कांदाभजी..
अभ्यास उरकून हॉलमध्ये येण्यासाठी जिना उतरत असताना श्रुतीला आईच्या बडबडीचा आवाज कानी पडला. सुरवातीला तिला वाटलं की कोणी तरी आलंय घरी आणि आई त्यांच्याशी गप्पा मारतीये पण खाली येऊन पहिल्यानंतर तिला कळालं की आपली आई स्वतःशीच बडबड करतीये.
तिच्यासाठी हे रोजच होत म्हणून काही क्षण तिने त्या बडबडीकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा आईच्या तोंडात नानांचं नाव आलं तेव्हा तिला राहवलं नाही. तिने आईला विचारलं
"काय झालंय आई? आत काय केलं नानांनी?"
"तुझे नाना चार वाजता घराबाहेर पडलेत आता सात वाजत आले तरी त्यांचा काही पत्ता नाही. इतकं कसं निष्काळजी असू शकत कोणी. महेश आला म्हणजे माझ्याच नावाने खडे फोडेल, लक्ष ठेवता येत नाही का म्हणून. हजार वेळा सांगून झालंय एक मोबाईल राहूद्या बरोबर महेश ने मोबाईल घेऊन ही दिला पण या जहागीरदारांनी त्याला हात ही नाही लावला."
आईच बोलणं न पटल्यामुळे श्रुती मधेच चिडूनच बोलली
"आई मोबाईल न वापरण्याला तू नानांना दोष देऊच नको. ते तुमच्या दोघांमुळे मोबाईल वापरत नाहीत. तुम्ही जे तासंतास मोबाईल मध्ये डोकं घालून बसता तुम्हाला आजूबाजूला असलेल्या लोकांची खबरही नसते. तुम्हाला नानांशी बोलायला कधीच वेळ नसतो. म्हणून नाना म्हणतात ते यंत्र हातात पडल्यावर जर माणूस असा वागू लागतो तर ते यंत्र माझ्यापासून दूरच बरं"
लेकीने शहाणपण शिकवण कांचनला सहन नाही झालं मग तिने आपल्या बोलण्याचा आवाज अजून वाढवला. अखेर आपण कितीही समजावलं तरी आई स्वतःचच खरं करणार आहे याचा अनुभव असल्याने श्रुती शांत झाली.
नाना म्हणजे महेशचे वडील तिची आज्जी गेल्यापासून नाना खूप एकटे पडले होते. मुलगा सकाळी बाहेर पडला म्हणजे रात्री आठला घरी येई आणि त्यानंतर टीव्ही किंवा मोबाईल पाहतच जेवण होई. जेवण झालं की सकाळी लवकर उठायचं असल्यामुळे वेळेत झोपणं गरजेचं म्हणून सगळे आपापल्या खोलीत जात. मुलाने आपल्याघरात नानासाठी वेगळी खोली करून ठेवली होती हीच काय ती एक चांगली गोष्ट. आपल्या खोलीत बसून किमान नानांना स्वतःला हवं ते करता येत होत. घरात श्रुतीला एकटीला नानांचं मन कळे. खरंतर श्रुती होती म्हणूनतर नानांची जगण्याची इच्छा अजून तरी संपली नव्हती. श्रुतीच्या सहवासातच नाना थोडंफार तरी हसत नाहीतर त्यांच्या आयुष्यातलं हसू पुरत हरवून गेलं होत. बायोकोने अर्ध्या प्रवासात साथ सोडली असं त्यांना नेहेमी वाटे. मुलाच्या नोकरी निमित्त ते अनोळखी शहरात राहायला आले होते. त्यामुळे घरात बसून राहण्याशिवाय नानांकडे पर्याय नसे.
नानांचा जास्तीत जास्त वेळ वर्तमानपत्र चाळत बसणं, एखाद पुस्तक वाचत बसणं, किशोर कुमारची गाणी ऐकत बसणं यातच जाई. संध्याकाळी नाना बाहेर पडत नाक्यापर्यंत एक चक्कर मारून येत पण ही चक्कर फारतर अर्ध्या तासाची असे. नानांना आज फारच उशीर झालाय हे श्रुतीच्याही लक्षात आलं होत. तिलाही आता काळजी वाटू लागली होती.
दारावरची बेल वाजली श्रुतीने धावतच दार उघडलं. महेश आला होता. आता आईचा आवाज अजून वाढेल हे श्रुतीला ठाऊक होत. झालंही अगदी तसंच कांचन ने महेश दारातच उभा होता तोवर त्याला घडला प्रकार सांगायला सुरवात केली. एरवी कांचनच्या बोलण्याला फारस महत्व न देणारा महेशने आज मात्र तीच पूर्ण ऐकून घेतलं. त्यालाही नानांचं वागणं पटलं नाही. या दोघांना नानांच्या वागण्याचा राग आला होता मात्र श्रुतीला आता नानांची काळजी वाटू लागली होती. तिला ठाऊक होत की आपले नाना असे नाहीत ते विनाकारण न सांगता कुठे हिंडत बसणार नाहीत. नानांच्या उशीर होण्याला नक्की काहीतरी मोठं कारण असेल.
श्रुती विचारात बुडून गेली असतना दारावरची बेल वाजली. "प्लिज देवा नानाच असूदेत दारावर प्लिज प्लिज प्लिज.."
स्वतःशीच बडबडत श्रुतीने दार उघडलं.
"मला सोडून एकटं एकटं जेवलीतर नाहीस ना चिने"
कित्येक दिवस न पाहिलेलं मोठं हसू ओठावर फुलवून नाना श्रुतीला म्हणाले. तिने अलीकडे तरी नानांना असं इतकं आनंदी कधी पाहिलंच नव्हतं तिला काय उत्तर द्यावं हेच सुचलं नाही. तिला दारातच उभी पाहून नाना हसतच म्हणाले " घरात येऊ देणार आहेस का मला की दारातच थांबू"
श्रुतीला लाजल्यासारखं झालं ती बाजूला झाली. नानांचं पाऊल घरात पडताच महेश सोप्यावरून उठला आणि नानांना म्हणाला
“ काय हे नाना कुठे होते तुम्ही? इतकावेळ बाहेर इथे काळजी वाटते ना माणसाला. इतके निष्काळजी कधी पासून झालात तुम्ही, सांगून तरी जावं ना त्यात तुम्हाला मोबाईलही जवळ ठेवायचा नसतो."
आपले बाबा नानांना बोलायची संधीच देत नाहीयेत हे पाहून श्रुती मधेच म्हणाली, " बाबा नानांना बोलू तर द्या, तुम्ही नॉनस्टॉप बोलत आहात काय झालं होत ते ऐकून तरी घ्या एकदा"
त्यावर महेश शांत झाला आणि नाना म्हणाले,
" अरे अचानक गावाकडचा मित्र भेटला नाक्याजवळ त्याने त्याच्या घरी येण्याचा आग्रहच केला तो ऐकेच ना. त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो. तो आणि त्याची बायको दोघेच राहतात इथे. त्याची बायकोही आमच्या कॉलेज मधेच होती.
मग काय कॉलेजच्या गप्पा रंगत गेल्या. उशीर होईल म्हणून तुम्हाला सांगणार होतो पण तुमचे नंबर लिहिलेली डायरीच घरी विसरलो. जुन्यागप्पा निघत गेल्या त्यामुळे वेळे कडे लक्षच गेलं नाही."
आपल्याला जे सांगायचं होत ते सांगून झालाय हे समजून नाना आपल्या खोली कडे निघाले कांचन आणि महेशशी नानांचं बोलणं कमीच होई. नाना निघालेले पाहून कांचन बोलली,
" म्हणून तर आम्ही सांगत असतो मोबाईल बरोबर राहूद्या, आम्ही इकडे काळजी करत बसायचं आणि तुम्ही मित्रांची घर हिंडत बसा. बरं तुम्ही हिंडा मला काही प्रॉब्लेम नाही पण कुठे गेलाय कधी येणार आहात इतकं जरी कळालं तरी खूप झालं. जेवण करून आलात की करणार आहात?"
"जेवणार आहे" इतकच उत्तर देत नाना खोलीत निघून गेले. नानाही ऐकून घेणाऱ्यातले नव्हते पण आज आल्यापासून नानांचा चेहरा गुलमोहर सारखा गच्चं फुलला होता. कांचन आणि महेशच्या हे लक्षात नाही आले पण नाना जे सांगून गेले ते अर्धवट सत्य आहे हे श्रुतीने ओळखले होते. जेवण झाली की नानांच्या खोलीत जायचं आणि नक्की काय घडलंय ते ऐकायचं हे तीच ठरलं.
रोजच्या सारखी टीव्हीच्या आवाजातच जेवण झाले. महेश ने कांचनला जेवताना विषय नको अशी सक्त ताकीद दिल्यामुळे नानांचा विषय जेवताना निघाला नाही. जेवण झाले की नाना सोप्यावर येऊन बसले. श्रुती नाना कधी आपल्या खोलीत जातायेत याची वाट पाहत होती. नाना सोप्यावर ठेवलेलं वर्तमानपत्र उचलणार तितक्यात श्रुतीने नानाच्या खोलीमधून काहीतरी हवंय च निम्मित काडून नानांना खोलीत न्हेलं. नाना खोलीत शिरताच तिने दार बंद केलं आणि नानांना म्हणाली,
" नाना लवकर आग्रह न करायला लावता मगाशी सांगितलेली अर्धवट कथा पूर्ण करा"
नाना श्रुतीकडे पाहून हसले, जणू त्यांना श्रुतीच हे वागणं अपेक्षितच होत. मग किंचितही वेळ न घालवता नानांनी बोलायला सुरवात केली.
" अगं..गंपू भेटला होता. तसं त्याच नाव संपत पण आम्ही गंपू म्हणायचो. गंपू मी आणि सरिता म्हणजे त्याची बायको आम्ही गावाजवळच्या कॉलेजात एकत्र शिकत होतो. मला सरिता आवडायची" हे बोलता बोलता लाजले नाना पाहून श्रुतीला हसू आवरेना पण अश्याने नाना बोलणार नाहीत हे लक्षात आल्याने ती शांत झाली. नाना बोलत होते
" सावळा रंग, कपाळावर चंद्रकोरीच्या आकाराची टिकली, काळेभोर डोळे, अजूनही आठवतंय तिच्या एका गाली खळ पडे. त्यावेळी मुलामुलींची मैत्री आजच्या तुमच्या पिढीतील मैत्री सारखी नसे. एकमेकांना एखाद्या विषयाची वही मागणं इथून बोलायला सुरवात होई ती फारतरफार एकत्र एखादा चहा घेणं इतपर्यंत येऊन थांबे. ती मला आवडते हे काही मला तिला कधी सांगता आलं नाही. पुढे वडिलांची बदली झाल्यामुळे मला गाव आणि नाईलाजास्तव कॉलेजही सोडावं लागलं. फोनवर गंपूशी कधी कधी बोलणं होई पण सरिता मला आवडते हे मी त्यालाही सांगितलं नव्हतं. पुढे कितीतरी दिवसांनंतर माझं लग्न तुझ्या आज्जीशी झाल्यानंतर मला गंपूचा फोन आला आणि त्याने तो लग्न करत असल्याचं सांगितलं. मुलीच नाव विचारताच त्याने सरिताच नाव घेतलं. काही क्षण मला दुःख झालं पण पुढच्याच क्षणी माझ्या शेजारी उभ्या तुझ्या आज्जीचा आवाज माझ्या कानी पडला आणि मी त्याला शुभेच्छा देत फोन ठेवला. मला गंपूच्या लग्नाला जात आलं नाही. अधून मधून आमच्यात फोनवर बोलणं होई पण मी इथे राहायला आल्यानंतर तेही संपलं आणि आज तोच गंपू नाक्यावर समोर दिसला. मी त्याच्या घरी येण्याच्या आग्रहाला नाही म्हणूच शकलो नाही. त्याच्या घरात पाऊल ठेवताच माझी नजर सरिताला शोधू लागली. गंपूने आवाज देताच ती समोर अली. अजूनही तितकीच ताजीतवानी तशीच हिरवीगार, काहीक्षण तिच्याकडे एकटक पाहिल्यानंतर मलाच थोडं लाजल्यासारखं झालं आणि मी सोप्यावर येऊन बसलो. मग चहाचा घोट घेत घेत एक एक करून कॉलेजचे विषय निघत गेले. आणि काहीवेळाने माझ्या हातात कांद्याभजीची प्लेट अली. आयुष्यात कधीच कांदाभज्यांना पाहून इतका आनंद झाला नासता जितका त्या क्षणी झाला. त्या भज्यांनी एक आठवण ताजीतवानी केली.
कॉलेजला असताना सहज कसल्यातरी चर्चेत
तुला कुठला खाद्यपदार्थ आवडतो या सरिताच्या प्रश्नाला आपण मला कांदाभजी खूप आवडतात हे दिलेलं उत्तर तिच्या आजही लाक्षात आहे या जाणिवेनेच अंगावर शहारा आला कित्येक दिवसातून आनंदी होण्यासाठी काहीतरी कारण मिळाल्याचं भास झाला पण बेलगाम झालेल्या मनाची लगाम ओढत तिने आत्ता भजीच करणं हा निवळ एक योगायोग असावा असं मी स्वतःलाच समजावलं. भज्यांची प्लेट हातात धरून विचारात बुडालेलो असताना समोरून सरिताच्या आवाज आला,
"ती प्लेट हातात घेऊन काय बसलाय नुसती, तुला आवडतात ना कांदाभजी मग खा ती गार होतायेत"
पुढचे काही क्षण मी जणू आमच्या कॉलेजच्या बाकावर बसून भजी खातोय असंच मला भासलं
Sweet <3
Sweet <3
सुन्दर!
सुन्दर!
मस्तच!
मस्तच!
सुंदर..
सुंदर..
छान कथा. आवडली.
छान कथा. आवडली.
खूप गोड! हळूवार.
खूप गोड! हळूवार.
वाह मस्त.. फार आवडली
वाह मस्त.. फार आवडली
आवडली कथा
आवडली कथा
आवडली कथा.
आवडली कथा.
मस्त..
मस्त..
छान.
छान.
मस्त.
मस्त.
खूपच छान आहे कथा
खूपच छान आहे कथा
मस्त कथा... आवडली
मस्त कथा... आवडली
धन्यवाद
धन्यवाद
तरल
तरल
धन्यवाद नीलूदा
धन्यवाद निलुदा
गोष्ट अकाली संपली आहे असे
गोष्ट अकाली संपली आहे असे वाटतेय !
नुसती भजीच नकोत इतर ही अनेक आठवणी असतील ज्या नानांचे निरस आयुष्य फुलवू शकतात
तसे ही मावळतीचे प्रेम अशारीरिक आणि मानसिकच असते !
Chanch
Chanch
@राजा मनाचा
@राजा मनाचा
पुढे नक्की विचार करेल धन्यवाद
धन्यवाद urmila mathre
धन्यवाद urmila Mhatre
धन्यवाद केशवकूल, aashu,
धन्यवाद केशवकूल, aashu, ऋन्मेssष, मानिम्याऊ