--
डोंगर?? हाहा... टेकडी असेल.
भाऊच्या धक्याला तर समुद्र आहे ना? तिथे कसला डोंगर? काहीही फेकू नकोस.
तू दहावी बारावीला अभ्यासाला जायचास तिथे? म्हणजे टेकडीच असेल? दिव्याखाली अभ्यास करायचा की झाडाखाली?
माझगाव म्हणजे ते हार्बर लाईनला आले ना? किती झोपडपट्टी आहे त्या लाईनला.. तिथे कसले आलेय गार्डन?
काय बोलतोस? कारंजे सुद्धा आहे तिथे? म्हणजे खरेखुरे गार्डन आहे?
काय नाव म्हणालास? जोसेफ बापटिस्टा गार्डन... हाहा.. कधी नावही ऐकले नाही.
आज ट्रेन थांबली होती डॉकयार्ड स्टेशनला तेव्हा पाहिले. वर देवीचे मंदीर आहे ना? ते ही नीट दिसत नव्हते. आणि गार्डन तर कुठे दिसलेच नाही...
बस आता उगाच फेकू नकोस.. म्हणे आमचा माझगावचा डोंगर !
-------
म्हणजे अगदी लहानपणापासून जेव्हा जेव्हा कोणासमोर आमच्या माझगावच्या डोंगराचा आणि तेथील गार्डनचा उल्लेख केला तेव्हा तेव्हा हेच ऐकत आलोय.
दादरकरांना जेवढे शिवाजी पार्क बद्दल अभिमान आणि आपुलकी आहे साधारण त्याच भावना आम्हा माझगावकरांच्या माझगावच्या डोंगराबद्दल आहेत. सकाळचा व्यायाम, संध्याकाळचे फिरणे, रात्रीच अभ्यास, शेकोट्या, चायनीजच्या पार्ट्या आणि मित्रांच्या मेहफिली अश्या बालपणीपासूनच्या कैक आठवणी ज्या जागेशी जोडल्या गेल्या आहेत, तिच्याबद्दल जाणून न घेताच तिची अशी टिंगल उडवली जाणे ईतके अंगवळणी पडले होते की त्याचे कधीच वाईट वाटले नाही.
पण आज मुंबईतल्या उद्यानांबद्दल चित्रवर्णनासह लिहीत आहे तर त्या मालिकेत नैसर्गिक आणि भौगोलिकरीत्या सुंदर असलेल्या आमच्या माझगावच्या डोंगराचा नंबर लागायलाच हवा
१) फर्स्ट लूक
वर निळे आकाश, त्याखाली झाडांनी आच्छादलेली टेकडी, पायथ्याशी लहान मुलांचे खेळायचे गार्डन..
लेखाच्या सुरुवातीला आलेले आरोप खोडून टाकायला हे चित्र पुरेसे आहे.
या फोटोत वर जी टेकडी दिसत आहे ती पाण्याची टाकी आहे, आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी जे गार्डन दिसत आहे ते डोंगरावर आहे.
कसे ते आता तिथवर गेल्यावरच समजेल...
.
२) चला तर मग डोंगर चढायला सुरुवात करूया. मेन गेट पासून आत जायच्या रस्त्याचा फोटो टिपायचा राहिला. पण हा नागमोडी रस्ता लहानपणापासून फार आवडीचा.
.
३) थोडे याच रस्त्याने अजून वर जाऊया...
.
४) तसे पटकन पोहोचतो वर. तरी दमले असल्यास या कट्ट्यावर क्षणभर विश्रांती घेऊ शकता. आम्ही दमलो नसलो तरी या दगडी कट्ट्यावर बसायचा मोह आवरत नाही.
एक वेगळाच फिल येतो ईथे. दुपारच्या वेळी कॉलेजकुमारांचे टोळके ईथे बसलेले आढळते.
.
५) ईथून बसल्याबसल्या खाली नजर टाकली तर गर्द झाडींमध्ये हरवलेला मेनगेटपासून येणारा रस्ता हा असा दिसतो.
.
६) आणि समोर नजर टाकली तर हे असे गार्डन दिसते.
पिसाचा झुकता मनोरा दिसला असेल तर सांगू ईच्छितो की तोच नाही तर जगातली सारी आश्चर्ये ईथे आहेत.
.
७) आम्ही सकाळीच गेलो होतो. नुकतेच उजाडत आहे..
.
८) चला तर मग थोडा आत फेरफटका मारूया. वॉकला येणारी लोकं कडेकडेने जातात. त्यामुळे मधले गार्डन असे छान शांत आणि रिकामे मिळते.
.
९) मुले मात्र सर्वात पहिले स्लाईडस जिथे आहेत तिथेच पळतात. ईथे ओपन जिम सुद्धा असल्याने काही व्यायामपटू ईथे आढळतात.
.
१०) सकाळीच सकाळी मुले फारशी नसल्याने स्लाईडसवर मात्र सन्नाटा असतो. असे आरपार दिसते.
.
११) त्याचाच फायदा उचलत मग असे बागडत खेळता येते आणि पोज देत फोटोही काढता येतात.
.
१२) छे, चुकून राणीबागेचा फोटो या धाग्यावर पडला असे समजू नका. काही जनावरे आमच्या डोंगरावरही आहेत
.
१३) त्यांचीही नुकतीच सकाळ झाल्याने पाणवठ्यावर आले आहेत.
.
१४) झोका घसरगुंडी खेळून मन भरले की भाऊच्या धक्क्याला जाग येताना बघणे हा आवडीचा उद्योग.
.
१५) यांना ईथून काय दिसतेय कल्पना नाही. पण अध्येमध्ये वाढलेली झाडीझुडपे जरा साफ केली जातात. तेव्हा त्या रेलिंगवर बसल्याबसल्या छान नजारा दिसतो.
.
१६) आता थोडे ऊन येऊ लागले.
.
१७) १८) तसे हिरव्या बगीच्यांचे सौंदर्य खुलू लागले
.
.
१९) २०) उन्ह कोवळेच असल्याने आम्हीही त्याचा आनंद लुटत फेरफटका मारू लागलो.
.
.
२१) थोडे वाढले तसे झुडुपांच्या पायवाटेतून चालू लागलो
.
२२) परततानाही हा सावलीचा रस्ता धरला.
.
२३) २४) चला आता जरा संध्याकाळचा नजारा बघूया...
.
.
२५) सकाळ असो वा संध्याकाळ, पोरं सोबत असली की पहिली पावले झोका घसरगुंडीच्या दिशेनेच वळवावीत हे शास्त्र असते.
.
२६) सकाळच्या मानाने ईथे आता गर्दी होती. पण रविवारची संध्याकाळ असूनही हे चित्र असेल तर तुरळकच म्हणायला हवी.
.
२७) २८) पोरांना खेळायला सोडावे आणि आपण आपला एक कट्टा पकडून बसावे.
.
.
२९) मध्येच फोटो काढायचा मोह झाला तेव्हा तेवढे उठावे
.
३०) आता हे आजोबा कोण म्हणता?
तर ते आजोबा नसून अजूबा आहेत..
नाही ओळखले?
.
३१) चला तर मग पुढून बघूया..
.
३२) याला ओपन थिएटर म्हणू शकता. मधोमध एक स्टेज आणि सभोवताली बसायला स्टेप्स.
आम्ही सकाळच्या वेळी ईथे एक डान्सची रील बनवली होती. बघायला कोणीच नसल्याने लाजायचा प्रश्न नव्हता.
.
३३) हे असे रस्ते पुर्ण डोंगराच्या परीघाभोवती पसरले आहेत. कुठलाही पकडा आणि चालायला सुरुवात करा.
.
३४) ३५) संध्याकाळच्या वेळी भाऊच्या धक्क्याचा नजारा असा दिसतो. ईथे कितीही वेळा येऊन बसा, फोटो काढायचा मोह आवरत नाही. पण ईथले सौंदर्य फोटोत कधीच सामावत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच मजा आहे.
.
.
३६) चला आता परतीचा रस्ता धरूया. पण जर या नागमोडी रस्त्याने मन भरले असेल....
.
३७) तर मग या झाडीझुडुपात लपलेल्या खुफिया रस्त्याने उतरूया..
.
३८) त्याचाही एक अनुभव घेतला असेल तर शेजारीच असे आणखी दोन आहेत.
.
३९) आम्ही मात्र आणखी चौथ्या रस्त्याने उतरलो
या वाटांची गंमत म्हणजे हे रस्ते सर्व पब्लिकला ठाऊक नसतात. त्यामुळे ईथे कधीच वर्दळ नसते. मग कुठलीही वेळ असो. त्यामुळे दहावी बारावीला असताना या पायर्यांवर पेपर टाकून अभ्यासाला बसणे ही एक आवडीची जागा होती.
.
४०) अरे हो, गावदेवीचे दर्शन राहिलेच... चल तर मग.
त्यासाठी मेन गेटने आत शिरल्यावर समोरचा नागमोडी रस्ता न धरता हा डावीक्डचा रस्ता पकडावा लागतो.
.
४१) ४२) तोच रस्ता पकडून हळूहळू वर चढूया..
.
.
४३) थोडे आणखी पुढे... जसजसे वर जाऊ तसे डावीकडचे द्रुश्य बघण्यातले मजा वाढत जाते.
.
४४) ईथे हा रस्ता संपल्यावर पुढे जो कॉर्नर दिसतो आहे त्याला सेल्फी पॉईंट म्हणू शकता. कोणी का कोणी ईथे महाबळेश्वरच्या एखाद्या पॉईंटला आल्यासारखे फोटो काढताना आढळतेच.
.
४५) ४६) कारण तिथे उजेड खूप छान असतो आणि बॅक ग्रांऊडला हे असे द्रुश्य दिसते..
.
.
४७) तिथून पुढे हा अखेरचा टप्पा. हा रस्ता तुम्हाला थेट देवीकडे घेऊन जातो.
देवीचा फोटो काढला नाही. कारण ती समोर पसरलेल्या दर्यावर लक्ष ठेवण्यात बिजी असते. तिच्या दर्शनासाठी तुम्हाला तिथेच जावे लागेल.
.......
४८) लेख खरे तर ईथेच संपवायचा होता. पण हा स्पेशल फोटो टाकायचा मोह आवरला नाही.
हा असा डोंगराच्या कडेला सुका पालापाचोळा पसरलेला असतो. थंडीच्या रात्री अभ्यासाला जायचो तेव्हा हाच वापरून कित्येक शेकोट्यांच्या आठवणी रंगल्या आहेत. आणि कैक भूताखेतांचे किस्से आणि अनुभव आले आहेत. त्यांना पुन्हा कधीतरी स्वतंत्र लेखात उजाळा देऊ.
तरी त्या आठवणींवर आधारीत एक कथा पुर्वी ईथे लिहिली होती ती वाचू शकता -
डोंगराला आग लागली - पळा पळा पळा sss (फक्त प्रौढांसाठी)
धन्यवाद,
ऋन्मेष
-------------------
या मालिकेतील ईतर लेख
निसर्ग उद्यान - Hidden Gem of नवी मुंबई (फोटोंसह)
ती, मी आणि मुंबईची खादाडी ! (मरीन ड्राईव्ह) - फोटोसह
प्रियदर्शिनी पार्क - मुंबईच्या समुद्रकिनारी लपलेली एक सुंदर जागा - (फोटोंसह)
हरीश महिंद्रा चिल्ड्रन पार्क - (फोटोसह)
अंडर वॉटर क्रोकोडाईल पार्क @ राणीबाग - (विडिओसह)
राणीबागेचा राजा - (फोटो आणि विडिओसह)
-------------------
वाचा, प्रतिसाद द्या, आणि धागे वर काढा.
धन्यवाद,
आभारी आहे,
ऋन्मेष
पराग, सामो, धन्यवाद
पराग, सामो, धन्यवाद
मॉर्निंग वॉल्क..
Sunday मॉर्निंग वॉल्क ..
पण लेकीला चालायचा कंटाळा आल्याने ती आपला टॅब घेऊन एका झोपाळ्यावर बसली आणि मी एकटाच डोंगराला प्रदक्षिणा घालत होतो. त्यामुळे निवांतपणे काही वेगळे अँगल टिपता आले
.
.
.
. . .
.
.
.
. . .
.
.
.
. . .
.
.
.
. .
.
.
Pages