चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा, उत्साही व्यक्तीमत्व, उद्योजकता असे नानाविध गुण असतात, पैकी तुमच्या मते कोणता गुण हा 'ओव्हर रेटेड' आहे आणि कोणता गुण हा 'अंडर रेटेड' आहे. आणि का? तेव्हा एकोळी उत्तर नको. 'का' या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्यावे.
माझ्या मते 'सातत्य' = कन्सिस्टन्सी हा प्रचंड अंडररेटेड गुण आहे. उदा. - मैत्री टिकण्याकरता, अनेक प्रकारच्या गुणांचे खरे तर सातत्य लागते. तुम्ही दुसर्या व्यक्तीस सपोर्ट करणे, धीराने म्हणजे पेशंटली त्या व्यक्तीचे गुणावगुण सहन करणे. त्या व्यक्तीला काय हवे ते त्या क्षणी ओळखून त्याप्रमाणे सल्ला देणे किंवा क्रिटिसाइज करणे. या सगळ्यात मुख्य म्हणजे सातत्य हवे. हे सातत्य तेव्हा येते जेव्हा, ते नाते निभावण्याची इच्छा असेल.
जॉबमध्येही, एक प्रॉजेक्ट मारे वेळेच्या आधी डिलीव्हर केले आणि दुसर्या प्रॉजेक्टला हयगय झाली तर कौतुक होणच शक्य नाही ना. कौतुक तर सोडाच पण तुमच्यावर कोणी विसंबूनही राहू शकणार नाही.
आता 'ओव्हररेटेड' गुण - मला वाटतं स्वकर्तुत्वावर न मिळालेले, वडिलोपार्जित, जेनेटिकली आलेले गुण हे ओव्हररेटेड. उदा - हुषारी. हां मूळात आपोआप आलेल्या हुषारीला तुम्ही धार लावलीत तर ते कर्तुत्व आहे आणि नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु - वर्ण, जात, जात्याच बुद्धी, पिढ्यान पिढ्या चालत आलेली पारंपारिक कुशलता - या काही गोष्टी मला ओव्हररेटेड वाटतात. अर्थात सर्वांना वाटाव्यात असेही नाही.
ओव्हररेटेड - मराठी शब्द?
अंडररेटेड - मराठी शब्द? (अतिपरिचयात अवज्ञा?)
सौंदर्य म्हणाल तर, कधीकधी मला
सौंदर्य म्हणाल तर, कधीकधी मला अगदी अबोल, शांत व्यक्तीही कन्व्हेन्शनली (पारंपारिक रीत्या) सुंदर नसली तरी चटकन आवडून जाते. तेव्हा होय सौंदर्य विशेषतः पारंपारिक निकष हे ओव्हररेटेड आहेत. मकं म्हणजे सुंदरच दिसेल, असं ठासुन सांगूच शकत नाही.
ओवररेटेड म्हणणे मला थोडी
ओवररेटेड म्हणणे मला थोडी जेलसी वाटते
>>>
हो, जेव्हा आपण एखाद्यातील एका क्वालिटीला ओवररेटेट बोलतो तेव्हा आपल्याला त्याची जलन त्रास होत होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी कुठली क्वालिटी ओवररेटेड ठरवताना क्षणभर थांबून आत्मपरीक्षण गरजेचे
धागे काढणे हे ओव्हर रेटेड आहे
धागे काढणे हे ओव्हर रेटेड आहे.
ते चालवणे अंडर रेटेड आहे.
मला जुने सर ओवररेटेड आणि
मला जुने सर ओवररेटेड आणि
नवीन सर अंडर रेटेड वाटतात
सुधा मूर्ती ओव्हर रेटेड आहे
सुधा मूर्ती ओव्हर रेटेड आहे व कपील शर्मा अंडर रेटेड.
थोडसं spartan असणे, म्हणजे
थोडसं spartan असणे, म्हणजे मनात आले वस्तू विकत घेतली. मनात आले जीभेचे चोचले पुरविले - असे न करणे. हा मला एक अल्प-मानांकित गुणविशेष वाटतो. कोणता तरी लेखक एकटा spartan अशी जीवनशैली जगला होता - एक प्रयोग म्हणुन. मला आता नावच आठवत नाहीये. त्याचे पुस्तक आहे प्रसिद्ध - ते वाचायचा मी प्रयत्न केलेला. पण मग कंटाळा आलेला.
पण सांगायचा मुद्दा हा की मला हा गुणविशेष कौतुकास्पद व अल्प-मानांकित वाटतो.
मी तर अजिबात तशी नाही. पण फार लोभस आहे हा गुण. कमीत कमी पर्यावरणाचा र्हास हाही फायदा आहे.
थोडसं spartan असणे, म्हणजे
थोडसं spartan असणे, म्हणजे मनात आले वस्तू विकत घेतली. मनात आले जीभेचे चोचले पुरविले - असे न करणे. >> पण काय होते यु लिव्ह ओन्ली वन्स व मेल्यावर एका व्यक्तीने काही सुखे उपभोगली काय किंवा नाही काय जगाला काही फरक पडत नाही. पण त्या व्यक्तीचे अनुभव क्षेत्र मात्र मर्यादित होउन राहते. इट्स नाइस बट फॉर अदर्स.
सुधा मूर्ती ओव्हर रेटेड आहे व
सुधा मूर्ती ओव्हर रेटेड आहे व कपील शर्मा अंडर रेटेड.
>>>
मी वेगळ्या जगात राहतो वाटते
मला सुधा मुर्ती हे नाव ऐकून माहिती आहे. आणि कपिल शर्माचे शो बघण्यात आयुष्याचे किमान तीसचाळीस तास तरी खर्च केलेत
पाश्चात्य संस्कृती, आचार
पाश्चात्य संस्कृती, आचार-विचार ओव्हर रेटेड
पौर्वात्य संस्कृती, आचार विचार underrated
ममो च्या म्हणण्या नुसार हापूस
ममो च्या म्हणण्या नुसार हापूस आणि उमो मलाही ओव्हर रेटेड वाटतात. म्हणजे दोन्ही आवडतात, तरीही.मी लहान होते तेव्हा हापूस हा दशहरी, नीलम, लंगडा, पायरी सारखा खाण्याचा एक आंबा प्रकार होता.आता हापूस सोडून सगळे अगदी कमी प्रतीचे किंवा 'हापूस परवडत नै वाटतं' वाला नाकं मुरडण्याचा प्रकार झालाय.उमो आणि तळणीचे मोदक हाही तोच प्रकार. तळणीचे मोदक एकदमच बिचारे होऊन किंवा ज्यांना उकडीचे येत नाही ते आळशीपणा म्हणून तळणीचे करतात असं समजलं जातं.
चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा,
चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा, उत्साही व्यक्तीमत्व, उद्योजकता असे नानाविध गुण असतात
१. कोणते ओव्हर रेटेड / अंडर रेटेड आहेत?
चांगुलपणा - म्हणजे कुणाला फसवायला न बघणे या अर्थी धरला तर नोकरी आणि धंदा दोन्हींत अंडररेटेड आहे. याचे महत्त्व फार आहे आणि दुर्लक्ष करून चालत नाही. इतर गुणांबद्दलही हेच.
या सर्वांवर भाष्य करण्यापेक्षा उदाहरण म्हणजे ' पर्यटन सम्राट राजा पाटील ' म्हणता येईल. याच नावाचे पुस्तक आहे. या गुणांचा परिपाक म्हणजे विश्वासार्हता वाढते .
२. ओव्हर रेटेड / अंडर रेटेड प्रतिशब्द ?
//- Overrated स्तोम माजवणे
Underrated कमी/तुच्छ लेखणे -
Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 May, 2023 - 08:15//
हे बरोबर वाटते.
Overrated = अति कौतुक
Overrated = अति कौतुक
Underrated = कमी कौतुक (under appreciated)
अशी माझ्या व्याख्या आहे.
ऊबो बरोबर आहे. एखादी गोष्ट
ऊबो बरोबर आहे. एखादी गोष्ट अंडर रेटेड अहे म्हणजे लोक त्या गोष्टीला तुच्छ लेखतात असे नाही. शिप ऑफ थिसियस हा सिनेमा अंडर रेटेड आहे. कारण तो जास्त कोणी पहिलाच नाही आणि व्हावे तितके कौतुक झाले नाही.
ओव्हररेटेड- अतिरंजीत
ओव्हररेटेड- अतिरंजीत
अंडररेटेड- दुर्लक्षित
ओव्हररेटेड- 'जुने ते सोने'
अंडररेटेड- 'नव्याचे नऊ दिवस'
आल्याचा चहा - ओव्हररेटेड
आल्याचा चहा - ओव्हररेटेड
हो आल्याचा चहा ओवररेटेड आहे
हो आल्याचा चहा ओवररेटेड आहे
त्यापेक्षा जास्त आता ग्रीन टी, लेमन टी वगैरे प्रकार लोकं चहाच्या वेळी चहाच्या नावाखाली पितात ते ओवररेटेड वाटते.
ओव्हररेटेड- अतिरंजीत
ओव्हररेटेड- अतिरंजीत
अंडररेटेड- दुर्लक्षित
हेसुध्दा चालेल.
मला वाटतं पर्यटन ठिकाणांना ओवरहाइप्ड म्हणणे बरोबर. उदाहरणार्थ बेंगलोर (बेंगळुरू) मैसूर (म्हैसूर) ट्रिप मधले वृंदावन गार्डन - कारंजे आणि त्यासाठी पायपीट. किंवा मैसूर महालाचे लाइटिंग. तसेच पुण्याची तुळशीबाग - बाजार.
न्यूयॉर्क मध्ये टाईम स्क्वेअर
न्यूयॉर्क मध्ये टाईम स्क्वेअर हा भयंकर ओवररेटेड प्रकार आहे. पण अमेरिका बघायला आलेले लोक्स तंगड्या तोडत रात्री तो बघायला जातातच ! तिथे प्रचंड मोठ्या एल ई डी स्क्रीन आहेत व त्यावर जाहीराती सुरू असतात. बरं तुळशीबागे सारखी काही अनवट वस्तू मिळतात म्हणावं तर तेही नाही, मेड इन चायना चहाचे कप, टे शर्ट्स ई ई . खरे तर न्यू यॉर्क मध्ये अनेक प्रेक्षणीय अंडर रेटेड जागा आहेत.
टाईम स्क्वेअर - ओव्हररेटेड
टाईम स्क्वेअर - ओव्हररेटेड आहे होय!! बरोबर.
तुळशी बाग इतकी मस्त आहे अज्जिबात ओव्हररेटेड नाही
टाईम स्क्वेअरला अनवट शॉपिंग
टाईम स्क्वेअरला अनवट शॉपिंग किंवा प्रेक्षणीय काही दिसेल म्हणून गेलात तर ओव्हररेटेड वाटेल. तिकडे येणारे लोक,गर्दी बघायला अनुभवायला गेलात तर तशी जागा आख्या अमेरिकेत कुठे नाही.
मला दरवेळी तिकडे जायला, निरुद्देश पायपीट करायला, अठरापगड मेल्टींग पॉट माणसे बघायला, झगमग बघायला, कुठे एखादं म्युझियम/ पाणी, उंचच उंच इमारती, भले थोरले बिल बोर्ड, लावलेल्या कॅमेऱ्यात आपली प्रतिमा शोधायला हात उंच करून हलवायला, बसेस टॅक्सी कारचा गदारोळ, वाजले जाणारे हॉर्न, मेट्रोला जाणारे जिने, तरी कुठे कोलाहल नाही सगळ्याला एक आपोआप प्राप्त झालेली शिस्त, इतकी माणसं एवेएठी लिहिलं का... बघायला फार्फार आवडतं.
पेन स्टेशन मधून पाऊल बाहेर टाकलं की जादुई वातावरणात प्रवेश करतो मी.
overhyped : That has been
overhyped : That has been promoted or publicized excessively
overrated : Given an undue amount of credit for quality or merit in a field; not necessarily related to popularity.
अंडररेटेड चॅनल्स - https:/
अंडररेटेड चॅनल्स - https://www.youtube.com/@pustakdarpan7662 - पुस्तक दर्पण
https://www.youtube.com/@gloryofhennaofficial - दिपालीचा, फॅशनविषयक हा चॅनल
मला वाटते- विनोद बुद्धी असणे
मला वाटते- विनोद बुद्धी असणे हे अंडररेटेड आहे. अगदी कमी लोकांत (फारेंड, अनू, अस्मिता) अशा लोकांत हा गुण असतो! मल दुर्मिळ वाटतो हा गुण.
>>>>>>
धन्यवाद आशू.
विनोद कळायला सुद्धा विनोद बुद्धी लागते असं लक्षात आलंय. नाही तर विनोद वाया जातात.
Update: धन्यवाद सामो.
फारेंड, अनू, अस्मिता + हर्पा
फारेंड, अनू, अस्मिता + हर्पा + मानव + आचार्य + पायस + अमितव आणि मूडमध्ये असली की स्वाती
हे सर्व लोक हसवतात मला. अगदी दर वेळेला मी ख्या: ख्या: लिहीत बसत नाही पण तो जोक ऐकून खुदूखुदू तर कधी कोलमडून पडत हसणं झालेलं असतं.
क्वचित वाटतं की मिस्टरी इज
क्वचित वाटतं की मिस्टरी इज अंडररेटेड.
जोवर तुम्ही थोडी मिस्टरी ठेवता तोवरच काही लोकांचा इन्टरेस्ट टिकून असतो. आपली बलस्थाने व मर्यादा एकदा लक्षात आल्या की काही लोक पुस्तक वाचल्यासारखे आपल्याला अडगळीत टाकून देतात असे वाटते - अर्थात नेहमी नाही पण क्वचित हा अनुभव घेतलेला आहे.
खरं तर आपण प्रत्येक क्षणी इव्हॉल्व्ह होत असतो. नित्यनूतन असतो.
ओव्हररेटेड: पहाटे उठणाऱ्यांना
ओव्हररेटेड: पहाटे उठणाऱ्यांना धन-विद्या-आरोग्य वगैरे मिळते.
-->>काही मिळत नाही, आरामात उठा.
ओव्हररेटेड: सध्या पालकत्व व त्याचा ताण ओव्हररेटेड झाला आहे. हे नवं डायनॅमिक सगळ्यांनी मिळून असह्य केलं आहे.
अंडररेटेड: घरातल्या स्त्रियांनी एकट्याने सिनेमाला किंवा बाहेर चांगल्या रेस्टॉरंट मधे खायला जाणं. निरुद्देश भटकंती.
कधीकधी विनोद नसलेल्या
कधीकधी विनोद नसलेल्या गोष्टींनाही विनोद म्हणतात.
** एकदा जोग धबधब्यापासून जवळ गांधिजी आणि चमूचा मुक्काम होता. बरेच जण धबधबा पाहून आल्यावर गांधीजींना सांगू लागले "नक्की जाऊन पाहा,खूप उंचावरून पाणी पडते."
"पावसाचे पाणी ढगांतून पडते त्याहीपेक्षा उंचावरून?"
त्यांनी नाद सोडला आणि महादेवभाईंना सोबती म्हणाले ते जात नाहीत,तुम्ही तरी जा."
"गांधीजी जाणार नसतील तर मीही नाही जाणार."
त्या सेन्स ऑफ ह्युमरच्या
त्या सेन्स ऑफ ह्युमरच्या लिस्टमध्ये सी यांनाही टाका
बाई दवे,
त्या आजकाल फार दिसत नाहीत.
>>>>>>काही मिळत नाही, आरामात
>>>>>>काही मिळत नाही, आरामात उठा.
हाहाहा
>>>>सी यांनाही टाका Happy
>>>>सी यांनाही टाका Happy
होय १००% खरे आहे.
Pages