आशियाना विदाउट भटारखाना

Submitted by अनिंद्य on 27 March, 2023 - 06:03

* * *
- प्रेसेंटेशन झकास आहे. किंमत किती असणार एका फ्लॅटची साधारण ?

- सात कोटी पासून सुरु

- म्हणजे फक्त श्रीमंत लोकं राहणार ना. त्यांना चालेल असे ‘किचनलेस होम’. नवरा बायको दोन्ही मोठ्या पदांवर काम करणारे, भरपूर पैसे कमावणारे. खूप आहेत असे कपल्स आपल्या बंगळुरूत. तेच घेतील तुझे फ्लॅट.

- तसं नाही, काही व्यापारी आणि संयुक्त कुटुंब असलेल्यांनाही इंटरेस्ट दाखवलाय.

- दाखवणारच ! व्यापारी म्हणजे स्थानिक नसणारच. श्रीमंतांच्या बायका नाहीतरी कामचुकार असतात. खायचे-प्यायचे-ल्यायचे-मिरवायचे-लोळायचे हेच त्यांचे काम. पैसा भरपूर असतो ना. गरजच नसते काही काम करायची.

- कित्ती प्रिजुडाईसेस तुझे गं आक्का !

- असेनात का. बोगस आयडिया आहे तुझी किचनलेस होम ची.

* * *

- पण करायचीच कशाला अशी उठाठेव. आशियाना विदाउट भटारखाना? किचनलेस होम म्हणे. जगतो आपण पोटासाठी. स्वतःला हवे तसे करून खाता येत नसेल तर काय उपयोग अशा मोठ्या राजेशाही घराचा?

- अरे मित्रा, प्रत्येक घरात नसले तरी मोट्ठे कॉमन किचन आहे ना प्रकल्पात. चोवीस तास सुसज्ज, अत्याधुनिक रुफटॉप किचन. चहा, नाश्ता, जेवण-खावण, दारू, आईस्क्रीम, पिझ्झा पास्ता, दहीबुत्ती विथ अम्मा स्टाईल मँगो पिकल ...सगळे मिळणारी जागा. नावही तसेच ठरवलेय मी. ‘फूड कामधेनू’ ! मागाल ते मिळेल या सामायिक किचनमध्ये. मग का पाहिजे प्रत्येक फ्लॅट ला वेगळे किचन ?

- शेवटी ते हॉटेल ना ? कधीतरी घरी पटकन करून खायला किचनेट तरी हवे ना ? आणि रात्रीबेरात्री कुणी आले तर ?

- सर्व विचार केलाय माझ्या टीम नी. चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल. फोनवर सांगितले तर मागाल ते घरी आणून देईल आमचा स्टाफ. रिझनेबल रेट मध्ये. चोवीस तास. हवे तेव्हढे. जब और जितना आप चाहो. और क्या चाहिये ?

- तरी घराची सर नाही यायची या सेटअपला. हॉटेल वाटेल ते, घर नाही.

* * *

- पण हवे तेव्हढे नोकर मिळतात. पैसे टाकले की स्वयंपाक करायला घरी लोकं येतात. आपल्यासमोर आपल्याला हवा तसा स्वयंपाक करून देतात. हे काय वेगळे असणार?

- असतं. किचन म्हणजे फक्त दोनवेळा स्वयंपाक असतो का? तुमच्या मावशी ग्रोसरी आणतात की तुम्ही स्वतः ? कोण सॉर्टींग-स्टोअरिंग करतं ? भाज्या आणि फळे ? रोजचा मेन्यू स्वतःच ठरवतात की तो ठरवायला ऑफिसच्या गंभीर मीटिंगमध्ये तुम्ही असतांना मधेच फोन करतात ? टूरवर असतांना आज मुलांचे-नवऱ्याचे जेवणाचे डबे तुम्हाला आठवत असतात का ? ज्यूस कोण तयार करतं ? बर्फासाठी फ्रीजमधे पाणी ट्रे कोण लावतं ? फ्रीझ ची स्वच्छता कोण करतं ? गार्बेज कोण रिकामं करतं ? त्यात किचनशी संबंधित कचरा किती असतो? पेस्ट कंट्रोल ? ते कोण बघतं ? भांडी घासणे? त्यासाठीची उस्तवार ? किचनची स्वच्छता ? मेंटेनन्स? कुकिंग रेंज, ग्रिल-मायक्रोवेव्ह, गॅस सिलेंडर, चिमनी, मिक्सर-ग्राइंडर-ज्युसर, रोटीमेकर, डोसा मेकर ….. सगळ्यांची खरेदी सफाई दुरुस्ती, ती कोण करतं ? उद्या डब्यात काय आणि संध्याकाळी काय आणि आज त्यासाठी करायची तयारी काय हे रोज कोण ठरवतं आणि करतं ?

- ऐकतेय मी. आगे बोलो

- बाईसाहेब, तुमच्या लक्षात येतंय का ? एका किचनने तुमचे सर्व जीवन व्यापून टाकले आहे. हजारो कामे तुम्हाला येऊन चिकटली आहेत. लाईक अ मॅग्नेट. आणि आता तुम्हाला ती सोडवत नाही आहेत. वन वे ट्रॅप. अभिमन्यू झालाय तुमचा. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया हा चक्रव्यूह भेदायला उत्सुक आहेत. माझा 'किचनलेस होम' प्रोजेक्ट अशा स्त्रियांसाठी वरदान आहे. विचार करा तुम्ही.

- काही पुरुष करत असतील घरची कामं. सगळेच काही ऐतखाऊ नसतील. बऱ्याच स्त्रिया बाय चॉईस होम मेकर असतील ना ?

- असं बघा मॅडम, जगाच्या पाठीवर एकूण पुरुष ३९७ कोटी तर महिला ३९० कोटी, म्हणजे साधारण ५०% प्रत्येकी. त्यातले प्रगत, समंजस, लिंगनिरपेक्ष, घरकाम करणारे किंवा त्यात मदत करणारे दोन-पाच टक्के पुरुष सोडले तरी जगभरात आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा वेळ हा चूल आणि मूल सांभाळण्यात जातो. मूल बाजूला ठेवू थोडावेळ, तरी अर्ध्या लोकसंख्येचा चुलीपाशीचा वेळ अन्यत्र अधिक चांगल्याप्रकारे गुंतवला तर एकूणच मानवजातीचे कल्याण होईल. प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, नवनवे शोध लागतील, जगणे सुकर होईल.

- समज मला आवडच आहे स्वयंपाकाची तर ?

- ज्या स्त्री-पुरुषांना स्वयंपाकाची आवड आहे ते इतरांसाठी करतील, त्यांना पैसे मिळतील आणि आवडीचे काम करण्याचा आनंदही.

- पटतंय का ?

- नाही.

* * *
AA96C183-FA63-4369-AFB8-18770A64E0BC.jpeg

* * *

- अरे आय वॉन्ट टू गिव्ह यू अ हग फॉर धिस ! तू तर स्वर्ग साकारणारा देव वाटतोस मला. तो कोण होता नवी सृष्टी रचणारा ऋषी ? वसिष्ठ ?

- नाही, विश्वमित्र होता बहुतेक.

- त्याचे होते ना सर्व कस्टम मेड ? भन्नाट आयडिया आहे - आशियाना विदाउट भटारखाना. मी जग फिरते पण कान्ट कीप अवे द किचन फ्रॉम माय माईंड. मी ठरवले तरी माझे कुटुंब मला ते विसरू देत नाही. ५-६ दिवस ‘ऍडजस्ट’ करतात म्हणे अन मी घरात पाय ठेवला की फर्माईशी कार्यक्रम चालू. डार्लिंग भाकरी ठेचा तुझ्या हातचा... ममा बटर चिकन तुझ्या हातचे...सुनबाई प्रसादाला शिरा सोवळ्यातला, तूच कर गं .. अरे मी काय मशीन आहे काय ? काय फायदा माझ्या शिक्षणाचा, लठ्ठ पगारी नोकरीचा आणि माझ्या कामातल्या हुशारीचा ? मी घरात आले की किचनमध्ये मला ढकलायला सगळे सज्ज. वर प्रेमळपणे सगळे. नाही म्हणायला मलाच गिल्ट यावा अशी नाकेबंदी. नकोच ते किचन. सर्वांना सर्व देणारी तुझी कामधेनू हवी. वा भाई वा. तूने मेरा दिल जीत लिया. मला धर रे तुझ्या बुकिंग लिस्ट मध्ये.

- जरूर. वेलकम टू अवर किचनलेस होम फॅमिली.

- स्त्री, तिचे घर, तिचे कुटुंब, कुटुंबातील स्थान झालच तर समाजातील स्थान सगळेच 'किचन' आणि स्वयंपाक याला कसे जोडता येईल ? हुषार कमावत्या बाईने घरी येताच पदर खोचून कामाला लागावे, सगळ्यांना आवडणारा गरमागरम स्वयंपाक करावा. सगळे घर कसे तृप्त होते. घराला घरपण येते. हेच काम पुरुषाने एखाद्याच दिवशी केले तर तो दिवस सणाचा, स्त्रीसम्मानाचा ? माय फुट.

- माझा एक प्रश्न आहे. हे सगळे मास्टर शेफ संजीव कपूर, रणवीर ब्रार, विकास खन्ना, कुणाल कपूर काम संपवून घरी जातात तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण करतं ? ते तर स्वतःच एक्स्पर्ट ना ?

- यू सिंग माय सॉंग बडी. लव्ह द साउंड ऑफ युअर वर्ड्स.

- तू तर जगभर फिरतेस, अमेरिकेतही लॉन्ग स्टे. तिकडे काय आहे परिस्थिती ?

- अमेरिकेत ? सेम. थोडे सटल आहे तिकडे, पण आहे हेच. बेकिंग युअर फ्रेश कुकीज. अमेरीकानो. विथ आफ्टरनून टी / कॉफी. उत्तम अमेरिकन फर्स्ट लेडी होण्याचं क्वॉलिफिकेशन आहे ते. हिलरी क्लिंटन असो की मिशेल ओबामा. अपेक्षा असतातच त्यांच्याकडून किचन सांभाळण्याच्या. डिफेन्स काय तर म्हणे त्यांच्या दिमतीला एवढे नोकरचाकर असतात, दिले थोडे लक्ष तर काय बिघडले ?

- पण तुला माहिताय का ? याच अमेरिकेत मोठ्या शहरातल्या १९२० सालापूर्वीच्या घरांमध्ये किचन नव्हतेच. सर्वांचे एकच सामायिक किचन. सगळे लंगर का खाना वाले. नो किचनेट टू. पण पुढे रशियन असेच कम्यून बांधतात म्हणून अमेरिकेत किचनलेस हाऊसिंग ही शिवी झाली म्हणे. सामायिक किचन म्हणजे रशिया, त्यांची कम्युनिस्ट थेरं. बंद पडला तो प्रकार आणि बायका जुंपल्या गेल्या घराघरातल्या किचन कामात. ऐकलं का तू आधी कधी हे ?

- नाही ऐकले हे आधी. बराच रिसर्च केला आहेस. आय एम इन. माझं बुकिंग नक्की, पटवते मी घरात सगळ्यांना.

* * *

- चिन्नू, हा विचार वेगळा आहे बेटा. कोण ती बया ? काय तरी नाव म्हणे –

- आना पुईजानेर ..

- आर्किटेक्ट? कुठं अमेरिकेत राहते का ती ?

- नाही अम्मा, स्पेन.

- तेच ते सेमच रे. गोऱ्या लोकांची थेरं. नकोच आपल्याकडे हे.

- किती रे वय तिचं ?

- असेल तिशीची -फार तर पस्तीस.

- किचनलेस होम या कल्पनेसाठी तिने जगभर फिरून अभ्यास केला अम्मा. स्वतः तसे प्रॉजेक्ट उभारलेत. उत्तमरीत्या चालवलेत. तिला पुरस्कार मिळालेत भरपूर आणि पुढील कामासाठी फंडिंग सुद्धा.

- फार इंप्रेस झालेला दिसतो माझा बिल्डर मुलगा.

- होय अम्मा, मला तिचा विचार पटतो आहे. शिवाय किचनलेस होम हा चांगला मार्केटिंगचा मुद्दा ठरेल असे माझ्यातला बिझनेसमन मला सांगतोय अम्मा.

- पण आता आमच्यावेळसारखं नाही चिन्नू. जात्यावरचं दळण, पाटा वरवंटा, खलबत्ता जाऊन आता किती सोयीचा झालाय स्वयंपाक ? आपल्याच घरातले ग्याजेटस बघ. नाही का पुरेसे ?

- कितीही नवनवीन उपकरणे आणि सोयीसुविधा आल्या तरी महिन्याकाठी किचनमध्ये लागणार वेळ फार कमी काही झालेला नाही. घर आणि विशेषतः किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यामध्ये दिवसाचा आणि आयुष्याचा एक फार मोठा भाग खर्च होतो. बहुतेक जागी हा वेळ आणि हे श्रम स्त्रियांचे असतात.

9009E5EC-FB61-4100-A1D6-4E52E675E1F2.jpeg

- व्हॉट अबाऊट द फूड रुटीनस चिन्नू ? सच लव्हली फूड रिच्युअल्स, एज ओल्ड. डीप रूटेड इन अवर प्राउड हेरिटेज ! व्हॉट अबाऊट देम ? आपलं घर अन्नाभोवती फिरतं. सगळ्यांच्या पसंतीचे खाणे-पिणे यात मजा नाही का ?

- ते काम घरातच स्वतः एकाच व्यक्तीने आयुष्यभर करत राहावे हा हट्ट का ? आमच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल म्हणून तू धड ४ दिवस माहेरी तरी राहिलीस का अम्मा ?

- एक सांगू ? वेडी आहे ती कोण आना का फाना पुईजानेर. तिला काय आम्हा सर्व बायकांपेक्षा जास्त समजतं का ? केस उन्हात पांढरे नाहीत केले हे. स्वयंपाक आणि अन्न घराला बांधून ठेवते. चार दिवस घरी स्वयंपाक नाही झाला तर बाहेरचे खाऊन आजारी तरी पडतील नाही तर कंटाळतील तरी. स्वयंपाकघराविना कसले घर? घराचे हॉटेल होईल.

- आपल्याकडे नाही पण अनेकांकडे घरातले किचन म्हणजे धगधगते अग्निकुंड. ठिणगी पडायचा अवकाश की युद्ध सुरु. टीव्हीवरच्या तुझ्या त्या दळणदळू मालिकांमध्ये किचन आणि डायनींग टेबल हा कट कारस्थानाचा आणि खलबतांचा अड्डा म्हणूनच दाखवले जाते, ते उगाच नाही अम्मा. अनेक कुटुंबात, विशेषतः मोठ्या संयुक्त कुटुंबात अन्न आणि स्वयंपाक याचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जातो. तिथे किचनचे रणांगण होते. फार दूर कशाला मुत्थुमामाकडेच बघ.

- माझ्या माहेरच्या लोकांबद्दल बोलायचं काम नाही चिन्नू. आणि ऐक, असे तर कुणीच कुणासाठी काही करायला नको मग. सगळेच मोल देऊन विकत घ्या. भावना, ओलावा, एकमेकांबद्दल प्रेम राहील का लोकांमध्ये ?

- अम्मा, प्रेम फक्त एखाद्यासाठी स्वयंपाक करून दिला तरच आणि त्यातच असतं का ?

- नॉट दॅट वे चिन्नू, पण प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे ऐकलंय ना ?

- क्लिशे.

- क्लिशे ईज क्लिशे फॉर अ रीझन चिन्नू बेटा.

* * *

15445DD4-7299-4384-8FBC-D41E1DC7B4F9.jpeg

- मैं हुसैन. और ये है डॉ. नफिसा, मेरी मंगेतर. वी आर गेटिंग मॅरीड नेक्स्ट मंथ. माझा एक्स्पोर्ट बिझनेस आहे आणि नफिसा नेफ्रोलॉजिस्ट, मुंबईतच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. मेरे चाचा हैं मोहम्मद वाजुद्दीन जिनका आपने जिक्र किया.

- तुमचे चचाजान सांगत होते की तुम्ही आधीच ‘किचनलेस होम’ वाले आहात, खरे का ?

- हो, साधारण २००८ सालापासूनच.

- वॉव. कसे जमवले ? घरातल्या लोकांना कसे पटवले ?

- पटवायचे काय त्यात ? हिचे आणि माझे आई- बाबा दोघे डॉक्टर आहेत. फुलटाईम वर्किंग कपल्स. आमच्यासारखेच. सगळ्यांना सोयीचं आहे किचनलेस होम.

- पण मुळात ही आयडिया आली कशी ?

- मैं बताती हूं. आमचा बोहरा मुस्लिम समाज व्यापार आणि शिक्षण दोन्हीकडे आधीपासून पुढे आहे. सर्वांनीच, विशेषतः स्त्रियांनी भरपूर शिकावे आणि पूर्णवेळ व्यवसाय-नोकरी करावी यावर आमच्या समाजाचा भर आहे. मॅनेजिंग किचन अँड फुलटाईम करियर डोन्ट गो हॅन्ड इन हॅन्ड.

- मग ? तुमची संस्था FMB, त्याबद्दल तुमचे काका सांगत होते ते काय ?

- आमचे धर्मगुरू सैय्यदना. समाजाचे मार्गदर्शक, आमचे मौला, वली, खलिफा. ५२ वे धर्मगुरू सैयदाना बुऱ्हानुद्दीन यांच्या कल्पनेतून फैझ-अल-मावैद-अल-बुरहानीया म्हणजे FMB हे अन्नछत्र सुरु झाले आधी. गरिबांसाठी फुकट खाना. रोज, दिवसातून तीन वेळ. समाज श्रीमंत असल्यामुळे लोकांना 'फुकट' अन्नाची गरज कमी. सैयदना स्वतः स्रियांनी स्वयंपाकघरातून मुक्त होऊन स्वतःच्या व्यवसायाकडे आणि करियरकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे या मताचे. त्यामुळे पुढे सर्वांसाठीच 'तयार' खाना दिवसातून १-२-३-४ वेळेला, जसे हवे तसे उपलब्ध करून द्यावा यावर त्यांचा भर. ब्रेकफास्ट, लंच, मिड इव्ह स्नॅक्स, डिनर. दॅट वॉज द स्टार्ट.

- सर्वांना फुकट ?

- नाही. फुकट घेणे आम्हाला कमीपणाचे वाटते. ठराविक रक्कम महिन्याला भरून ही सोय मिळवता येते आणि आर्थिक अडचण असेल तर विनामूल्य. सर्व सधन कुटुंबे पैसे देतांना स्वतःतर्फे काही जादा पैसे भरून अन्य कोणाला तेच अन्न कमी पैश्यात किंवा विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था करतात. गुप्तपणे. थोडे क्रॉस सबसिडी सारखे. अन्नासाठी पैसे कमी पडलेच तर समाजाच्या संयुक्त फंडातून दिले जातात.

- वा. म्हणजे घरी किचन नाहीच ? किती लोक वापरतात ही सोय ?

- भरपूर. साधारण १ लाख बोहरा मुंबईत राहतात. फोर्ट भागात बद्री महल हे समाजाचं मुख्यालय आहे, तेथून हे कामकाज चालते. आम्ही लोकं स्वतःच्या कामातून वेळ काढून 'सेवा' म्हणून काम करतो. अन्न शिजवायला, त्याचे पॅकिंग आणि वाटप करायला पगारी सेवक मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत, त्यामुळे काम सोपे आणि व्यावसायिक पद्धतीने होते. आहारतज्ञ महिन्याचा मेन्यू बनवून देतात, समाजातील लोक वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या, स्वच्छतेच्या आणि एकूणच कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे काम करतात.

- जास्त कमी नाही होत का ? वेस्टेज वगैरे ?

- त्यासाठी एक 'दाना कमिटी' आहे. सर्व लोकांना जेवण पाठवले की उरलेल्या अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाही. ते अन्न गोरगरिबांना विनामूल्य वाटतो, अगदी खाली सांडलेल्या अन्नाचे कण नीट गोळा करून मांजरी आणि पक्ष्यांसाठी ठेवतो आम्ही.

- मुंबईबाहेरच्या लोकांचं काय ?

- जिथे जिथे समाजाची पुरेशी संख्या आहे तिथे आहे ही सोय. गुजरातमध्ये राजकोट सारख्या छोट्या शहरात २२०० बोहरा परिवार आहेत आणि त्यांना सोयीच्या ठिकाणी ५ वेगवेगळी कम्युनिटी किचन आहेत. राजस्थानातल्या कोटा शहरात १५०० बोहरा एकाच भागात राहत असल्याने एकच मोठे किचन त्यांना पुरेसे आहे. सुरत, खंबात, पाकिस्तानात कराची, श्रीलंकेत कोलंबो, सब जगह शुरू है. दिन में चार दफे. घरमें किचन नही है, किचनलेस होम इज अ रियालिटी !

- अरे यार. माझे 'किचनलेस होम' वाले अपार्टमेंट्स म्हणजे काही नवीन नाही. यू गाईज आर ऑलरेडी डुईंग इट लाईक अ प्रो. आशियाना विदाउट भटारखाना !

* * *
तर मित्रांनो, बिल्डर चिन्नू उर्फ चिन्नासामी आणि त्याच्या गोतावळ्यातला हा संवाद संपला नाहीये अजून. जितने मुंह उतनी बातें. चर्चा सुरूच आहे, ती तुम्ही पुढे न्या; तुमचे, तुमच्या मित्रांचे, कुटुंबियांचे, कल्पनेतल्या मित्रांचे मत - संवाद लिहा. थोडे विचारमंथन होईल, झाली तर चिन्नूला मदतच होईल. व्हॉट से ?

* * *

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयडिया चांगली आहे सावली. पण ऑफिसमधून जाऊन आपण कशाला रांधा असा प्रश्न पडलाच. स्वतःच्या हातची चव वगैरे कबूल आहेच. मेबी शेफला माझ्यासमोर कर असं म्हणता येईल. त्यात ऑफिसमधून गेल्या गेल्या शेफने गरम चहाचा कप हातात ठेवून बघा मी कशी करतो/करते म्हटलं तर आणखीनच बेस्ट.

हो सायो
शेफ ने करणं हा ऑप्शन तिथे पण असेल ( म्हणजे होता प्लॅन मध्ये. की तुम्ही हवी तर रेसिपी द्या , आम्ही रांधतो)
पण अनेकांना आपण करण्यात इंटरेस्ट असतो किंवा रेस्टॉरंट मधून आणलेलं नको वाटतं तर त्यासाठी हे extended kitchen जे तुमच्या घराचा भाग आहे पण घरात नाही.
यात मदतनीस आहेत, पण त्यांना रोजचा पगार देऊन मॅनेज करणं नाही.
आणि घरात फुकाची कामं, कटकटी, नाहीत.

एकूण वर्कलाइफ बॅलन्स हा मुद्दा मध्यमवर्गियांनाच सतावतो असा माझा ग्रह झालेला आहे. म्हणजे 'वर्किंग विमेन' हा शब्दप्रयोगदेखील उदयाला येण्याआधी माळणी-कोळणी दुकानं मांडत होत्या आणि शेतकरी कातकरी बायका कामावर जात होत्या, हो ना? त्या कसं करत होत्या?
सधन वर्गाला सगळीच कामं सहजच डेलेगेट करता येतात, त्यामुळे हा प्रश्न येत नसावा.

@ सावली,

तुमचा प्रोजेक्ट शेयरल्याबद्दल आभार. लिमिटिंग द एक्सपोजर Happy छान.

जपानमध्ये जागेची टंचाई, विश्वयुद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि वैशिट्यपूर्ण समाजरचना अशा अनेक मुद्द्याचं जालीम रसायन 'घर' आणि 'स्वयंपाकघर' दोन्हीकडे प्रभावी असावे. तिकडे बांधकाम क्षेत्रात 'टोकियो नोमेड गर्ल' स्कूलवाले वि. Matabolist infrastructure वाले असा जोरदार सामना रंगला होता त्याबद्दल वाचलेय Happy

धन्यवाद अनिंद्य

(((टोकियो नोमेड गर्ल' स्कूलवाले वि. Matabolist infrastructure वाले असा जोरदार सामना रंगला होता त्याबद्दल))) याबद्दल वाचले नाहीये.

वरील कल्पना प्रायव्हसी जपणाऱ्या जपानी लोकांना सहजी पटली नव्हती पण. ( तिथल्या जपानी इंटेरियर स्कूल मधलेच प्रॉजेक्ट होते) खरंतर तिथे विशेष प्रसंगी वापरता येणारी पब्लिक किचन किंवा हॉल असतात पण मी वर लिहिलंय तसा वापर असलेलं किचन त्यांना रूचलं नव्हत.

माळिणी कोळिणींची आयुष्य फारच साधी होती, अजून असतील. पिक अप्स्/ड्रॉप ऑफ्स, बड्डे पार्ट्या अन मुलांसोबत क्वालिटी टाइम ही काही उदाहरणं आधुनिक वर्किंग वुमन्स करत असतील अशा गोष्टींची. मला असं वाटतं ज्या घरातले अ‍ॅदल्ट्स बरोबरीनं कामं वाटून घेतात त्या घरांमध्ये हा प्रश्न कमी भेडसावत असणार. घरची दारची सगळी किंवा जास्तीत जास्त कामं त्या वर्किंग वुमनवर पडत असतील तर कुठला आलाय बॅलन्स. आणि स्वयंपाकघर समजा नसलं तरी लॉन्ड्री, आवराआवरी, इ इ असंख्य कामं असतातच की घर म्हटल्यावर. त्यांचं काय करायचं?

बाकी चार घटकपदार्थ घेऊन त्याच्यापासून काही चविष्ठ पदार्थ बनवणे हा प्रकार फक्त मनुष्यजात करू शकते, त्याच्यावरच पहिला घाला आणि कशासाठी तर म्हणे बायांवर काम कमी पडावं? अजिबात पटलं नाही. बायांवर पडायची ती कामं पडतीलच वर 'आता तर स्वयंपाकाचं पण काम नसतंय तुझ्या वाटेला' असं ऐकवून २-४ कामं इतर कुणी करत असतील तर ती पण बायांवर ढकलायला कमी करणार नाहीत. शक्य तेवढे स्वावलंबन, घरातल्या जबाबदार्‍या वाटून घेणे अशी साधी वाट सोडून किचनच काढून टाकून गैरसोय तेवढी वाढवायची तर्‍हा आहे ही.

सामुदायिक किचनमध्ये हायजीन कोण बघणार? माझ्या घरात हात पुसायला एक आणि ताटं पुसायला एक असे दोन किचन-टॉवेल्स असतात. पाण्याच्या बाटल्यांसाठी वेगळी घासणी असते म्हणजे खरकट्याचा वास लागत नाही. चहाची आणि तुपाची वेगवेगळी गाळणी. अशा किती तरी गोष्टी आणि स्वच्चतेबाबतीत नियम अरारा! विचार करूनच नको नको झालं.

>>> घरची दारची सगळी किंवा जास्तीत जास्त कामं त्या वर्किंग वुमनवर पडत असतील तर कुठला आलाय बॅलन्स. आणि स्वयंपाकघर समजा नसलं तरी लॉन्ड्री, आवराआवरी, इ इ असंख्य कामं असतातच की घर म्हटल्यावर. त्यांचं काय करायचं?
प्रिसाइजली माय पॉइंट! ही कामं बायकांचीच असा ग्रह मध्यमवर्गातच जास्त आहे का? हे जजमेन्ट नाही, उलट त्यांची काय सिस्टिम असेल ती समजून घ्यायला हवी असं म्हणते आहे. त्यांना आपले व्याप नसतील, पण त्यांचे (आता आपण फाटा दिलेले असे) काही व्याप असतीलच की.

मला वाटतं बायकांचं शोषण हा मुद्दा इथे कानामागून येऊन अकारण तिखट झाला - त्यात माझाही हातभार लागला.
ही चर्चा लिंगनिरपेक्ष व्हायला हवी होती.
रोजच्या रोज घरात स्वयंपाक करणं ज्यांना शक्य नाही/आवडत नाही, त्यांच्यासाठी - बाया/पुरुष/एकटे/दुकटे/तरूण्/वृद्ध कोणीही - कम्यूनिटी किचन ही सोय चांगली आहे की नाही?

वरच्या सिंडरेलाच्या पोस्टशी पूर्ण सहमत.
स्पष्ट सांगायचं तर बिल्डरचे गोंडस नावाखाली आणि मेकिंग वर्ल्ड बेटर प्लेस हॅशटॅग खाली पैसे काढायचे धंदे आहेत. श्रीमंती चोचले, बाकी काही अर्थ नाही. असो.
अनिंद्य, त्यांना सांगू नका. Proud Wink (म्हणजे, त्यांना माहित असेल) Wink Light 1

घरगुती डबा आणि कम्युनिटी किचनमध्ये काय फरक आहे? आणि त्यासाठी किचन नकोच असं का? शिवाय त्या घराची रीसेल व्हॅल्यु कमी होणार कारण टार्गेट बायर ग्रूप छोटा होइल. बरं कोव्हिडसारख्यस साथीत काय करणार? एकुणातच फॅन्सी पण प्रॅक्टिकल नसलेलं प्रपोजल आहे.

>>> घरगुती डबा आणि कम्युनिटी किचनमध्ये काय फरक आहे?
माझ्या आकलनानुसार काहीच नाही, आणखी कन्व्हीनियन्स कदाचित - कारण हे तुमच्या बिल्डिंगमधेच असेल.
इथे चिन्नू यांचा टार्गेट कस्टमर आणि बोहरा समाजाचं उदाहरण परस्परविरोधी आहे - नाहीतर मी 'सर्वांना परवडेल असा पर्याय' असाही विचार केला होता.

बाकी प्रोफेशनल शेफ स्वच्छता का पाळणार नाहीत? त्यांच्या ट्रेनिंगचा भाग असतो तो. (प्रोफेशनल शेफच एम्प्लॉय केले जातील असं गृहित धरते आहे.)

घरगुती डबा इज मिडलक्लास. कम्युनिटी किचन कम्स विथ प्राईस टॅग.
कोणी घरी आलं की आरडर करायची, पावण्यांना मिडिआ रुम, पार्टी रुम मध्ये जसं घेऊन जातो तसं स्टेट ऑफ द आर्ट किचन मध्ये घेऊन जायचं. बडं घर पोकळ वासा. गिमिक आहे फक्त.

हेच जर स्वस्तात करायचं तर आळीपाळीने एका बाईने/पुरुषाने कुटुंबाने एका आठवड्यातल्या दिवशी मजल्यावरच्या 10 लोकांचा स्वयंपाक असं करता येईल Happy स्वस्तात काम होईल

आपण याकडे मध्यमवर्गीय चष्म्यातून बघतोय. ज्यांच्यासाठी ते आहे त्यांचा चष्मा मिळवून पाहणं कठीण आहे.
तसंच चिन्नूने दिलेल्या उत्तरातलं एक आणि दोन हे एकमेकांशी मेळ खात नसावेत, असं मला वाटतं.
घरगुती जेवणाच्या डब्यात मेन्यु डबावाले ठरवतात. हे हॉटेलसारखं आहे. तुम्ही रूम सर्व्हिसला सांगून हवं ते मागवू शकता.

आणि हे जर इतकं हाय फाय आहे तर त्यांची सर्व्हिस, स्वच्छता इ. चे स्टँडर्ड तसे ठेवण्याची अपेक्षा करता यावी.
------
Anna Puigjaner यांची मूळ संकल्पना वेगळी आहे. टारगेट पॉप्युलेशन वेगळं आहे. मी उडत उडत वाचलं. पण तिथे किचनलेस घरांमुळे घरांच्या किंमती कमी व्हायला हव्यात. घरात लहानसं किचनेट असेल. ( आपल्याकडेही किचन रूम लहान लहान होत आहेत).

नवीन Submitted by mi_anu on 31 March, 2023 - 11:01>>
असे अमेरीकेत चालायचे सबडिविजन्समधून पण मग कोविड आला आणि ....

बाकी प्रोफेशनल शेफ वगैरे कितीही म्हटले तरी कमर्शिअल किचनमधली स्वच्छता म्हणजे दृष्टी आड सृष्टी. सदनिका रेंटल असल्यास जरा तरी गुणवत्ता राखली जाईल, विकत घेतल्यावर नव्याचे नऊ दिवस असे व्हायचे.

आम्ही मिडवेस्ट मधल्या एका युनिवर्सिटी टाऊनमधे एक अपार्टमेंट कॉप्लेक्स बघितला होता २०१६ मधे. त्यांच्याकडे ब्रेकफास्टसाठी कम्युनिटी किचन होते. ब्रेकफास्ट फ्री वाल्या हॅंप्टन इन पेक्षा जरा वरचा सेटअप होता. $१००० डिपॉझिट वेटिंग लिस्टसाठी होते. अपार्टमेंट्स मात्र व्यवस्थित किचनवाली होती.

>>> Anna Puigjaner यांची मूळ संकल्पना वेगळी आहे. टारगेट पॉप्युलेशन वेगळं आहे. मी उडत उडत वाचलं.
हो, मीही तुम्ही दिलेल्या त्या लिंक्स फक्त चाळल्या, पण त्या चिन्नूच्या संकल्पनेपेक्षा निराळ्या आहेत.

एकूण वर्कलाइफ बॅलन्स हा मुद्दा मध्यमवर्गियांनाच सतावतो असा माझा ग्रह झालेला आहे. म्हणजे 'वर्किंग विमेन' हा शब्दप्रयोगदेखील उदयाला येण्याआधी माळणी-कोळणी दुकानं मांडत होत्या आणि शेतकरी कातकरी बायका कामावर जात होत्या, हो ना? त्या कसं करत होत्या? >>> मध्यमवर्गाला फक्त तो मांडायला व्यासपीठ व मोकळा वेळ आहे Happy या इतर बायका एकमेकींशी बोलत असतील कधीतरी पण वर्क लाइफ बॅलन्स हा आपापल्या कामाच्या क्षेत्रात ज्यांना काही आवाज उठवता येतो त्यांनाच आधी जाणवत व सतावत असेल. स्वतःच्याच शेतात दिवसरात्र काम करणार्‍यांना पर्यायच नाही आणि रोजंदारी ई. वर करणार्‍यांना तो जाणवला तरी आवाज उठवायला जागा नाही. कारण मुळात बेसिक हक्कच जेथे मिळत नाहीत तेथे हे काय मिळणार.

That covers almost entire urban population of the world ! ग्रामीण भागाबद्दल बोलत नाही कारण तिथे मी किचनयुक्त किंवा किचनलेस कोणतीच घरे बांधण्याची शक्यता नाही. स्त्रिया आणि किचन काम म्हणशील तर एकवेळ आमच्या बंगळुरुतल्या कब्बन पार्कात वाघ दिसेल, फक्त पुरुषच पूर्णवेळ किचन सांभाळत असलेले घर दिसण्याचा चान्स किती ? >>>>

हे म्हणजे एकदम "पोलिस नायतर काय चोर आहे?" विचारल्यासारखे झाले Happy "हे स्त्रियांचे व हे पुरूषांचे" यातली लाइन ब्लर होत चाललेली घरे मी माझ्या लहानपणापासून पाहिलेली आहेत. याचा अर्थ पुरूष पूर्णवेळ किचन सांभाळतील असा नाही. घरातले कोणतेही काम कोणीही करतात अशा अर्थाने. प्रत्येक अशा घरात याची वाटणी एकसारखी नसते. पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती "बहुतांश" समान असली म्हणजे झाले.

त्यांच्या आयुष्यात 'लाइफ' होतं का पण? सगळी लढाई सर्वायवलचीच.

स्वच्छतेचा मुद्दा त्या प्रोफेशनल शेफबद्दल नाही. तिथे आपल्याला हवं तेव्हा जाऊन काहीही करून घेता येइल असं वाचलं म्हणून मनात आधी हायजीन उभं राहिलं. घाणेरड्या सवयी आणि आर्थिक परिस्थिती यांचा काही संबंध नाही. नो डिस्क्रिमिनेशन ऑर बायास देअर Proud

बाकी, मध्यमवर्गाचा चष्मा लावून नाही बघतेय सगळ्याकडे. मी माझ्या घरात सगळी कामं स्वत: करतेय किंवा धा बाया/बाप्ये लावून करून घेतेय, महत्वाचा आहे कंट्रोल. आता तुम्ही म्हणाल बघा स्टाफ मॅनेज करायचं काम आलं ना तुझ्याकडे. पण ज्यांच्याकडे एवढी लोकं घरकामाला ठेवलीत त्यांच्याकडे एक जरा सिनियर लेवलचा/ची मॅनेजर असतो/ते.

>>> मुळात बेसिक हक्कच जेथे मिळत नाहीत तेथे हे काय मिळणार.
>>> त्यांच्या आयुष्यात 'लाइफ' होतं का पण? सगळी लढाई सर्वायवलचीच
होय, खरं आहे.

मला सिंडीचा हायजिनचा मुद्दाही पटला. प्रत्येकाचे अ‍ॅक्सेप्टेबल हायजिन निराळे Happy इथे स्वच्छता या अर्थाने नाही. ते लोक त्यांच्या दृष्टीने स्वच्छता पाळत असतात. पण आपल्याला टॉवेल्स, भांडी, चमचे ई चे आयसोलेशन लागते तसे दुसर्‍याला लागेलच असे नाही, त्यामुळे त्यांनी तसे केले नाही तर आपल्याला ते चालणार नाही.

इव्हन प्रोफेशनल लोकांचे स्वतःचे हायजिन लॉजिक ट्रेनिंगला ओव्हरराइड करते असे अमेरिकेतही पाहिले आहे. मीट वाला डाव्/चमचा भसकन व्हेज पदार्थात घालणे वगैरे. कारण त्यांना त्या दोन्हीमधे आयसोलेशन असावे असे वाटत नाही.

मग रेस्टॉ मधे कसे चालते? तेथे थेट पदार्थ आपल्या समोर येतो त्यामुळे त्याची हिस्टरी बघायची गरज पडत नसेल. इथे तसे होईल का माहीत नाही.

माझंही अमित आणि सिंडीसारखंच मत. कम्युनिटी कचन = स्त्रियांना आराम वगैरे मार्केटिंग गिमिक वाटते.
कोणीही हवे तेव्हा तिथे येऊन स्वयंपाक करणार म्हणजे हायजिन चा एक मुद्दा आहेच. पण मला स्वतःला पण कधीतरी काही छोटेसे जरी करायचे म्हटले तरी प्रायव्हसी हवी. हवे तेव्हा हवे ते करता यायला हवे, २० घरांमधे मिळून त्या सामायिक किचन मधे समज ४ मोठे मायक्रोवेव्ह आहेत पण मला हवे तेव्हा नेमके चारी ऑक्युपाइड आहेत ( सार्वजनिक लाँड्री सारखे फीलिंग आले ना?!) किंवा मला हवेय तेव्हा अजून पण कोणीतरी त्या किचन मधे लुडबुडतंय. किंवा "आता इतरांचे कम्युनिटी फूड बनवायला शेफ ने किचन बंद केले आहे तुम्हाला प्रायव्हेट कुकिंग करायचे तर अमूक वेळेतच किचन वापरता येईल" असे ही होऊ शकते ना? केवढी ती कटकट /गैरसोय झाली!

… तुम्ही टार्गेट कस्टमर नाही चिन्नूचे. केस क्लोज्ड…..,

अरे असे नाही. आपण बिनघोर आपले मत देऊच शकतो. छान मुद्दे येत आहेत चर्चेत. असं कुलुप का लावायचं ?

या सगळ्यात आमच्या सारखे कोणत्याही वेळी काहीही करणारे हरफन मौला लोक काय करणार?काम करताना खूप वैताग आला, चला ग्रील पनीर बनवून खा/चहा करून घ्या.
(अर्थात आम्ही 7 कोटी चं घर घेणार नाही त्यामुळे प्रश्नच मिटला.
या किचन ला आपल्या घरातून थेट दार हवं.मग बेस्ट.कधीही जाऊन पटकन शेफ कडून चहा बनवून आलं की झालं.,)

ओके अनिंद्य! Happy
शेफचा चहा आवडणारे का?
आज कामं संपत न्हवती तर दुपारी पटक्न पोटात ढकलायला रेडी टू ईट भेळेचं पाकिट होतं, तर पटकन कांटो चिरुन पाच मिनिटांत लंच केला. ते नसतं तर ओटमिल केलं असतं. आता सामानच नाही ठेवलं की कुठे बघायचं आम्ही? टी बॅग्ज्स कोपच्यात लपवाव्या लागणार का राजरोस चालणारेत? मावे ठेवायला रॅक आहे का? जेवण गरम तरी केलं पाहिजे ना? का गारच खायचं आहे? फ्रीज आहे का तो पण गेला? बर्फ हवा असेल, गार पाणी हवं असेल तर ते पण ऑर्डर करायचं का? जेवलेली भांडी घासायला सिंक आहे? डिशवॉशर आहे? का भांडी पण घेऊन जाणार ते शेफ?
आम्ही पै पै साठवून बरिस्ता सारखं एस्प्रेसो मशीन घेतलंय. त्या फेस बनवायचा असेल तर गार दूध लागतं. थोडी साखर आवडते कॉफीत. आणि कॉफी थंडगार आवडत नाही. पेपर कप मध्येही नको असते. आता कॉफी मशीन ठेवू का मार्केटप्लेस वर काढून टाकू. क्युरिग तरी चालेल का?

स्वाती Lol

या किचन ला आपल्या घरातून थेट दार हवं. >>> Happy प्रत्येकाने आपापल्या घरातून भुयारे बांधून घेतली आहेत असे डोळ्यासमोर आले Happy

मजल्यावरच्या 10 लोकांचा स्वयंपाक असं करता येईल Happy स्वस्तात काम होईल >>> यातील स्वस्तात काम होईल याबद्दल साशंक आहे. १० लोकांचा स्वयंपाक हे सब्जेक्टिव्ह आहे:
- महाराष्ट्रातील एक विशिष्ठ उपजात वि. महाराष्ट्रातील दुसरी एक उपजात यांचे "दहा लोकांचा स्वयंपाक" चे गृहीत प्रमाण
- विशिष्ठ शहर ते प्रत्येक बाबतीत त्याचे दुसरे टोक असलेले एक शहर यांचे पोर्शन साइज व तिखटाचे प्रमाण

याप्रमाणे ते बदलेल Wink

Pages