उन्हाचा त्रास कसा कमी करावा?
Submitted by sneha1 on 25 July, 2023 - 20:14
नमस्कार!
मी टेक्सासमधे राहते, आणि इथला उन्हाळा चांगला कडक आहे आणि त्याचा त्रास होतो. उन्हाच्या वेळेला मी जरी गाडीतून बाहेर गेली तरी घरी आल्यावर त्रास होतो. डोकेदुखी, मळमळणे, अॅसिडिटी, थकवा आणि chills. मी भरपूर पाणी पिते, गॉगल्स, हॅट वगैरे वापरते. मधून मधून गॅटोरेड घेते. आणि हा त्रास रोज होत नाही, कधीकधी होतो.
कोणी काही उपाय सांगू शकेल का?
धन्यवाद!
शेअर करा