उन्हाचा त्रास कसा कमी करावा?

Submitted by sneha1 on 25 July, 2023 - 20:14

नमस्कार!
मी टेक्सासमधे राहते, आणि इथला उन्हाळा चांगला कडक आहे आणि त्याचा त्रास होतो. उन्हाच्या वेळेला मी जरी गाडीतून बाहेर गेली तरी घरी आल्यावर त्रास होतो. डोकेदुखी, मळमळणे, अ‍ॅसिडिटी, थकवा आणि chills. मी भरपूर पाणी पिते, गॉगल्स, हॅट वगैरे वापरते. मधून मधून गॅटोरेड घेते. आणि हा त्रास रोज होत नाही, कधीकधी होतो.
कोणी काही उपाय सांगू शकेल का?
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Homeopathy मध्ये sun care नावाचे औषध मिळते. बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे 4 गोळ्या घेतो आम्ही नागपूरच्या उन्हाळ्यात. शिवाय घरी आल्यावर तळ पायांना कांद्याचा रस चोळतात.

काळी (सुती कापड)छत्री वापरणे.
पण आता नायलान कापडाचा वापर वाढला आहे त्याचा उन्हाला काही उपयोग होत नाही. पूर्वी सेंचूरी मिलचे काळे कापड (सुती) असे. ते चांगले होते. जमिनीवर पडलेले ऊन परावर्तीत होऊन छत्री कडे आतल्या भागातून परत डोक्याकडे येते. ते नायलान कापड शोषत नाही.

तमिळ लोक लांब दांड्याची छत्री वापरताना दिसत. काठी म्हणून आणि छत्री म्हणून दोन्ही उपयोग होत असे. तमिळनाडूत उन्हाळा कडकच असतो. पाऊस ऑक्टोबर-डिसेंबर येतो.

गाडी ला ऑटो स्टार्ट लावून घ्या.. गाडीत बसण्याआधी पाच मिनिटे गाडी ऑन करा रिमोट ने आणि थंड होऊ द्या...

त्रास नेहमी होतोच असे नाही असं तुम्ही लिहलेय म्हणजे त्रासाचे मुळ कारण बाह्य (वाढते तापमान, उन्हाळा) नसुन अंतर्गत आहे. तुम्ही होणार्या त्रासाची डायरी मेन्टेन करुन बघाल का? म्हणजे ज्या ज्या वेळी त्रास होतो त्या वेळी समान असणार्या घटकांचा विचार करून नक्की कारण शोधून काढता येईल. उदा त्रास झाला त्या प्रत्येक वेळी झोप अपुरी झाली होती, किंवा खाण्यातल्या काही विशिष्ट घटकांचे प्रमाण कमी किंवा जास्त होते, किंवा दुपारी ३ वाजता बाहेर पडल्यावर हमखास त्रास होतो पण दुपारी १२ ला बाहेर पडल्यास त्रास कमी वेळा होतो इ.

तिकडे तुळशीचं बी मिळेल का? मिळालं तर रात्री एक चमचाभर बी एका वाटीभर पाण्यात भिजत घाला, आ णि स का ळी किं चीत दूध, साखर (आवडीप्रमाणे) घालून प्या. पोटाला थंडावा मिळतो. ध ने + जिरे भिजवून ते पाणी प्यायल्याने उष्णता कमी होते.

<< मी टेक्सासमधे राहते, आणि इथला उन्हाळा चांगला कडक आहे आणि त्याचा त्रास होतो. उन्हाच्या वेळेला मी जरी गाडीतून बाहेर गेली तरी घरी आल्यावर त्रास होतो. डोकेदुखी, मळमळणे, अ‍ॅसिडिटी, थकवा आणि chills. मी भरपूर पाणी पिते, गॉगल्स, हॅट वगैरे वापरते. मधून मधून गॅटोरेड घेते. आणि हा त्रास रोज होत नाही, कधीकधी होतो.
कोणी काही उपाय सांगू शकेल का? >>

------- त्रास नक्की कशामुळे होतो हे स्पष्ट होत नाही.

१. केवळ उन्हामुळे ? त्या काळांत पूर्ण वेळ घरी राहिल्यास तरी पण त्रास होत असेल , त्रास सारखा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

घरातील तापमान आणि सोबत आर्द्रता किती आहे हे बघणे महत्वाचे आहे. आर्द्रता जास्त असेल तर असह्यपणा वाढतो, आणि तापमानानुसार तो अजूनच वाढतो, आर्द्रता < ५० % ठिक आहे. भारतीय स्वयंपाक म्हणजे पाणी उकळणे आले. माझा चहाच दहा मिनिटे निव्वळ उकळत असतो Happy भात/ कुकर / भाजी अशा प्रत्येक वेळी घरांत असलेल्या वाफेच्या प्रमाणांत भर पडते.
humid index किती आहे हे महत्वाचे. गुगलून तक्ता मिळेल.

२. घरी राहिल्यास कुठलाही त्रास होत नाही, पण काही कारणा साठी बाहेर गेल्यास ( गाडीचा वापरामुळे ?) त्रास होतो.
घरी असतांना गाडी गॅरेजमधे सावलीत आहे पण बाहेर पार्किंग मधे गाडीला सावलीत ठेवण्याचा पर्याय नेहेमीच मिळेल असे नाही.

माझा अनुभव - मी घरी राहिल्यास मला कुठलाही त्रास होत नाही , अर्थात तापमान आणि आर्द्रता नियंत्रणांत ठेवणे सतत सुरु बसते. Dehumidifier मधून आरामांत ४ लिटर पाणी निघते. घराचा / जागेचा आकार मोठा असेल तर १२ तासांत सहज १० लिटर पाणी निघते.
गाडी गरम असतांना (अविचाराने, धांदरटपणाने किंवा घाई गडबडीत) आंत प्रवेश करुन, त्वरित गाडी सुरु आणि AC max वर ठेवत लागलीच गाडी चालवणे अशी शक्यता असेल तर तापमानांतला मोठा बदल मला त्रासदायक ठरलेला आहे.
गाडीत बसण्याच्या २-४ मिनिटांच्या घाईने मला किंमत चुकवावी लागते .

तापमानातल्या बदलाचा त्रास टाळण्यासाठी मी काय करतो ?
बाहेरचे तापमान (ambient temperature) १०० F असेल आणि गाडी एक तास उन्हात पार्क केलेली असेल तर गाडीच्या आंतमधले तापमान सहज १३५ F पेक्षा जास्त जाते. अशावेळी लागलीच गाडीत बसण्याची धडपड करायची नाही.
१३५ F च्या गरम हवेला थंड करण्यापेक्षा तिला आधी बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. बाहेरची हवा आंत मधे आणण्यासाठी दोन - चार मिनिटे सर्व दारे सताड (पर्याय असेल तर) उघडी ठेवायची. मग गाडी सुरु करुन AC सुरु करायचा. सुरवातीला काही काळ (३० -४० km/hr) खिडक्या शक्य तेव्हढ्या उघड्या ठेवायच्या. हा वेळ वाढवता आल्यास चांगले. कमी स्पिड ( अर्थात टेक्सासमधे शक्य नसेल) असेल तर गाडी थंड होण्याला तेव्हढीच मदत होते. ६० km/hr आल्यावर खिडकी ८० % बंद करतो आणि हायवेला लागल्यावर खिडकी पूर्ण बंद करतो... तो पर्यंत गाडी बर्‍यापैकी थंड झालेली असते.

गाडी मधे पण टोपी /हॅट , गॉगल वापरतो. टोपी वापरत असल्यास डोक्याच्या आकार मानापेक्षा थोडी ढिली असायला हवी. धुतल्यामुळे टोपी आटते, तर धुणे पुढे ढकलायचे.

<< गाडी ला ऑटो स्टार्ट लावून घ्या.. गाडीत बसण्याआधी पाच मिनिटे गाडी ऑन करा रिमोट ने आणि थंड होऊ द्या...
Submitted by च्रप्स on 25 July, 2023 - 23:59 >>

---- टेक्सास मधे असे करता येते का याची खातरजमा करा. Texas Transportation code.

https://statutes.capitol.texas.gov/Docs/TN/htm/TN.545.htm#:~:text=On%20a....

उदय चांगले उपाय लिहिलेत.
चिया सीड भिजवून खाल्याने पोटाची हीट कमी होते असा माझा स्वानुभव आहे. सतत पाणी तरी किती पिणार?

धन्यवाद सगळ्यांना !
पर्णिका, हो अ‍ॅसिडिटी वाढली असेल तर जास्त वाटतो त्रास. आणि १२ वाजताच्या उन्हापेक्षा ३ ला त्रास जास्त होतो.

इथे होमिओपॅथी, तुळशीचे बी मिळेल का माहिती नाही. सब्जा, चिया, क्रॅनबेरी मिळेल.

गाडीला ऑटोस्टार्ट आहे!
उदय, तुम्ही म्हणता ते खरे आहे. घाईगडबडीत गाडी गरम असताना आधीपासून थंड न करता जाऊन बसल्याने त्रास जास्त होतो. आता लक्षात ठेवून गाडी थंड झाल्याशिवाय बसणार नाही. ३-४ मिनिटांसाठी २ दिवस वाया जातात! humidity बद्दल काही माहीत नाही खरे मला. चांगल्या आहेत सगळ्या टिप्स.

लोक शीतली प्राणायाम करतात. पण तो मला जमेल असे मला वाटले नाही.

चिया की सब्जा>>> चिया सीड ईंग्लिश नाव आहे सब्जा च्या जात कुळीतले. पण सेम नसावे. काळपट बारीक बिया असतात, किवी च्या सीड सारख्या.

ओके, पण चिया सिड्सने मला असा अनुभव आला नाही म्हणुन विचारून खात्री करून घेतली.
सब्जाचा अनुभव नाही.