अवकाशाशी जडले नाते: अतिसूक्ष्म कणांपासून ते विश्वाच्या आकारापर्यंत गप्पा

Submitted by अतुल. on 10 July, 2023 - 09:01
Webb's first deep field

अवकाश....

अणुरेणु पासून तारे दीर्घिका पर्यंत खूप मोठा विश्वव्यापी पसारा.

आपले अवकाश (सूर्यमाला):
सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, चंद्र, कृत्रिम उपग्रह, मंगळ, लघुग्रह पट्टा, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो(?), हेलिस्फिअर, क्यूपर बेल्ट, टर्मिनल शॉक, धूमकेतू, उर्ट क्लाऊड

छोटे छोटे अवकाश:
अणु, रेणू, बोसॉन, फोटॉन, ग्लुओन, फर्मीओन, इलेक्ट्रोन्स, क्वार्क्स, क्वांटम्स, स्ट्रिंग्ज

मोठे मोठे अवकाश:
तारे, न्युट्रॉन स्टार्स, पल्सार्स, क्वासार्स, सुपरनोव्हा, नेब्युलाज, दीर्घिका, क्लस्टर्स

गूढ गम्य अवकाश:
डार्क म्याटर, डार्क एनर्जी, वर्म होल्स, कृष्णविवरे, श्वेत विवरे

संशोधकांचे अवकाश:
CERN, LHC, LIGO, NASA, Quantum, Relativity, Gravity, Time Dilation, Length Contraction, Light years, Ripple effect, Hubble, James Webb, Double slit experiment, Photo electric effect, Planck's constant, Spring theory, Schrodinger's Cat, Uncertainty Principle, Pauli exclusion principle, Wavefunction, Multiverse theory, Quantum entanglement, Quantum teleportation, Quantum computers,

या आणि अशा संदर्भातील शोध लागतात. त्याच्या बातम्या आपण वाचतो. तेंव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात. या व अशा गोष्टीवर प्रश्न/शंका विचारून चर्चा करण्यासाठी हा धागा. या जास्तीकरून गप्पाच असतील. हमरीतुमरी हरकत नाही पण दिवे घेऊन चर्चा. गणिती व क्लिष्ट समीकरणे, सिद्धता इत्यादी शक्यतो टाळून Lol Proud

PhysicsConference.jpg
(Conference on Physics which was held from 24 to 29 October 1927)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तारा जर २८ बिलिअन प्रकाशवर्ष दूर आहे. ह्या ताऱ्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते पृथ्वीवर यायला १२.९ बिलिअन वर्ष लागतात.
>>> whatttttt… म्हणजे एखादा तारा संपला तरी पृथ्वी ला 12.9 वर्षे समजणार नाही???

तारा जर २८ बिलिअन प्रकाशवर्ष दूर आहे. ह्या ताऱ्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते पृथ्वीवर यायला १२.९ बिलिअन वर्ष लागतात. >> तारा आत्ता २८ बिप्र दूर आहे. आज त्याचे जे किरण आपल्याला दिसतात त्या वेळी अवकाशात तो जिथे होता तिथपासूनचे अंतर १२.९ बिप्र इतके आहे असा त्याचा अर्थ.

यावरून दोन अनुमान निघतात
१. विश्व प्रसरण पावतेय.
२. हा तारा ज्या गॅलेक्सी मधे आहे किंवा त्याचे जे सौरमंडल आहे त्याच्या भ्रमणकक्षांचा मार्ग हा आपल्याला ज्ञात असल्याप्रमाणे किमान १२.९ बिप्र आणि कमाल २८ बिप्र इतका आहे. कदाचित ही कक्षा आणखीही मोठी आणि छोटी असेल. त्यामुळे ती ३४ बिप्र पर्यंत जाऊन सर्वात जवळच्या बिंदूवर येईल तेव्हांचे अंतर कदाचित ७ बिप्र इतकेही असेल. पुन्हा या बिंदूला यायला त्याला किती वर्षे लागतील याची कल्पना नाही.

सुरूवातीचे प्रतिसाद वाचायला सुरूवात केली . हा धागा संपाद्दीत आहे का ?
आधीचे प्रतिसाद कुठे गेले ? अस्मिताचा अवघड पेपर कुठे आहे ?

तारा आत्ता २८ बिप्र दूर आहे. आज त्याचे जे किरण आपल्याला दिसतात त्या वेळी अवकाशात तो जिथे होता तिथपासूनचे अंतर १२.९ बिप्र इतके आहे असा त्याचा अर्थ.
>>> करेक्त्त .. आपण तारा बघतो म्हणजे तिथून निघालेले किरण आपल्यापर्यन्त पोचतात म्हणून तो तारा दिसतो.. ते 12.9 बिलियन वर्षे आधी निघालेले किरण असतात...

खूप आधी भविष्यात जाण्यासंबंधीचे किंवा भूतकाळात जाण्याआधीचे दावे खोडून काढणारे पॅराडॉक्स होते. आता बहुतेक ते कालबाह्य झालेले असावेत. त्यातला एक.

समजा भूतकाळात जाऊन आजोबांच्या बालपणाच्या काळात जाता आलं असतं. हे शक्य आहे असे समजा. आता आजोबांच्या भूतकाळात जाऊन जर त्यांचा लहान असतानाच खून केला तर त्यांना मुलगा होणार नाही, म्हणजेच आपलेही अस्तित्व असणार नाही. यात कुठेच विज्ञानाची, गणिताची गरज पडत नाही. फक्त तर्काने भूतकाळात जाण्याची शक्यता खोडून काढली.
function at() { [native code] }उल सरांचे पॅराडॉक्स रिजॉल्व करण्यासंबंधी तर्काने (थॉट एक्सपरिमेंट) ने उत्तर देण्याबद्दलचे आग्रही प्रतिपादन समजून घेतले आहे.
मला असे वाटते की ज्या वेळी अशी प्रमेये मांडली जातात त्या प्रमेयांमधे अवैज्ञानिक काय आहे हे विज्ञानाने आणि गणिताने सुद्धा मांडण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. माझे ज्ञान त्या दृष्टीने कुचकामी आहे. इथे अनेक लोक संशोधन क्षेत्रात आहेत.आशिष महाबळ आहेत. ते यासंबंधाने अधिकाराने सांगू शकतात.

अस्मिताने सेट केलेला पेपर.
तारा जर २८ बिलिअन प्रकाशवर्ष दूर आहे. ह्या ताऱ्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते पृथ्वीवर यायला १२.९ बिलिअन वर्ष लागतात.हे जर विश्वनिर्मितीच्या वेळे पासून अजून दूर गेले आहे , तर किती दूर व कुठल्या दिशेने हे नेमकं कसं मोजतात. अवकाशात दिशाज्ञान असतं का आणि त्याने फरक पडतो का ? विश्वाचे प्रसरण या स्पंदनामुळे होते त्यालाच गुरुत्वीय लहरी म्हणता येईल का ? विश्व आधी अमर्याद नव्हते का , म्हणजे जेव्हा विश्वनिर्मिती झाली तेव्हापेक्षा आता ते मोठे आहे म्हणजे मग ज्या जागी हे मोठे होत गेले तिथे आधी काय होते का त्याने ही जागाही प्रसरण पावत निर्माण केली. अशाही काही जागा आहेत का की जिथे काहीच नाही, काहीच अस्तित्वात नाही. गुरुत्वीय लहरीमुळे काळ ही संकल्पना अस्तित्वात आहे का, कारण जिथे यापेक्षाही सूक्ष्म लहरींचे अस्तित्व असेल तिथे पृथ्वीच्या मानाने काळ थांबल्या सारखा होतो का? पृथ्वीपासून सगळं विश्व सगळ्या दिशांनी तितकंच मोठं आहे का ? वक्राकार म्हणजे गुंडाळल्यासारखे , ripple effect. ही चक्क मोठी गाठ आहे , प्रसरण पावताना या गाठी हळुहळू मोकळ्या होत असतील का ? हे प्रश्न बाळबोध वाटले तर सोडून द्या. Happy

खरंतर विश्व १३.८ बिलियन वर्षांच्या आधीपासून असायला हवे ,फक्त आपल्याकडे पुरावे नाहीत. बिग बँग हे इसवीसनपूर्व व इसवीसन पश्चात या मानवी कालगणनेसारखं परिमाण असावं.कारण सध्या एवढाच आवाका आहे.

काल वावेची लिंक वाचून जरा शोधलं तर अल् जजिरा वरील ही लिंक मिळाली. किंचित सोपं आहे, अतुल यांच्या पोस्टीसारखं.
Scientists hear the cosmic 'hum'

Submitted by अस्मिता. on 9 July, 2023 - 19:44

विश्वनिर्मितीच्या वेळे पासून अजून दूर गेले आहे , तर किती दूर व कुठल्या दिशेने हे नेमकं कसं मोजतात. अवकाशात दिशाज्ञान असतं का आणि त्याने फरक पडतो का ?>>>
एखादा संदर्भ बिंदु घेतल्या खेरीज अवकाशात दिशेला अर्थ नाही, ठरवता येणार नाही. विश्वाचा कुठलाच असा केंद्र बिंदु नाही.
आपण पृथ्वीवासी पृथ्वी हा केंद्र बिंदु गृहीत धरून अवकाशातील ग्रह, तारे, कुठलेही ऑब्जेक्ट्स यांचे स्थान निश्चित करतो. अवकाशातील एखादा ऑब्जेक्ट कुठल्या दिशेला आहे हे सांगण्यास कोनीय निर्देशांक(?) (angular coordinates) वापरतो. त्यासाठी विषुववृत्त (जर आपण विषुववृत्तावर उभे असु तर डोक्याच्या वर) म्हणजे शून्य अंश, तिथून दक्षिण ध्रुव - ९० अंश आणि उत्तर ध्रुव म्हणजे + ९० अंश. (कदाचित हे दक्षिण ध्रुव +९० आणि उत्तर ध्रुव - ९० असेही असेल. ) हे झाले एक प्रतल . म्हणजे समजा आपण पूर्वेकडे तोंड करून उभे आहोत. ते आपल्यातुन उभे डावी-उजवीकडे जाणारे प्रतल.
याच्या कटकोनातील प्रतलास 0 ते २४ तासात (आणि तासाचे मग छोटे भाग अचूकते साठी) विभागले जाते.
म्हणजे कोन आणि तास सांगितले की दिशा निश्चित झाली पृथ्वी संदर्भ मानून. मग पृथ्वी पासूनचे अंतर सांगीतले की स्थान निश्चित झाले.

किती दूर यासाठीही संदर्भ हवा. तो संदर्भही पृथ्वीच.

विश्व प्रसरण पावते आहे तिथे आधी काय होते?>>
काहीच नाही. हे पचवायला जड आहे. आपल्याला अवकाश हे अमर्याद वाटते. पण ते तसे नाही. विश्व निर्मिती आधी काहीच नव्हते, अवकाश पण नाही. विश्व नक्की केव्हा निर्माण झाले यात मतभेद असतील, पण निर्मिती आधी काहीच नव्हते, अवकाशही नाही. कदाचित आधीही विश्व निर्माण होऊन नष्ट झाले असेल, नष्ट झाले तेव्हा काहीच उरले नाही, अवकाशही नाही. शून्य. विश्व निर्माण होऊन प्रसरण पावते आहे म्हणजे गुरुत्वामुळे एकमेकांना ठराविक अंतरावर धरून ठेवणारे ग्रह, तारे, समुह वगळता सर्व एकमेकांपासून दूर जात आहे (तारकापुंज (गॅलक्सीज) एकमेकांना पासून दूर जात आहेत).
जिथे जात आहेत तिथे आधी काय होते तर काहीच नाही, अवकाशही नाही. याची भौतिक दृष्टया कल्पना करणे खूप अवघड आहे, मला तरी ते कधी जमणार नाही.

माझ्या माहिती प्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
अवकाशाबदल दिशा निश्चित कसे करतात हे फक्त कन्सेप्ट समजवण्याच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे, त्यात नक्की संज्ञा आणि निर्देशांक काय वापरतात याबाबतीत त्रुटी असू शकतील.

<विश्व निर्मिती आधी काहीच नव्हते, अवकाश पण नाही. विश्व नक्की केव्हा निर्माण झाले यात मतभेद असतील, पण निर्मिती आधी काहीच नव्हते, अवकाशही नाही.>

हे आठवले
सृष्टी से पहले सत नहीं था असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं आकाश भी नही था

मानव खूपच छान मांडलेत. अंतर्मुख करणारे उत्तर. अस्मितानी सेट केलेला पेपर खरंच सोपा नाही. तत्पूर्वी हि चाचणी परीक्षा...

>> मला नेहमीच एक प्रश्न पडतो विश्वात सर्व पदार्थ अणु पासून बनलेले असतात त्या अणु चे आयुष किती असते किवा अणु चा मृत्यू कसा होतो/होईल ( थोडक्यात अणु ची expiry date किती असते.
>> Submitted by उदयगिरी on 15 July, 2023 - 21:41

हा छान प्रश्न आहे. BigBang theory नुसार सारे मूलभूत अणू (विशेषतः हायड्रोजन आणि हेलियम) विश्व निर्मिती नंतर लगेचच तयार झाले (fermions पासून) आणि मग या अणूंपासून तारे आणि सुपरनोव्हा यांमधून बाकीच्या मूलद्रव्यांचे अणू तयार झाले. यांना स्वतःचा असा लाईफस्पॅन नाही. असा एकच अणू विश्वाच्या पोकळीत स्वतंत्र असेल त्यावर कोणतीही ऊर्जा वा किरण इत्यादी कार्य करत नसेल तर तो विश्वाच्या अंतापर्यंत तसाच राहील. काळाचा त्यावर काहीच परिणाम होणार नाही.

यात सुध्दा रेडिओऍक्टिव्ह अणू हा अपवाद आहे. त्याचे मात्र स्वतःहून विघटन होत होत अन्य मूलद्रव्याच्या अणूत रूपांतर होत होत अखेर तो सुद्धा एखादा स्थिर अणू बनतो. याला सुद्धा बराच काळ लागतो (काही अणूंसाठी तर अब्जावधी वर्षे इत्यादी).

पण इतर सामान्य (नॉन-रेडिओऍक्टिव्ह) अणूंच्या बाबत: गुरुत्वाकर्षण मुळे अन्य खगोलात (मुखत्वे ताऱ्यांत) अणू खेचला गेला तर प्रचंड गुरुत्वाकर्षण आणि तापमान यामुळे तिथे त्याचा दोन प्रकारे अंत होऊ शकतो:

1. Fusion: इतर अणूसोबत fusion होऊन वेगळा अणू तयार होणे. जसे की सूर्यामध्ये व अन्य ताऱ्यांमध्ये हायड्रोजन अणू एकत्र येऊन हेलियम बनतो. तारा जर अतिप्रचंड असेल तर अखेर सुपरनोव्हा स्फोट होऊन त्यांनंतर अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण मध्ये दबले जाऊन काही अणूंपासून इतर जड अणू तयार होतात. पृथ्वीवर सापडणाऱ्या अनेक मूलद्रव्यांचे अणू (उदा. लोखंङ, तांबे, सोने, चांदी आदी) हे अशाच एखाद्या सुपरनोव्हा मध्ये बनले असावेत असे मानले जाते (कारण, साध्या ताऱ्यात इतके गुरुत्वाकर्षण नसते)

2. Fission: अतीप्रचंड तारा जेव्हा सुपरनोव्हा होतो तेंव्हा त्यामध्ये जसे fusion होते तसेच fission सुद्धा होते. म्हणजे काही जड अणूंचे विघटन होते. हीच क्रिया अनेकदा neutron stars मध्ये सुद्धा होते. Neutron star म्हणजे सूर्याहूनही मोठा तारा आकसून एखाद्या शहराएव्हढा होतो. तिथे अणू इतके दाबले जातात की अणूंची केंद्रे एकमेकांच्या संपर्कात येतात. uranium-235 व इतर अनेक प्रकारच्या अणूंचे इथे विघटन होत असते. याच न्यूट्रॉन ताऱ्यांचे पुढे Gamma-ray bursts मध्ये रूपांतर होते. तिथे तर Fission चा सगळा धुमाकूळच असतो Lol

(तसे ढोबळ मानाने उत्तर आहे. काही छोट्यामोठ्या चूका असू शकतात. म्हणून चुभूदेघे)

काहिच नसल्या पासून इतके मोठे विश्व बनले असेल तर हा निसर्ग च सर्वात मोठा जादूगार आहे.
माणसाला नाही असली जादू अजून करायला जमली.
काही लोकांच्या मते काहीच नव्हते हे खरे नाही .ते फक्त आपली बाकी सर्व गणिती सूत्र जुळावी म्हणून तसे ग्राह्य धरले जाते.
काहिच नव्हते ह्याला काही ही पुरावा नाही.
विश्वाचे बीज होते.एका बिंदूत खूप मोठी energy साठवून ठेवलेली होती आणि त्याचा स्फोट झाला म्हणजे बिंग बँग.
वडाच्या झाडाची बी किती लहान असते .
पण त्याच बी पासून इतका मोठा वट वृक्ष तयार होतो.
तसेच विश्वाचे बीज एका बिंदूत सामावलेले होते.

गावातल्या घाण्यावर जाऊन एका महीलेने तेलाची ऑर्डर दिली. टरफले काढून तेल काढा असे सांगितले. भुईमूगाच्या शेंगा तुमच्याकडच्याच वापरा असे सांगितले. मालकाकडे बैल नव्हते. तिने खूपच कळकळीची विनंती केली. त्यामुळे मालकाने स्वतःच पंधरा दिवस घाण्याला जुंपून तेल काढले. पंधरा दिवसांनी तो तेल घेऊन त्या महिलेकडे गेला. तर ती महिला म्हणाली...

"माफ करा, पण डॉक्टरांनी सांगितलेय कि सध्या शेंगदाणा तेलापासून दूरच रहा. तुमच्या प्रकृतीला ते झेपणार नाही. नाईलाज आहे हो. हे तेल मी घेऊ शकत नाही".

या कथेचा आणि अवघड पेपरचा आपसात काहीही संबंध नाही. असंबद्ध आहे. Proud

आपण निर्जीव समजत असलो आपल्या व्याख्ये नुसार तरी विश्वातील प्रतेक वस्तू मध्ये काहीतरी हालचाल चालू असते...
इलेक्शन फिरत असतात .
त्यांना निर्जीव समजनेच चूक आहे.

प्रतेक ग्रहाच्या पोटात काही ना काही हालचाली चालू असतात.
अनेक बल ह्या विश्वात कार्य करत असतात.
आपल्या ला फक्त काहीच बल माहीत आहेत.
बाकी किती तर अजून माहीत नाहीत.

@अतुल
रसायनिक प्रक्रियेतून अणूचे रूप बदलते त्याला काय म्हणायचे जसे शुद्ध लोखंड कालांतराने गंजते.

फुग्यावर बसलेल्या माशीसाठी फुगा द्वीमिती आहे.two dimentional. तो फुगा त्रिमिती मध्ये फुगतो. तद्वत आपले त्रिमिती विश्व हे चौथ्या मिती मध्ये प्रसरण पावत आहे.

>> एखादा संदर्भ बिंदु घेतल्या खेरीज अवकाशात दिशेला अर्थ नाही, ठरवता येणार नाही.

होय. पूर्व कुठे, पश्चिम कुठे, दक्षिण कुठे, उत्तर कुठे इतकेच काय वर आणि काय खाली हे सगळे आपणच ठरवायचे. पृथ्वीवर निदान दिशेसाठी सूर्य तरी आहे, खाली आणि वर साठी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आहे. अवकाशात मात्र "मी म्हणेल ती पूर्व" करण्याची छान सोय आहे Lol तशा दृष्टीने विचार करता आपण अवकाशात असू, विशेषतः सूर्यापासूम दूर दूर, तर दिशा ठरवणे अवघडच आहे हे सत्य!

परंतु, विविध देशांच्या अवकाशयानांचे स्थान आणि दिशा निश्चित समजावी आणि NASA सहीत जगभरातील सर्व स्पेस एजन्सीजना त्या संदर्भात एकमेकांशी संवाद साधता यावा म्हणून सर्वानुमते Celestial Reference Frame (ICRF) नावाचे एक दिशा convention अस्तित्वात आणले गेले. बिलियन्स प्रकाशवर्षं दूर असणाऱ्या जवळपास तीस ते बत्तीस क्वासार्स (अतिशय तेजस्वी ऑब्जेक्ट्स) चा संदर्भ घेऊन हे convention तयार केले आहे, ज्यात अजूनही नविम क्वासर्स ची भर घालून वरचेवर अद्ययावत केले जाते. ICRF साठी सूर्य हाच मध्यभागी समजला गेला आहे. म्हणजे सूर्य आणि हे क्वासर्स यांच्या आधारे अवकाशात दिशा निश्चित केल्या गेल्यात.

<< रसायनिक प्रक्रियेतून अणूचे रूप बदलते त्याला काय म्हणायचे जसे शुद्ध लोखंड कालांतराने गंजते. >>

--------
हवेत आर्द्रता आहे, ऑक्सिजन आहे. लोहाचे (आयरन, फेरस Fe) ऑक्सिडेशन होते आणि Fe(x)O(y) तयार होते. आपण त्याला गंजणे म्हणतो.

सफर चंद चिरल्यावर स्वच्छ दिसते, काही काळानंतर त्याच्या पृष्ठभागावर रस्टी ( नारंगी तपकिरी- रस्टी ) रंग येतो. हे सफरचंदात असणार्‍या Fe चे ऑक्सिडेशन Fe(x)O(y) मुळे. चिरलेले सफरचंद जेव्हढा जास्त वेळ उघड्यावर राहिल तेव्हढा गडद रंग ( ऑक्सिडेशन जास्त) असतो.

Fe3O4, Fe2O3, FeO ला थोडे जनरल Fe(x)O(y) असे सोपे केले.

लोखंड शुद्ध नसले तरी चालते, Fe जिथे असेल तिथे त्याला O शोधून काढतो. Happy

>> रसायनिक प्रक्रियेतून अणूचे रूप बदलते

This is indeed a good point. हे मनात आले होते. पण इथे अणूंचे आयुष्य संपते म्हणता येणार नाही. कारण इथे दोन वा अधिक अणू एकत्र येवून त्यापासून संयुग तयार होते. जसे मिठामध्ये सोडियम आणि क्लोरीन यांच्या अणूंचे ना fusion होते ना fission. त्या दोन्हींचे अस्तित्व असतेच. नाही का?

<< ICRF साठी सूर्य हाच मध्यभागी समजला गेला आहे. >>

----- आपल्या मिल्की गॅलेक्सी ची व्याप्ती १००,००० प्रकाश वर्ष आहे आणि त्यामधे अनेक सूर्य (१०० अब्ज) आहेत पैकी कुठला ?
अशा अनेक गॅलेक्सी ( अब्जावधी) आहेत.

छान चर्चा सुरु आहे. थँक्स अतुल. आणि सर्वांचे.

<< This is indeed a good point. हे मनात आले होते. पण इथे अणूंचे आयुष्य संपते म्हणता येणार नाही. कारण इथे दोन वा अधिक अणू एकत्र येवून त्यापासून संयुग तयार होते. जसे मिठामध्ये सोडियम आणि क्लोरीन यांच्या अणूंचे ना fusion होते ना fission. त्या दोन्हींचे अस्तित्व असतेच. नाही का? >>

----- थोडे अवकाशातून बाहेर पडतो.

Atom, अणू - म्हणजे न्युट्रल.
त्याच्यामधून एक electron काढला / जोडला तर अणू हा अणू रहात नाही, मग त्याला आयन म्हणायचे. आयन हे कुठल्याही अर्थाने तटस्थ नसते Happy .

कधी Electron कायमचा दिला जातो (Na+) घेतला जातो (Cl-) (ionic bond) NaCl तर कधी एकमेकांना सहाय्य करुन वाटून घेतला जातो ( covalent bond) H2, O2, Cl2.

आता पुन्हा अवकाशांत चला.

>> त्याच्यामधून एक electron काढला / जोडला तर अणू हा अणू रहात नाही, मग त्याला आयन म्हणायचे.

सहमत आहे. ही खरंतर boundary condition आहे. म्हणूनच मी हा मुद्दा सुचूनही उत्तरात घेतला नाही. कारण अणूच्या मृत्यूची व्याख्या कशी करावी त्यावर हे अवलंबून आहे. आयन म्हणजे "जिया बेकरार" झालेला अणू असे असे मला वाटते (त्याचा मृत्यू नव्हे) आणि लग्न म्हणजे संयुग Lol

जेव्हा बिग bang स्फोट झाला तेव्हा मटेरियल वेगळे असणार.
आताचे धातू,दगड,वायू, इत्यादी काही नसणार.
Stepwise he सर्व मटेरियल बनले असणार,त्या नंतर तारे ,ग्रह,ब्लॅक होल बनले असणार.
आणि त्या नंतर physics चे नियम लागू झाले असणार.

खूप स्टेप स्टेप नी ही विश्व बनले असणार.
प्रतेक गलेक्सी च्या मध्य भागी खूप विशाल ब्लॅक होल आहे.
तारे कोसळतात तेव्हा ब्लॅक होल बनतात.
पण तारे तसे galaxy मध्येच बनतात.
मग galaxy अगोदर,की तारे अगोदर,की ब्लॅक होल अगोदर.
असे नवीन प्रश्न उभे राहतात.

<< आणि त्या नंतर physics चे नियम लागू झाले असणार. >>

------- Physics लहान वाटते... आपण विज्ञान म्हणू या.
निसर्गाचे नियम अगोदर ( कुठली बँग... का विश्वाच्या निर्मीती आधी) पासून अस्तित्वात होते / आहेत. आपण फक्त त्यांची उकल करत जात आहोत, नियम उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत.

सर आयझॅक न्यूटन ने शोधायच्या आधी पासून निसर्ग नियमाप्रमाणे सफरचंद झाडापासून जमिनीवर पडतच होते. त्याचे निरीक्षण जोरदार होते, त्याला समजले, त्याने आपल्याला सांगितले. आता आपण तो नियम इतरांना सांगत आहोत.

तुम्ही (?) नासाबद्दल मत नोंदवले होते, ते अगदी खरे आहे, आपले निसर्गाबद्दलचे ज्ञान १ % पण नसेल...

प्रकाश पर्टिकल आणि तरंग ह्या दोन्ही स्वरूपात असतो आणि.
Particles आणि तरंग ह्या दोघांची वागणूक वेगळी असते .
अजून किचकट केला ना विषय ह्या नवीन शोधानी.
विश्व विषयी एक सत्य आहे. जितके जास्त ते समजायचं प्रयत्न कराल तितके अजून अज्ञात नवीन पेचात अडकत जाल.
उकल तर काहीच होणार नाही.
आपल्या सामान्य लोकांचे कसे असते.
दोन वर्षात सर्व प्रश्न मिटतील मग फक्त बँकेत पैसे जमा होतील ,balance होतील पगाराचे पूर्ण.
पण ती दोन वर्ष कधीच संपत नाहीत

Pages