांनीही तिचा योग्य वापर केला.
शशांक तुम्हाला उत्तम
शशांक तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा! काळजी घ्या.
हा सोशल मिडीयाचा खरा सदुपयोग आणि त्याचे सुपरिणाम. डाॅ.कुमार1 खरच उपयुक्त माहिती देत आहात, धन्यवाद!
डॉ कुमार सर
डॉ कुमार सर
यालाच मार्कर म्हणतात का? कारण मला काही दिवसांपूर्वी संशय आला तेव्हा इ सी जी बरोबरच रक्ताची हीच तपासणी केली होती... व तिचे परिणाम मिळाल्यानंतर काळ्जीचे कारण नाही असे सांगितले
नव्याने प्रतिसाद दिलेल्या
नव्याने प्रतिसाद दिलेल्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद !
आपण सर्वांनी अतिशय मनापासून लिहिलेले प्रतिसाद वाचून समाधान वाटले.
रेव्यू
चांगला प्रश्न. होय, याला मार्कर म्हणतात.
हृदयविकाराच्या बाबतीत अशा रक्तातील मार्कर्सचे ३ गटात विभाजन करता येईल :
१. Markers of Myocardial Necrosis and Ischemia : उदा. Cardiac troponins
२. Markers of Cardiac Inflammation : उदा. C-reactive protein
३. Markers of Hemodynamic Stress : उदा. BNP
नव्याने प्रतिसाद दिलेल्या
दु प्र
Dhanyawad sir
Dhanyawad sir
Dhanyawad sir
Dhanyawad sir
डॉक्टर कुमार १ यांच्या
डॉक्टर कुमार १ यांच्या लेखनाचा मी पूर्वीपासून चाहता आहे.
क्लिष्ट वैद्यकीय विषयांवर सामान्य माणसाला समजेल आशा सोप्या भाषेत लिहीण्याचे शिवधनुष्य त्यांनी वेळोवेळी पेलले आहे.
एखाद्या लेखामुळे कुणाचे तरी प्राण वाचावेत यात त्या लेखाचे महत्व आणि लेखकाचे कौशल्य दोन्ही प्रगटते.
श्री. पुरंदरे यांना पुढील निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा आणि डॉ. कुमार १ यांना लेखनासाठी आणि उदंड निरामय आयुष्यासाठीही शुभेच्छा.
__/\__
श्री. पुरंदरे यांना पुढील
श्री. पुरंदरे यांना पुढील निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा आणि डॉ. कुमार १ यांना लेखनासाठी आणि उदंड निरामय आयुष्यासाठीही शुभेच्छा.>>+1
कुमार सर तुमचे लेख खरोखर
कुमार सर तुमचे लेख खरोखर आत्मभान देणारे असतात. आपले आभार. शशांक जी काळजी घ्या
सदासर्वदा देव सन्नीध आहे,
कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे
हेच खरे. लवकर बरे व्हा. उत्तम आरोग्याकरता शुभेच्छा.
कुमार सर तुमचे लेख खरोखर
दुकाटाआ
पुरंदरे शशांक, तुम्हाला उत्तम
पुरंदरे शशांक, तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!
कुमार सर जनजागृतीचं महत्वाचं काम करत आहेत. धन्यवाद.
फारच छान. तुम्हाला खूप
फारच छान. तुम्हाला खूप शुभेच्छा.. व कौतुकही वाटले की पाठपुरावा करुन सर्व केलेत. डॉ. कुमार यांचेही खूप आभार.
डॉक्टर कुमार तुम्ही कदाचीत लिहिले असेल पण तरी विचारते. प्रौढांनी आपले हृदयाचे अरोग्य नीट चालु आहे का हे माहिती करुन घ्यायला दवाखान्यात कोणत्या चाचण्या किती कालावधीने कराव्यात?
नव्याने प्रतिसाद दिलेल्या
नव्याने प्रतिसाद दिलेल्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद !
...
सुनिधी,
हे पहा :
१.https://www.maayboli.com/node/65597
२. https://www.maayboli.com/node/64397
धन्यवाद डॉ.
धन्यवाद डॉ.
Submitted by मोक्षू on 8
Submitted by मोक्षू on 8 August, 2023 - 22:39 >>
याचे अंशतः उत्तर इथे : (कोविड धागा )
https://www.maayboli.com/node/80675?page=15
याचे अंशतः उत्तर इथे : (कोविड
याचे अंशतः उत्तर इथे : (कोविड धागा )
https://www.maayboli.com/node/80675?page=15 >>>सर, लसींची सविस्तर माहिती दिली आहे...पण याचे काही दुष्परिणाम असू शकतात का? जसे आजकाल बर्याच लग्नांमध्ये लोकांना हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण अचानक वाढल्यासारखे वाटत आहे...Corona लस घेतल्यावर DJ चा आवाज सहन करायची capacity कमी झाली आहे असे वाचनात आले...याचा संदर्भ लग्नातील हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढण्याशी असेल का? आणि तुम्हाला बराच अनुभव आहे तर वयानुसार पण आताच लहान वयात पण बर्याच लोकांना हार्ट अॅटॅक येत आहे की हे आधीपण असंच होतं? आत्ता जास्त अधोरेखित होतंय असं काही आहे का?
या संदर्भात आपल्या राज्य/ देश
या संदर्भात आपल्या राज्य/ देश यांचा काही विदा प्रसिद्ध झालाय का ते शोधावे लागेल.>>>विदा म्हणजे काय?
मोक्षू, लसींची सविस्तर माहिती
मोक्षू
, लसींची सविस्तर माहिती दिली आहे. >>>
नाही, ते नव्हते बघायचे !
हा माझा त्या पानावरील शेवटून दुसरा प्रतिसाद बघा :
Submitted by कुमार१ on 12 August, 2023 - 10:01
या आजारामुळे होणारे दुष्परिणाम आणि लसीमुळे होणारे हे कुठेतरी एकमेकांशी मिळतेजुळते असणार आहेत
विदा म्हणजे काय?>>>> डेटा
विदा म्हणजे काय?>>>> डेटा
..
लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसा विदा उपलब्ध व्हायला बऱ्याचदा काही वर्षांचा ( निदान एक-दोन) कालावधी जावा लागतो. मग त्यावर गांभीर्याने मत देता येते.
भारतातील विदा जमायला आणि तो प्रसिद्ध व्हायला प्रगत देशांच्या तुलनेत अजून वेळ लागतो / मिळत नाही. यासंबंधी काही चर्चा इथे (https://www.maayboli.com/node/83621?page=4) झाली होती. तिथले डॉ. रोहिणी यांचे प्रतिसाद पाहता येतील.
या आजारामुळे होणारे
या आजारामुळे होणारे दुष्परिणाम आणि लसीमुळे होणारे हे कुठेतरी एकमेकांशी मिळतेजुळते असणार आहेत>>OK....धन्यवाद सर,प्रतिसाद नव्हते वाचले मी..पण तुम्ही प्रत्येक वाचकाच्या प्रत्येक शंकेचं जे निराकरण करता (मनापासून) ते खरंच वाखाणण्याजोगे आहे...You are really great...
मी तुमचे बरेच लेखन वाचायचे पण सगळेच नव्हते वाचले आता सगळे वाचणार अगदी प्रतिसादांसहित ....धन्यवाद
शशान्क तुम्हाला निरामय
शशान्क तुम्हाला निरामय आरोग्यासाठी खुप शुभेच्छा, वेळेवर निदान झाले, तुम्ही जागरुक राहिलात त्याबद्दल अभिनदन..
कुमार सराचे कौतुक करावे तितके कमी आहे, अभ्यासपुर्ण लेखन, किचकट-कन्टाळवाणे वैद्यकिय विषय आणी समस्या सहज सोपे करुन सान्गण्याची त्याचि हातोटी विलक्षण आहे..
सर तुम्ही असेच लिखाण चालू ठेवा ही आग्रहपुर्वक विनती
धन्यवाद.
धन्यवाद.
**लहान वयात पण बर्याच लोकांना हार्ट अॅटॅक येत आहे की >>>
याची थोडीफार चर्चा troponin च्या धाग्यावर झाली आहे. यथावकाश त्यात भर घालेन.
तिकडे वाचता येईल.
याची थोडीफार चर्चा troponin
याची थोडीफार चर्चा troponin च्या धाग्यावर झाली आहे. >>OK... वाचते मी आता...
डॊ कुमार
डॊ कुमार
या व्हॆल्युज किती सचल असतात?
या व्हॆल्युज किती सचल असतात?
या व्हॆल्युज किती सचल असतात? >>> कोणत्या ?
सचल >>> ?? म्हणजे 'बदलत्या " ?
बदलत्या
बदलत्या
प्रश्न जरा अधिक स्पष्ट कराल
प्रश्न जरा अधिक स्पष्ट कराल का ? म्हणजे तुम्हाला, 'हार्ट अटॅक आल्यानंतर trop पातळी कशी बदलते ' असे म्हणायचे आहे का ?
1)सामान्य स्थितीत, काहीही
1)सामान्य स्थितीत, काहीही त्रास नसताना पॉझिटिव्ह रिडिंग..
2)त्रास वाटला पण निगेटिव्ह रिडिंग
3) वार्षिक चेक अप मध्ये ही चाचणी दर वर्षी करावी का/ इतर कोणत्या चाचण्यात हे समाविष्ट असते का?
. 4) वार्षिक चाचणीत निगेटिव्ह आले तर चेकिंगची फ्रिक्वेन्सी काय असावी? (लक्षण असले तर गोष्ट वेगळी)
Pages