वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.....
सध्या बायकोचा वाढदिवस असला की नेटकरी, फेसबूक वरचे सुजाण सभासद बायकोचा फोटो टाकीत त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको... असे लिहितात. वाचणारे देखील तेच वाचतात जे लिहिले आहे. नवर्याच्या शुभेच्छात भिजला प्रेमाचा स्वर.. नवरा पोरांच्या चक्री पाळण्यात बसून पिपाणी वाजवत असल्यागत बायकोवर किती माया आहे दाखवितोय. वाचणार्याचे मन हले वार्यावर. खरं सांगा कसं वाटतं तुम्हांला. मला तर योग्य वाटत नाही. जे टाकतात त्यांनी एकदा मनाला विचारून पाहावे. बायकोला नांव आहे. त्यापूढे हवी ती विशेषणं वापरुन तिच्या नावाने शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको...हा मेसेज आई देखील वाचते. बापही वाचतो. दीर वाचतो. नणंद आणि घरातील कर्ती सवरती ज्येष्ठ श्रेष्ठ घनिष्ठ मित्र देखील वाचतात. हवं तर त्यांना देखील विचारा. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको... बरोबर आहे का ? त्यांनी हो म्हटले तर मग खुशाल टाका. काही हरकत नाही. बायको पेक्षा सहचारिणी म्हटले असते किंवा अर्धागिनी म्हटले तर चालले असते. झर्यातले पाणी खळखळून हसले असते. फुले हसू लागली असती तर नवल नाही. तरु नृत्य करू लागली असती ती आनंदाने. कारण त्या शब्दात अर्थ आहे. नवरा बायकोला प्रेमाने सहचरिणी किंवा अर्धागिनी म्हणत असल्याने दोघेही समान पातळीवर नांदत असल्याचा संदेश समाजात जात असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा या संदेशाने मैत्रीचे बळ दिसून आले आहेत.
हा विषय लिहिण्याचे कारण आमच्या एका परीचीत मित्राने इंस्टाग्रामवर Happy Birthday Darling लिहून बायकोचा फोटो एडिट करून टाकला. त्याला त्यात वावगे काहीच वाटले नाही. पण कोणीतरी त्यांच्या वडिलांना मुलाचे कर्तुत्व चारचौघात सांगितले. ऐकून मात्र म्हातारा इतका थरथरला की, घरी जाऊन आपल्या विवाहित दिवट्याला इतका हाणला की, नको ते प्रसारमाध्यम, मुलाला समज आली. तुला डार्लिंग काय म्हणायचे ते घरात बोलना... पेपरात प्रसिध्दी कशाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको... हा मेसेज टाकणारास धूर्त म्हणायचं की मूर्ख. ज्ञानी म्हणावे की अज्ञानी. अबोल म्हणावं की नळ गळल्यासारखे टपटप काहीतरी मेसेज टाकत असतात. मेसेज टाकून अशी खुलतात की त्यांना लाइक करणारी अघळपघळ जमात उगीचच आपली बुध्दी पाजळतात. स्पष्ट सांगायला हवे. तू बोलला बायको, आम्ही कसे वाचायचे रे बायको. नवरा बोले, दल हाले... लाइक मिळतेच.
आपल्या घरी आलेल्या दुसर्या घरच्या लेकी लक्ष्मीच्या पावलाने येतात. रस्त्यावरच्या नसतात. त्यांची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. संसाराचे व्रत स्विकारलेल्या या लक्ष्मीला इतका सन्मान द्या की वाचणारे सुध्दा गर्भगळीत झाले पाहिजेत. लोकांच्या मनातलं कोसळणार्या धबधब्यासारखं लिहिलंय. अनेकांना वाईट वाटेल किंवा चांगलेही. मेसेज वाचून बायको हुरळून जात असेल. आनंदाचे फवारे उडत असतील. पण नवरा टाकतोय म्हणून रणरागिनी यांनी नवर्याला आवर घालायला पाहिजे. त्यांच्या अज्ञानाला बाहेर काढले पाहिजे. समाजात त्यांचे हास्य होते आहे. हे बायकोने नवर्याला सांगितले तर नक्कीच बदल घडेल. बायकोच्या अवमानार्थ नवरोबांचा चाललेला खेळ बंद व्हावा म्हणून या दोन ओळींचा प्रपंच.
वाढदिवसाच्या शुभेच्छा या ओळीत आपल्या सहचारिणीचे नांव लिहून किंवा टोपण नावाने हवंतर लिहून आनंद साजरा करा.
अशोक भेके
लेख वाचल्याची ही पोचपावती.
लेख वाचल्याची ही पोचपावती. बाकी याविषयावर माझे मत शून्य.
लेख वाचला..
लेख वाचला..
खरं सांगा कसं वाटतं तुम्हांला.>>>> योग्य वाटत नाही.
म्हणून या दोन ओळींचा प्रपंच.
म्हणून या दोन ओळींचा प्रपंच. >>>>> दोन ओळी ?
अगदीच निरर्थक आणि त्र्यागा केल्यासारखा लेख वाटला.
BTW, घरात 24 तास बरोबर असणाऱ्या बायकोला, जी FB post टाईप करत असताना सुद्धा बाजुला सोफ्यावर बसलेली असते, तिला सरळ सरळ wish करायचं सोडुन FB पोस्टच्या माध्यमातून का बरं wish करत असतील? मला तो अतीव मुर्खपणा वाटतो.
>> घरात 24 तास बरोबर असणाऱ्या
>> घरात 24 तास बरोबर असणाऱ्या बायकोला, जी FB post टाईप करत असताना सुद्धा बाजुला सोफ्यावर बसलेली असते, तिला सरळ सरळ wish करायचं सोडुन FB पोस्टच्या माध्यमातून का बरं wish करत असतील? मला तो अतीव मुर्खपणा वाटतो.>> अगदी!! सगळाच बावळटपणा.
बाहुली लिहायचं असणार ते चुकून
बाहुली लिहायचं असणार ते चुकून बायको टाईप झालं असणार.
ते काहिका म्हणू देत..
ते काहिका म्हणू देत...आपल्याला कशाला त्यात नाक खुपसायचे... मिया बीबी राझी SS
आणि बायको किंवा darling म्हटलं तर अवमान कसा होतो?
शिवी थोडीच आहे... नातं आहे ते.
Re: वाढदिवसाच्या शुभेच्छा या ओळीत आपल्या सहचारिणीचे नांव लिहून किंवा टोपण नावाने हवं...
हे म्हणजे happy birthday भावा ऐवजी happy birthday भ्राता किंवा happy birthday बंधुराज लिहायला लावल्यासारखे आहे.
काहीच्या काही अपेक्षा.
एका परीचीत मित्राने
एका परीचीत मित्राने इंस्टाग्रामवर Happy Birthday Darling लिहून बायकोचा फोटो एडिट करून टाकला. त्याला त्यात वावगे काहीच वाटले नाही. पण कोणीतरी त्यांच्या वडिलांना मुलाचे कर्तुत्व चारचौघात सांगितले. ऐकून मात्र म्हातारा इतका थरथरला की, घरी जाऊन आपल्या विवाहित दिवट्याला इतका हाणला की, नको ते प्रसारमाध्यम, मुलाला समज आली. तुला डार्लिंग काय म्हणायचे ते घरात बोलना.>>
२०२३ मधे नवर्याने बायकोला डार्लिंग म्हटल्याकरता वडल्यांच्या हातून मार खावा ! आणि त्याबद्दल परक्यांनी पब्लिक फोरमवर चर्चा करावी ? :कपाळबडवती:
डार्लिंग चा भारतीय अर्बन डिक्शनरी मधे काही वेगळाच अर्थ तर नाही ना ?
>> संसाराचे व्रत
>> संसाराचे व्रत स्विकारलेल्या या लक्ष्मीला इतका सन्मान द्या की वाचणारे सुध्दा गर्भगळीत झाले पाहिजेत. लोकांच्या मनातलं कोसळणार्या धबधब्यासारखं लिहिलंय. >> काका, टोटल गर्भगळीत अवस्था! तुम्हाला एक लाईक बनतोच! टाळ्या होऊन जाऊद्या काका!
हा मेसेज आई देखील वाचते.
हा मेसेज आई देखील वाचते. बापही वाचतो. दीर वाचतो. नणंद आणि घरातील कर्ती सवरती ज्येष्ठ श्रेष्ठ घनिष्ठ मित्र देखील वाचतात. हवं तर त्यांना देखील विचारा. >> त्यांना काय वाटायचं आहे? वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, बाबा वगैरे आपण लिहितोच ना, तसंच बायको. जेव्हा आपण नाव न वापरता नात्याचा उल्लेख करतो तेव्हा ते नातं उल्लेख करणाऱ्याचं त्या उल्लेखित व्यक्तीशी असतं एव्हढा कॉमन सेन्स त्या मेसेज वाचणाऱ्या आई बाप दीर नणंद वगैरे लोकांना नसेल का?
अमित, एक लाईक बनतोच
जेव्हा आपण नाव न वापरता
जेव्हा आपण नाव न वापरता नात्याचा उल्लेख करतो तेव्हा ते नातं उल्लेख करणाऱ्याचं त्या उल्लेखित व्यक्तीशी असतं एव्हढा कॉमन सेन्स त्या मेसेज वाचणाऱ्या आई बाप दीर नणंद वगैरे लोकांना नसेल का?>>> +१
मग हॅप्पी बर्थडे आई लिहायला ही विचार करावा लागेल..माझी आई ती सगळ्यांची आई नाही.. अगदी ओढून ताणुन काढलेला मुद्दा आहे.
बाकी----एकतर बेस्ट नवरा, बेस्ट बायको (बेस्ट म्हणजे इतर ऑप्शन्स पैकी सर्वात उत्तम ), बुके, गिफ्ट फोटो वगैरे हे सगळं उगा शो वाटतं, वै. मत. पण जे करतात त्यांची आवड म्हणुन चिल!
खरंच एक लाईक तर बनतोच! लेख
खरंच एक लाईक तर बनतोच! लेख आणि प्रतिक्रियांनी हहपुवा झालेय.
>> संसाराचे व्रत स्विकारलेल्या या लक्ष्मीला इतका सन्मान द्या की वाचणारे सुध्दा गर्भगळीत झाले पाहिजेत. लोकांच्या मनातलं कोसळणार्या धबधब्यासारखं लिहिलंय. >> काका, टोटल गर्भगळीत अवस्था! तुम्हाला एक लाईक बनतोच! टाळ्या होऊन जाऊद्या काका! >>> प्रचंड हहपुवा!
हा मेसेज आई देखील वाचते. बापही वाचतो. दीर वाचतो. नणंद आणि घरातील कर्ती सवरती ज्येष्ठ श्रेष्ठ घनिष्ठ मित्र देखील वाचतात. हवं तर त्यांना देखील विचारा. >> त्यांना काय वाटायचं आहे >>
तिला सरळ सरळ wish करायचं
तिला सरळ सरळ wish करायचं सोडुन FB पोस्टच्या माध्यमातून का बरं wish करत असतील? मला तो अतीव मुर्खपणा वाटतो.>> अगदी!! सगळाच बावळटपणा.
>>>>>
माझ्यामते ते विश करणे नसून आपल्या जोडीदारावरचे प्रेम जाहीरपणे व्यक्त करणे असते.
सगळ्यांना नाही जमत हे.
आणि ज्यांना जमते त्यांच्या जोडीदाराला आवडतच असेल तर हा बावळटपणा जरूर करावा
मला पण जाहिरपणे प्रेम व्यक्त
जाहिरपणे प्रेम व्यक्त करणे दिखावा वाटतो..ज्याच्यासाठी आहे त्याला कळलं कि झालं सगळ्या जगाला प्रदर्शन कशाला..
आपल्या जोडीदाराला काय आवडते
आपल्या जोडीदाराला काय आवडते तसे वागावे
एवढे सिंपल आहे हे
माझ्या नात्यातील एका बाईने
माझ्या नात्यातील एका बाईने तिच्या (३८व्या) वाढदिवसाचे स्टेटस नवऱ्याने WhatsApp ला टाकले नाही म्हणून प्रचंड कांगावा केलेला प्रत्यक्ष बघितला आहे. अगदी आरडा ओरड ते वस्तूंची फेकाफेक.
So.. जावे त्याच्या वंशा... आणि आवड आपली आपली.
आपल्या घरातल्या अगदी जवळच्या
आपल्या घरातल्या अगदी जवळच्या लोकांना आपण घरात आवर्जून शुभेच्छा देतो का ? लव यू म्हणतो का ? अनेक घरात ते अव्यक्त असते. किमान ब्रिटीशकृपेने आपण हॅपी बड्डे टू डिअर अमूक तमूक असे व्यक्त होतो. मग फेसबुकवर शुभेच्छा कुणासाठी हे खटकायला पाहीजे होतं, ते सोडून बायको का लिहीतात हे खटकले हे गंमतीशीर आहे.
त्याची बायको आहे. तो काहीही लिहील. आपल्याला काय करायचे ? त्याने त्याच्या बायकोला शुभेच्छा देताना भैस, हडळ म्हटले तरी आपल्या अंगाला का भोकं पडावीत ? त्याच्या बायकोचं नाव कशाला माहिती व्हायला पाहीजे. नसेल सांगायचं त्याला. त्याची मर्जी. तुम्हाला खटकलं तुमची मर्जी. ज्या अर्थी तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकत नाही त्या अर्थी आपल्या खटकण्यात दम नाही याची खात्री असेल. नाही का ?
लोकांचे काय चुकते हा एक लोकांचा आवडता विषय असतो. मग कुणाचंही काहीही खटकू शकतं. आणि ते ही अगदी मुद्देसूद मांडणीसह .
आता बायकांनी आपल्या नवऱ्याला
आता बायकांनी आपल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हॅपी बर्थडे नवऱ्या! असं लिहावं.
खूप इनोदी आणि मॉडर्न लिहायचं असेल तर हॅपी बर्थ डे बऱ्या अर्ध्या ! असं म्हणावं. तेवढंच त्याला सन्मानही दिल्यासारखं!
लिहितात कि बायका नवरोबा
लिहितात बायका नवरोबा
मेसेज वाचून बायको हुरळून जात
मेसेज वाचून बायको हुरळून जात असेल. आनंदाचे फवारे उडत असतील. << तरीही बाय्को असं न लिहीता तिचे नाव लिहायचे?
Wifey n Hubby
Wifey n Hubby
जग चंद्रावर, काका डोंगरावर
जग चंद्रावर, काका डोंगरावर
बऱ्याच दिवसांनी असा लेख
बऱ्याच दिवसांनी असा लेख माबोवर वाचला. खळखळून हसवल्याबद्दल सर्वांनाच थॅन्क्स!
सगळेच
सगळेच
सर्वांचे मनापासून आभार...
सर्वांचे मनापासून आभार...
सर्वांचे मनापासून आभार...
सर्वांचे मनापासून आभार...
मागे फेसबुकवर एक गृहस्थ , नाव
मागे फेसबुकवर एक गृहस्थ , नाव आठवत नाही - एका स्नेह्यांच्या वतीने त्यांच्या भाडेकरूच्या घरी गेले होते , भाडेकरू बहुधा घर सोडणार होते , त्यापूर्वी घर सुस्थितीत आहे की नाही , हे बघायला गेले होते . त्या घरातली बायको आत बेडरूममध्ये झोपलेली यांना बाहेरून दिसली आणि नंतर पोस्ट लिहिली की कशा हल्लीच्या बायका सकाळी नऊ नऊ वाजेपर्यंत झोपून असतात , अशाने मुलांवर काय संस्कार होणार , आपली संस्कृती , कुटुंबव्यवस्था वगैरेबाबत अपार काळजी त्यांना दाटून आली होती .. त्यावेळी या पोस्टवरून तिथे बराच गोंधळ माजला होता .
दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खूपसणे हा फॅक्टर त्या आणि या घटनेत समान वाटतो . त्यांचं ते बघतील ना . भले प्रदर्शन असेल , दिखावा असेल .. त्या बायकोला काही अडचण नसेल तर तिऱ्हाईताचा संबंध काय !
आणि नवरा बायकोत पडणाऱ्या सासरेबुवांनाच वागण्याचा काही पोच नाही असं वाटलं मला .. याबाबतीत वडलांचा हस्तक्षेप ऐकून घेणारा नवराही शामळू सीताराम वाटला . त्या बायकोच्या जागी जर मी असते तर सासरे बुवांबद्दल कायमची अढी मनात बसली असती , नवऱ्याचा अपमान केला हे एक कारण आणि पतीपत्नीच्या खाजगी जीवनात नाक खुपसलं हे दुसरं कारण .. आणि तुम्ही यात पडायचा संबंध नाही असं स्पष्ट सांगू न शकणारा शामळू नवरा पण किंचित उतरला असता मनातून . एका वयानंतर सासू सासऱ्यांनी मुलांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य देणं ही बेसिक डिसेन्सी आहे . सासरे किंवा सासूकडून या मुलांचं आयुष्य कंट्रोल करण्याचा अतिरेक होणं हेसुद्धा मुलं आणि सून वेगळं घरकूल करून राहण्याचं एक कारण आहे .
बायको पेक्षा सहचारिणी म्हटले
बायको पेक्षा सहचारिणी म्हटले असते किंवा अर्धागिनी म्हटले तर चालले असते. झर्यातले पाणी खळखळून हसले असते. फुले हसू लागली असती तर नवल नाही. तरु नृत्य करू लागली असती ती आनंदाने. कारण त्या शब्दात अर्थ आहे. >>
काका तुम्हाला मानाचा मुजरा. हा लेख म्हणजे माबोवरचा अनमोल ठेवा आहे. झणझणीत अंजन घातलं बघा तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात. ( डोळा शब्द चालेल ना. )
आता बाकीचं चहा प्राशन करून लिहितो.
अर्धागिनी >>
अर्धागिनी >>
बायकोला गिनी वगैरे म्हटले, ते पण अर्धा, तर तिच्या 'माझे हत्येचे प्रयोग' करण्यात माझा गिनीपिग करून टाकेल.
डोळा शब्द चालेल ना >>
डोळा शब्द चालेल ना >>
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
आपला प्रतिसाद लाखमोलाचा
Pages