Renewal of Driving license

Submitted by कनू on 9 June, 2023 - 04:46

Hello friends,
I have driving license snart card from RTO Pune which is about to expire.
To renew it, I have filled online form on Parivahan Sewa site, uploaded old DL and address proof, done payment.
It is in status as 'application is under processing at RTO level.' since 15 days.
do I need to visit the RTO Pune office? Agent is asking thrice the amount that I paid online.

Thanks in advance.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो, तुम्ही भरलेल्या online

हो, तुम्ही भरलेल्या online application ची प्रिंट आणि २५० रुपयांच्या आसपास फी भरली असेल (नक्की रक्कम लक्षात नाही) त्याच्या payment receipt ची पावती घेऊन RTO मध्ये जावे लागेल. सोबत तुमचा जुना वाहन चालक परवाना (लायसन्स) त्या अर्जाला जोडावा लागेल. (स्मार्ट कार्ड असेल तर एखाद्या प्लास्टिक पाऊचमध्ये घालून अर्जाला स्टेपल करा, जुने booklet लायसन्स ज्यांचे असते त्यांनी थेट स्टेपल केले तरी चालते.) RTO जुना परवाना जमा करून घेते आणि मगच नवीन परवाना (लायसन्स) देते. दरम्यानच्या काळात तुम्ही पावतीवर गाडी चालवू शकता किंवा मोबाईलमध्ये m-parivahan app download करून त्यात virtual DL download करून ते वापरू शकता. नवीन लायसन्स स्पीड पोस्टने तुमच्या घरी येईल.
अधिक माहितीसाठी YouTube वर अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत, ते पहा.

त्या सर्व ऑनलाईन application च्या Hard copies RTO कार्यालयात जमा कराव्या लागतात..
जो पर्यंत तुम्ही जमा करणार नाही तोपर्यंत स्टेटस बदलणार नाही.

प्रिन्ट घेऊन जावे लागते. ओनलाइन करुनच जावे लागते.

वेळ नसेल तर एजेंट गाठा. तिप्पट पैशात काम होइल.

मला हौस व वेळ दोन्ही होता म्हणुन मी याआधी दोन वेळा नुतनीकरण स्वतःच केलेले आहे. सकाळी लवकर १० पर्यंत गेलो तर दुपारी तिनपर्यंत वेगवेगळ्या खिडक्यांवरची नाचानाची आटोपुन आपण निवांत घरी जाऊ शकतो. शेवटची पायरी म्हणजे मोठ्या साहेबांची सही आपण स्वतः जाऊन घ्यावी लागते. आपले सगळे कागदपत्र व्यवस्थीत असणे, वेगवेगळ्या खिडक्या आपला नंबर येतो तेव्हा उघड्या मिळणे आणि शेवटी साहेब केबिनमध्ये असणे हे सगळे योग जुळुन येणे खायचे काम नाही. माझे नशिब दोन्ही वेळा जोरदार होते. पहिल्या वेळेस एका फेरीत काम झाले, दुसर्‍या वेळेस दोन फेर्‍या माराव्या लागल्या.

माझा वाशी आरटिओचा अनुभव आहे. माणसे चांगली आहेत.

पुणे आरटीओ मध्ये कागदपत्रे घेऊन गेल्यावर १० मिनिटात काम झाले. १ महिन्याने घरी लायसेन्स आला. एजंट ची गरज नाही

एजंट ची गरज नाही +१११११११
नकाच जाऊ एजंटकडे.

माझ्या गाडीचे hypothecation removal (फायनान्सरचे नाव कमी करणे) हे काम सुद्धा मी एजंटशिवाय स्वतः केले. DL renewal तर तुलनेने खूप सोपे आहे.

माझा वाशी आरटिओचा अनुभव आहे. माणसे चांगली आहेत.>>>>
same here at Mumbai (West) means Andheri (MH02) RTO!

मागच्या वर्षी लायरन्स online renew केले. ( पिंपरी चिंचवड ) ३० दिवसानी स्टेटस बदलले. ५० दिवसानी स्पिड पोस्ट ने घरी आले. मधल्या काळात काही केले नाही. पोलिसानी पकडले असते तर लॉग इन होऊन स्टेटस दाखवले असते पण तशी वेळ आली नाही. थोडा वेळ थांबा.

ह्या कामासाठी एजंटची गरज नाही. तो काही करु शकत नाही.

माझे booklet form मधील ड्रायव्हिंग लायसन्स मुंबईत काढले होते. ते पुण्यातील rto मध्ये रिन्यू करता येईल का?

माझे booklet form मधील ड्रायव्हिंग लायसन्स मुंबईत काढले होते. ते पुण्यातील rto मध्ये रिन्यू करता येईल का? >>> एका अटीवर करता येऊ शकतं. जर तुम्ही मुंबईहून पुण्याला स्थायिक झाले असल्यास, नवीन पत्त्यासह मुंबईच्या RTO ला अर्ज द्यावा लागेलं आणि त्यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. ते आणि सगळी कागदपत्र घेऊन पुण्याच्या RTO ला जावे लागेल. माझेही भंडारा (महाराष्ट्रातील (पूर्व विदर्भातील) एक जिल्हा आहे) येथून काढलेले booklet form मधील ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही कायमचे नागपूरला स्थायिक झाल्यावर स्मार्ट कार्डच्या स्वरूपात रिन्यू केले होते.

लायसन्स कुठल्याही आर टी ओ ऑफिस मधुन रिन्यु करता येतं का ??? >>> तुमचा पत्ता बदलला असल्यास जवळच्या आरटीओ कार्यालयातून रीन्यू करता येतो. पण त्यासाठी आधीच्या आरटीओ कार्यालयाने जारी केलेले नाहरकत प्रमाणपत्र जोडावे लागते.

हे तर ड्रायविंग लायसेंसबद्दल झालय. 15 वर्ष जुन्या गाडीच्या रजिस्ट्रेशनचे पुढच्या 5 वर्षांसाठी (20 वर्षापर्यंत) रीन्युअल मुळ आरटीओलाच (जिथून गाडीचे रजिस्ट्रेशन नंबर इश्यू झाले आहे) करावे लागते. मी नुकताच अनुभव घेतलाय. मी 2008 मध्ये दुचाकी घेतली तेव्हा सपूंर्ण नागपूर जिल्ह्याचे एकच आरटीओ कार्यालय होते [MH 31]. आता त्याचे नागपूर शहर असे नामांतरण झाले असून [MH 31] आणि नागपूर ग्रामीण [MH 40] व नागपूर शहर (पूर्व) [MH 49] अशी दोन नवीन आरटीओ कार्यालये सुरू झाली आहेत. त्यात माझे घर नागपूर शहराच्या पूर्व भागात असून आमच्या भागासाठी नवीन झालेले आरटीओ कार्यालय [MH 49] अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. दरम्यान ह्या वर्षी माझ्या दुचाकीला 15 वर्ष पुर्ण झाल्याने मी पुढच्या 5 वर्षांसाठी रजिस्ट्रेशन रीन्यूअल करायला घराजवळच्या आरटीओ कार्यालयाला गेलो. मात्र त्यांनी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर ज्या आरटीओनी इश्यू केला आहे तिकडूनच रीन्यूअल होईल असे सांगून माझा अर्ज स्वीकारला नाही, केवळ अपवादात्मक परिस्थितीतच त्यांना रीन्यूअलचे अधिकार असल्याचे सांगितले.

लायसन्स कुठल्याही आर टी ओ ऑफिस मधुन रिन्यु करता येतं का ??? >>> हो सध्या लायसेंस कुठुनही काढु शकतो , कुठुनही रिन्यु करु शकतो. सगळे ऑनलाईन आहे.

मुलाचे लर्निंग आणि पर्मनंट दोन्ही लायसन्स काढायचे होते. अधार वर मुम्बईचा पत्ता होता आणि आम्ही चिंचवड मध्ये. आधार वरचा पत्ता काही कारणा मुळे बदलत न्हवता (चुक आमचीच होती पण कळायला उशिर झाला) . त्यामुळे आम्ही मुंबईचा आधार वर आम्ही ऑन लाईन फॉर्म भरला त्यात सगळी माहिती आधार वरुन घेतली गेली. फक्त लर्निंग लायसन्स चे ठिकाण ( MH14 - चिंचवड) , ईमेल आणि कुठले लायसन्स (२ आणी ४ व्हिल) ही माहिती दिली की पैसे भरायचे. पैसे भरल्यावर ऑनलाईन टेस्ट द्यायची . टेस्ट पास झाली की लगेच लर्निंग लायसन्स pdf फाईल मिळाली. १५ मिनिटात लायसन्स हातात ते पण रात्री ९ वाजता ! लायसन्स वर नंबर MH 14 ने होता.
एक महिना झाल्यावर फोन वर SMS आला की तुम्ही पर्मनंट लायसन्स घेउ शकता. ४ चाकी गाडीची उपलब्धता बारामतीत असल्याने टेस्ट ड्राईव बारामती मध्ये ऑन लाईन बुक केली. टेस्ट झाल्यावर दोन दिवसात पर्मनंट लायसन्स पोर्टल वर आले (लायसन्स नंबर MH42/xxxxx , बारमती) . फिजिकल लायसन्स १० दिवसानी मुंबईच्या पत्यावर आले.
ह्या पुर्ण प्रोसेस मध्ये एकही डॉकुमेंट किंवा फोटो द्यावा लागला नाही. (फक्त टेस्ट ड्राईव च्या वेळी ईन्सुरन्स किंवा PUC ची softcopy दाखवावी लागली) लायसन्स वर फोटो पण आधार कार्ड्वरुन घेतला होता.

ही दोन्ही कामे स्वतः पण करु शकता किंवा एजंट ला देउ शकता
लर्निंग एजंटला दिल्यास तो ड्युअल स्क्रीन वापरुन दुसर्या स्र्कीन वरुन परिक्षा देतो. पण त्यात पण एक catch आहे. RTO software मध्ये artifical intelligence आहे. जर बुबुळ/मान निट नाही फिरली तर टेस्ट फेल होते आणि परत टेस्ट RTO office chya computer वर द्यावी लागते. चांगला एजंट आपली मान डोळे कसे फिरवायचे त्याचे ट्रेनिंग देतात.
टेस्ट ड्राईव च्या वेळी एजंट असल्यास तो गाडी देउ शकतो किंवा आपलीच गाडी वापरणार असेल तर आपल्या गाडीचे ईन्सुरन्स किंवा PUC नसेल तरी चालते.