भारतीय संस्कृतीस समृद्ध करण्यात संत विचारांचा खूप मोठा हात आहे. अर्थाअर्थी भारतीय संस्कृतीचा संत शिकवण हा आत्मा आहे. आज भारत जो काही सहिष्णू आणि महान म्हणून ओळखला जातो याचा पाया या महान संत परंपरेनेच रचलाय मग आणि आता सकारात्मक विचार हा त्याचा कळस होऊ पाहत आहे.
आज आषाढी एकादशी निमित्त या संत शिकवणीचा गाभा उकलण्याचा हा छोटासा प्रयत्न जाणीवपूर्वक होईल की हा सोहळा का, कश्या साठी, संतांनी काय दिलं?
माणसाला त्याच्या खऱ्या माणूसपणाची ओळख संत करून देतात. त्याच संपूर्ण व्यक्तिमत्व खुलवण्याचा, परिपक्व करण्याचा सोप्पा मार्ग या संत कार्यात आहे. माणसाच्या आयुष्याचा खरा उद्धार खरी किंमत जर कुठून होत असेल तर ते संत विद्यापीठ आहे आणि ते सुद्धा विनामूल्य. संपूर्ण सृष्टीला समृद्ध जीवनशैली देणारी एकच ताकद आहे ती म्हणजे संतज्ञान
मनुष्याच व्यक्तिमत्व बाहेरून ब्रॅण्डेड, महाग वस्तूने सजवता येतं पण ते अनेकदा पारिधान करणाऱ्या व्यक्तीला माहीत असतं की हे सारं पोकळ आहे. पण संतविचार अंतरंग सजवतात, ते सजवण्यासाठी त्याच्या अंतर्गर्भापर्यंत पोचणारे स्वर निर्माण करतात. संत भक्तीच कौतुक अथवा वैभव हेच आहे की ते सदैव सकारात्मकता देत राहत, मग ती कोणतीही आर्थिक, शारीरिक, मानसिक सामाजिक अवस्था असो वा वेदना.. संत शिकवण त्यावर मलम होऊ पाहतात. आयुष्याच्या वरचढ असणाऱ्या कालावधीत किंवा कठीण प्रसंगात मनुष्याला श्रीमंत करणारी, ताजीतवाने ठेवणारी एकच मात्रा संतवाणी. ती कायम असते आणि राहील.
आपल्या भाषेत अधिक डिगऱ्या म्हणजे सुशिक्षित, ज्ञानी माणूस, पण ही फसवणूक करणारी मतं अनेक प्रसंगातच गटांगल्या खाताना दिसतात, , ह्या दिशाभूल करणार्या विचारांच खंडन अनेकदा आपणच आपल करतो. कारण अनेकांचा जीव वाचवनारा डॉक्टरच आत्महत्या करतो, तर एखादा इंजिनिअर गाडीखाली स्वतःस संपवतो, शोधातून माणसाचं आयुष्य गतिमान करणारा सुखी करणारा सायंटिस्ट स्वतःच आयुष्य नको त्या द्रव्याचे सेवन करून थांबा घेतो पण संतभक्ती करणारा किंवा संत शिकवणीला समर्पित असणारा कधीच आपल्याला या भूमिकेत दिसला नसेल आणि दिसणार नाही त्याचं कारण असं आहे संत शिकवण ही स्थावर अथवा दृषात दिसणाऱ्या वस्तूवर आपलं सुख अवलंबून ठेवत नाही.
अधिक श्रीमंत म्हणजे अनेक वस्तूंनी भरून राहणं नाही तर अंरतातल्या शक्तीशी कायम संवादातून भरून राहणं, आतला संवाद तुटला की बाहेरून माणूस सहज तुटतो. तर आत विचारांनी त्या शक्तीला जवळ धरून जो उभा आहे तो प्रत्येक कठीण प्रसंगी जास्त सुखी झालाय. त्याच्याजवळ ही स्थिरता आणून देणारी अमोघ शक्ती म्हणजे हा संत संवाद आहे.
म्हणून सजग संत शिकवणीच्या मार्गाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला या सृष्टीत पर्याय नाही. संत कोणाला भक्ती करून त्याला बुरसटलेल्या नाही ठेवत नाही तर त्याला ती आकाशा एवढा व्यापक बनवतात.
श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, जनाबाई नामदेव, समर्थ रामदास आदी अनेक संत मांदियाळी काहीही दिसणारं न कमावता व्यापक झाले कारण त्यांना व्यापक करणारा अंतर्गर्भातील आकाश मार्ग सापडला, आणि आपल्याला ही तोच मार्ग दाखवून गेले, म्हणून मनुष्य म्हणून जन्माला जरी आलो असलो तरी एक सामान्य प्राणी अथवा जीव म्हणून न मरता "अणू रेणू थोकडा, तु का आकाशाएवढा ह्या प्रश्नाचं उत्तरही ते देऊन गेलेत
माणूस म्हणून छोट्या भावनेतून जगण्यापेक्षा, आकाशाच्या परे असणाऱ्या संतांची शिकवण कार्य घेऊन, संत विचारांनी आपलं व्यक्तिमत्व आकाशा एवढा व्यापक बनवणारा हा आषाढी एकादशीचा सोहळा...
विठ्ठल दर्शन म्हणजे केवळ मूर्ती दर्शन नसून आपल्या अंतरंगात असणाऱ्या त्या शक्तीशी संवाद साधत आपलं आयुष्य सकारात्मकतेने, ज्ञान मिळुन जगणं म्हणजे विठ्ठल दर्शन होय. *ज्ञान, सकारात्मकता, संवाद* ही ताकद, हे सामर्थ्य आपल्या प्रत्येकात आहे आपण केवळ एक अणू रेणू सारखे थोडका जीव नसून तर.... तु का आकाशाएवढा
"अणू रेणू थोकडा, तु का आकाशाएवढा ...
*शब्दांकन:*
कपिल प्रदिप घोलप.
९८८१८५८१८४
चांगला निबंध. लिहिते राहा.
चांगला निबंध. लिहिते राहा.
मला संत ही कन्सेप्ट आवडत नाही. तरी काही संत कवी कवी म्हणून खूप आवडतात.
ज्या एकदम टॅलेंटेड लोकांमध्ये नॅचरली DMT (Dimethyltryptamine) जास्त स्त्रवतो ते लोक असे खूप महान कवी होतात.
त्यामुळे ज्ञानेश्वर माउली, तुकोबाराय समग्र आठवडाभर वाचून DMT ट्रिप मारावी असे मला खूप वाटते. परंतु आमचे सरकार असे करू देत नाही.
परंतु अशा कृत्रिम महान काव्याला ते कितीही युगप्रवर्तक असले तरी त्याला अर्थ नाही. कारण माझा बाप विठ्ठलपंत कुलकर्णी नाही आणि त्याला समाजाने विष प्यायला लावले नाही. किंवा माझ्या कविता समाजाने इंद्रायणीत बुडवून मला संपवण्याचा प्रयत्न केला नाही.
त्या भोगाच्या अभावामुळेच माझ्या शब्दाला काडीचीही धार नाही.
आता तर नवीनच त्रांगडे आहे. तुका पेक्षा सुगम आणि ग्यानबा पेक्षा गहन काव्य AI लिहू शकते. त्यालातर DMT ची ट्रिप मारायचीही गरज नाही.
ते तंत्रज्ञान कौशल्याने वापरून नवीन पैठण धर्म सभा तयार होणार आहेत. त्यांची नावे गुगल मायक्रोसॉफ्ट अशी असतील.
त्यामुळे खऱ्याखुऱ्या हाडा मासाच्या नवीन तुकारामाने किंवा ज्ञानेश्वराने जे क्वांटम कॉम्पुटर ए आय ला देखील शक्य नाही असे धार धार काही लिहावे लागेल.
आजकाल गरिबातला गरीब सुद्धा आपल्या मुलांची नावे तुकाराम आणि ज्ञानेश्वर ठेवत नाहीत. सगळ्यांनाच तक्ष का इक्वाक्षु का संमार्जन का सान्या का साम्या का काव्या का इयान का अयान का विहान का जिया असली मुले हवी असतात. आय व्ही एफ करून जुळी झाली तर अजून मज्जा म्हणजे एकाच दमात सडा-संमार्जन अशी नावे ठेवता येतात. ज्यांनी वयाच्या ३ ऱ्या वर्षी इन्स्ताग्राम वर क्यूट क्यूट बोलून खूप खूप खूप म्हणजे मेनी मिलियन्स view मिळवावेत आणि वर आपली डेटा प्रायव्हसीहि जपावी, क्रिएटिव्हिटीहि वाढवावी अश्या माफक अपेक्षा बाळगणारे खूप संवेदनशील बाप सॉल्ली एकवचनी बाबा खूप आहेत त्यामुळे बहुतेक नवी भावार्थदीपिका क्वांटम कॉम्पुटर ए आय लाच लिहावी लागणार.
मात्र तेव्हा क्वांटम कॉम्पुटर ए आय कृत भावार्थदीपिका वाचल्याने कॅन्सर होतो म्हणून पुन्हा आपले पप्पा मम्मी जी देव्हाऱ्यात ठेवायचे तीच जुनी भावार्थदीपिका च वाचलेली बरी असे या निओ बाबा-आई मंडळींना वाटेल.
किंवा कदाचित खरोखर पुन्हा तुकाराम आणि ज्ञानेश्वर नावे ठेवायची फॅशन येईल. खरोखर कुणालातरी वाटेल, आता क्वांटम कॉम्पुटर ए आय च्या आणि इंस्टाग्राम टिकटॉक सारख्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला अभिमन्यूलाच नवी गीता सांगावी लागेल. किंवा ओझेम्पिक बम/बुटी कंट्रोल करायला काय करावे या विवंचनेत असलेल्या एखाद्या बीजे फ्रेंडली बोटॉक्स lipjob केलेल्या सुंदर ललनेला बम म्हणजेच गांड असे निलाजरी स्वतः ची भाषा शिकवायला तरी काही रचावे लागेल.
एवढं वाचूनही कित्येकांच्या डोक्यात झिणझिण्या उठल्या असतील.
ते काय निओ भावार्थ दीपिका किंवा निओ गाथा वाचणार?
लिहिण्याचा प्रयत्न चांगला आहे
लिहिण्याचा प्रयत्न चांगला आहे.
लेखनावरून आणखी एक हात फिरवायला हवा होता.
तुका आकाशाऐवढा ही ओवी प्रश्नार्थक नाही. तु का? अशी फोड करून काय साधले?
पण तरीही तिसरा आणि सहावा परिच्छेद चांगला आहे.
लिहीत राहावे.