भाग १
https://www.maayboli.com/node/83282
भाग २
https://www.maayboli.com/node/83302
भाग ३
https://www.maayboli.com/node/83312
भाग ४
https://www.maayboli.com/node/83323
प्रकरण ५ - गडे मुर्दे
निलय रे च्या केबिन मध्ये बसला होता. मधल्या आणि पहिल्या बोटाच्या कात्री मध्ये हनुवटी टेकवून विस्फारीत नजरेने हातातल्या रिपोर्ट्स कडे एकदा आणि रे कडे एकदा अशी नजर फिरवत होता. "आर यू हंड्रेड पर्सेंट श्योर् ऑफ धिस रिझल्ट डॉक?" त्याने शॉक होतं रे ला प्रश्न केला.
"निलय, मी जर श्योर् नसलो असतो तर एवढी गंभीर बाब मी सांगितली नसती. आणि होय, आता पर्यंत सापडलेले सगळे विक्टमस् रिलेटेड आहेत आता ऑफ कोर्स क्लोसली रिलेटेड नव्हते. बट आर. एफ. एल. पी. अनालिजिस** च्या ॲकॉर्डींग दे वेअर रिलाटेड." रे बोटांनी स्वतःच्या कपाळावर मसाज करत बोलला. "डॉ. ओविने हे स्वतः टेस्ट करून खात्री केलीय." दोन दिवस सलग काम करत असल्याचे त्याच्या थकलेल्या चर्येवर स्पष्ट दिसत होते.
"त्यांच्या टिश्यूज ज्या अव्हेलेबल होत्या त्यांचं अनालीसिस हेच सांगतय. आय'म ऍज शॉक्ड ऍज यू आर..," स्वतः च बोलणं कंटिन्यू करत रे स्पष्टीकरण देऊ लागला. "म्हणून मी मागच्या वेळच्या विक्टमस् च्या बॉडीज् एक्सझूम करण्यासाठी कोर्ट परमिशन मागितली होती.. सो दॅट आय कॅन चेक इफ देअर इस सेम कनेक्शन बीट्वेन लास्ट विक्टमस..."
"पण जर असं असलं असतं तर त्यावेळी फॉरेन्सिक एक्स्पर्टस् नी तेंव्हाच सांगितलं असतं." निलय थोडा टेन्सेड होत बोलला.
"सॉरी, पण खरं सांगायचं तर तू ज्या फाईल्स मला दिल्या होत्या, त्यात फॉरेन्सिक रिपोर्ट्स व्यवस्थित नव्हते. आणि काही काही रिपोर्ट्स मिसींग पण होते. आता का आणि कसं हा नंतरचा भाग आहे.. लकीली ॲकॉर्डींग टू योर् फादरस् नोट्स, लास्ट विक्टमसचे अंतिम संस्कार करताना कोणत्या तरी ऑ'गस्टीनो फ्यूनरल होम ने त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली होती. त्यामुळं दहन न होता दफन केलं गेलं होत. त्यामुळं मला त्याची बोनस् रिएक्सामिन करायला मिळू शकले. आणि ऑनेस्टली, त्या फ्यूनरल होमने बॉडी एक्सझूम करायला हेल्प केली. दे केप्ट प्रोपर रेकॉर्डस् व्हीच वॉज क्वायट इम्प्रेसिव ईफ यू आस्क... आणि मोर् शॉकिंग न्युज अवेट्स... ते सुद्धा रिलाटेड होते."
"पण विक्टमस् रिलाटेड होते हे तुला कसं समजलं?? ओह याह..., राईट, फॉरेन्सिक ऍन्थ्रोपोलॉजिस्ट ... " निलयने स्वतः च स्वतःचे उत्तर देत समजल्यासरखी मान हलवत बोलला.
"हो.. दे शेअर्ड ऍन ऑटोसोमल** डीसिज... ऑस्टिओसिस इम्प्रफेक्टा** त्याच्या हाडांचा स्टडी केल्यावर मला त्यांच्या बोन डेन्सिटी मधला फरक जाणवला... जो हाडांना कमजोर बनवतो आणि परेंट्स कडून तो मुलांकडे पास होतो. जास्त टेक्निकल माहिती कडे जाऊ नकोस. ट्रस्ट ऑन माय क्नक्लुजन." स्वतःच बोलणं थकलेल्या स्वरात पूर्ण करत रे बोलला.
त्याच्याकडे बघून निलय त्याला विचारू लागला, "शेवटचा कधी झोपलायस तू? खूपच भयंकर दिसतोयस.. जाऊन जरा रेस्ट घे."
"ते जाऊदेत, तू कसा आहेस? तुझ्यावर हल्ला झाल्याचं ऐकलं मी. आणि अविनाश कसा इन्व्होल्व्ह झाला या सगळ्यात?? त्या माणसाला तर संकट शोधत गळ्यात मारून घ्यायची हौस दांडगी आहे..." रे ने काळजीने विचारले.
"अरे गोळी लागली पण नाही मला. सगळे एवढं काय ओव्हर रिऍक्ट करतायत?? " निलयने थोडं वैतागत प्रश्न केला..
"बाय द वे, अविनाश वरून आठवलं, श्री कडे जाऊन यायला पाहिजे.. त्याच्याकडे अवि ने फोन दिले होते... त्यावरून काही माहिती मिळाली आहे का ते पाहायला पाहिजे." असं म्हणत रे च्या केबिन मधून रिपोर्ट्स ची फाईल घेत बाहेर पडू लागला. तेवढयात रे ने हाक मारत त्याला थांबवले, "मी समजू शकतो की या सगळया प्रकरणामुळे तू डिस्टर्ब आहेस. जुन्या आठवणी जाग्या होणार... पण तुला काहीही गरज लागली तर तुझा हा मित्र तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव. आणि त्या श्री कडून जी माहिती मिळेल ते सांग मला... कीप मी इन द लूप, ओके?"
"नक्कीच.. येतो मी..." निलय रे ची नजर चुकवत त्याचा निरोप घेतला.
**********
"दीक्षा, ऐक ना माझ अग, आस्था बोलली होती ना, तिचा भाऊ पोलीस आहे... आपण त्यांना एकदा भेटून तरी येऊयात.. किती दिवस हे अस धास्ती घेत जगायचं?" सुमेर कळवळून दीक्षाला समजावत बोलत होता.
पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बहिण भावाचा संवाद सुरू होता. सूमेर दिक्षाला कधीचा समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता.
"आणि जर खरचं यात जर त्या माणसाचा हात असेल तर आपण पाहिला पोलिसांकडे जायला पाहिजे.. तुला आणि मला नक्की माहित आहे, जर आपल्याला असे प्रायव्हेट नंबर वरून टिप्स येतायत तर तो नक्कीच तुला संपर्क साधायचा प्रयत्न करत असेल. अँड आय स्वेअर् जर त्यानं तुला काही नुकसान करायचा प्रयत्न केला तर त्याला जिवंत सोडणार नाही मी." बोलता बोलता कठोर आवाजात तिला सुमेर सांगू लागला.
दिक्षा ने कपाळावर आठ्या घालत त्याच्याकडे पाहिले. "हे बघ भाई, तुझा कन्सर्न मला समजतोय, पण तो आस्थाचा भाऊ सुद्धा जर आपण एक्सपोज केलेल्या करप्ट अधिकाऱ्यापैकी एक असला तर? आगीतून फुफाट्यात पडायची वेळ येईल." हातातल्या कपड्यांची घडी घालत सुमेरला म्हणाली. "तसं पण आपण प्रिकॉशन घेतोयच ना.. मी सतत रिव्हॉल्ववर बाळगतेय, तू स्वतः चार लोकांना लोळवायला पुरेसा आहेस मग प्रॉब्लेम काय आहे?"
दीक्षाच्या जिद्दिपणावर वैतागून कपाळावर दोन बोटं घासत सुमेरने दीर्घ श्वास घेतला. "हे बघ राजा, अपघात सांगून होत नाहीत.. इट्स अल्वेज बेटर तो हॅव एस अपटू योर् स्लीव... आणि जर आस्था चा भाऊ त्या करप्ट अधिकाऱ्यापैकी निघाला तर आपण त्याला काहीही न सांगण्याचा ऑप्शन निवडू शकतो ना.. पाहिला बोलून तरी पाहू... पण आस्था कडे पाहून, तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून, आणि ती ज्या पद्धतीनं तिच्या भावाबद्दल बोलते त्याकडे पाहून मला नाही वाटत की तिचा भाऊ असा असेल.." त्याने एकच खांदा अर्धवट उडवत तिला कन्विन्स करायचा प्रयत्न करू लागला.
"मला जिद्दी म्हणतोस पण माझ्यापेक्षा जास्त स्टबर्न तर तुच आहेस..... " हातातले कपडे दाणकन बेड वर आपटत दीक्षा त्याच्याकडे वळून त्याच्या छातीत बोट रुतवत बोलू लागली.
"खरं सांग दीक्षा, तू अश्या क्षुल्लक कारणावरून पोलिसांकडे जायला नाही म्हणणार नाहीस. काय झालंय?" सुमेर ने तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेत, तिचं बोलणं अर्धवट तोडत, हळव्या आवाजात प्रश्न केला. त्याच्या अश्या आविर्भावात विचारण्याने दीक्षाचा बांध फुटला आणि डोळ्यातून एक चुकार अश्रू अलगद गालावर ओघळला.
"भाई, ते जर खरच टिप्स देणारे असतील तर? आणि मागच्यावेळी त्यांच्यावर खोटा आळ घेतला असला असेल तर? किंवा तू बरोबर असशील आणि मी स्वतःला खोटी आशा लावून ठेवली असेल तर? किंवा ज्या टिप्स मिळतायत त्या पाठवणारे ते नसतील, आणि कोणतरी वेगळेच असतील तर?" थरथरत्या आवाजात तिने सुमेरला स्वतःची भीती बोलून दाखवली आणि तिचे प्रश्न ऐकून त्याने अलगद जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात ठेवत डोळे घट्ट मिटून घेतले. आपल्या बहिणीची भीती आणि त्या पाठीमागची आशा तो नक्कीच समजून घेऊ शकत होता. पण सध्या त्याच्या बहिणीला त्याची गरज होती.
त्यामुळं स्वतःची इन्सेक्युरिटी इग्नोर करत तिला समजावू लागला, "अगं, जे काही असेल ते आपण शोधून काढू. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तर करायला पाहिजेत ना. कधीना कधी कोणावर तरी विश्वास ठेऊन खरं काय आहे ते शोधायला हवं ना? आणि मी काय असं म्हणत नाहीय की लगेच त्या इन्स्पे. ला खरं सांगायचं.. वी'ल चेक हिम फर्स्ट... डोन्ट वरी.. मला आपल्या जन्मदात्यावर विश्र्वास नाहीय, कारण मी तेंव्हा ते सगळं पाहिलं होत, अनुभवलं होत.. पण कदाचित..., कदाचित तू बरोबर असशील, कदाचित ते निर्दोष असतीलही... तू घाबरु नकोस, जे काही सत्य असेल ते आपण दोघं मिळून शोधणार आहोत.. तू कधीच एकटी नाहीस हे लक्षात ठेव. यू हिअर मी? आय'म अल्वेस विथ यू..."
सुमेर च्या बोलण्याने ती थोडी शांत झाली. पण अजूनही तिच्या नाकाची सुरसुर चालूच होती. "आता तुझ ते सूर्सुरणार नाक माझ्या शर्टला पुसू नको म्हणजे झालं.." वातावरण थोडं हलकं करण्यासाठी त्याने जोक मारला आणि त्याची प्रतिक्षिप्त क्रिया यावी तशी तिच्या हाताची चापट त्याच्या खांद्यावर बसली. "हात आहे का हातोडा? कसलं जोरात मारलस.." उगाचच खांदा चोळत तिला वेंगाडून दाखवत सुमेर तिला म्हणाला.. आणि तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
आणि तिला हसताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य पसरलं.
"आज ऑफिस सुटलं की जाऊ आपण त्यांना भेटायला, त्याआधी मला आस्था ला सगळं सांगायचं आहे. हो, माहितीये मला की मी आधी कोणाला काही सांगायचं नाही असं ठरवलं होत. पण या मागच्या तीन चार महिन्यात तिच्यासोबत राहून तिच्या स्वभावाची कल्पना आलीय मला, अँड शी डीसर्वेस टू नो दि ट्रूथ्" तिने तिच्या त्या रडण्यामुळे थोड्याशा जड, घोगर्या झालेल्या आवाजात बोलत त्याला सांगितलं.
**********
"बोला सावंत, आपण जी बुलेट केसिंग कलेक्ट केली होती त्याचे बलेस्टिक रिपोर्ट्स आले का??" निलयने खुर्चीवर बसत सावंत ना प्रश्न केला. "आणि त्या गाडीचा काही पत्ता लागला का? कोणाच्या नावावर आहे किंवा कसं काय ? आणि श्री च काम कुठं पर्यंत आलंय? काही माहिती मिळाली का त्या मोबाईल वरून?" निलय लागोपाठ प्रश्न विचारत बोलला.
"बलेस्टिक रिपोर्ट्स आलेत सर, आणि ऍज एक्सपेक्टेड बुलेट गावठी कट्ट्यामधून चालवली गेली होती. ट्रेस करण अवघड आहे... अशक्य नाहीय... पण ट्रेस करायला वेळ लागू शकतो. आणि मी सुलेमान ला लक्ष ठेवायला सांगितलं होतं.. पण त्याचं दिवशी ती गाडी एक बुरखा घालून एक स्त्री ती गाडी स्क्रॅप मध्ये सोडून आली.. आणि गाडीची प्लेट तर वेगळाच विषय होता, लेलँड ची प्लेट होती ती. त्यामुळं तिथं पण डेड एन्ड लागलाय आपल्याला. पण ज्या स्क्रॅप मध्ये गाडी सोडली होती त्या दुकानात सुलेमान ल चौकशी करायला सांगितलं आहे.. आणि खबरी पण कामाला लावलेत. लवकरच काहीना काही क्लू हाताला लागेलच." हलकेच सुस्कारा टाकत त्यांनी त्याचं बोलणं सुरु ठेवलं.
"आणि श्री ला कॉल केला होता मी तो इकडेच यायला निघाला होता, पोहचेलच इथे एक दहा मिनिटांमध्ये."
"ठीकेय, तुम्ही रे चे रिपोर्ट्स टीम कडे फॉरवर्ड करा. पुढचा प्लॅन ऑफ अँक्शन तयार करायला हवा. तुम्ही गाडीचे डिटेल्स अजून मिळतायत का ते पहा पुन्हा एकदा..."
त्याच बोलणं पूर्ण होतंय न होतंय तोपर्यंत दारावर टकटक ऐकू आली. "कम ऑन इन.." त्याने वर न बघताच सूचना केली आणि समोर जिच्या नावाने सगळी टीम शंख करत होती ती म्हणजेच दीक्षा कर्वे आणि तिचा भाऊ, फोटोग्राफर एसके म्हणजेच सुमेर कर्वे समोर उभे होते...
**********
✓ RFLP ANALYSIS
आर. एफ. एल. पी. अनालिजिस
फुल फॉर्म सांगायचं झाला तर, Restrictions Fragment Length Polymerase...
काही कॉन्सेप्ट कळायला तुम्हाला बायोलॉजी ची background हवी... पण सोपं करून सांगायचं म्हणजे, पेशींमधील DNA एक्स्ट्रॅक्ट केला जातो, आणि एन्झाईम्स म्हणजे, मराठी शब्द त्यासाठी, जैव उत्प्रेरक म्हणजे आपल्या शरीरात ज्या ज्या रिएक्शन्स होतात त्यांना हेल्प करणारे मोलेक्युलस्.. तसेच मोलेक्युलस् बॅक्टरिया मध्ये सुद्धा असतात ते वापरून DNA फ्रॅगमेंट केला जातो आणि gel electrophoresis (जेल इलेक्ट्रॉफोरेसिस) करून paternity testing s वैगेरे केल्या जातात..
ज्यांना बायोलॉजी / बायोटेच्नोलॉजीचं बॅकग्राऊंड आहे त्यांना लक्षात येईल. तरी सोपं करून सांगायचं मी प्रयत्न केला आहे..
✓ऑटोसोमल डीसिज (autosomal disease)
काही काही आजार हे पालकांकडून मुलांकडे पास होतात.
आता ह्यूमन क्रोमोसोम (chromosome) मध्ये एकूण ४६ क्रोमोसोम असतात, म्हणजे २३ जोड्या (pairs) त्यातली जी जोडी लिंग ठरवते त्यांना सेक्स क्रोमोसोम (sex chromosomes) म्हणतात. आणि राहिलेल्या २२ pairs त्यांना ऑटोसोमस (autosomes) म्हणातात.
आता काही काही जेनेटिक डीसिज हे sex specific असतात फॉर एक्सांपल, रंगांधाळेपणा जो फक्त पुरुषांना होतो आणि स्त्रियांचा जेनेटिक मटेरियल त्या डीसिज साठी फक्त कॅरअर च काम करतो .. आता असं का? त्यांचं स्पष्टीकरण बराच मोठा आहे... आणि तेवढ्या डीप जाण्याची काही गरज पण नाही.
पण काही डिसिज हे sex specific नसतात. म्हणजे नो मॅटर ऑफ सेक्स जर तो जिन डोमिनंट असेल तर तो आजार कोणालाही होऊ शकतो.
मी जे इथं या कथेत वापरल आहे ते म्हणजे ऑस्टिओसिस इम्प्रफेक्टा हा आजार...
या आजारात COL1A1 किंवा COL1A2 या gene मध्ये म्युटेशन (mutation) होतं. आणि या आजारात सुद्धा बरेच सब टाइप्स आहेत. आता हे सुध्दा मी काही जास्त डीप सांगत बसत नाही. तुम्ही यातल्या काही गोष्टी गूगल बाबा ला विचारू शकता. मी फक्त या आजारात काय होत ते सांगते,
यात हाडांची रचना जशी नॉर्मली व्हायला हवी तशी होत नाही. हा आजार असलेल्या लोकांची हाडं ठिसूळ असतात. आणि त्यामुळं हाडं फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे mild trouma मुळे सुद्धा हाडं मोडू शकतात. अर्थात् हे ओव्हर सिंपलीफिकेशन आहे. पण यात जेवढं डीप जाल तेवढं शिकण्यासारखं आहे.
पण ही कथा आहे, सायन्स चा क्लास नाही त्यामुळं अजून जास्त माहिती काही मी देत नाही.
मी अतिशयोक्ती न करता फॅक्ट्स सांगत पुढं कथा घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे.
पण काही काही कॉन्सेप्ट आपण नुसत वाचून पुढे जातो, खूप कमी जण त्याच्या खोलात शिरतात. त्यामुळं त्याची अगदी बेसिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतेय.
**********
आणि या भागात सुद्धा कथा थोडीच पुढं गेलीय, अजून जास्त कथा पुढं सरकणं गरजेचं होत. पण माझ्या exams मुळे कथा पुढं सरकवयाला जमलं नाही. त्यासाठी क्षमस्व. पुढचा भाग लवकर टाकायचा प्रयत्न करेन. आणि कथा पुढं सरकेल याची काळजी घेईन.
छान!
छान!
Thank you @केशवकुल
Thank you @केशवकुल
आई मोड ऑन " परीक्षेकडे लक्ष
आई मोड ऑन " परीक्षेकडे लक्ष द्या आधी, मग काय ती गोष्ट लिहा" आई मोड ऑफ..
वाचक मोड ऑन- भारी चालली आहे कथा.. वेगवान आहे. कथेचा आराखडा तुमच्या डोक्यात तयार आहे हे जाणवतेय. Genes ची माहिती आवडली.
धनवन्ती याना मम
धनवन्ती याना मम
कथा मस्त चालली आहे.
कथा मस्त चालली आहे.
कथा चांगली रंगतेय
कथा चांगली रंगतेय
निलय आस्था आणि सुमेर दिक्षा यांची टीम होणार का? ... त्यांचा भूतकाळ त्यांना मार्गर्शक असेल का? ...
छान उतुकाता निर्माण केली आहे
खाली जे स्पष्टीकरण देताय ते उल्लेखनीय आहे.
Mass spec, RFLP, AUTOSOMAL DISORDER वैगरे बद्दल छान माहिती दिलीत, हे गुगल कॉपी पेस्ट वाटतं नाही, तुमचा अभ्यास दिसतोय ह्यात.
परीक्षा तुम्ही देत होता का घेत होता?
आई मोड ऑन " परीक्षेकडे लक्ष
आई मोड ऑन " परीक्षेकडे लक्ष द्या आधी, मग काय ती गोष्ट लिहा" आई मोड ऑफ..>>>>>
माझ्या आई च सुद्धा हेच मत आहे त्यामुळे ... टोटली relatable....
माझ्या आई च सुद्धा असाच dilema आहे...
लिही तर म्हणते आणि अभ्यास करून काय ते कर अस पण...
नक्कीच मी पुढचे भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन
Thank you
कथा मस्त चालली आहे.>>>>>
कथा मस्त चालली आहे.>>>>>
धन्यवाद सामो...
परीक्षा तुम्ही देत होता का
परीक्षा तुम्ही देत होता का घेत होता? >>>>>
करेक्ट गेस....
मी लेक्चरर आहे... घेते मी एक्समास पण यावेळी माझी exam होती....
अर्थात् phd entrance sathi exams देतिय मी... त्यासाठीच वेळ झाला भाग पोस्ट करायला...
आणि मझ फील्ड च हे आहे...
I'm a biotechnologist
त्यामुळं हे एक्सपलाईन करू शकते मी...
आणि कसय महितिय का, आता शिकवण्याची एवढी सवय झालीय की explain न करता पुढं गेली की चुकल्यासारखं वाटतं
प्रतिसादासाठी आभार
धनवन्ती याना मम>>>>
धनवन्ती याना मम>>>>
सॉरी पण तुम्हाला काय सांगायचं आहे ते कळलं नाही मला
@एस
कथा मस्तच सुरू आहे.
कथा मस्तच सुरू आहे.
कथा मस्तच सुरू आहे.>>>>
कथा मस्तच सुरू आहे.>>>>
Thank you @मामी
छान फ्लो आहे कथेचा.
छान फ्लो आहे कथेचा.
घाई मुळे असेल पण typo आणि द्वीरुक्ती आहेत , पुढील वेळी अगोदरच चेक करा
typo आणि द्वीरुक्ती आहेत ,
typo आणि द्वीरुक्ती आहेत , पुढील वेळी अगोदरच चेक करा>>>>>
आता कोणत्या typo आहेत ते पाहते...
पुढच्या वेळी नक्की दुबार तपासून पोस्ट करेन...
छान फ्लो आहे कथेचा.>>>
थॅन्क्स @आबा
सॉरी पण तुम्हाला काय सांगायचं
सॉरी पण तुम्हाला काय सांगायचं आहे ते कळलं नाही मला
@एस >>>>> धनवन्ती यांनी जे लिहिले तेच मला देखील वाटते -- असे सांगायचे होते मला.
माणसाचा हात असेल तर आपण
माणसाचा हात असेल तर आपण पाहिला पोलिसांकडे जायला पाहिजे
अजुन एका ठिकाणी असच आहे.