याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83710
"ती तुझ्या समोर होती?"
"हो."
"आणि तू काय केलं?"
"माझे हात थरथरत होते, तिला बघून. अक्षरशः छाती धडधड करून फुटायला लागली होती."
"आणि तू तिच्याशी बोलला देखील नाही?
नाही. तिचं नाव विचारलं नाही, पत्ता विचारला नाही. काहीच नाही?"
"नाही... मला काहीच सुचलं नाही. अण्णा परत गमावलं मी तिला."
"कुठे दिसली?"
"काळाराम मंदिरात."
"तमा, प्रेमात इतकं वेड नसतं व्हायचं. विलास." गौडाने आवाज दिला.
"बोला अण्णा."
"काळाराम मंदिराचे सीसीटिव्ही कॅमेरे तपास, आणि बघ त्या मुलीचा काही पत्ता सापडतो का. आपल्या हिरोला मदत आपणच केली पाहिजे."
त्याने निःश्वास सोडला.
"ठीक आहे अण्णा." विलास शिंदे म्हणाला.
"तमा, भावनांवर ताबा ठेव. कधीकधी अति प्रेम सुद्धा घात करतं. कधीकधी प्रेमच प्रेमाचा बळी देतं. निगेटिव्ह नाही बोलत. तुमची जोडी राम सीतेसारखी असू दे कायम, हीच महादेवाला प्रार्थना. पण... तमा... काळजी घे."
त्याला अचानक शरा आठवली.
अचानक काळजात एक कळ गेली.
"अण्णा, मी काळजी घेईन. एवढंच तो म्हणू शकला."
"जा. ऑफिसमध्ये घालव थोडा वेळ, बरं वाटेल."
"ठीक आहे अण्णा." तो उठला आणि तिथून निघाला.
*****
ऑफिसमध्ये तो तिच्याच विचारात आला.
तळमळत...
' का. का. इतका विक झालो मी, की मी नावही विचारू शकलो नाही?
का? का पुन्हा फक्त तिला एक क्षण बघू शकलो. का? '
त्याला विचारांनी अक्षरशः डोकं फोडून घ्यायची वेळ आली.
"सर. आत येऊ?"
त्याची तंद्री भंगली.
"साक्षी ये ना."
ती आत आली.
तो तिच्याकडे बघत राहिला, कुणी काहीही बोललं नाही.
"मी वाट बघतोय" तुझ्या बोलण्याची.
"सर मला राजीनामा द्यायचाय."
"परत?" तो हसला.
त्याचं हसू बघून ती चक्रावली.
"सॉरी सर. मला असं वाटत होतं, की तुम्ही माझी क्षमता बघून मला या पोस्टसाठी निवडलं आहे, पण..."
"पण काय साक्षी?"
"यू नो सर. यू नो..."
"बसशील दोन मिनिटं?"
ती बसली.
"शराने काही सांगितलं?"
ती काहीही बोलली नाही.
तोही थोडावेळ शांत बसला.
"ओके. तुझी इच्छा. पण एक रिक्वेस्ट करू?"
"बोला ना सर."
"जमलं तर उद्या शराला ऑफिसला बोलावून घे."
"काय?"
"हो."
"हे ठीक नाहीये."
"विचारून बघ. तिला यायचं असेल तर ती येईल. नसेल तर नसेल."
"सर. मला माझ्या फॅमिलीला यात आणायचं नाहीये."
"...तू राजीनामासुद्धा फॅमिलीमुळेच देतेय. समज जर मी शराचा एक्स बॉयफ्रेंड नसतो, तर? तर आता तू हॅप्पीली काम करत राहिली असतीस."
"सर."
"साक्षी. लेट युवर सिस्टर टेक धिस डिसिजन. आय डोन्ट वॉन्ट टू लूज यु. इफ पोसिबल, कॉल शरा टूमारो, अँड..."
...त्याने तिचा राजीनामा घेतला, आणि सही केली...
"...तुझा राजीनामा मी स्वीकारतो."
ती त्याच्याकडे बघतच राहिली.
"साक्षी आजपर्यंत आयुष्यात मी फक्त एका व्यक्तीला थांबवण्यासाठी सगळं केलं होतं. शरा. अक्षरशः मी रडलो, चिडलो, संतापलो, पाठीचा कणा मोडून माफी मागितली, ती जा जा म्हणत होती, मी लोचट माणसासारखा तिच्या मागे राहायचो. शरा, मी राहतो दूर, तू आज बोलशील ना? उद्या बोलशील ना, असे प्रश्न विचारत राहिलो. तुझा हा बॉस आहे ना, सगळ्या जगासाठी एक योद्धा होता. शरापुढे तो अक्षरशः केविलवाणा झाला. अलमॉस्ट गुलाम होतो मी. तुला नाही कळणार साक्षी, तुझी बहिण माझ्यासाठी काय होती. सर्वस्व होती शरा...
...आणि यापुढे या थराला जायचं असेल, तर फक्त प्राजक्तासाठी जाईन. बाकी कुणासाठी नाही."
साक्षी काहीही बोलली नाही.
"साक्षी, याचा अर्थ तुझी दीदी वाईट आहे, आणि मीच चांगला आहे, असा अजिबात होत नाही. याचा अर्थ एकच होतो, की दोन चांगल्या व्यक्ती मिळून कायम चांगलं नातं नाही बनवू शकत. आम्ही दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर होतो. इट्स जस्ट... मी तिच्या जरा जास्तच प्रेमात होतो."
ती हसली.
"सो, उद्या निर्णय घ्यायचा?"
"हो सर."
"गुड. सी या."
"सी या सर."
******
रात्री त्याने विलास शिंदेला फोन लावला.
काही कळलं?
"अजून तरी नाही."
"लवकर करा प्लीज."
"ट्राय करतोय सर..."
त्याने वैतागून फोन ठेवला.
तेवढ्यात एक मेसेज वाजला, आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं.
तो तयार झाला, गाडी काढली, आणि तो निघाला.
थोड्याच वेळात तो फॅक्टरीसमोर उभा होता.
समोर चार कंटेनर रचून ठेवलेले होते. त्याची सगळी माणसे तिथे जमलेली होती.
गौडा अण्णा सुद्धा तिथे उपस्थित होता.
"भाषण द्यायचंय की सरळ सांगू?" त्याने अण्णाला विचारले.
"भाषण केल्याशिवाय मजा नाही." अण्णा हसला.
"सगळ्यांनी ऐका." तो म्हणाला.
"आज आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. कारण... कारण आता शेलारांच्या बरोबरीने जाण्यासाठी जे हवं ते सगळं आपल्याकडे आहे.
...मेथ, आपण खूप विकतो आहे. पण सगळं लपून, छपून, घाबरून. शेलारांची माणसे सर्व जगात बंदुका दाखवत फिरतात. आपण लपत राहतो. आता असं नाही...
...रावणाला सगळं जग फक्त त्याची लंका सोन्याची होती म्हणून घाबरायचं नाही, तर तो महापराक्रमी होता म्हणून घाबरायच. नवग्रह, यक्ष, देव, दानव, गंधर्व सगळ्यांना त्रासून सोडणारा रावण. ज्याच्या अंतासाठी साक्षात त्रिदेवांपैकी दोघांना अवतार घ्यावा लागला तो रावण. म्हणून पैशांपेक्षा ताकद महत्वाची."
...तो प्रत्येक कंटेनरची कडी काढू लागला.
"...आणि ताकद याला म्हणतात..."
पहिलं दार उघडलं...
आतमध्ये खच्चून छोट्या पिस्टल आणि रिव्हॉल्वर भरलेल्या होत्या.
"ताकद याला म्हणतात..."
दुसरं दर उघडलं...
उझी, मशीन गन आणि रायफल्स...
"ताकद याला म्हणातात..."
खच्चून दारूगोळा भरलेला... बॉम्ब भरलेले.
बघणारे अक्षरशः आ वासून बघतच राहिले.
"...आणि ताकद याला म्हणतात..."
त्याने शेवटचं दार उघडलं...
"ओ माय गॉड..." गौडाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले.
...समोर M777 तोफ दिमाखात चमकत होती...
"आजपर्यंत नाशिकने बंदुकांच्या चकमकी बघितल्या. मात्र आता वेळ आली तर तोफांचा अग्नीवर्षाव काय असतो, तेही दाखवू..."
त्याचा आवाज आसमंत चिरत होता...
...नाशिकच्या इतिहासाला आज वेगळं वळण लागलं होतं.
क्रमशः
भारी नेहमीप्रमाणे
भारी नेहमीप्रमाणे
जोरात सुरुय एकदम
जोरात सुरुय एकदम
क्या बात!
क्या बात!
कथा छान चाललीये. पण काही
कथा छान चाललीये. पण काही प्रश्न उभे राहतात. शेलार इतकं दुर्लक्ष का करतील ह्याच्याकडे?
असो, शेवटी रावण महादेवाचाच भक्त होता. आणि महादेवाच्या रुद्ररूपी अंशाच्या म्हणजे बजरंग बलीच्या हातूनच सोन्याची लंका राख झाली होती.
अजून एक, माझ्या अंदाजाने तुमच्याकडे कथा तयार आहे तर इतके लहान भाग का? जमले तर जरा मोठे भाग टाका.. विनंती
.<<< पण काही प्रश्न उभे
.<<< पण काही प्रश्न उभे राहतात. शेलार इतकं दुर्लक्ष का करतील ह्याच्याकडे?>>
मला पण हाच प्रश्न पडलाय.. पोलिस जाऊ देत पण शेलारांना हे काहीच माहित नाही? खानसाहेब काय करतायत?? नुसती बिर्याणीच खातात की काय??