'ओव्हररेटेड' - 'अंडररेटेड'

Submitted by सामो on 22 May, 2023 - 13:49

चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा, उत्साही व्यक्तीमत्व, उद्योजकता असे नानाविध गुण असतात, पैकी तुमच्या मते कोणता गुण हा 'ओव्हर रेटेड' आहे आणि कोणता गुण हा 'अंडर रेटेड' आहे. आणि का? तेव्हा एकोळी उत्तर नको. 'का' या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्यावे.

माझ्या मते 'सातत्य' = कन्सिस्टन्सी हा प्रचंड अंडररेटेड गुण आहे. उदा. - मैत्री टिकण्याकरता, अनेक प्रकारच्या गुणांचे खरे तर सातत्य लागते. तुम्ही दुसर्‍या व्यक्तीस सपोर्ट करणे, धीराने म्हणजे पेशंटली त्या व्यक्तीचे गुणावगुण सहन करणे. त्या व्यक्तीला काय हवे ते त्या क्षणी ओळखून त्याप्रमाणे सल्ला देणे किंवा क्रिटिसाइज करणे. या सगळ्यात मुख्य म्हणजे सातत्य हवे. हे सातत्य तेव्हा येते जेव्हा, ते नाते निभावण्याची इच्छा असेल.
जॉबमध्येही, एक प्रॉजेक्ट मारे वेळेच्या आधी डिलीव्हर केले आणि दुसर्‍या प्रॉजेक्टला हयगय झाली तर कौतुक होणच शक्य नाही ना. कौतुक तर सोडाच पण तुमच्यावर कोणी विसंबूनही राहू शकणार नाही.

आता 'ओव्हररेटेड' गुण - मला वाटतं स्वकर्तुत्वावर न मिळालेले, वडिलोपार्जित, जेनेटिकली आलेले गुण हे ओव्हररेटेड. उदा - हुषारी. हां मूळात आपोआप आलेल्या हुषारीला तुम्ही धार लावलीत तर ते कर्तुत्व आहे आणि नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु - वर्ण, जात, जात्याच बुद्धी, पिढ्यान पिढ्या चालत आलेली पारंपारिक कुशलता - या काही गोष्टी मला ओव्हररेटेड वाटतात. अर्थात सर्वांना वाटाव्यात असेही नाही.

ओव्हररेटेड - मराठी शब्द?
अंडररेटेड - मराठी शब्द? (अतिपरिचयात अवज्ञा?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाबळेश्वर आणि लोणावळा दोन्हीकडचे मॅप्रो गार्डन हा अतिशय महागडा आणि ओव्हररेटेड प्रकार झाला आहे.आम्ही ठरवून मॅप्रो गार्डन ला न थांबता पुढे जाऊ पुढच्या वेळी.

अनु मॅप्रोला मोठ्या मोठ्या तुती मिळतात का?
इथे जर्सी सिटीमध्ये तुतीची ७-८ झाडे पाहीलेली आहेत पण लहान लहान असतात त्या.
शिवाय इथे दुकानात ब्लॅक बेरीज मिळतात पण तुती (मलबेरीज) नाही मिळत. मला त्या मोठ्या तुती फार आवडतात.

मोठ्या तुती महाबळेश्वर मुख्य बाजारा मध्ये आणि बाहेर येताना छान मिळतात.मॅप्रो मधल्या स्ट्रॉबेरी पण विशेष वाटल्या नाहीत.

ओव्हररेटेड -- म्हणजे "निरस्त पादपे देशे एरंंडोपी द्रुमायते."
अंडररेटेड -- छ्या. हे काहीच नाही आमच्या कोकणात ना... इत्यादि.

सलमान रश्दी खूप ओव्हररेटेड लेखक आहेत हेमावैम. सतानिक व्हर्सेस मोठ्या अपेक्षेने वाचायला सुरू केले आणि अक्षरशः एक प्रकरण पण पूर्ण करवले नाही असे अगम्य लिखाण आहे. (ह्याचा राजकीय भूमिकेशी काही संबंध नाही. उलट त्यांनी काय स्पायसी लिखाण केले आहे की इतका वादंग होतो आहे बघू म्हणून मोठ्या उत्साहाने ते पुस्तक उचलले होते. याआधी त्यांचे मिडणाईट्स चिल्ड्रेन मोठ्या कष्टाने संपवले होते, ते सुध्दा असेच. काही भाग आवडले पण बरेचसे अगम्य आणि गूढ होते, समजलेच नाही.) पण सलमान रशदिंचे ह्या शतकातला सर्वोत्तम लेखक अश्या पातळी पर्यंत कौतुक बघितले आहे, ते उमगत नाही.

खूप खूप धन्यवाद कॉमी! Lol
मी दोन वेळा पाच-सहा वर्षांच्या अंतराने सटॅनिक व्हर्सेस आणून ते वाचायचा आटोकाट प्रयत्न केला आणि आपल्या बौद्धिक पातळीत काही सुधारणा होत नाही मनाशी म्हणून पुस्तक परत करुन टाकले. मिडनाईट चिल्ड्रेन काही ओळखीचे संदर्भ मिळत गेल्याने बर्‍यापैकी वाचलं गेलेलं.
मला तर काही सटॅनिक व्हर्सेस झेपलं न्हवतं. झेपलं न्हवतं म्हणायला वाचायला लागतं... तर मला झोपच यायची ते पुस्तक वाचू लागलं की त्यामुळे वाचलंच गेलं नाही. Happy

बरं झालं सांगितलं . मिडनाईट *** इपब घेतलं आहे ते भराभर चाळेन.
वाचनालयातील 'खाडी देशातील स्त्री जीवन' छाप पुस्तके कधीच घेत नाही. त्यांचे त्यांनाच सुधारायचे नाही आणि स्त्री वर्गाला खाईत लोटायचे आहे तर कशाला वाचायचे?
म्हणजे पुस्तके लिहून समाजजीवनातील फक्त नोंद करणे झाले ते बाहेरच्या जगातील वाचकांसाठी. पण आतमध्ये कुणी पुस्तकेच उघडायचीच नाहीत तर खटाटोप कशाला?

Pages