Submitted by निखिल मोडक on 5 May, 2023 - 19:35
अजून देखील केसरवर्खी
सूर्य जरासा दिसतो आहे
चांदण पेरीत आकाशातून
चंद्र जरासा हसतो आहे
अजून देखील कातरकापी
सांज वेंधळी कुढते आहे
नक्षत्रांच्या अनवट लतिका
बांधून मांडव सजतो आहे
अजून देखील थकला रावा
परत कोटरी फिरतो आहे
गाई गुरांचा कळप भागला
कुशल गुराखी वळतो आहे
अजून देखील पाण्यावरती
उंबर अंबर धरतो आहे
काजळ होडीतून नावाडी
जाळे अपुले भरतो आहे
अजून देखील आठव वेणा
देत काळ हा सरतो आहे
आणि इथे ह्या ऐल तीरावर
साजण तुजला स्मरतो आहे
©निखिल मोडक
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है! शब्दांची निवड
क्या बात है! शब्दांची निवड खूप आवडली. छान!
वाह!!
वाह!!
मा सरस्वतीचा वरदहस्त आहे!
मा सरस्वतीचा वरदहस्त आहे!
सुंदर....
सुंदर....
खूप छान.
खूप छान.
चित्रदर्शी!
चित्रदर्शी!
सुरेख! चित्रदर्शी..
सुरेख! चित्रदर्शी..
खूपच सुंदर लिहिलंय..!
खूपच सुंदर लिहिलंय..!
मस्त!
मस्त!
अप्रतिम.. कविता आवडली..
अप्रतिम.. कविता आवडली..
आपण साऱ्यांनी केलेल्या कौतुका
आपण साऱ्यांनी केलेल्या कौतुका बद्दल आभार!
वाह...वेगळेच शब्द आणि वेगळाच
वाह...वेगळेच शब्द आणि वेगळाच ताल आहे !