* * *
- प्रेसेंटेशन झकास आहे. किंमत किती असणार एका फ्लॅटची साधारण ?
- सात कोटी पासून सुरु
- म्हणजे फक्त श्रीमंत लोकं राहणार ना. त्यांना चालेल असे ‘किचनलेस होम’. नवरा बायको दोन्ही मोठ्या पदांवर काम करणारे, भरपूर पैसे कमावणारे. खूप आहेत असे कपल्स आपल्या बंगळुरूत. तेच घेतील तुझे फ्लॅट.
- तसं नाही, काही व्यापारी आणि संयुक्त कुटुंब असलेल्यांनाही इंटरेस्ट दाखवलाय.
- दाखवणारच ! व्यापारी म्हणजे स्थानिक नसणारच. श्रीमंतांच्या बायका नाहीतरी कामचुकार असतात. खायचे-प्यायचे-ल्यायचे-मिरवायचे-लोळायचे हेच त्यांचे काम. पैसा भरपूर असतो ना. गरजच नसते काही काम करायची.
- कित्ती प्रिजुडाईसेस तुझे गं आक्का !
- असेनात का. बोगस आयडिया आहे तुझी किचनलेस होम ची.
* * *
- पण करायचीच कशाला अशी उठाठेव. आशियाना विदाउट भटारखाना? किचनलेस होम म्हणे. जगतो आपण पोटासाठी. स्वतःला हवे तसे करून खाता येत नसेल तर काय उपयोग अशा मोठ्या राजेशाही घराचा?
- अरे मित्रा, प्रत्येक घरात नसले तरी मोट्ठे कॉमन किचन आहे ना प्रकल्पात. चोवीस तास सुसज्ज, अत्याधुनिक रुफटॉप किचन. चहा, नाश्ता, जेवण-खावण, दारू, आईस्क्रीम, पिझ्झा पास्ता, दहीबुत्ती विथ अम्मा स्टाईल मँगो पिकल ...सगळे मिळणारी जागा. नावही तसेच ठरवलेय मी. ‘फूड कामधेनू’ ! मागाल ते मिळेल या सामायिक किचनमध्ये. मग का पाहिजे प्रत्येक फ्लॅट ला वेगळे किचन ?
- शेवटी ते हॉटेल ना ? कधीतरी घरी पटकन करून खायला किचनेट तरी हवे ना ? आणि रात्रीबेरात्री कुणी आले तर ?
- सर्व विचार केलाय माझ्या टीम नी. चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल. फोनवर सांगितले तर मागाल ते घरी आणून देईल आमचा स्टाफ. रिझनेबल रेट मध्ये. चोवीस तास. हवे तेव्हढे. जब और जितना आप चाहो. और क्या चाहिये ?
- तरी घराची सर नाही यायची या सेटअपला. हॉटेल वाटेल ते, घर नाही.
* * *
- पण हवे तेव्हढे नोकर मिळतात. पैसे टाकले की स्वयंपाक करायला घरी लोकं येतात. आपल्यासमोर आपल्याला हवा तसा स्वयंपाक करून देतात. हे काय वेगळे असणार?
- असतं. किचन म्हणजे फक्त दोनवेळा स्वयंपाक असतो का? तुमच्या मावशी ग्रोसरी आणतात की तुम्ही स्वतः ? कोण सॉर्टींग-स्टोअरिंग करतं ? भाज्या आणि फळे ? रोजचा मेन्यू स्वतःच ठरवतात की तो ठरवायला ऑफिसच्या गंभीर मीटिंगमध्ये तुम्ही असतांना मधेच फोन करतात ? टूरवर असतांना आज मुलांचे-नवऱ्याचे जेवणाचे डबे तुम्हाला आठवत असतात का ? ज्यूस कोण तयार करतं ? बर्फासाठी फ्रीजमधे पाणी ट्रे कोण लावतं ? फ्रीझ ची स्वच्छता कोण करतं ? गार्बेज कोण रिकामं करतं ? त्यात किचनशी संबंधित कचरा किती असतो? पेस्ट कंट्रोल ? ते कोण बघतं ? भांडी घासणे? त्यासाठीची उस्तवार ? किचनची स्वच्छता ? मेंटेनन्स? कुकिंग रेंज, ग्रिल-मायक्रोवेव्ह, गॅस सिलेंडर, चिमनी, मिक्सर-ग्राइंडर-ज्युसर, रोटीमेकर, डोसा मेकर ….. सगळ्यांची खरेदी सफाई दुरुस्ती, ती कोण करतं ? उद्या डब्यात काय आणि संध्याकाळी काय आणि आज त्यासाठी करायची तयारी काय हे रोज कोण ठरवतं आणि करतं ?
- ऐकतेय मी. आगे बोलो
- बाईसाहेब, तुमच्या लक्षात येतंय का ? एका किचनने तुमचे सर्व जीवन व्यापून टाकले आहे. हजारो कामे तुम्हाला येऊन चिकटली आहेत. लाईक अ मॅग्नेट. आणि आता तुम्हाला ती सोडवत नाही आहेत. वन वे ट्रॅप. अभिमन्यू झालाय तुमचा. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया हा चक्रव्यूह भेदायला उत्सुक आहेत. माझा 'किचनलेस होम' प्रोजेक्ट अशा स्त्रियांसाठी वरदान आहे. विचार करा तुम्ही.
- काही पुरुष करत असतील घरची कामं. सगळेच काही ऐतखाऊ नसतील. बऱ्याच स्त्रिया बाय चॉईस होम मेकर असतील ना ?
- असं बघा मॅडम, जगाच्या पाठीवर एकूण पुरुष ३९७ कोटी तर महिला ३९० कोटी, म्हणजे साधारण ५०% प्रत्येकी. त्यातले प्रगत, समंजस, लिंगनिरपेक्ष, घरकाम करणारे किंवा त्यात मदत करणारे दोन-पाच टक्के पुरुष सोडले तरी जगभरात आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा वेळ हा चूल आणि मूल सांभाळण्यात जातो. मूल बाजूला ठेवू थोडावेळ, तरी अर्ध्या लोकसंख्येचा चुलीपाशीचा वेळ अन्यत्र अधिक चांगल्याप्रकारे गुंतवला तर एकूणच मानवजातीचे कल्याण होईल. प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, नवनवे शोध लागतील, जगणे सुकर होईल.
- समज मला आवडच आहे स्वयंपाकाची तर ?
- ज्या स्त्री-पुरुषांना स्वयंपाकाची आवड आहे ते इतरांसाठी करतील, त्यांना पैसे मिळतील आणि आवडीचे काम करण्याचा आनंदही.
- पटतंय का ?
- नाही.
* * *
* * *
- अरे आय वॉन्ट टू गिव्ह यू अ हग फॉर धिस ! तू तर स्वर्ग साकारणारा देव वाटतोस मला. तो कोण होता नवी सृष्टी रचणारा ऋषी ? वसिष्ठ ?
- नाही, विश्वमित्र होता बहुतेक.
- त्याचे होते ना सर्व कस्टम मेड ? भन्नाट आयडिया आहे - आशियाना विदाउट भटारखाना. मी जग फिरते पण कान्ट कीप अवे द किचन फ्रॉम माय माईंड. मी ठरवले तरी माझे कुटुंब मला ते विसरू देत नाही. ५-६ दिवस ‘ऍडजस्ट’ करतात म्हणे अन मी घरात पाय ठेवला की फर्माईशी कार्यक्रम चालू. डार्लिंग भाकरी ठेचा तुझ्या हातचा... ममा बटर चिकन तुझ्या हातचे...सुनबाई प्रसादाला शिरा सोवळ्यातला, तूच कर गं .. अरे मी काय मशीन आहे काय ? काय फायदा माझ्या शिक्षणाचा, लठ्ठ पगारी नोकरीचा आणि माझ्या कामातल्या हुशारीचा ? मी घरात आले की किचनमध्ये मला ढकलायला सगळे सज्ज. वर प्रेमळपणे सगळे. नाही म्हणायला मलाच गिल्ट यावा अशी नाकेबंदी. नकोच ते किचन. सर्वांना सर्व देणारी तुझी कामधेनू हवी. वा भाई वा. तूने मेरा दिल जीत लिया. मला धर रे तुझ्या बुकिंग लिस्ट मध्ये.
- जरूर. वेलकम टू अवर किचनलेस होम फॅमिली.
- स्त्री, तिचे घर, तिचे कुटुंब, कुटुंबातील स्थान झालच तर समाजातील स्थान सगळेच 'किचन' आणि स्वयंपाक याला कसे जोडता येईल ? हुषार कमावत्या बाईने घरी येताच पदर खोचून कामाला लागावे, सगळ्यांना आवडणारा गरमागरम स्वयंपाक करावा. सगळे घर कसे तृप्त होते. घराला घरपण येते. हेच काम पुरुषाने एखाद्याच दिवशी केले तर तो दिवस सणाचा, स्त्रीसम्मानाचा ? माय फुट.
- माझा एक प्रश्न आहे. हे सगळे मास्टर शेफ संजीव कपूर, रणवीर ब्रार, विकास खन्ना, कुणाल कपूर काम संपवून घरी जातात तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण करतं ? ते तर स्वतःच एक्स्पर्ट ना ?
- यू सिंग माय सॉंग बडी. लव्ह द साउंड ऑफ युअर वर्ड्स.
- तू तर जगभर फिरतेस, अमेरिकेतही लॉन्ग स्टे. तिकडे काय आहे परिस्थिती ?
- अमेरिकेत ? सेम. थोडे सटल आहे तिकडे, पण आहे हेच. बेकिंग युअर फ्रेश कुकीज. अमेरीकानो. विथ आफ्टरनून टी / कॉफी. उत्तम अमेरिकन फर्स्ट लेडी होण्याचं क्वॉलिफिकेशन आहे ते. हिलरी क्लिंटन असो की मिशेल ओबामा. अपेक्षा असतातच त्यांच्याकडून किचन सांभाळण्याच्या. डिफेन्स काय तर म्हणे त्यांच्या दिमतीला एवढे नोकरचाकर असतात, दिले थोडे लक्ष तर काय बिघडले ?
- पण तुला माहिताय का ? याच अमेरिकेत मोठ्या शहरातल्या १९२० सालापूर्वीच्या घरांमध्ये किचन नव्हतेच. सर्वांचे एकच सामायिक किचन. सगळे लंगर का खाना वाले. नो किचनेट टू. पण पुढे रशियन असेच कम्यून बांधतात म्हणून अमेरिकेत किचनलेस हाऊसिंग ही शिवी झाली म्हणे. सामायिक किचन म्हणजे रशिया, त्यांची कम्युनिस्ट थेरं. बंद पडला तो प्रकार आणि बायका जुंपल्या गेल्या घराघरातल्या किचन कामात. ऐकलं का तू आधी कधी हे ?
- नाही ऐकले हे आधी. बराच रिसर्च केला आहेस. आय एम इन. माझं बुकिंग नक्की, पटवते मी घरात सगळ्यांना.
* * *
- चिन्नू, हा विचार वेगळा आहे बेटा. कोण ती बया ? काय तरी नाव म्हणे –
- आना पुईजानेर ..
- आर्किटेक्ट? कुठं अमेरिकेत राहते का ती ?
- नाही अम्मा, स्पेन.
- तेच ते सेमच रे. गोऱ्या लोकांची थेरं. नकोच आपल्याकडे हे.
- किती रे वय तिचं ?
- असेल तिशीची -फार तर पस्तीस.
- किचनलेस होम या कल्पनेसाठी तिने जगभर फिरून अभ्यास केला अम्मा. स्वतः तसे प्रॉजेक्ट उभारलेत. उत्तमरीत्या चालवलेत. तिला पुरस्कार मिळालेत भरपूर आणि पुढील कामासाठी फंडिंग सुद्धा.
- फार इंप्रेस झालेला दिसतो माझा बिल्डर मुलगा.
- होय अम्मा, मला तिचा विचार पटतो आहे. शिवाय किचनलेस होम हा चांगला मार्केटिंगचा मुद्दा ठरेल असे माझ्यातला बिझनेसमन मला सांगतोय अम्मा.
- पण आता आमच्यावेळसारखं नाही चिन्नू. जात्यावरचं दळण, पाटा वरवंटा, खलबत्ता जाऊन आता किती सोयीचा झालाय स्वयंपाक ? आपल्याच घरातले ग्याजेटस बघ. नाही का पुरेसे ?
- कितीही नवनवीन उपकरणे आणि सोयीसुविधा आल्या तरी महिन्याकाठी किचनमध्ये लागणार वेळ फार कमी काही झालेला नाही. घर आणि विशेषतः किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यामध्ये दिवसाचा आणि आयुष्याचा एक फार मोठा भाग खर्च होतो. बहुतेक जागी हा वेळ आणि हे श्रम स्त्रियांचे असतात.
- व्हॉट अबाऊट द फूड रुटीनस चिन्नू ? सच लव्हली फूड रिच्युअल्स, एज ओल्ड. डीप रूटेड इन अवर प्राउड हेरिटेज ! व्हॉट अबाऊट देम ? आपलं घर अन्नाभोवती फिरतं. सगळ्यांच्या पसंतीचे खाणे-पिणे यात मजा नाही का ?
- ते काम घरातच स्वतः एकाच व्यक्तीने आयुष्यभर करत राहावे हा हट्ट का ? आमच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल म्हणून तू धड ४ दिवस माहेरी तरी राहिलीस का अम्मा ?
- एक सांगू ? वेडी आहे ती कोण आना का फाना पुईजानेर. तिला काय आम्हा सर्व बायकांपेक्षा जास्त समजतं का ? केस उन्हात पांढरे नाहीत केले हे. स्वयंपाक आणि अन्न घराला बांधून ठेवते. चार दिवस घरी स्वयंपाक नाही झाला तर बाहेरचे खाऊन आजारी तरी पडतील नाही तर कंटाळतील तरी. स्वयंपाकघराविना कसले घर? घराचे हॉटेल होईल.
- आपल्याकडे नाही पण अनेकांकडे घरातले किचन म्हणजे धगधगते अग्निकुंड. ठिणगी पडायचा अवकाश की युद्ध सुरु. टीव्हीवरच्या तुझ्या त्या दळणदळू मालिकांमध्ये किचन आणि डायनींग टेबल हा कट कारस्थानाचा आणि खलबतांचा अड्डा म्हणूनच दाखवले जाते, ते उगाच नाही अम्मा. अनेक कुटुंबात, विशेषतः मोठ्या संयुक्त कुटुंबात अन्न आणि स्वयंपाक याचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जातो. तिथे किचनचे रणांगण होते. फार दूर कशाला मुत्थुमामाकडेच बघ.
- माझ्या माहेरच्या लोकांबद्दल बोलायचं काम नाही चिन्नू. आणि ऐक, असे तर कुणीच कुणासाठी काही करायला नको मग. सगळेच मोल देऊन विकत घ्या. भावना, ओलावा, एकमेकांबद्दल प्रेम राहील का लोकांमध्ये ?
- अम्मा, प्रेम फक्त एखाद्यासाठी स्वयंपाक करून दिला तरच आणि त्यातच असतं का ?
- नॉट दॅट वे चिन्नू, पण प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे ऐकलंय ना ?
- क्लिशे.
- क्लिशे ईज क्लिशे फॉर अ रीझन चिन्नू बेटा.
* * *
- मैं हुसैन. और ये है डॉ. नफिसा, मेरी मंगेतर. वी आर गेटिंग मॅरीड नेक्स्ट मंथ. माझा एक्स्पोर्ट बिझनेस आहे आणि नफिसा नेफ्रोलॉजिस्ट, मुंबईतच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. मेरे चाचा हैं मोहम्मद वाजुद्दीन जिनका आपने जिक्र किया.
- तुमचे चचाजान सांगत होते की तुम्ही आधीच ‘किचनलेस होम’ वाले आहात, खरे का ?
- हो, साधारण २००८ सालापासूनच.
- वॉव. कसे जमवले ? घरातल्या लोकांना कसे पटवले ?
- पटवायचे काय त्यात ? हिचे आणि माझे आई- बाबा दोघे डॉक्टर आहेत. फुलटाईम वर्किंग कपल्स. आमच्यासारखेच. सगळ्यांना सोयीचं आहे किचनलेस होम.
- पण मुळात ही आयडिया आली कशी ?
- मैं बताती हूं. आमचा बोहरा मुस्लिम समाज व्यापार आणि शिक्षण दोन्हीकडे आधीपासून पुढे आहे. सर्वांनीच, विशेषतः स्त्रियांनी भरपूर शिकावे आणि पूर्णवेळ व्यवसाय-नोकरी करावी यावर आमच्या समाजाचा भर आहे. मॅनेजिंग किचन अँड फुलटाईम करियर डोन्ट गो हॅन्ड इन हॅन्ड.
- मग ? तुमची संस्था FMB, त्याबद्दल तुमचे काका सांगत होते ते काय ?
- आमचे धर्मगुरू सैय्यदना. समाजाचे मार्गदर्शक, आमचे मौला, वली, खलिफा. ५२ वे धर्मगुरू सैयदाना बुऱ्हानुद्दीन यांच्या कल्पनेतून फैझ-अल-मावैद-अल-बुरहानीया म्हणजे FMB हे अन्नछत्र सुरु झाले आधी. गरिबांसाठी फुकट खाना. रोज, दिवसातून तीन वेळ. समाज श्रीमंत असल्यामुळे लोकांना 'फुकट' अन्नाची गरज कमी. सैयदना स्वतः स्रियांनी स्वयंपाकघरातून मुक्त होऊन स्वतःच्या व्यवसायाकडे आणि करियरकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे या मताचे. त्यामुळे पुढे सर्वांसाठीच 'तयार' खाना दिवसातून १-२-३-४ वेळेला, जसे हवे तसे उपलब्ध करून द्यावा यावर त्यांचा भर. ब्रेकफास्ट, लंच, मिड इव्ह स्नॅक्स, डिनर. दॅट वॉज द स्टार्ट.
- सर्वांना फुकट ?
- नाही. फुकट घेणे आम्हाला कमीपणाचे वाटते. ठराविक रक्कम महिन्याला भरून ही सोय मिळवता येते आणि आर्थिक अडचण असेल तर विनामूल्य. सर्व सधन कुटुंबे पैसे देतांना स्वतःतर्फे काही जादा पैसे भरून अन्य कोणाला तेच अन्न कमी पैश्यात किंवा विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था करतात. गुप्तपणे. थोडे क्रॉस सबसिडी सारखे. अन्नासाठी पैसे कमी पडलेच तर समाजाच्या संयुक्त फंडातून दिले जातात.
- वा. म्हणजे घरी किचन नाहीच ? किती लोक वापरतात ही सोय ?
- भरपूर. साधारण १ लाख बोहरा मुंबईत राहतात. फोर्ट भागात बद्री महल हे समाजाचं मुख्यालय आहे, तेथून हे कामकाज चालते. आम्ही लोकं स्वतःच्या कामातून वेळ काढून 'सेवा' म्हणून काम करतो. अन्न शिजवायला, त्याचे पॅकिंग आणि वाटप करायला पगारी सेवक मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत, त्यामुळे काम सोपे आणि व्यावसायिक पद्धतीने होते. आहारतज्ञ महिन्याचा मेन्यू बनवून देतात, समाजातील लोक वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या, स्वच्छतेच्या आणि एकूणच कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे काम करतात.
- जास्त कमी नाही होत का ? वेस्टेज वगैरे ?
- त्यासाठी एक 'दाना कमिटी' आहे. सर्व लोकांना जेवण पाठवले की उरलेल्या अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाही. ते अन्न गोरगरिबांना विनामूल्य वाटतो, अगदी खाली सांडलेल्या अन्नाचे कण नीट गोळा करून मांजरी आणि पक्ष्यांसाठी ठेवतो आम्ही.
- मुंबईबाहेरच्या लोकांचं काय ?
- जिथे जिथे समाजाची पुरेशी संख्या आहे तिथे आहे ही सोय. गुजरातमध्ये राजकोट सारख्या छोट्या शहरात २२०० बोहरा परिवार आहेत आणि त्यांना सोयीच्या ठिकाणी ५ वेगवेगळी कम्युनिटी किचन आहेत. राजस्थानातल्या कोटा शहरात १५०० बोहरा एकाच भागात राहत असल्याने एकच मोठे किचन त्यांना पुरेसे आहे. सुरत, खंबात, पाकिस्तानात कराची, श्रीलंकेत कोलंबो, सब जगह शुरू है. दिन में चार दफे. घरमें किचन नही है, किचनलेस होम इज अ रियालिटी !
- अरे यार. माझे 'किचनलेस होम' वाले अपार्टमेंट्स म्हणजे काही नवीन नाही. यू गाईज आर ऑलरेडी डुईंग इट लाईक अ प्रो. आशियाना विदाउट भटारखाना !
* * *
तर मित्रांनो, बिल्डर चिन्नू उर्फ चिन्नासामी आणि त्याच्या गोतावळ्यातला हा संवाद संपला नाहीये अजून. जितने मुंह उतनी बातें. चर्चा सुरूच आहे, ती तुम्ही पुढे न्या; तुमचे, तुमच्या मित्रांचे, कुटुंबियांचे, कल्पनेतल्या मित्रांचे मत - संवाद लिहा. थोडे विचारमंथन होईल, झाली तर चिन्नूला मदतच होईल. व्हॉट से ?
* * *
आपलं मूल (म्हणजे ट्रॅडिशनली
आपलं मूल (म्हणजे ट्रॅडिशनली आपल्या प्रेमाच्या जोडीदाराबरोबरचं आपण स्वतः नऊ महिने पोटात वाढवून जन्माला घातलेलं) ह्या अतिशय जिव्हाळ्याच्या, खाजगी आणि ज्याबाबतीत जगाच्या पाठीवरची कुठलीही सेन आई सहसा कुठलेही कॉम्प्रमाईझ करत नाही. तिथेही अनेक कारणांमुळे (करिअर ते मानसिक/ शारिरिक अपरिहार्यता असे कुठलेही) सरोगसी वरदान आणि ऑब्विअस चॉईस ठरत आहे. प्रियांका चोप्राचे ऊदाहरण ह्याबबतीत बोलके तर आहेच पण अनेक कॉर्पोरेट्स सुद्धा वीशी-तिशीतल्या फीमेल इम्प्लॉईजना एग फ्रीज करण्यासाठी इन्सेटीव्ज देतात. म्हणजे हे प्रकरण फक्त सेलिब्रिटीज पुरते मर्यादित नसून कॉर्पोरेट्स मध्ये काम करणार्या, गे कपल्स , सायकोलॉजिकल/बायोलॉजिकल ईश्यूज असणार्या सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा हा पर्याय निवडत आहेत.
तर माझा मुद्दा असा होता की मुलांच्या बाबतीत स्त्रिया सरोगसी ते अॅडॉप्शन (ह्यात पुन्हा मेल पार्टनरच नको मग लिमिटेड रिलेशनशिपनंतर प्रेग्नंट राहणे ते स्पर्म बँक मधून मदत घेऊन प्रेग्नंट राहणे असे अनेक पर्याय आहेतच) करता असे पर्याय निवडत असतांना किचनच्या बाबतीतही ट्रॅडिशनल किचनला नाकारून (ह्या नाकारण्यामागचे कारण काहीका असेना) कम्युनिटी किचन किंवा रेस्टॉरंट हा निर्णयही त्या घेऊ शकतातच आणि त्यासाठी त्यांना कोणी जज करावे हे एथिकल वाटत नाही. मॉरल डिलेमा त्या बाईचा असू शकतो पण त्याच्याशी तिलाच डील करायचे आहे.
फक्त अॅट द कॉस्ट ऑफ काय? >> ही कॉस्ट म्युचुअली कन्सेटिंग पार्टीजना लीगल परिघात राहून ठरवू देत ना. हाच प्रश्न नॉर्मल प्रेग्नन्सी च्या बाबतीत सुद्धा विचारता येऊ शकतोच ... मुलांना जन्माला घालायचे 'अॅट द कॉस्ट ऑफ काय'? चाईल्ड बर्थ दरम्यान कायम स्वरूपी हेल्थ प्रॉब्लेम्स ते डेथ असे काहीही होऊ शकतेच.
पुन्हा स्पर्म बँक सुद्धा आहेतच की जो मुद्दा सरोगेट मदर्स ना लागू होतो तोच तात्विकरित्या स्पर्म डोनर्सना सुद्धा लागू होतो. फक्त डोनर्स आणि सरोगेट्सच्या लेबर मध्ये कमालीची तफावत आहे आणि असोसिएटेड काँपेनसेशनमध्ये सुद्धा.
मान्य सरोगेट्स सोशोईकॉनॉमिक पातळीवर तुलनेने खालच्या पायरीवर असतील पण आयुष्यभर दहा घरची धुणी भांडी करून पै पै जोडत दोन मुलांना वाढवायचे की दोनदा सरोगसी करून त्या मुलांच्या भविष्याची कायमची चांगली तरतूद करायची हे त्या बाईलाच ठरवू देत जसे घरात किचन असू द्यावे की नको.
सरोगसी आणि रोजचे अन्न याची
सरोगसी आणि रोजचे अन्न याची तुलनाच पटली नाही. >> थेट तुलना करायचा हेतू नाही... दोन्ही ऊदाहरणातून (किचन वा प्रेग्नंसी) जर ट्रॅडिशनली काम स्त्रीचे मानण्यात आले आहे तर चॉईस सुद्धा स्त्रीची असावी आणि त्यासाठी तिला जज केले जाऊ नये असेच सुचवायचे आहे.
सरोगसी म्हणजे दुसर्या बाईवर
सरोगसी म्हणजे दुसर्या बाईवर ते मातृत्व फोर्सच केले जाते किंवा exploitation च असते असे थोडीच आहे? बाय चॉइस कुणी ते काम पैसे घेऊन करत असेल तर आपण कोण जज करणारे?कोण कुणाचा उद्धार करतेय असं नाही पण त्या कामासाठी पैसे देणारे आहेत तसे ती सर्विस देऊन पैसे मिळवण्याचा मार्ग कोणाला तरी निवडावासा वाटला. ते इल्लीगल पण नाही. मग काय इश्यू आहे? >> मै, इश्यू पर से काही नाही.
मला जज तर अजिबातच करायचे नाही.
मार्केट फोर्सेस, डिमांड सप्लाय लावायला माझी काही हरकत नाही. अमेरिका - कॅनडात हेल्थकेअर नियम आणि त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थित होत असेल आणि यात एक्सप्लॉयटेशन होत नसेल. पण हेच एक्स्टापोलेट करुन सरोगसी थर्ड वर्ल्ड देशांसाठी डॉलर मिळवून देणारी दुभती गाय होईल आणि तिकडे कितपत कायदे असतील आणि ते पाळले असतील त्याबद्दल वेगळे बोलायची गरजच नाही. माझा फार अभ्यास नाही, पण कदाचित आजही होत असेल.
टेक्सटाईल, चिप मॅन्युफॅक्चरिंग ही चटकन आठवली अशी उदाहरणे आहेत. बांग्लादेश. कंबोडिआ मधील टेक्सटाईल वर्कर्सची अवस्था/ ज्या प्रकारे ते हाताळलं जातं ते ५-६ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातांच्या वेळी समजल्या नुसार भयंकर होतं. ते वर्कर आनंदाने काम करतात, कारण ते काम गेलं तर भुके मरायची वेळ येईल. त्यांचे मालक आनंदाने काम करतात, आपण आनंदाने कपडे घेतो कारण इतके स्वस्त कपडे कोणाला नको आहेत? थोडक्यात नियम - आणि त्यांची पाश्वात्य सँडर्ड नुसार अंमलबजावणी होत नसेल तर इक्सप्लॉयटेशनचा धोका मला फार वाटतो.
बाईला ठरवू दे. अगदीच. फक्त त्यातील धोके, पैसे इ. इ. समिकरणे आली.... कदाचित मला नीट मांडता येत नसेल.... की माझ्या मनात नकळत वेश्या व्यवसाय करायचा का नाही हे सुद्धा बाईला ठरवू दे हे आलंच. पण पोटाची खळगी भरायला देह विकायला लागू नये, जसं वाटतं. तसंच सरोगसीत जराही एक्सप्लॉईट होण्याची शक्यता असेल तर त्या मार्गाने पैसे मिळावे का? हा माझ्या मनात तरी संदेह येतो.
मै +१
मै +१
अमित, तुझा मुद्दा फारफेच्ड वाटला. भारतातही सरोगसी कायदे मजबूत आहेत. आणि परदेशी पालक असतील तर अजून कडक. इथली वकील मंडळी सांगतीलच, पण सरोगसीमधे एक्सप्लॉयटेशन(च) होत असेल असं तू गृहित धरून तुझा मुद्दा मांडतोयस असं वाटतंय.
बाकी मूळ मुद्द्यावर - स्वैपाकघर पूर्णपणे न काढता एक लहानसं किचन / किचनेट आणि कम्यूनिटी किचनची सोय असलेली व्यवस्था आवडेल.
हे बरेच लोकांनी लिहिले आहे,
हे बरेच लोकांनी लिहिले आहे, पण
जर छोटे किचन दिले तर मूळ संकल्पनेलाच तडा नाही का जाणार?
तिथे मग घरातली स्वयंपाक करणारी व्यक्ती कमी अधिक राबवली जाणारच.
भारतात जेंडर सिलेक्शन कायदे
भारतात जेंडर सिलेक्शन कायदे ही कागदावर मजबुत आहेत. स्त्री-भ्रूण हत्येची भारतात काय परिस्थिती आहे?
चाईल्ड ट्रॅफिकिंगचे कायदे ही भारतात कडकच आहेत. किती लहान मुलं ट्रॅफिकिंगची बळी आहेत?
भारतातील टीअर-१ शहरं सोडली तर वैद्यकीय आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्था आणि सिस्टिम्स वर दररोज इतकं वाचनात येतं की माझा विश्वास उडालेला आहे.
भारतात आता कमर्शिअल सरोगसी पूर्ण बंद केली आहे. अल्ट्रुईस्टिक चालेल ती सुद्धा जवळच्या नात्यात पण जवळचे नाते म्हणजे काय याची धड व्याख्या कायद्यात नाही अशा अर्थाची अर्टिकल्स सापडली. तो स्त्री स्वातंत्यावर घाला आहे असं ही लोकांचं मत आहे.
https://thewire.in/law/surrogacy-ban-assault
पण तो कायदा येण्यापूर्वी काय परिस्थिती होती तर गावं/ कुटुंबं सरोगसीच्या पैशावर गुजराथ मध्ये चालत होती
https://www.theindiaforum.in/article/surrogacy-biomarkets-india-troublin...
आणखी शोधलं तर बरंचं सापडेल. उद्या वेळ झाला तर वाचेन आणखी.
अर्थात भारतात कायद्याचा किती उपयोग असतो आणि कशा पळवाटा लोक करतात ते जाणून असल्याने एक्सप्लॉयटेशनच्या भितीने ओल्याबरोबर सुके ही न्यायाने मी तरी ताकही फुंकरून पिणेच पसंत करेन.
तीच गत इच्छा मरणाची. त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे पण कॅनडात. भारतात ते नकोच, कारणे अर्थात पूअर कायदा आणि सुव्यवस्था.
>>तिथे मग घरातली स्वयंपाक
>>तिथे मग घरातली स्वयंपाक करणारी व्यक्ती कमी अधिक राबवली जाणारच.>>
तसे तर 'चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल.' या सेटअपमधेही होवू शकतेच. 'राबवले जाणे' नको म्हणून किचनच नको यापेक्षा किचन आहे, पण 'घरातील एकाच व्यक्तीला राबवणे नाही' हा बदल होणे जास्त महत्वाचे. जोडीला घरातील सज्ञान व्यक्तींचा सध्याचा दिनक्रम पहाता कम्युनिटी किचन मधून घरपोच जेवणाची सोय असेलच.
>>तिथे मग घरातली स्वयंपाक
>>तिथे मग घरातली स्वयंपाक करणारी व्यक्ती कमी अधिक राबवली जाणारच.>>
तसे तर 'चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल.' या सेटअपमधेही होवू शकतेच.>>> +१ करेक्ट.
चर्चा सरोगसी मुळे भरकटत आहे ह्याची नोंद घ्यावी. बाकी उत्तम मुद्दे समोर येत आहेत.
तसे तर 'चोवीस तास किचन आहे.
तसे तर 'चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल.' या सेटअपमधेही होवू शकतेच.
>>>>
पण मग ते चार भिंतीच्या आत नाही राहणार.
आम्ही हे होऊ नये या कारणासाठी असा सेट अप प्रीफर केला असा आव नाही आणता येणार.
फरक पडणारच.
जसे ईथेही लोकं बिनधास्त आदर्शवादी विचार मांडत असतात. कारण कोण कोणाच्या घरात बघायला जात नाही.
जर सर्वांच्या घरात मायबोलीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि त्याचे थेट प्रक्षेपण ईथे कोणालाही बघायला उपलब्ध केले तर कित्येक आदर्शवादी विचार लोप पावतील
हे मलाही लागू.
सांझा चुल्हा ही संकल्पना
सांझा चुल्हा ही संकल्पना आपल्याकडे (पंजाबात) आहे / होतीच ना. (माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक फक्त तंदूर करता) भाज्या आपापल्या घरी शिजवत असावे. 'सांझा चुल्हा' नावाची एक सिरियल दुरदर्शनवरून प्रसारित होत असे, असेही आठवत आहे.
सध्याच्या जमान्यात व्यक्तीस्वातंत्र्यवाद जोरात असताना, एकाच घरातील भावा-भावांची स्वयंपाक घरे विभागली जात असताना, सामुहिक स्वयंपाकघर कसे आणि कितपत स्विकारले जाईल ह्याबद्दल कुतुहल वाटते आहे.
एकाच घरातील भावा-भावांची
एकाच घरातील भावा-भावांची स्वयंपाक घरे विभागली जात असताना
>>>
भावाभावांमध्ये तुलना इर्ष्या जास्त असते. ते ईतरांबाबत लागू होत नाही. मानवी स्वभाव आहे तो.
एक साधी शंका, डबे किचन
एक साधी शंका, डबे किचन मधून घरी आणून खाउ. पण मग ते डबे प्लेटा घास णार कुठे? का ते परत देउन टाक णार ़ खरकटी भांडी.
disposable
disposable
https://www.archdaily.com
https://www.archdaily.com/793370/the-kitchenless-house-a-concept-for-the...
>>आम्ही हे होऊ नये या
>>आम्ही हे होऊ नये या कारणासाठी असा सेट अप प्रीफर केला असा आव नाही आणता येणार.>> मुळात आव आणायचाच कशाला? हळू हळू का होईना पण बदल 'आतून' घडणे महत्वाचे. या गोष्टी लोकांसाठी थोड्या न करायच्या असतात!
मुळात आव आणायचाच कशाला?
मुळात आव आणायचाच कशाला?
>>>
मी कुठे म्हणालो आव आणने गरजेचे आहे.
पण जो या सेटअपच्या मार्केटींगचा मूळ मुद्दा आहे किचनलेस होम आणि ते का म्हणून असले पाहिजे.. त्यालाच धाब्यावर बसवून घरात आणखी एक छोटे किचन देण्यात काय अर्थ आहे? मग वेगळेपण उरलेच नाही. असे तर आमचे घरही आहेच. ८० टक्के आम्ही बाहेरचे खातो आणि २० टक्के घरचे..फरक ईतकाच की आमचे कम्युनिटी किचन स्विगीवाला आहे
>>आव नाही आणता येणार.>> हे
>>आव नाही आणता येणार.>> हे तुम्ही म्हणालात. म्हणून म्हटले की कशासाठी आणायचा आव?
किचनलेस होम मार्केट करताना 'तुम्हाला वाटले तर कम्युनिटी किचनमधे शिजवू शकता' म्हणावे लागते यातच सर्वकाही आले. मागाल ते आयते मिळत असताना जर का व्यक्ती स्वतः स्वयंपाक करु इच्छित असेल तर त्याचे तसेच कारण असणार आणि कम्युनिटी किचन तुमचे खाजगीपण नाही जपू शकणार.
पण मग अश्यांनी ज्यांना खाजगीत
पण मग अश्यांनी ज्यांना खाजगीत स्वयंपाकाची हौस मिटवायची आहे त्यांनी या किचनलेस सोसायटीची पायरी चढावीच का?
दोघा चौघांच्या मागणीमुळे एखादीला किचन नकोच आहे तिच्याही गळ्यात मारले जाण्याची शक्यता नाही का निर्माण होणार?
पण मग अश्यांनी ज्यांना खाजगीत
पण मग अश्यांनी ज्यांना खाजगीत स्वयंपाकाची हौस मिटवायची आहे त्यांनी या किचनलेस सोसायटीची पायरी चढावीच का?>>>> म्हणूनच सांगितले की छोटेसे स्वतंत्र किचन असेल तरच आवडेल. किचनलेस सोसायटी असेल तर मग ती किचनलेसच मार्केट करा ना! गरज पडल्यास तुम्हाला कम्युनिटी किचन वापरता येइल हे सांगून काय नसेल ते अधोरेखीत होते.
एखादीला किचन नकोच आहे तिच्याही गळ्यात मारले जाण्याची शक्यता>> आठ कोटी टाकून घर घेतानाही जर का 'किचन गळ्यात मारले जाण्याची' भीती वाटणार असेल तर मग कठीण आहे.
छान लेख आणि चर्चा.
छान लेख आणि चर्चा.
मला वाटतं की ज्यांना किचनलेस घरात रहायला आवडेल, त्यांनी तो पर्याय खुशाल निवडावा. पण त्यासाठी 'स्त्रियांना राबावे लागते म्हणून' हे कारण न पटण्यासारखे आहे. ज्यांना स्त्रियांना राबवायचेच आहे, ते स्वयंपाक नाही तर अन्य बर्याच गोष्टी शोधून काढतील; किंबहुना अनेक पर्याय आजही उपलब्ध आहेतच त्यांना. द ग्रेट इंडियन किचन हा एक सर्वात मोठा पर्याय असल्यामुळे तो डोळ्यात भरतो इतकंच. पण खरोखरच तो प्रश्न सोडवायचा असेल तर स्त्रियांना राबवणे हा आपला हक्कच आहे - ही मानसिकता गेली पाहिजे. ती काही स्वयंपाकघराबरोबर घराच्या बाहेर जाणार नाही. उलट मुळातच ज्यांना घरी शिजवलेलं अन्न कधी न खाण्याबद्दल काही आक्षेप नाही, तेच हा पर्याय निवडणार आहेत ना? कुणाचं मतपरिवर्तन होऊन, पारंपरिक मतं, स्वतःच्या समजुती वगैरेंमध्ये आमूलाग्र बदल होऊन कुणी किचनलेस होईल अशी शक्यता नगण्य आहे. ज्यांची ती मानसिकता आहे, त्यांच्यात यामुळे काही बदल होईल असं वाटत नाही (इथे किचन ही वैयक्तिक गरज आहे म्हणून किचनलेस पर्याय न निवडणारे - ह्या लोकांबद्दल मी बोलत नाहीये; कृ गैरसमज नसावा). मानसिकता बदलणे ही एक खूप संथ आणि दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे. आपण सर्वही त्या प्रक्रियेच्या कुठल्या ना कुठल्या मधल्या टप्प्यांवरती आहोत.
परदेशात स्थायिक होऊन मग तिथल्या लिंगनिदान चाचणीनंतर स्त्रीभ्रुणाला कमी लेखणारे (तिथेही हत्या करणारे असतील कदाचित), शिवाशिव पाळणारे, जातीनिहाय भेदाभेद करणारे भारतीय आहेतच की! वेगळ्या राहणीमानाचा पर्याय उपलब्ध झाला म्हणजे मानसिकतेत बदल होतोच असं काही नाही.
आठ कोटी टाकून घर घेतानाही...
आठ कोटी टाकून घर घेतानाही...
>>>
हे सात कोटी आठ कोटी या धाग्यावर बरेच वाचले आहे. काय असा विचारसरणीत फरक असतो एखाद्या सातआठ कोटींच्या घरात राहणाऱ्यांच्या आणि एखाद्या दिडदोन कोटींच्या घरात राहणाऱ्यांच्या? आठ प्लस कोटींच्या घरातील स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य असतेच का?
रचनात्मक चर्चेसाठी पुन्हा
रचनात्मक चर्चेसाठी पुन्हा एकदा आभार मंडळी. इथले काही मुद्दे मी चिन्नूकडे मांडले.
१) या प्रकल्पातील घरे खूपच महाग दिसत आहेत.
चिन्नू उवाच :
प्रोजेक्ट 'सुपर एक्सक्लुझीव' श्रेणीखाली मार्केटमध्ये आणायचे आहे. त्यामुळे ही घरे जाणीवपूर्वक जास्त महाग असतील. माझ्या रिसर्च प्रमाणे गुरगाव, मुंबई, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये Ultra luxury super sized अशा घरांसाठीची डिमांड जोरात आहे. कन्सेप्टच्या दृष्टीने हे सेलिब्रेटी - अतिश्रीमंत लोकं जे करतील त्याचे अनुकरण करणारा वर्ग हा माझा पुढचा ग्राहक होऊ शकतो.
२) किचनलेस होमची गरज ही बहुधा अशाच गटांना जास्त आहे, जेथे अजून हे स्त्रियांचे काम व हे पुरूषांचे अशी मेण्टॅलिटी आहे.
चिन्नू उवाच :
- That covers almost entire urban population of the world ! ग्रामीण भागाबद्दल बोलत नाही कारण तिथे मी किचनयुक्त किंवा किचनलेस कोणतीच घरे बांधण्याची शक्यता नाही. स्त्रिया आणि किचन काम म्हणशील तर एकवेळ आमच्या बंगळुरुतल्या कब्बन पार्कात वाघ दिसेल, फक्त पुरुषच पूर्णवेळ किचन सांभाळत असलेले घर दिसण्याचा चान्स किती ?
३) आपल्या लोकांच्या खाण्यात
३) आपल्या लोकांच्या खाण्यात वैविध्य फार आहे, कस्टमायझेशनची गरज अमर्याद आहे.
चिन्नू उवाच :
पहिल्या फेज मध्ये २० ते ३० कुटुंबे राहतील असे नियोजन आहे. मॅक्स १५० ते २०० लोकं. मॅनेज होईल असे वाटते.
४) प्लेजर डिनायीड इज द प्लेजर मोस्ट सॉट. किचन नसेल तर लोकं घरात मुद्दाम काहीतरी बनवतील, हॉस्टेलमध्ये कडक मनाई असते तेंव्हा हॉटप्लेट लावून मॅग्गी करतात, दारूबंदी केली की लोकं लपून दारू पितात, तसे.
चिन्नू उवाच :
मे बी.
किचनलेस होम हा लाईफस्टाईलचा मुद्दा आहे. चॉईस आहे. लोकांनी सखोल विचार करूनच इथे घर घ्यावे असा माझा आग्रह आहे. प्रकल्पात किचनेट / पॅन्टरी वगैरे दिली की माझा प्रमुख selling point निकालात निघतो. पॅन्टरी कॅन ग्रो अप टु फुल्ल किचन इन नो टाइम. त्यापेक्षा फुल्ल लक्झरी किचन दिलेले काय वाईट?
हे हे काय होते ते लिहा
हे हे काय होते ते लिहा बिलिडिन्ग बांधल्यावर आम्ही किचनच्या बाल्कनीतून बघू. अमीरोंके चोंचले.
हो. इथेही सहमत अनिंद्य.
हो. इथेही सहमत अनिंद्य. सध्याची आधुनिक स्वयंपाकघरे फारच लहान होत चालली आहेत. कधी भाउबिजेसारख्या समारंभाला घरातली धरून आठ दहा माणसे असली तरी जेवण रांधताना खूपच गैरसोय होते. बाहेर जाऊ म्हटलं तर नेमके त्या दिवशी सगळी हॉटेल्स रेस्तरँ भरलेली असतात. रस्त्यावर भयानक ट्रॅफिक असतो. डिलिव्हरी सुद्धा उशीराने येते. पुन्हा ताटे प्लेट्स घासणे आलेच.
त्यापेक्षा फुल्ल लक्झरी किचन बरे.
उप्पर मजदूर लोगां का पोस्ट नै
अमीरोंके चोंचले.….
उप्पर मजदूर लोगां का पोस्ट नै पढे क्या मामी ? वो लोगां तो क़तई अमीर नै
लेख , प्रतिसाद, लोकांची मतं
लेख , प्रतिसाद, लोकांची मतं, त्यावर चिन्नूचं मत वाचायला मजा आली.
> वो लोगां तो क़तई अमीर नै>> मजूर वर्ग (गरीब) आणि अति श्रीमंत वर्ग सोडून मध्यमवर्गालाच जास्त गरज पडेल छोट्या का होईना किचनची. ते मजूर लोगाना रोज जेवायला भात , आमटी, पिठलं/ एक भाजी , भाकऱ्या बस होईल, कधीतरी सणासुदीला वेगळा पदार्थ. मध्यमवर्गाला ते पण हवं, सलाड ,पिझ्झा, मोमो पण हवे, मध्येच रवा बेसनाचा लाडू पण हवा.
आणि चिन्नू उवाच मध्ये पहिल्याच उत्तरात म्हणलाय न तो की डोळ्यासमोर अतिश्रीमंत वर्गच आहे.
आम्ही किचनच्या बाल्कनीतून बघू. अमीरोंके चोंचले.
हे वाक्य आवडलं अमा
>>आठ प्लस कोटींच्या घरातील
>>आठ प्लस कोटींच्या घरातील स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य असतेच का?>> निर्णय स्वातंत्र्य नसेलच तर मग ते अनेक पातळ्यांवर नसेल. त्यात स्वयंपाक- किचन हे हिमनगाचे फक्त टोक.
माझ्या नजरेने - कामाचे स्वरुप आणि एकंदरीत दिनक्रम बघता हाऊस किपर आणि कुक असा स्टाफ पूर्णवेळासाठी ठेवण्याची गरज नाही, असा स्टाफ मॅनेज करायची जबाबदारी नको आहे मात्र जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच दर्जाची सेवा अपेक्षित आहे असा एक वर्ग आहे. या मंडळींना किचन ड्यूटी गळ्यात पडेल ही भीती नाहीये तर त्यासाठी द्यायला वेळ , ऊर्जा नाहीये. साहाजिकच चांगल्या गुणवत्तेचा आहार घेणे कठीण जाते. अशांसाठी हाउस किपिंग सर्विस आणि २४ तासाची ऑनसाईट किचन सर्विस असलेल्या सदनिका भाडेतत्वावर उपलब्ध झाल्या तर सोईचे असेल.
अशांसाठी हाउस किपिंग सर्विस
अशांसाठी हाउस किपिंग सर्विस आणि २४ तासाची ऑनसाईट किचन सर्विस असलेल्या सदनिका भाडेतत्वावर उपलब्ध झाल्या तर सोईचे असेल.>> आहेत ना सर्विस अपार्ट मेंट्स फार मस्त अस्तात पण महाग पडतात मध्यमवर्गियास.
गेले दोन दिवस लिहू लिहू
गेले दोन दिवस लिहू लिहू म्हणून राहून जातंय.
सुमारे १२ वर्षापूर्वी एक कॉन्सेप्ट म्हणून कम्युनिटी किचन डिझाईन केलं होत. ( फक्त पेपर वर, प्रोजेक्ट होतं )
Extended kitchen जे तुमच्या घराचा भाग होऊ शकतं पण घरात नाही.
त्यात मी अशी कल्पना मांडली होती की स्वयंपाक करायला जरी आवडत असेल तरी, - एकट्या दोघांसाठी हवी ती सगळी ग्रोसरी आणणे हे वाया जातं ( उदा. इटालियन करायचं तर त्यासाठी लागणारे सगळे हर्ब्ज आणून फुकट जाणार, जपानी करायचं तर ते सामान एकदा दोनदा वापरलं जाणारं )
- १५ किंवा जास्त माणसांसाठी करायचं तर तशी भांडी घरात नाहीत.
- शिवाय स्वयंपाकाची पूर्वतयारी, नंतरची भांडी घासणे आणि आवरणे हे सगळं खूप वेळखाऊ आणि नावडीच काम होतं.
यावर उपाय म्हणून हे कम्युनिटी किचन
इथे सर्व ग्रोसरी असेल, शेफ , मदतनीस, भांडी असतील. आठ दहा गॅस stov असतील.
तुम्ही म्हणाल त्या जेवणाची सगळी पूर्वतयारी शेफ करून ठेवेल. आणि तुमचं शिजवून झालं की नंतरची आवरा आवर पण तिथला स्टाफ करेल.
उदाहरण म्हणजे -
मला आज २० जणांसाठी रात्रीच्या जेवणात पावभाजी करायची आहे तर मी सकाळी / आदल्या दिवशी किचन बुक करणार ( ऑनलाईन)
- मला लागणारं काही खास साहित्य असेल ( जसं पावभाजी मध्ये बीट घालायचं आहे वगैरे )
तिथला शेफ वीस पावभाजी साठी लागणाऱ्या भाज्या चिरून बिरून सगळं तयार ठेवणार.
मी ७ वाजता ऑफिसातून तिथे जाणार
१० मिनिटात पावभाजी फोडणी (!) घालणार.
ती शिजे पर्यंत तिथे टाईमपास करत चहा पिणार.
तयार झाली की तिथला मदतनीस छानपैकी पॅक करून मला हातात देणार ( मी माझे स्तीलचे डबे न्यायचा ऑप्शन आहेच)
तिथली साफफाई वगैरे तेच लोक करणार.
आणि घरी येऊन आम्ही आम्हाला हवी त्या चवीची, घरात बनवलेली पावभाजी खाणार.
भाज्या आणा, धुवा, चिरा, भांडी घासा वगैरे पासून सुटका.
हेच सगळं मला ५० लोकांसाठी करायचं तरी जमू शकेल. किंवा अगदी एकासाठी करायचं तरी जमू शकेल.
यात काही addon जसं, सलाड, गोड पदार्थ, किंवा चपात्या तिथे रेडिमेड उपलब्ध ठेवता येतील.
म्हणजे मी मला हवी ती भाजी केली, आणि पोळ्या, सलाड विकत घेतल्या.
यात कमी कष्टात हव्या त्या चवीचं जेवण मिळू शकतं.
लहान किंवा मोठ्या प्रमाणात जेवण शिजवता येऊ शकतं.
नंतरची आवराआवर करावी लागत नाही.
अगदी बेसिक functional किचन असेल तरी रहाता येईल ( जपान मध्ये काही ठिकाणी अगदीच बेसिक किचन असतात हे डोक्यात ठेवून हे प्रोजेक्ट केलं होतं. )
Pages