प्राजक्त

Submitted by अनिरुद्ध अग्निहोत्री on 17 April, 2023 - 10:08

कुठे निघाला तूच तुझ्या वाचून असा घाईत..?
किती आर्त ते शब्द दाटले तुझे तुझ्या शाईत...

रंगले दंगले तरी ना कळले तुला हे जीवन गाणे,
मनात असतो सूर तू शोधे भवती प्राणपणाने...

उमग स्वतःला त्यातच सारे ब्रम्हज्ञान समजेल,
नकळत अंती काळोखातून ज्योत नवी उजळेल..

एक सत्य अन तू ही एकला, द्वैत हे अद्वैताचे,
स्वर्गीय वृक्षापरी विश्व हे, फुल तू प्राजक्ताचे..!

-अनिरुद्ध

Group content visibility: 
Public - accessible to all site users