Submitted by रोहितकुलकर्णी on 30 May, 2023 - 14:21
तू चुकली की मी,हा निव्वळ बनाव होता
मान्य करूया, संवादांचा अभाव होता
माहित आहे, बोलून जातो न रुचणारे
ठाऊक आहे? मौनाशीही लगाव होता?
तुझा मनामधे जी दलदल, तिच्या तळाशी
...एके काळी किती देखणा तलाव होता
आस सोडली, हट्ट सोडला तू असण्याचा
मला असाही तू नसण्याचा सराव होता
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला ठीक वाटली. तिच्या मनात
मला ठीक वाटली. तिच्या मनात आता दलदल आहे असे लिहील्याने उगाचच एक कडवटपणा आला.