Submitted by भरत. on 28 June, 2023 - 01:47
हिंदी चित्रपटसंगीताचा प्रवास
या धाग्यावरील प्रतिसादांतून प्रेरणा घेऊन त्याबद्दल चर्चा करण्यासाठी धागा.
संगीतकार, गीतकार, गायक, वादक, गाण्याचं टेकिंग, या विषयावरची किंवा संदर्भ आलेली पुस्तके, यु ट्युब चॅनेल्स, ऐकावेत असे रेडियो कार्यक्रम, कोण श्रेष्ठ यावरून हमरीतुमरीवर येणे, कोणावर अन्याय झाला आणि कोणाचे वाजवीपेक्षा जास्त कौतुक झाले, इ.इ.
सुरुवात सुरुवातीपासून म्हणजे पार्श्वगायन सुरू व्हायच्या आधीच्या काळात पडद्यावर दिसणारे लोक स्वतः गाणी म्हणत तेव्हापासून करूया.
सह्याद्रीच्या पाउलखुणा दाखवताना कार्यक्रमाच्या सदोष गुणवत्तेबद्दल एक पाटी दाखवतात, ती इथे लावायची गरज आहे.
हा धागा प्लेबॅक सिंगिंग सुरू व्हायच्या आधीचा काळ आणि प्लेबॅक सुरू झाल्यानंतरचा सिंगिंग स्टार्सचा काळ- कुंदनलाल सैगल, नूरजहाँ , सुरैया इ. पुरता ठेवू.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फा, किमान चार गाणी माहिती
फा, किमान चार गाणी माहिती हवीत
वाटलच हे कोणीतरी लिहेल
धन्यवाद.
ते जी बरीक काढा हो 
इक बंगला बने न्यारा, बाबुल मोरा, तेरी गठरीमें लागा चोर, मन की आखें खोल बाबा
किशोरचं गाणं
लंपन धन्यवाद
फा, किमान चार गाणी माहिती
फा, किमान चार गाणी माहिती हवीत Wink
इक बंगला बने न्यारा, बाबुल मोरा, तेरी गठरीमें लागा चोर, मन की आखें खोल बाबा
>>
येस, हीच चार माहिती आहेत...
हाफ टिकिट मधे चील चील चिल्लाके च्या शेवटी टीसी आल्यावर किशोर एकदम गिअर चेंज करून 'बाबा मन की आंखे खोल' म्हणून पळायला बघतो ते ही आठवलं
तेरी गठरी मे लागा चोर चे धमाल
तेरी गठरी मे लागा चोर चे धमाल विडंबन - और कौन हो सकता है - किशोर चे >> +१ .. मला गवसलेली एक चतुर नार - हा धागा आठवला. त्यातली सगळीच कडवी , मुळातली गाणी माहिती असतील तर, ऐकताना आणखी मजा येते. मला तरी त्या धाग्यात वाचल्यावर कळली होती काही गाणी.
बाबा मन की आंखे खोल >> हे गोलमाल सिनेमातही येतं. उत्पल दत्त तो पोटाचा व्हायब्रेट होणारा पट्टा लावून हे म्हणत असतो.
लाईट संगीत (मराठीत प्रतिशब्द?
लाईट संगीत (मराठीत प्रतिशब्द?) - सुगम संगीत
ऑर्केस्ट्रेशन - वाद्यवृंद
प्ले बॅक (मराठीत प्रतिशब्द?) - पार्श्वगायन/क
त्रिशंकू, सुगम संगीत बरोबर
त्रिशंकू, सुगम संगीत बरोबर वाटतोय पम तो चित्रपट संगीतासाठी वापरला जातो का?
धन्यवाद
ऑर्केस्ट्रेशन - वाद्यवृंद नाही, ऑर्केस्ट्रा ला वाद्यवृंद बरोबर होईन न?
प्लेबॅक- पार्श्व गायन बरोबर. मी आपलं पार्श्व संगीत मनात म्हणून खोडत आले
रच्याकने "हारजीत" मधल्या गाण्यातली गंमत ओळखा बरं का
रच्याकने "हारजीत" मधल्या
रच्याकने "हारजीत" मधल्या गाण्यातली गंमत ओळखा बरं का
>>
४ हार जीत आहेत
Haar Jeet (1940 film), an Indian Hindi-language film directed by Amar Mullick, starring Pahadi Sanyal and Kanan Devi
Haar Jeet (1954 film), an Indian Hindi-language film directed by Jaggi Rampal starring Manorama
Haar Jeet (1972 film), an Indian Hindi-language film directed by C.P. Dixit, starring Anil Dhawan, Rehana Sultan, Radha Saluja and Mehmood
Haar Jeet (1990 film), an Indian Hindi-language film directed by Avtar Bhogal, starring Kabir Bedi
नक्की कुठल्या शी संबंधित गंमत ओळखायची आहे???
मी लिंक दिलीय त्या गाण्यात
मी लिंक दिलीय त्या गाण्यात आहे बघा
>>>"हारजीत" हा १९३९ चा चित्रपट. यातलं गाणं "मस्त पावन शाखाये लहाराये" हे गीत. त्यात सुरुवातीला वाजणारे हे व्हायोलिन ऐका, कोणतं गाणं आठवलं सांगा बरं (२० व्या सेकंदांपासून ऐका)
https://youtu.be/97gqq1v_YKE <<<
अवल, मस्त पोस्ट. आर सी बोराल
अवल, मस्त पोस्ट. आर सी बोराल यांची तुम्ही दिलेल्यातली तीन गाणी ऐकलेली आठवतात. लताचं नव्हतं ऐकलं.
भजनं गाणारे के सी डे अंध आहेत. ते मन्ना डेंचे काका.
दीड मिनिटांचं इन्ट्रो म्युझिक! शंकर जयकिशन यांनीही एवढं दीर्घ इन्ट्रो म्युझिक दिलं नसेल.
मी वाचलं त्यानुसार पार्श्वगायन प्रथम कोणी आणलं याबद्दल अनेक दावे आहेत. सरस्वतीदेवी आणि केशवराव भोळे . यातल्या एकांनी गायकाला सीनमध्ये लपवून अभिनेत्याला फक्त लिप सिंक करायला लावलं ( पडोसनसारखं ) आणि त्याला पार्श्वगायन म्हटलं.
भरत : धन्यवाद.
भरत : धन्यवाद.
>>>भजनं गाणारे के सी डे अंध आहेत. ते मन्ना डेंचे काका.<<< हो बरोबर.
>>>मी वाचलं त्यानुसार पार्श्वगायन प्रथम कोणी आणलं याबद्दल अनेक दावे आहेत.<<< हो असू शकतील. एक मात्र आहे, त्याकाळी या सर्व संगीतकारांमधे हेवेदावे नव्हते
सच्ची अन स्वच्छ मैत्री होती. पण तुम्ही म्हणताय ते खरय, इतर काहींचे श्रेय असू शकते.
कोणतं गाणं आठवलं सांगा बरं
कोणतं गाणं आठवलं सांगा बरं (२० व्या सेकंदांपासून ऐका)
>>
नुसतं मोबाईल व ऐकून नाही क्लिक होत आहे. थोड्या वेळानी हेडफोन वर ऐकतो
ऑर्केस्ट्रेशन = ध्वनिसंयोजन
ऑर्केस्ट्रेशन =
ध्वनिवाद्यसंयोजन चालेल बहुदाधन्यवाद भरत
दीड मिनिटांचं इन्ट्रो म्युझिक
दीड मिनिटांचं इन्ट्रो म्युझिक! शंकर जयकिशन यांनीही एवढं दीर्घ इन्ट्रो म्युझिक दिलं नसेल.
>>
आजा आजा चं किती आहे बघायला हवं. ते पण लांबलचक आहे.
त्याकाळी या सर्व
त्याकाळी या सर्व संगीतकारांमधे हेवेदावे नव्हते Wink सच्ची अन स्वच्छ मैत्री होती.
>>
हो, ते एकमेकांना चाली ऐकवून फीडबॅक घ्यायचे असं पण ऐकलंय
<ऑर्केस्ट्रेशन = ध्वनिसंयोजन
<ऑर्केस्ट्रेशन = ध्वनिसंयोजन चालेल बहुदा-
वाद्यसंयोजन
अवल, मला आंखो ही आंखो मे
अवल, मला आंखो ही आंखो मे इशारा हो गया आठवलं.
--
https://youtu.be/jv4eQQoOS74?t=26
भरत हो हो वाद्यच. करते
भरत हो हो वाद्यच. करते दुरुस्त
मानव : ) शाब्बास. बरोब्बर
मानव
शाब्बास. बरोब्बर गाणं
भरत,
भरत,
तुम्ही धाग्याचं नाव बदललत. आता माझा बोराल यांचा प्रतिसाद मिस फिट होणार इथे. बरं मला एडिट करायची आता संधीपम नाही
पारच विसंगत झाला आता तो प्रतिसाद
अशानं स्वतंत्र धागा काढूनच
अशानं स्वतंत्र धागा काढूनच लिहावं आता

नाही. इथेच राहून दे. त्यांची
नाही. इथेच राहून दे. त्यांची सुरुवात पार्श्वगायन आमच्या आधीपासूनच आहे. वर लिहिलेल्या तरं शेवटचं वाक्य वाचा.
तसंही हे हार्ड आणि फास्ट नाहीए.
आता इथून काढून टाकलेली पोस्ट
आता इथून काढून टाकलेली पोस्ट कदाचित समर्पक होईल.
नाही भरत, इथे मिस फिट. भाग
नाही भरत, इथे मिस फिट. भाग दोनचे नाव बघता तिथे हवं
ऑर या भाग 1 ला सुरवातीचा काळ
ऑर भाग 1 ला सुरवातीचा काळ आणि भाग 2 1940.- 60 असा करावा?
भरत यांना वाईट वाटेल म्हणून
भरत यांना वाईट वाटेल म्हणून तसे केले नाही. नाहीतर पूर्वार्ध, ४० चे स्वातंत्र्यपूर्व दशक, ५० चे सुवर्णयुग, ६० चे मेलडीयस युग. ७० चे कात टाकणारे, ८० चे संघर्ष युग आणि ९० व नंतरचे पुन्हा मेलडी असे धागे एका वेळी सुरू करावे असा विचार होता. ज्याला जिथे लिहायचे तिथे त्याने लिहावे. फक्त दशकाशी संबंधित असावे. लॅपटॉप खराब झाल्याने आता इतक्यात नाही शक्य.
रघू अनुमोदन
रघू अनुमोदन
त्यापेक्षा एकच धागा असू दे.
त्यापेक्षा एकच धागा असू दे. लताची कारकीर्द किमान ६० वर्षांची. तिच्याबद्दल कोणत्या दशकात लिहिणार? संगीतकारही ३० - ३० वर्षे काम करतात.
संगीतकार मदनमोहन यांचे
संगीतकार मदनमोहन यांचे जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांना अभिवादन !
तसेच दोन तीन दिवसांपूर्वी भारताची पहिली गायिका जिच्या गाण्यांची रेकॉर्ड ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडीयाने प्रकाशित केली तिचाही जन्मदिवस होता. त्यांना ग्रामोफोन गर्ल आणि फर्स्ट रेकॉर्डिंग सुपरस्टार ऑफ इंडीया अशा संबोधनाने गौरवले गेले होते.
या गायिकेचे नाव गौहर जान. हे टोपण नाव होते. त्या ब्रिटीश होत्या. मूळचे नाव अँजलिना युवोवाई. पित्याचे नाव रॉबर्ट विलियम . आईचे नाव एडलिना व्हिक्टोरिया. आई कथक नृत्यांगना होत्या आणि गायनही शिकल्या होत्या. आईकडूनच नृत्याचे प्रारंभिक धडे मिळाले. एडलिना १९८३ पासून नवाब वाजिद अलींच्या दरबारात नृत्य पेश करू लागल्या. त्यातून त्यांना उत्तम कमाई व्हायची. इतकी कि कोलकत्या बाहेर एक राजेशाही हवेली त्यांनी २५ हजार रूपयांत विकत घेतली होती. इथेच गौहर जान यांच्या नृत्य आणि गायनाच्या प्रशिक्षणाची सुरूवात झाली.
सुगम संगीताच्या प्रशिक्षणासाठी संगीत गुरू काळे गुरूजी , शास्त्रीय संगीतासाठी पटियाळा घराण्याचे अलिबक्ष महाराज यांची शिकवणी सुरू झाली.
नृत्यासाठी पंडीत बिंदादीन महाराज ( बिरजू माहाराजांच्या आजोबांचे बंधू) यांची नेमणूक केली गेली.
बंगाली कीर्तन शिकण्यासाठी गुरू चरणदास येत. या वातावरणात गौहर जान शायरी करू लागल्या. त्यासाठी त्यांनी हमदम हे नाव वापरले.
१८८७ साली गौहर जान दरभंगाच्या राजदरबारात राज-नर्तकी म्हणून रुजू झाल्या. याच दरम्यान वाराणसी येथील नृत्यालयातीला गुरू त्यांना नृत्याचे धडे देत राहीले.
त्याआधी एक वर्षे म्हणजे १८८६ साली ग्रामोफोन कंपनीने त्यांचे गाणे ऐकून त्यांच्या गाण्याची रेकॉर्ड बनवली.
१९०४ साली त्यांची पहिली मुलाखत गुजराती पारसी थेटरचे कलाकार अमृत केशव नायक यांनी घेतली.
१९१० साली त्यांना मद्रास राज्यातल्या व्हिक्टोरिया पब्लीक हॉलचे निमंत्रण आले. तिथे त्यांनी हिंदी - उर्दू गीतांची पेशकश केली. त्या वेळी मद्रास मधे हिंदी विरोधी वातावरण नव्हते.
१९११ मधे जॉर्ज पंचम यांच्या भारत भेटी दरम्यान त्यांच्या समोर गायन आणि नृत्य पेश करण्यासाठी संधी मिळाली. गौहर जान एव्हढ्या लोकप्रिय होत्या कि या कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांनी अटी व शर्ती घातल्या आणि घसघशीत बिदागीची मागणी केली. त्या वेळच्या सुप्रसिद्ध गायिका जानकीबाई या त्यांना सहाय्यक म्हणून काम करत होत्या.
त्यांच्या प्रसिद्धीची चर्चा, किर्ती ऐकून म्हैसूरचे राजे कृष्णराज वड्डीयाच, चतुर्थ यांनी त्यांना त्यांच्या दरबारात गौहर जान यांची नियुक्ती राज नर्तकी व संगीतकार म्हणून केली. त्यांच्यासाठी रंगमहालाची व्यवस्थाही केली.
गौहर जान यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदी, उर्दू, गुजराती, फारसी, मराठी, अरबी, तमिळ, फ्रेंच आणि इंग्लीश अशा भाषातून ६०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
त्या त्या वेळच्या सर्वात जास्त मानधन घेणार्या गायिका होत्या. त्यांच्या पहिल्या गाण्यासाठी ( तीन मिनिटापेक्षा कमी कालावधी असलेले) त्यांना तीन हजार रूपये मिळाले होते. त्या काळी हे मानधन अव्वाच्या सव्वा होते.
खूप पैसे हाती आल्याने व्हायचे तेच झाले. अफाट खर्च, अंदाधुंद जीवनशैली, अयोग्य व्यक्तीशी लग्न यामुळे त्यांची कारकीर्द लवकरच उतरणीला लागली. १९३० साली ५७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हां त्यांची लोकप्रियता इतकी ओसरली होती कि दोन चार वर्तमानपत्रात चार ओळीची बातमी छापून आली.
बॉलीवूडचे चित्रपट संगीताचे विश्व सुरू होण्याआधीच ग्रामोफोन रेकॉर्ड वर गेलेली गायिका म्हणून त्यांचे नाव सुरूवातीस घ्यावे लागेल.
( सौजन्य : कायप्पा. जालावर कन्फर्म करता येते).
गौहर जानबद्दल हे काहीच माहीत
गौहर जानबद्दल हे काहीच माहीत नव्हतं. मला वाटायचं बालगंधर्वांच्या गोहर कर्नाटकी म्हणजेच गौहर जान.
दुसरा भाग पोस्ट केला आहे.
दुसरा भाग पोस्ट केला आहे.
गौहर जानविषयी सुंदर माहिती
गौहर जानविषयी सुंदर माहिती आचार्य.
Pages