वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.....

Submitted by ASHOK BHEKE on 8 June, 2023 - 11:39

वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.....

सध्या बायकोचा वाढदिवस असला की नेटकरी, फेसबूक वरचे सुजाण सभासद बायकोचा फोटो टाकीत त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको... असे लिहितात. वाचणारे देखील तेच वाचतात जे लिहिले आहे. नवर्‍याच्या शुभेच्छात भिजला प्रेमाचा स्वर.. नवरा पोरांच्या चक्री पाळण्यात बसून पिपाणी वाजवत असल्यागत बायकोवर किती माया आहे दाखवितोय. वाचणार्‍याचे मन हले वार्‍यावर. खरं सांगा कसं वाटतं तुम्हांला. मला तर योग्य वाटत नाही. जे टाकतात त्यांनी एकदा मनाला विचारून पाहावे. बायकोला नांव आहे. त्यापूढे हवी ती विशेषणं वापरुन तिच्या नावाने शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको...हा मेसेज आई देखील वाचते. बापही वाचतो. दीर वाचतो. नणंद आणि घरातील कर्ती सवरती ज्येष्ठ श्रेष्ठ घनिष्ठ मित्र देखील वाचतात. हवं तर त्यांना देखील विचारा. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको... बरोबर आहे का ? त्यांनी हो म्हटले तर मग खुशाल टाका. काही हरकत नाही. बायको पेक्षा सहचारिणी म्हटले असते किंवा अर्धागिनी म्हटले तर चालले असते. झर्‍यातले पाणी खळखळून हसले असते. फुले हसू लागली असती तर नवल नाही. तरु नृत्य करू लागली असती ती आनंदाने. कारण त्या शब्दात अर्थ आहे. नवरा बायकोला प्रेमाने सहचरिणी किंवा अर्धागिनी म्हणत असल्याने दोघेही समान पातळीवर नांदत असल्याचा संदेश समाजात जात असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा या संदेशाने मैत्रीचे बळ दिसून आले आहेत.
हा विषय लिहिण्याचे कारण आमच्या एका परीचीत मित्राने इंस्टाग्रामवर Happy Birthday Darling लिहून बायकोचा फोटो एडिट करून टाकला. त्याला त्यात वावगे काहीच वाटले नाही. पण कोणीतरी त्यांच्या वडिलांना मुलाचे कर्तुत्व चारचौघात सांगितले. ऐकून मात्र म्हातारा इतका थरथरला की, घरी जाऊन आपल्या विवाहित दिवट्याला इतका हाणला की, नको ते प्रसारमाध्यम, मुलाला समज आली. तुला डार्लिंग काय म्हणायचे ते घरात बोलना... पेपरात प्रसिध्दी कशाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको... हा मेसेज टाकणारास धूर्त म्हणायचं की मूर्ख. ज्ञानी म्हणावे की अज्ञानी. अबोल म्हणावं की नळ गळल्यासारखे टपटप काहीतरी मेसेज टाकत असतात. मेसेज टाकून अशी खुलतात की त्यांना लाइक करणारी अघळपघळ जमात उगीचच आपली बुध्दी पाजळतात. स्पष्ट सांगायला हवे. तू बोलला बायको, आम्ही कसे वाचायचे रे बायको. नवरा बोले, दल हाले... लाइक मिळतेच.
आपल्या घरी आलेल्या दुसर्‍या घरच्या लेकी लक्ष्मीच्या पावलाने येतात. रस्त्यावरच्या नसतात. त्यांची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. संसाराचे व्रत स्विकारलेल्या या लक्ष्मीला इतका सन्मान द्या की वाचणारे सुध्दा गर्भगळीत झाले पाहिजेत. लोकांच्या मनातलं कोसळणार्‍या धबधब्यासारखं लिहिलंय. अनेकांना वाईट वाटेल किंवा चांगलेही. मेसेज वाचून बायको हुरळून जात असेल. आनंदाचे फवारे उडत असतील. पण नवरा टाकतोय म्हणून रणरागिनी यांनी नवर्‍याला आवर घालायला पाहिजे. त्यांच्या अज्ञानाला बाहेर काढले पाहिजे. समाजात त्यांचे हास्य होते आहे. हे बायकोने नवर्‍याला सांगितले तर नक्कीच बदल घडेल. बायकोच्या अवमानार्थ नवरोबांचा चाललेला खेळ बंद व्हावा म्हणून या दोन ओळींचा प्रपंच.
वाढदिवसाच्या शुभेच्छा या ओळीत आपल्या सहचारिणीचे नांव लिहून किंवा टोपण नावाने हवंतर लिहून आनंद साजरा करा.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@हपा अहो काय कंमेंट लिहिली आहे भयानक, मी इतक्या भसकन हसले जोरात. की कॉल वर असणारा माझा अर्धां गना कॉल अर्ध्यात ठेऊन बघायला आला. त्याला वाटलं वेडी झाली का काय बायको सॉरी अर्धांगिनी

@लेख, कोणी आपल्या जवळच्या माणसांना काय म्हणावं किंवा म्हणू नये हा फार वैयक्तिक प्रश्न आहे ओ. आपण कशाला काय म्हणायचं त्याबद्दल. आणि पब्लिक डिस्प्ले ऑफ अफ्फेकशन (pda )बोलायचं तर कायद्याच्या चौकटीत राहून काय अफ्फेकशन दाखवेनात का ज्यांना आवडत ते लोक. कित्येक लोक ट्रिप, खादाडी,अचिव्हमेंट, मुलांची कौतुक असं काय काय पब्लिक ला डिस्प्ले करतात तसें हे जीव प्रेम डिस्प्ले करतात इतकंच. आणि त्या मित्राच्या लक्ष्मी ला या pda ने गर्भ गळीत सन्मानित झाल्यासारखं वाटलं असेल ना जाणो. तिच्या वाटणीच आपण च गृहीत कशाला धरा की तिला अपमानीत वाटलं असेल.

सगळंच अर्थहीन , तरीही वाचून एवढाच बोध जाहला कि लग्न बंधनात अडकलेल्या एका परिपकव व्यक्तीवर एका वयोवृद्ध व्यक्तीने दुसऱ्यांचे ऐकून हात उगारु नये .

Pages