"सखी"
उड्या मारत चिऊताई अंगणात आली .
अन म्हणाली ,
उरले नाही मला घरदार .
जागा शोधुन मी दमले फार.
झाडं नाहीत की जंगल नाही .
घर बांधायची काही सोयच नाही .
छोटीशीच जागा शोधली प्रयत्नाने ,
त्यावरही कब्जा केला त्या 'काळ्या ' कावळ्याने .
कधी मिळते ,
पण गावापासून फार दूर असते.
दाणापाणी जमवून आणताना जीवाला फार दमवते .
कधी बांधकामाच्या साईटवर मिळतो एखादा कोपरा .
मात्र ,मजूर उचलून फेकतात घराला, समजून कचरा .
त्यापेक्षा मी असं करते ,
बँकेत जाऊन लोनच काढते .
असेन का वन -रूम किचन ,
एक ब्लॉक मला दे बुक करून .
मी आणि चिमणा दिवसभर काम करू .
ओव्हरटाईम अन जोड -धंदाही करू .
जमेल तसे हप्ते फेडू .
पिलांना राहायला मिळेल घर .
चिंता माझी होईल दूर .
मी म्हणाले ,
बँकलोन ,इ एम आय ,बिल्डर
या जाळ्यात नको फसू .
विकतच दुखणं नको घेत बसू.
चिंतेचे सावट कायम डोक्यावर .
त्याचा परिणाम बिचाऱ्या पिलांवर .
शेवटी,
घराच्या कोपऱ्यात मी तिला जागा दिली .
तेंव्हापासून एक गोड सखी मला मिळाली .
डॉ . शुभांगीनी कपिल महाजन
धन्वन्तवरी हॉस्पीटल
मेन रोड
उमरगा .
४१३६०६
Mo. No. 7350957385
गोड!!
गोड!!
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
"माहिती आणि अधिकार"
"माहिती आणि अधिकार"
आजकाल सगळ्यांत जास्त भीती वाटते
ती,
अंगावर धावून येणाऱ्या माहितीची.
कधी पूर आलेल्या ,
नदीसारखी बुडवून गुदमरुन टाकते.
तर कधी ,
अचानक भिरभिरत येणाऱ्या
वादळासारखी चक्रावुन टाकते.
कधी तप्त उन्हात ,अंगाची लाही लाही
करते.
तर कधी ,
अवकाळी पावसासारखी
अचानक कोसळून भिजवून टाकते.
समाज माध्यमातुन कधी खरी तर कधी खोटी!
टेली व्हिजन वहिन्यांमधुन अतिरंजीत , बटबटीत,
नी मेंदुला झिणझिण्या आणणारी.!
थोडक्यात,वास्तव आणि योग्य असेल
तरच तिची गोडी अधिक.
नाहीतर ओल्या दुष्काळातल्या
नासक्या भाजीसारखी ती
रस्त्यात तुडवली जाते.
जनावरेही तोंड नाही लावत तिला.
कानावर आदळुन आदळुन
कानही बधीर झाले आहेत आतां.
आणि संवेदना जागृत करण्याची
माहीतीची क्षमताही नाहिशी झाली आहे.
युग खरेतर माहीती आणि तंत्रज्ञानाचे.
पण नुसतंच तंत्र वापरलं जातंय
ज्ञान काही पोंहचत नाही.
'माहितीला' तर प्रत्येकानेच आपल्या
सोयीनुसार दावणीला बांधुन
फ़रफ़टत नेलंय.
रक्तबंबाळ झालेली ती आसरा
शोधतेय .
तिला आतां हक्काची जागा तर हवीच आहे.
पण त्यावर "अधिकारही " हवाय.
डॉ० शुभागिनि कपिल महाजन.
उमरगा