गतवर्षी सप्टेंबरात तामिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या दीर्घकादंबरीवर आधारित त्याच नावाचा 'पोन्नियिन सेल्वन' (भाग पहिला) चित्रपट प्रदर्शित झाला.
मणिरत्नमचे चित्रपट आणि रहमानचं संगीत आवडून घेणं हा आमच्याकडचा कुळाचार आहे. हे दोघे एकत्र म्हणजेतर मणिकांचनरहमान योग! अर्थातच आम्ही मनोभावे सेवेत रुजू झालो. चित्रपटाची थिएटरमध्ये आणि मग घरी प्राइमवर पारायणं करणं, शक्य तिथे - शक्य तेव्हा - शक्य तितक्या मोठ्या आवाजात त्याची गाणी ऐकणं, मूळ कादंबरी (इंग्रजी अनुवाद) शोधून वाचणं, कुठल्याही चर्चेत सहज निघाल्यासारखा हा विषय काढणं, इष्टमित्रपरिवारातील शक्य तितक्या व्यक्तींना त्याची दीक्षा द्यायचा प्रयत्न करणं, प्रत्येक व्यक्तिरेखेचा, प्रसंगाचा, सुरावटीचा कीस काढणं इत्यादी षोडशोपचार यथासांग पार पाडले.
रहमानच्या गाण्यांत डावंउजवं करणं मुश्किलच नाही, तर नामुम्किन असतं. तरीही त्यातल्या पुंगुळली या नाविककन्येच्या तोंडी असलेल्या Alaikadal (तामिळ उच्चाराबद्दल साशंक असल्यामुळे अल्बममधलं गाण्याचं 'नाव' लिहिलं आहे) गाण्याने माझ्यावर अक्षरशः चेटुक केलं! 'पुनिपुनि कितनी सुनी सुनाई | इय की प्यास बुझत ना बुझाई ||' असा प्रकार झाला!
अशातच कधीतरी त्याचा हिंदी अवतार कानाला किती खडबडीत लागतो अशी तक्रार मी माझ्या मुलाकडे करत होते, तेव्हा त्याने 'समजा तुला मराठीत या गीताचे शब्द लिहायला सांगितले तर कसे लिहिशील ते दाखव बघू' असं आव्हान मला दिलं. मग मीही त्याला अट घातली, की जर मी शब्द लिहून दाखवले, तर त्याने ते त्याच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून मला मिरवायची संधी द्यायची.
तर या द्वंद्वाचा परिपाक तुमच्यासमोर ठेवत आहे.
कसा वाटला जरूर सांगा.
हे मूळ तमिळ गाणं.
हे आदित्यने गायलेले त्या चालीवरचे माझे शब्द.
आणि हे ते शब्द :
भिरभिर वारा दरियात शहारा (येलो येलेलो)
मनभर पाऱ्यात तुझाच पुकारा (येलो येलेलो)
वादळ व्याकुळ देही होते हुरहुर जागी
सावळ पाहुन मेघ चंद्राचा अनुरागी
उलगडते नभ मोरपिसारा (येलो येलेलो)
दूर किती बघ दूर किनारा (येलो येलेलो)
गुणगुणगुण तनभर धुन लहर लहर झाली
कळ उमलुन आली फिरुन चढे गाली नवतीची लाली
देशील का सांग हातात हात
विजा पांघरू जागवू चांदरात
का छळ माझा असा
जिव जळतो बघ पळपळ तिळतिळ काहुर हे अंतरात
श्वासांत भासांत एकच नांव
तुझी सावली हाच एकच गाव
शोधीन लाटांत घालुन नाव
जावो उभा जन्म सागरात
कडकड बिजली सळसळ वारा
पाऊस वेडा कोसळणारा
येईन सोसून साऱ्या झळा
टिपा:
१. चित्रपट पाहिला नसाल तर नक्की पाहा. दुसरा - आणि शेवटचा - भाग येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे, तेव्हा त्वरा करा!
२. दुसर्या भागासाठी हिंदी गाणी गुलझारने लिहिली आहेत. गुलझारचं काव्य हादेखील लेखात उल्लेख केलेल्या कुळाचाराचा भाग आहे, तेव्हा त्याबद्द्ल अधिक सांगणे न लगे.
दोन्ही भारी जमलेलं आहे.
दोन्ही भारी जमलेलं आहे.
वा सुंदरच!
वा सुंदरच!
)
तुमचं काव्य जमलय अगदी (हे म्हणणं म्हणजे सूर्याला काजव्याने... वगैरे
अन लेकाने फार सुंदर गायलय. सूर, उच्चार सहीच. कोणत्याही आधारा शिवाय! आवाजही छाने. लेकाचे खास कौतुक अन शाब्बासकी.
अशी चुरस मायलेकांत अजूनही होऊ देत
सहीच! खूप सुंदर जमले आहे हे
सहीच! खूप सुंदर जमले आहे हे द्वंद्व! शब्द किती सहज सुंदर बसलेत मूळ चालीत. आणि आदित्यने ते गायलेय ही सुंदर!!
मस्त. पिक्चर पाहिलेला नाही व
मस्त. पिक्चर पाहिलेला नाही व ते गाणेही आत्ताच पहिल्यांदा ऐकले. आदित्यने गायले आहे छान पण मूळ नीट बघितल्यावर जास्त पोहोचेल असे दिसते.
शब्दरचना छान आहे. "तुझी सावली हाच एकच गाव, शोधीन लाटांत घालुन नाव" हे जबरी आहे! कोठेही दुसर्या भाषेतील गाण्यात "बसवायचा" खटाटोप वाटत नाही. नंतर मराठीत आणताना कोणीतरी त्या तमिळ गाण्याचे टेलिफोन धून मे हसनेवालीकरण करण्या आधी मणि रत्नम कडे पोहोचव हे (गायकीसकट)
सिद्धहस्त लेखिला/कवियित्री
गीत फारच उत्कृष्ट लिहिलंयस. सिद्धहस्त लेखिका/कवियित्री माहित आहे पण तुझ्या लेकानं तर कमालच केलीये. फार सुरेख, तरल गायलंय गीत. उच्चारांबद्दल खास कौतुक.
Just Amazing. Loved it. खऱ्या
Just Amazing. Loved it. खऱ्या अर्थाने शब्द आणि सूर इतके जमून आलेले वाटले. मी original गाणं ऐकलं नव्हतं आधी. मला आदित्यचा आवाज खुप आवडला. त्याने आणखी काही म्हटले असले तर मला प्लिज पाठवशील कां?
बाप रे फार सुंदर गायले आहे.
बाप रे फार सुंदर गायले आहे. मागे एकच मोनोटोनस वाद्य हवे होते गं. एकच टुण ... टुण ..... साथ हवी होती. मस्त मेडिटेटिव्ह आहे.
>>>>>>>>>>>>देशील का सांग हातात हात
विजा पांघरू जागवू चांदरात
अफाट!!! वाटल्या या ओळी.
वा वा वा! अप्रतिम!! काय सुंदर
वा वा वा! अप्रतिम!! काय सुंदर केला आहे भावानुवाद. रात्रीच्या अंधारात चंद्राच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला, बोटीत बसलेला वंद्यतेवन आणि ते गीत मराठीत गाणारी पुंगळली डोळ्यासमोर आले. अनुवादात कुठेही ओढून ताणून केलेलं वाटत नाही. 'कळ उमलुन आली' वाचताना सवयीने चुकून कळी वाचलं. पण त्याजागी कळ हा शब्द जास्त मादक आहे. अफलातून! आता चित्रपटाच्या पुढच्या भागासह तुमच्या आणखी अश्या लेखनाचीही प्रतीक्षा आहे.
आदित्यचा (तुमचा आदित्य, करिगालन नव्हे!
) आवाजही खूप सुरेल आणि गोड आहे. हे गाणं गायला खूपच अवघड आहे. मूळ चाल मधुकंसाच्या स्वरांत असली, तरी तिसऱ्या चौथ्या ओळीच्या शेवटी येणारे येलो येलेलो शब्द हे जादुई आहेत. तिथे (कोमल) गंधाराचा षड्ज होतो आणि राग वेगळाच असल्यासारखा अनुभव येतो. त्यानंतर पुन्हा मधुकंसावर येते चाल. तो बदल गाताना करता येणं ही अवघड गोष्ट आहे. तो गायन शिकला आहे हे नक्कीच. गाण्याचे कार्यक्रमही करतो का?
अरे काय सुरेख झालंय हे !!
अरे, काय सुरेख झालंय हे !!
अनुवाद व गायन दोन्ही फार आवडले. आदित्यने छान गायलंय. येलो येलेलो तर कानात घुमलं. आई आणि मुलानं हे असं मिळून काही तरी कलाकृती करणं किती सुंदर आहे गं नात्यासाठी , फार प्रसन्न वाटलं वाचून.
ते गाणं अफाट सुंदर आहे. पहाटेची नदी, गूढ निळ्या रंगाचे आकाश, हळूहळू होत जाणारा सूर्योदय अफाट टिपलंय. पुंगुळलीही किती मादक, रॉ तरीही चिवट दिसते, तिच्या डौलदार हालचाली सोबत गाणं आणि नाव उलगडत जाते. कुंदवै व नंदिनीपेक्षा पुंगुळली मुक्त वाटली होती. ते विभ्रम या गाण्यात(अनुवादातही)फार चपखल पकडले आहेत. मला तिचा वावर फार आवडला होता. मी तर पुन्हा पुन्हा ऐकते ते !!
किती छान लिहिले आहे हर्पा
फारच सुंदर जमलं आहे गाणं.
फारच सुंदर जमलं आहे गाणं. आदित्यने अगदी गाण्यात उतरून गायले आहे.
भावानुवाद एक एक ओळ /कडवे घेऊन केला आहे की मूळ गीताचा साधारण आशय / भाव पकडला आहे?
अहाहा !! कसला आवाज आहे यार !!
अहाहा !! कसला आवाज आहे यार !!! काव्यदेखील अफलातून !!!
खूप सुंदर जमले आहे !
खूप सुंदर जमले आहे !
मस्त झालंय काव्य व गायन,
मस्त झालंय काव्य व गायन, दोन्ही.
मुळ गाणं आज पहिल्यांदा ऐकलं. मस्त आहे. सिनेमा पहावा लागणार आता.
खूप सुंदर! Amazing!
खूप सुंदर! Amazing!
सुरेख...एवढंच म्हणेन मी.
सुरेख...एवढंच म्हणेन मी.
या चित्रपटातले सर्वात जास्त काय आवडले होते ते हे गाणे. हिंदींत डुबी डुबी असे आहे व ऐकायला/पहायला छानच आहे.
याचा मराठीत भावानुवाद केलात हे छान. आवाजही छान आहे.
खूपच सुंदर. शब्द सुरांची
खूपच सुंदर. शब्द सुरांची शर्यतच जणू काय अधिक सुंदर म्हणून.
वर फार एंड ह्यांनी म्हटलंय तसं ही शब्द सुरांची मराठी प्रतिकृती लवकरात लवकर मणिरत्नम ह्यांच्याकडे जाऊ दे.
मुलाचा आवाज आणि सूर फारच छान. कसलेला गायक वाटतो. दोघांचेही अभिनंदन.
इतक्या प्रेमळ आणि उदार
इतक्या प्रेमळ आणि उदार (generous and kindसाठी नेमके मराठी शब्द सुचेनात!) अभिप्रायांसाठी आदित्य आणि माझ्यातर्फे सर्वांचेच अनेक आभार!
ह.पा., नाही, गाणं शिकला नाहीये आदित्य, पण कान आणि गळ्याची देणगी आहे त्याला. शिकायचं म्हणतो आहे.
भरत, जनरल त्या प्रसंगाचा/गाण्याचा भाव चित्रित करायचा प्रयत्न करतानाच त्याचा ध्वनी-स्वभाव (फोनेटिक एलिमेन्ट) जपायचा प्रयत्न केला आहे, ओळीगणिक भाषांतर नाही.
) त्यामुळे तो पैलू अधिक कसोशीने सांभाळायचा प्रयत्न केला.
तमिळ गाणं ऐकलंत तर त्यात कुठेही कानांवर आघात करणारी किंवा लय अडखळेल अशी व्यंजनं येत नाहीत. लाटांवर सोपवून दिलेल्या नावेसारखेच शब्द आणि सूर हेलकावे घेतात. एरवी कविता लिहिताना फोनेटिक एलिमेन्टचा इतका विचार केला जातोच असं नाही, (आणि हिंदी गाण्याला त्यावरूनच नाक मुरडलं होतं
अनु, बघते काही सेव्ह्ड असेल माझ्याकडे तर.
>>> टेलिफोन धून मे हसनेवालीकरण
फा
मॅजिकल काहीतरी वाटलं ऐकून.
मॅजिकल काहीतरी वाटलं ऐकून. मूळ गाणं किंवा चित्रपट/ कथा अजिबात माहित नाही. पण ती हुरहुर शब्दातून आणि गाण्यातून पोहोचते आहे.
आदित्यला श्वासाची जाणही उत्तम आहे. त्याला आवर्जुन शिकायला पुश कर.
भारीच! तुमचे गीत लेखन सुरेख
भारीच! तुमचे गीत लेखन सुरेख आहेच पण आदित्यचे खास कौतुक! छान मराठी उच्च्चार. गाण्याचे फॉर्मल शिक्षण न घेताही इतका सुंदर गायला आहे! माय-लेकराचा हा प्रोजेक्ट फार आवडला. असेच अजून प्रोजेक्ट होवोत. आदित्यने गाणे शिकायचे खरेच मनावर घ्यावे.
हे जे काही आहे ते एकदम मस्त
हे जे काही आहे ते एकदम मस्त जमले आहे !
गुणगुणगुण तनभर धुन लहर लहर झाली
ही ओळ आवडली, कागदावर व गळ्यातून दोन्हीही.
अप्रतिम! काय सुंदर गीत लिहिले
अप्रतिम! काय सुंदर गीत लिहिले आहे, आणि आदित्य ne केवढे अप्रतिम गायले आहे!
मूळ गाणे मी आज पहिल्यांदा ऐकले पण हे मराठी गाणे जास्त भिडले! रहमान chi गाणी हळूहळू चढत जातात. तसेही त्याचे नवीन गाणे खूप वर्षांनी ऐकले
अभिनंदन! रहमान la insta वर tag kara
मुळ गाणे आवडीचे आहे..
मुळ तमिळ गाणे आवडीचे आहे..
आणि हे मराठीकरण पण फारच आवडलं....भारीच!!
आमची तीन कुलदैवतं एकत्र!
आमची तीन कुलदैवतं एकत्र!
सर्व नवीन अभिप्रायदात्यांचे
सर्व नवीन अभिप्रायदात्यांचे आभार.
>>> रहमान la insta वर tag kara
हो, माझ्या मैत्रिणींनीही सुचवलं तसं. माझ्या ध्यानात आलं नव्हतं. करते.
व्वा, सुंदर ! शब्द आणि गायन
व्वा, सुंदर ! शब्द आणि गायन सुद्धा !
मूळचे तमिळ गाणे माहित
मूळचे तमिळ गाणे माहित नसल्यामूळे नुसते गाणे म्हणून मस्त वाटले - गायलय पण सुरेखच !
असामी, तू रहमानचे तमिळ गाणे
असामी, तू रहमानचे तमिळ गाणे ऐकलेले नाहीस असे कसे झाले?!

धन्यवाद!
Omg, स्वाती ताई, मी हे गाणे
Omg, स्वाती ताई, मी हे गाणे ऐकायच्या निमित्ताने ps1 chi गाणी ऐकायला लागले अणि omg, I am hooked. रहमान in his glory! नकुल अभ्यंकर म्हणुन कोणी मराठी पण आहे वाटते त्याच्या band मध्ये (आपली खोड कोणी मराठी आहे का ते पहायची
आता ps1 पाहणे आले. धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल!
असामी, तू रहमानचे तमिळ गाणे
असामी, तू रहमानचे तमिळ गाणे ऐकलेले नाहीस असे कसे झाले? >> हो ना - कसे काय कोण जाणे हे राहूनच गेले
ह्या निमित्ताने वीकेंड ला बघू नि ऐकू (नि ऐकतच राहू) 
सुंदर झालंय गाणं! मूळ ऐकलं
सुंदर झालंय गाणं! मूळ ऐकलं नाही अजून. आता ऐकते. आदित्यचा आवाज फार छान आहे.
Pages